Marathi Bible Reading | Friday 22nd November 2024 | 33 Week in Ordinary Time

सामान्य काळातील ३३वा  सप्ताह 

शुक्रवार २२ नोव्हेंबर  २०२४

  ✝️

 माझे घर प्रार्थनेचे घर होईल, असा शास्त्रलेख आहे, परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे." My house is the house of prayer. But you have made it a den of thieves.


 ✝️ 




संत सिसिलिया

कुमारिका, रक्तसाक्षी (२५०)

संत सिसिलिया हिचा जन्म दुसऱ्या शतकाच्या अखेरीस आलेक्झांडर सेवेरस ह्या सम्राटाच्या कारकीर्दीत रोममध्ये झाला. बालपणापासून तिला संगीत कलेची विलक्षण आवड होती. तशी ती एका मूर्तिपूजकाच्या घरी जन्माला आली होती; परंतु तिला ख्रिस्ती वातावरणात लहानाचे मोठे करण्यात आले. लहानपणीच तिने केवळ देवाच्या प्रेमाखातर कुमारिका राहण्याचा निर्णय घेतलेला होता. ती उपवास, प्रायश्चित्त आणि सर्व प्रकारची दयाकृत्ये करीत असे. परंतु तिच्या पालकांची मात्र तिच्यासाठी वेगळीच योजना होती. त्यांनी तिचे लग्न व्हेलेरियन नावाच्या एका सरदारपुत्राशी ठरविले आणि मोठ्या थाटामाटात व धुमधडाक्यात ते पार पडले.
लग्नाच्या सायंकाळी आपल्या कानात लग्नाचे वाधसंगीत घुमत असतानाच आपण देवाकरिता आमरण कुमारिका राहण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे तिने स्वत:शी नूतनीकरण केले. रात्री जेव्हा ती आपल्या पतीसह आपल्या निजावयाच्या खोलीत गेली तेव्हा तिने धीर करून त्याला 'हटले. "मला आपणांस एक गुपित सांगावयाचे आहे. आपणास ठाऊक असेलच की देवाचा एक दूत माझ्यावर लक्ष ठेवून आहे. जर आपण माझ्याशी वैवाहिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केलात तर तो कोपिष्ट होईल आणि आपणास भयंकर यातना भोगाव्या लागतील आणि जर आपण माझ्या कौमार्याचा आदर राखला तर माझ्याप्रमाणे तो देवदूत आपणावरही प्रेम करील व आपले रक्षण करील.' "

एक शूर सरदारपुत्र अशा प्रकारच्या भावनिक आव्हानाला सहज बळी पडणारा नव्हता, उलट त्याने सिसिलिया हिला तो देवदूत कुठे आहे तो आपणास दाखविण्याची विनंती केली आणि जर आपणास तो देवदूत दिसला तर आपण सिसिलियाची विनंती आयुष्यभरासाठी मान्य करण्याचे वचन त्याने दिले.
त्यावर सिसिलियाने उत्तर दिले की, “जर आपण एकाच खऱ्या व जिवंत
देवावर विश्वास ठेवून स्नानसंस्काराचे पाणी स्वीकारलेत तर आपणांस तो
देवदूत दिसू शकेल." उत्सुकतेपोटी व्हेलेरियनने तेही मान्य केले.
सिसिलियाने व्हेलेरियन ह्याला विशप अर्बन ह्यांच्याकडे पाठविले. त्यांनी व्हेलेरियनला बाप्तिस्मा दिला आणि आनंदाश्चर्याने तो थक्कच झाला. आपल्या घरी परतत असतानाच सिसिलिया एका पांढऱ्या शुभ्र देवदूताच्या शेजारी उभी असलेली त्याच्या दृष्टीस पडली. तो देवदूत व्हेलेरियनच्या जवळ आला आणि त्याने दोघांच्या मस्तकावर गुलाब व जुईच्या फुलांच्या पाकळ्यांची वृष्टी केली.
ह्या संपूर्ण घटनेने व्हेलेरियन अंतर्बाह्य पालटून गेला. त्याने आपल्या भावालाही ख्रिस्ती श्रद्धेचे शिक्षण दिले. त्याचा भाऊ तायबेर्शियस ह्याचीही श्रद्धा दृढ झाली. शेवटी दोघांनी आपल्या रक्तसाक्षित्वाद्वारे आपल्या श्रद्धेवर शिक्कामोर्तब केले. पण अमाल्विअस नावाच्या सेनापतीने त्यांचा शिरच्छेद केला.
त्या दोघांचे मृतदेह पुरून परतलेल्या सिसिलिया हिला सेनापतीने बोलावून घेतले आणि आपली श्रद्धा पायदळी तुडविण्याचा तिला आदेश दिला. सेनापतीच्या धमक्यांना न जुमानता सिसिलिया उत्तरली, "मी प्रभू येशू ख्रिस्ताची वधू आहे हे तुला ठाऊक नाही काय?" हे उत्तर ऐकून अपमानित झालेला सेनापती रागाने लालबुंद झाला. त्याने तिला एक संपूर्ण दिवस गुदमरून ठेवले आणि एक संपूर्ण रात्र उकळत्या पाण्यात डुंबवून ठेवले तरीही तिच्या शरीराला यत्किंचितही इजा पोहोचली नाही. शेवटी तिच्या डोक्यावर व छातीवर कुऱ्हाडीचे घाव घालण्यात आले. त्यामुळे ती तीन दिवस रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिलेली होती. तिला भेटी देणाऱ्या सर्वांसाठी ती प्रार्थना करीत होती आणि मोठ्या कळकळीने ख्रिस्ताची शिकवण देत होती.
शेवटी ती देवाचे गुणगौरव गात मरण पावली. उपासना संगिताची आश्रयदाती संत म्हणून तिला गौरविण्यात आलेले आहे.

चिंतन: "ख्रिस्तासाठी मरण्याइतके दुसरे काहीही मला अधिक आनंदी करणारे नाही हे आपणांस ठाऊक नाही का?" - संत सिसिलिया

मंदिर हे देवाचे वस्तीस्थान आहे. मंदिरात देव व मानव यांचा संवाद असतो. याठिकाणी परमेश्वर व मानव एकरूप होऊन मानव देवाचे प्रेम अनुभवत असतो परंतु याच मंदिराची व्यापाऱ्यांनी आणि कर वसुल करणाऱ्यांनी दुरावस्था केली आहे. आज अनेक भाविक चर्चसंलग्न संघटनेत कार्य करीत आहे. परंतु आपली भक्ती आराधना याला बाजाराचे अथवा मनोरंजनाचे ठिकाण तर बनले नाही ना? आपल्या भक्तीत अंतःकरण, आत्मा, तन-मन-धन, आपले सर्वस्व असणे आवश्यक आहे. मंदिराची जबाबदारी ही फक्त पुरोहितावर अवलंबून नसते. तर येणाऱ्या प्रत्येक श्रद्धावंतावर अवलंबून आहे. कधी कधी आपल्या भक्तीत फक्त मागणं असतं. हे देवा, मला हे दे म्हणजे मी त्याच्या बदल्यात काहीतरी अर्पण करीन. प्रत्येक मंदिर हे प्रार्थनेचे घर बनावे म्हणून आपण प्रत्येक ख्रिस्ती भाविक प्रयत्नशील राहू या.

                                                ✝️

पहिले वाचन : प्रकटीकरण : १०:८-११ 
वाचक :  प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन
मी, स्वतः योहान ह्याने, आधी स्वर्गातून झालेली जी वाणी ऐकली होती ती पुन्हा ऐकली ती अशीः “जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घे." तेव्हा मी त्या देवदूतांकडे जाऊन, 'ते लहानसे पुस्तक मला दे' असे म्हटले. तो मला म्हणाला, "घे आणि खाऊन टाक,ते तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल." तेव्हा मी देवदूताच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले आणि खाऊन टाकले, ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले, तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. तेव्हा ते मला म्हणाले, "अनेक लोक, राष्ट्र, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि राजे ह्यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे."
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : : Revelation 10: 8-11
And I heard a voice from heaven again speaking to me, and saying: Go, and take the book that is open, from the hand of the angel who standeth upon the sea, and upon the earth.And I went to the angel, saying unto him, that he should give me the book. And he said to me: Take the book, and eat it up: and it shall make thy belly bitter, but in thy mouth it shall be sweet as honey. And I took the book from the hand of the angel, and ate it up: and it was in my mouth, sweet as honey: and when I had eaten it, my belly was bitter. And he said to me: Thou must prophesy again to many nations, and peoples, and tongues, and kings.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद : ११९:१४.२४,७२,१०३,१११,१३१

प्रतिसाद : आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हांला राज्य आणि याजक असे केले आहेस.

१) तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा, असे मानून मी अत्यांनद करतो. तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत. ते माझे मंत्री आहेत.

२) सोन्यारुप्याच्या लक्षावधी नाण्यापेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधूर लागतात! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात.

३) तुझे निर्बंध माझे सर्वकाळ वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो. मी तोंड उघडून धापा टाकल्या,कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला.


Psalms 119: 14, 24, 72, 103, 111, 131
R. (103) How sweet to my taste is your promise!

14 I have been delighted in the way of thy testimonies, 
as in all riches.
R. How sweet to my taste is your promise!

24 For thy testimonies are my meditation: 
and thy justifications my counsel.
R. How sweet to my taste is your promise!

72 The law of thy mouth is good to me, 
above thousands of gold and silver.
R. How sweet to my taste is your promise!

103 How sweet are thy words to my palate! 
more than honey to my mouth.
R. How sweet to my taste is your promise!

111 I have purchased thy testimonies 
for an inheritance for ever: 
because they are a joy to my heart.
R. How sweet to my taste is your promise!

131 I opened my mouth and panted: 
because I longed for thy commandments.
R. How sweet to my taste is your promise!

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
 आलेलुया!

Acclamation: 
  My sheep hear my voice, says the Lord; I know them, and they follow me.


शुभवर्तमान   लूक १९:४५-४८
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू मंदिरात गेला आणि त्यात जे विक्री करत होते त्यांना तो बाहेर घालवू लागला आणि त्यांना म्हणाला, "माझे घर प्रार्थनेचे घर होईल, असा शास्त्रलेख आहे, परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे."
तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे. पण मुख्य याजक, शास्त्री आणि लोकांचे पुढारी हे त्याचा घात करायला पाहत असत. तरी काय करावे हे त्यांना सुचेना, कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 19: 45-48
And entering into the temple, he began to cast out them that sold therein, and them that bought. Saying to them: It is written: My house is the house of prayer. But you have made it a den of thieves.
 And he was teaching daily in the temple. And the chief priests and the scribes and the rulers of the people sought to destroy him:
 And they found not what to do to him: for all the people were very attentive to hear him.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:  देवाला समर्पित जीवन जगणे म्हणजे जो आपला निर्माता व परमपिता आहे त्याच्याशी प्रेमळ नातेसंबंधात जीवन जगणे होय. आज मरियेचे मंदिरात समर्पण हा सण साजरा केला जात आहे. व्रतस्थ जीवन म्हणजे आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करणे होय. पवित्र मरियेच्या संपूर्ण जीवनात डोकावून बघितले तर या सर्व गुणांची माळ तिच्यात आपल्याला दिसून येते. म्हणून ती व्रतस्थ बंधु-भगिनींसाठी व येशूच्या अनुयायांसाठी प्रेरणा आहे. आपण पवित्र असावे व स्वर्गीय पित्याप्रमाणे जीवन जगावे अशी प्रभू येशूची इच्छा आहे. आज पूर्णपणे देवाला आपले जीवन समर्पित करू या व ज्यावेळी देवाची इच्छा प्रमाण मानली नाही व ऐकली नाही त्याबद्दल देवाकडे क्षमा मागू या. येशूचे शिष्य बनायचे असेल तर त्याच्या इच्छेप्रमाणे, आज्ञेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करू या. हे आज्ञाधारक माते, आमच्यासाठी प्रार्थना कर..

प्रार्थना:  हे प्रभू परमेश्वरा, तुझ्यात एकरूप होण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या