सामान्य काळातील ३३वा सप्ताह
गुरुवार २१ नोव्हेंबर २०२४
✝️
Whoever does what my Father in heaven wants him to do is my brother, my sister, and my mother.".
कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छे- प्रमाणे करितो तोच माझा भाऊ, बहीण व आई.
✝️
धन्य कुमारी मरियेचे समर्पण
कॅथोलिक पंथातील एका रूढ परंपरेनुसार धन्य कुमारी मरिया हिचे आईवडील संत ज्योकिम व संत आन्ना ( सण २६ जुलै) ह्यांनी बाळ मरियेला वयाच्या तिसऱ्या वर्षी येरुशलेम मंदिरात आणले. नाझरेथ ते येरुशलेम हे अंतर किमान ८० मैलांचे आहे. हे अंतर पायी चालून त्यांनी आपली कन्या देवाला आर्पण केली. तिथे पवित्र स्त्रियांच्या सहवासात तिचे धार्मिक शिक्षण व्हावे म्हणून देवाच्या सेवेशी आपले जीवन वाहिलेल्या इतर मुलांमध्ये तिला ठेवण्यात आले. आपल्या म्हातारपणी झालेले हे नवसाचे बाळ त्यांनी देवालाच समर्पित केले.
हा समर्पण सोहळा सिरिया येथून साजरा करण्यात येऊ लागला. पुढे पोप महाशय अविग्रॉन येथे असताना तो पाश्चात्य ख्रिस्तसभेमध्येही पसरला.सर्व ऐहिक गोष्टींपासून दूर राहून आपण प. मरियेचे अनुकरण करावे असे आवाहन संत अल्फान्सोस ह्यांनी केलेले आहे. आपल्या पालकांपासूनही दूर राहण्याचा प्रसंग आला तरीही आपण मरियेप्रमाणे संपूर्णत: स्वत:ला देवास सादर करण्यास तयार असावे.
चिंतन : मातेने केलेल्या शारीरिक त्यागामुळे पुत्र शरीर धारण करून तिच्याठायी राहिला. तो तिच्या प्रार्थनांना उत्तर देण्यास तत्पर असतो. संत थिओफिलस.साभार: संत सहवास भाग-२
पवित्र मरियेने जसे प्रार्थनेला व देवाच्या इच्छेला प्राधान्य दिले व ती समर्पित जीवन जगली, तसेच तिचे अनुकरण करावे व परमेश्वराठायी समर्पित जीवन जगावे, तसेच प्रार्थनेची व सद्गुणांची ओढ आपणास लागावी म्हणून प्रयत्नशील बनू या. पवित्र मरियेच्या गुणांचे अनुकरण करु या.
पहिले वाचन : जखऱ्या : २:१०-१३
वाचक : जखऱ्या या पुस्तकातून घेतलेले वाचन
"हे सीयोनकन्ये, उल्हास कर, कारण मी येत आहे."
हे सीयोनकन्ये जयजयकार व उल्लास कर; कारण पाहा, मी येईन, मी तुझ्यांत वस्ती करीन, असे परमेश्वर म्हणतो. त्या दिवसांत बहुत राष्ट्र परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील; मी तुझ्या ठायीं वस्ती करीन, मग तुला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला तुजकडे पाठविलें आहे. परमेश्वर पवित्र भूमींतला आपला वाटा म्हणून यहूदाचा ताबा घेईल व पुनः यरुशलेम निवडील. सर्व मनुष्यहो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासांतून उठला आहे.
प्रभूचा शब्द.
First Reading : Zecharyah :2: 10-13
The LORD said, "Sing for joy, people of Jerusalem! I am coming to live among you!" At that time many nations will come to the LORD and become his people. He will live among you, and you will know that he has sent me to you. Once again Judah will be the special possession of the LORD in his sacred land, and Jerusalem will be the city he loves most of all. Be silent, everyone, in the presence of the LORD, for he is coming from his holy dwelling-place.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसादमरीयेचें स्तोत्र १:४६-५५
प्रतिसाद : माझा जीव प्रभूला थोर मानितो.
१) माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो माझा तारणारा त्याच्या मुळे माझा आत्मा उल्हास आहे; कारण 'त्याने आपल्या 'दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पाहा, आतापासून सर्व पिढया मला धन्य म्हणतील
२) कारण जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरितां महत्कृत्ये केली आहेत: आणि त्याचें नांव पवित्र आहे. आणि जे 'त्याचे भय धरितात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यान्पिढ्या आहे."
३) त्याने आपल्या 'बाहुने पराक्रम केला आहे; जे आपल्या अंत:करणाच्या कल्पनेने 'गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे 'त्याने अधिपतींस' राजासनांवरून 'ओढून काढिले आहे' व 'दीनांस उंच केले आहे.''
४) त्यानें भुकेलेल्यांस उत्तम पदार्थांनीं तृप्त केले आहे, व 'धनवानांस रिकामें लावून दिले आहे.आपल्या पूर्वजांस त्याने सांगितलें त्याप्रमाणे अब्राहाम व त्याचें 'संतान ह्यांच्यावरील दया' सर्वकाळ 'स्मरून त्याने आपला सेवक इस्राएल ह्याला साहाय्य केले आहे.
"My heart praises the Lord;
my soul is glad because of God my Saviour,
for he has remembered me, his lowly servant!
From now on all people will call me happy,
because of the great things
the Mighty God has done for me.
His name is holy; from one generation to another
he shows mercy to those who honour him.
He has stretched out his mighty arm
and scattered the proud with all their plans.
He has brought down mighty kings from their thrones,
and lifted up the lowly. He has filled the hungry
with good things, and sent the rich away
with empty hands. He has kept the promise he made to
our ancestors, and has come to the help
of his servant Israel. He has remembered to show mercy.
to Abraham and to all his descendants for ever!"
आलेलुया, आलेलुया!
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
Acclamation:
I am the light of the world, says the Lord; whoever follows me will have the light of life.
शुभवर्तमान मत्तय १२:४६-५०
वाचक :मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असतां पाहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हां कोणीएकानें त्याला सांगितलें, पाहा, आपली आई व आपले भाऊ आपणांबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हां त्यानें सांगणाऱ्याला उत्तर दिलें, कोण माझी आई व कोण माझे भाऊ ?आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पाहा, माझी आई व माझे भाऊ ! कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छे- प्रमाणे करितो तोच माझा भाऊ, बहीण व आई.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Mathew 12: 46-50
Jesus was still talking to the people when his mother and brothers arrived. They stood outside, asking to speak with him. So one of the people there said to him, "Look, your mother and brothers are standing outside, and they want to speak with you."Jesus answered, "Who is my mother? Who are my brothers?" Then he pointed to his disciples and said, "Look! Here are my mother and my brothers! Whoever does what my Father in heaven wants him to do is my brother, my sister, and my mother.".
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: देवाला समर्पित जीवन जगणे म्हणजे जो आपला निर्माता व परमपिता आहे त्याच्याशी प्रेमळ नातेसंबंधात जीवन जगणे होय. आज मरियेचे मंदिरात समर्पण हा सण साजरा केला जात आहे. व्रतस्थ जीवन म्हणजे आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करणे होय. पवित्र मरियेच्या संपूर्ण जीवनात डोकावून बघितले तर या सर्व गुणांची माळ तिच्यात आपल्याला दिसून येते. म्हणून ती व्रतस्थ बंधु-भगिनींसाठी व येशूच्या अनुयायांसाठी प्रेरणा आहे. आपण पवित्र असावे व स्वर्गीय पित्याप्रमाणे जीवन जगावे अशी प्रभू येशूची इच्छा आहे. आज पूर्णपणे देवाला आपले जीवन समर्पित करू या व ज्यावेळी देवाची इच्छा प्रमाण मानली नाही व ऐकली नाही त्याबद्दल देवाकडे क्षमा मागू या. येशूचे शिष्य बनायचे असेल तर त्याच्या इच्छेप्रमाणे, आज्ञेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करू या. हे आज्ञाधारक माते, आमच्यासाठी प्रार्थना कर.
प्रार्थना: हे पवित्र मरियामाते, प्रार्थना करण्यास व पवित्रतेने जीवन जगून सेवा करण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आम्हासाठी तुझ्या पुत्रापाशी विनंती कर,आमेन.
✝️
0 टिप्पण्या