सामान्य काळातील ३१वा सप्ताह
शुक्रवार ८ नोव्हेंबर २०२४
कारण ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.for the children of this world are wiser in their generation than the children of light.
✝️
सोईझीन्सनजिकच्या एका श्रीमंत घराण्यामध्ये गॉडफ्रीचा जन्म झाला. त्याच्या आईच्या अकाली निधनानंतर गॉडफ्रीने स्वत:ला ईश्वरकार्यास वाहून घेतले. वयाच्या पाचव्या वर्षी त्याला संत क्विन्टीनच्या मठामध्ये ठेवण्यात आले. त्याचे धर्मबाप पवित्र मठवासी (त्यांचेही नाव अॅबट गॉडफ्री असेच होते.) ह्याने तेथे त्याचे लालनपालन केले.
गॉडफ्री ह्याने आपल्या तारुण्याची महत्त्वाची वर्षे रात्रंदिवस प्रार्थना करण्यात घालविली. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला धर्मगुरूपदाची दीक्षा देण्यात आली. त्यानंतर लगेच मोडकळीस आलेल्या कॅम्पबेन इथल्या एका मठाचे अधिकारी म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. परंतु त्याने आपल्या चातुर्याने आणि हुशारीने तो मठ पुर्वस्थितीत आणला आणि त्यातील धार्मिक जीवनाचे पुनरुज्जीवन केले.
इ. स. ११०३ साली त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला एमिएन्सचे महागुरू म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यावेळी तो अनवाणीच, पश्चात्तापाची जाडीभरडी वस्त्रे (गोणताट) पांघरून शहरात शिरला आणि महागुरूंच्या राजमहालात एखाद्या भिक्षूप्रमाणे राहू लागला.
त्याची सहनशीलता, नम्रता आणि गरिबांविषयी त्याला वाटणारी कळकळ अलौकिकच म्हणावी लागेल. ख्रिस्त आणि बारा प्रेषित ह्या नात्याने तो दररोज १३ गरीब लोकांना भोजन देत असे. कुष्ठरोग्यांच्या इस्पितळांना भेटी देणे, त्यांच्या गरजा भागविणे, त्यांना हसतमुख ठेवून त्यांची सेवा करणे ह्यात त्याला परमानंद मिळत असे.
हाईम शहराच्या महापौराशी महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी जात असताना अचानक गॉडफ्री आजारी पडले. त्यांनी अंतिम संस्कार स्वीकारला आणि मोठ्या आनंदाने ह्या जगाचा निरोप घेतला. संत क्रिस्पीनच्या मठात (सोईझॉन्स) ८ नोव्हेंबर १११५ रोजी त्याच्यावर अंत्यविधी संस्कार करण्यात आला.
आपले नागरीकत्व तर स्वर्गात आहे. "
आपल्याला कारभाऱ्याप्रमाणे परमेश्वराला हिशोब द्यावा लागणार आहे. आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडावी म्हणून सतत जागृत राहायला हवे. जगातील माणसे जशी धूर्त आहेत तसे आपण नसावे तर आपली जीवनशैली देवाच्या वचनानुसार असावी.
संत पौल ह्या जगातील माणसाचे सत्य समोर मांडत असतानाच प्रभू येशूचे वैभवाने व पुनरागमन होणार असल्याचे सांगत आहे. म्हणजेच प्रभू सर्वांचा न्यायनिवाडा करण्यास येणार आहे. त्यावेळी तो म्हणेल, 'तू आपल्या कारभाराचा हिशोब दे.
आपण सर्वजण ह्या जगाचे नव्हे तर स्वर्गाचे नागरिक आहोत. मात्र ते | नागरिकत्व कायमस्वरूपी बनावे. म्हणून देवाच्या आज्ञेत राहून त्याच्या | वचनाप्रमाणे जीवन आचरण करण्यासाठी सदैव तयार असावे.
✝️
पहिले वाचन : फिलीप्पैकरांस पत्र ३:१७-४:१
वाचन :पौलचे फिलीप्पैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“आपण तारणाऱ्याची वाट पाहत आहो. तो आमचे दीन शरीर स्वतःच्या गौरवयुक्त शरीरासारखे करील.”
बंधूनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकरण करा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले आणि आताही रडत सांगतो की, पुष्कळ जण असे वागतात की, ते ख्रिस्ताच्या क्रुसाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहो. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचे दैनावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील. म्हणून प्रियजनहो, तुम्हांकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. तुम्ही माझा आनंद आणि मुकुट आहा. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :: Philippians 3: 17 – 4: 1
Be ye followers of me, brethren, and observe them who walk so as you have our model. For many walk, of whom I have told you often (and now tell you weeping), that they are enemies of the cross of Christ; Whose end is destruction; whose God is their belly; and whose glory is in their shame; who mind earthly things. But our conversation is in heaven; from whence also we look for the Saviour, our Lord Jesus Christ, Who will reform the body of our lowness, made like to the body of his glory, according to the operation whereby also he is able to subdue all things unto himself. Therefore, my dearly beloved brethren, and most desired, my joy and my crown; so stand fast in the Lord, my dearly beloved.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :१२२:१-५
प्रतिसाद :आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ.
१ )आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ,
असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
हे येरुशलेम, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत.
२) हे येरूशलेम, एकत्र जोडलेल्या
नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश,
परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण
करण्यासाठी चढून येतात.
३) इस्राएलला लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे
परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण
करण्यासाठी चढून येतात.
कारण तेथे न्यायासने, दावीदच्या घराण्याची
राजासने मांडली आहेत.
.
Psalms 122: 1-2, 3-4ab, 4cd-5
R. (1) Let us go rejoicing to the house of the Lord.
1 I rejoiced at the things that were said to me:
We shall go into the house of the Lord.
2 Our feet were standing in thy courts, O Jerusalem.
R. Let us go rejoicing to the house of the Lord.
3 Jerusalem, which is built as a city,
which is compact together.
4ab For thither did the tribes go up,
the tribes of the Lord.
R. Let us go rejoicing to the house of the Lord.
4 The testimony of Israel,
to praise the name of the Lord.
5 Because their seats have sat in judgment,
seats upon the house of David.
R. Let us go rejoicing to the house of the Lord.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे,
ते मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक आहे.
आलेलुया!
Acclamation: Alleluia, alleluia.
Whoever keeps the word of Christ,
the love of God is truly perfected in him.
Alleluia, alleluia.
शुभवर्तमान लूक १६:१-८
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.”
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर, “हा तुमचे द्रव्य उडवतो,” असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, “तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशेब दे, कारण ह्यापुढे तू कारभार पाहायचा नाही." मग कारभाऱ्याने आपल्या मनात म्हटले, माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करावे? कष्ट करण्याची मला शक्ती नाही, भीक मागण्याची लाज वाटते. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्याला समजून घ्यावे म्हणून मी काय करावे या बाबत मला एक मार्ग सुचला आहे. मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकऱ्यांना बोलावले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे ? तो म्हणाला, शंभर मण तेल. त्याने त्याला म्हटले, हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून पन्नास मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, शंभर खंडी गहू. तो त्याला म्हणाला, हा तुझा रोखा घे आणि ऐंशी मांड. अन्यायी कारभाऱ्याने शहानपण केले, हे पाहून धन्याने त्याची वाहवा केली, कारण ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :
Luke 16: 1-8
And he said also to his disciples: There was a certain rich man who had a steward: and the same was accused unto him, that he had wasted his goods. And he called him, and said to him: How is it that I hear this of thee? give an account of thy stewardship: for now thou canst be steward no longer. And the steward said within himself: What shall I do, because my lord taketh away from me the stewardship? To dig I am not able; to beg I am ashamed. I know what I will do, that when I shall be removed from the stewardship, they may receive me into their houses.Therefore calling together every one of his lord’s debtors, he said to the first: How much dost thou owe my lord? But he said: An hundred barrels of oil. And he said to him: Take thy bill and sit down quickly, and write fifty. Then he said to another: And how much dost thou owe? Who said: An hundred quarters of wheat. He said to him: Take thy bill, and write eighty. And the lord commended the unjust steward, forasmuch as he had done wisely: for the children of this world are wiser in their generation than the children of light.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आजच्या वाचनात प्रभू येशू, "या युगातील लोक” आणि “प्रकाशातील लोक" याच्यामधील फरक दाखवत आहे. अन्यायी कारभारी त्याच्या हुशारीमुळे तो या युगातील लोकांच्या श्रेणीत जाऊन बसला आहे. आपल्या चतुराईने त्याने या जगातील ऐहिक वृत्तीने जगातील लोकांचे लक्ष वेधून घेतले. परंतु तो स्वतःच्या मालकाबरोबर अप्रामाणिक राहीला. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या वेळी आपण एकतर "या युगातील लोक” किंवा "प्रकाशाची लोक” बनलेले आहोत. दैनंदिन जीवनात आपण अशाप्रकारे वागतो की, आपल्या वागण्याने जगाला आनंद होतो परंतु आपल्या स्वर्गातील पित्याला आनंद होत नाही. जगाचे मार्ग व देवाचे मार्ग या निवडीबाबत नेहमीच एक तणाव सतत भेडसावत राहील. या युगातील लोक या श्रेणीतून प्रकाशाची लोक याकडे जाण्याचा आपला प्रयत्न चालू आहे का ? यावर मनन चिंतन करू या.
प्रार्थना :-
हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यास व शेवटी स्वर्गराज्यात प्रवेश मिळवण्यास आम्ही पात्र बनावे म्हणून आमच्या अंतःकरणात तुझा प्रेमाग्नि प्रज्वलित कर, आमेन.

0 टिप्पण्या