Marathi Bible Reading | Monday 11th November 2024| 32nd week in ordinary Time |

सामान्य काळातील ३२वा  सप्ताह 

सोमवार ११ नोव्हेंबर  २०२४

  ✝️ 


तुझ्या भावाने अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर, If thy brother sin against thee, reprove him: and if he do penance, forgive him.

टुअर्सचे संत मार्टिन  

महागुरू, वर्तनसाक्षी (३१६-३९७)

हंगेरीमधील पलोनिया नामक प्रांतात सुरक्षादलामध्ये मोठ्या हुद्यावर कार्य करीत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या घरी मार्टिनचा जन्म झाला. हा अधिकारी अख्रिस्ती होता. पुढे त्याची बदली बोम्बार्डीतील पेव्हीया ह्या ठिकाणी झाली. इथे मार्टिनला गॉल शहरातील एमियन्स ह्या ठिकाणी राजकीय दरबारात भरती करण्यात आले. त्यावेळी तो केवळ १५ वर्षांचा होता.
एकदा आपल्या घोड्यावरून प्रवास करीत असताना रस्त्याच्या कडेला त्याला एक भिकारी थंडीने कुडकुडत असताना दिसला. त्याच्या अंगावर लाज झाकण्यापुरती लक्तरे होती. ते पाहून मार्टिनला त्याची दया आली. दरम्यानच्या काळात ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेण्यासाठी आवश्यक असलेले धर्मशिक्षण तो घेत होता. त्याचा जबरदस्त पगडा त्याच्यावर बसला होता. मार्टिनने मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या अंगावरील अत्यंत उंची झगा आपल्या हातातील तरवारीने कापून टाकला व त्या भिकाऱ्याच्या अंगाभोवती लपेटला. त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मार्टिन सुखावला. एका आगळ्या वेगळ्या आनंदात समाधानाने तो घरी परतला. रस्त्यावर त्याला पाहणारे सर्व लोक मार्टिनला हसत होते. रात्री स्वप्नात त्याला प्रभू येशू त्या झग्यामध्ये दिसला. त्याच्या अंगावर उरलेल्या झग्याचा तुकडा होता. पुढे मार्टिनच्या अंगावरील फाटका झगा तो फ्रँकीश किंग्सच्या नावाने उभारलेल्या चॅपलमध्ये बरीच वर्षे जपुन ठेवण्यात आला.ह्या घटनेनंतर आपल्याला लवकरच ख्रिस्ती धर्मात बाप्तिस्मा मिळावा म्हणून मार्टिन धडपडू लागला. लवकरच त्याची ही इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर त्याने मिलिटरीमधून स्वत:ची सुटका करून घेतली आणि तो संत हिलरीच्या (सण १३ जाने.) संस्थेत दाखल झाला. पेव्हिया येथे कुटुंबांना भेटी देत असताना त्याला त्याची आई भेटली. तिचे मनपरिवर्तन करून त्याने तिला ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. मात्र त्याच्या वडिलांनी ख्रिस्ती धर्म नाकारला.
दरम्यानच्या काळात एरियस नावाचा एक पाखंडी धर्मगुरू ख्रिस्तसभेमध्ये उदयास आलेला होता. त्याच्या मते पवित्र त्रैक्यातील तीन व्यक्ती समस्वरुपाच्या नसून एक दुसऱ्यापेक्षा कनिष्ठ आहेत. हा विचार गॉल शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला की संत हिलरी ह्यांनाच गॉल शहरातून हद्दपार करण्यात आले. आता त्यांची जागा मार्टिनने घेतली आणि तो भूमध्य समुद्राच्या किनारी एक साधू व मठवासी बनून जीवन जगू लागला.
इ. स. ३६१ मध्ये पुन्हा एकदा संत हिलरी ह्यांना बोलावण्यात आले आणि मार्टिन पुन्हा पोईटिएर्स येथे परतला. तेथे बरेचसे अनुयायी त्याला मिळाले. त्यांच्या सहाय्याने त्याने गॉलमधील पहिला बेनेडिक्टाईन मठ स्थापन केला. जिथे जिथे मूर्तिपूजेला स्थान आहे तिथे तिथे खऱ्या देवाची पूजा सुरू व्हावी ही मार्टिनची तीव्र इच्छा होती. म्हणून अधूनमधून तो आपला मठ सोडून प्रेषित कार्यासाठी संपूर्ण गॉल शहरात हिंडत असे.
अशा प्रकारे दहा वर्षे गेली. त्यानंतर मार्टिनला फ्रान्समधील टुअर्स नावाच्या शहरातून बोलावणे आले आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या इच्छेविरुद्ध त्याला महागुरूपदाची दीक्षा देण्यात आली. महागुरू म्हणून तो अत्यंत साधे आणि क्लेशमय जीवन जगत असे. इतर साधूसंतांना आपला त्रास होऊ नये म्हणून त्याने स्वतःसाठी एक वेगळी खोली बांधून घेतली होती, परंतु तिथेही त्याच्या खोलीभोवती इतर मठवाशांनी आपापले मठ उभारले. आजपर्यंत हा मठांचा समूह मारमोटूर इथे अस्तित्वात आहे.
आपल्या धर्मप्रांताचे प्रशासन कार्य तो अत्यंत सचोटीने कणखरपणे आणि न्यायभावनेने करीत असे. पाखंडी मतवाद्यांच्या कचाट्यापासून ख्रिस्तसभेला दूर ठेवण्यासाठी तो सतत झटत असे. त्यासाठी त्याने बरेच प्रेषितीय दौरे काढले. त्या दौऱ्यात तो खरीखुरी ख्रिस्ती शिकवण लोकांना पटवून देण्यात वेळ घालवीत असे. ट्रेवस (ट्रायर) नावाच्या शहरात तर त्याला राजाश्रय मिळाला होता. त्याचा त्याने पुरेपूर फायदा उठविला.
रक्तसाक्षी नसूनही एक संत म्हणून गौरविला गेलेला मार्टिन हा पाश्चात्य देशातील एक पहिला संत मानला जातो. मध्ययुगात तर त्याची कीर्ती दिगंतापर्यंत जाऊन पोहोचली. त्याच्यामुळे पाश्चात्य देशातील वरीचशी ख्रिस्तमंदिरे त्याच्याच नावाने उभारली गेलेली आहेत. शिवाय काही शहरांनाही त्याचे नाव देण्यात आले आहे.
मार्टिन ११ नोव्हेंबर ३९७ साली मरण पावला.

चिंतन : हे प्रभो जर तुझ्या लोकांना माझी गरज असेल तर कष्ट करण्यात मी कधीही हयगय करणार नाही. तुझ्या पवित्र इच्छेप्रमाणे होवो.

- संत मार्टिन

✝️   

पहिले वाचन : :  तीत  १:१-९ 
वाचन :पौलचे तीतला पत्र यातून घेतलेले वाचन १:१-९ 
"मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू वडील नेमावे.”
विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे बालक तीत ह्यास, जे युगानुयुगाचे जीवन सत्यप्रतिज्ञ देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले. त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित, देवाचा दास पौल, ह्याच्याकडूनः
देवपित्यापासून आणि ख्रिस्त येशू आपला तारणारा ह्याच्यापासून कृपा व शांती असो.
तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील नेमावे. यासाठी तुला मी क्रेतात ठेवून आलो. ज्याला नेमावयाचे तो निर्दोष, एकाच स्त्रीचा पती असावा. त्याची मुले विश्वास ठेवणारी असावी, त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी. धर्माध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असला पाहिजे. तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, अत्याचारी, अनीतीने पैसे मिळवणारा नसावा, तर अतिथीप्रिय, चांगुलपणाची निवड धरणारा, मर्यादेशील, नीतिमान, पवित्र, संयमी आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा. ह्यासाठी की, त्याने सुज्ञपणाने बोध करण्यास आणि उलट बोलणाऱ्यांना कुंठित करण्यासाठी समर्थ व्हावे.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :: Titus 1: 1-9
Paul, a servant of God, and an apostle of Jesus Christ, according to the faith of the elect of God and the acknowledging of the truth, which is according to godliness: Unto the hope of life everlasting, which God, who lieth not, hath promised before the times of the world: But hath in due times manifested his word in preaching, which is committed to me according to the commandment of God our Saviour: To Titus my beloved son, according to the common faith, grace and peace from God the Father, and from Christ Jesus our Saviour.
 For this cause I left thee in Crete, that thou shouldest set in order the things that are wanting, and shouldest ordain priests in every city, as I also appointed thee:
 If any be without crime, the husband of one wife, having faithful children, not accused of riot, or unruly.
For a bishop must be without crime, as the steward of God: not proud, not subject to anger, not given to wine, no striker, not greedy of filthy lucre: But given to hospitality, gentle, sober, just, holy, continent: Embracing that faithful word which is according to doctrine, that he may be able to exhort in sound doctrine, and to convince the gainsayers.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  :: २४:१-६
प्रतिसाद : हे देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले हेच लोक होत. 

१) पृथ्वी आणि तीवरील सर्वकाही परमेश्वराचे आहे, 
जग आणि त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत.
 कारण त्यानेच सागरावर तिचा पाया घातला, 
त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले.

२) परमेश्वराच्या पर्वतावर कोण चढेल ? 
त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील ? 
ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, 
जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही तो.

३ )त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल, 
आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. 
त्याला शरण जाणारे हेच लोक होत. 
हे याकोबच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी 
आतुर असलेले हेच लोक होत.

Psalms 24: 1b-2, 3-4ab, 5-6
R. (6) Lord, this is the people that longs to see your face.

1b The earth is the Lord’s and the fulness thereof: 
the world, and all they that dwell therein.
2 For he hath founded it upon the seas; 
and hath prepared it upon the rivers.
R. Lord, this is the people that longs to see your face.

3 Who shall ascend into the mountain of the Lord: 
or who shall stand in his holy place?
4ab The innocent in hands, and clean of heart, 
who hath not taken his soul in vain.
R. Lord, this is the people that longs to see your face.

5 He shall receive a blessing from the Lord, 
and mercy from God his Saviour.
6 This is the generation of them that seek him, 
of them that seek the face of the God of Jacob.
R. Lord, this is the people that longs to see your face.

 जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे, 
सार्वकालिक जीवनाची वचने आपणांजवळ आहेत.
 आलेलुया!

Acclamation:  Alleluia, alleluia.
Shine like lights in the world, 
as you hold on to the word of life.
Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक  १७:१-६
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“जर तुझा भाऊ दिवसातून सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, मला पश्चात्ताप झाला आहे. असे म्हणाला, तरी त्याला क्षमा कर."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "अडखळणे येऊ नये हे अशक्य आहे, परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार! त्याने ह्या लहानातील एकाला अडखळवावे ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बाधून त्याला समुद्रात टाकावे ह्यात हित आहे. तुम्ही स्वतः सांभाळा. तुझ्या भावाने अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर, त्याने दिवसातून सात वेळा तुझा अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, मला पश्चात्ताप झाला आहे, असे म्हटले, तरी त्याला क्षमा कर." मग प्रेषित प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढवा,” प्रभू म्हणाला, “तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर ह्या तुतीच्या झाडाला, तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा, असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : 
Luke 17: 1-6
And he said to his disciples: It is impossible that scandals should not come: but woe to him through whom they come.It were better for him, that a millstone were hanged about his neck, and he cast into the sea, than that he should scandalize one of these little ones. Take heed to yourselves. If thy brother sin against thee, reprove him: and if he do penance, forgive him. And if he sin against thee seven times in a day, and seven times in a day be converted unto thee, saying, I repent; forgive him. And the apostles said to the Lord: Increase our faith. And the Lord said: If you had faith like to a grain of mustard seed, you might say to this mulberry tree, Be thou rooted up, and be thou transplanted into the sea: and it would obey you.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतनआज येशू शिष्यत्वाची आजच्या युगातील वास्तवता काय आहे ह्याबद्दल प्रचिती करून देतो. ख्रिस्ती जीवनात अनेक अडथळे व मोह येत असतात. परंतु यापासून दूर जाऊन किंवा यासर्वांवर मात करून जो मनुष्य ख्रिस्ती जीवन योग्यप्रकारे जगतो तोच खरा शिष्य होय. आपल्या अहंकारामुळे आपण इतरांना तुच्छ किंवा कमी लेखत असतो. मी रोज चर्चला जातो किंवा जाते म्हणून मी पवित्र आहे. ही भावना सोडून देऊन इतरांना प्रभूकडे वळवण्यास आपण मदत केली पाहिजे. आपल्याप्रमाणे इतरांना येशूचे शिष्य बनवण्यास आपण प्रोत्साहन देतो की परावृत्त करतो ?

प्रार्थना :-हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या प्रेमात वाढता यावे म्हणून बंधु-भगिनींना क्षमा करण्यास आम्हाला प्रेरणा लाभो, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या