सामान्य काळातील ३२वा सप्ताह
बुधवार १३ नोव्हेंबर २०२४
✝️
"दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊजण कोठे आहेत?
nd Jesus answering, said, Were not ten made clean? and where are the nine?
संत स्टॅनिस्लॉस कॉस्तका
वर्तनसाक्षी (१५५०-१५६८)
हृदय विकार, प्राणघातक आजार आणि अंत्यसंस्काराविना येणारे मरण ह्यावर मात करण्यासाठी संत स्टॅनिस्लॉस ह्याचा धावा केला जातो. बऱ्याच संस्थांमध्ये नवशिष्यांचा तो आश्रयदाता संत मानला जातो.
चिंतन : मी विशिष्ट वेळेसाठी नव्हे तर सार्वकालिक जीवनासाठी जन्मलेलो आहे. -संत स्टॅनिस्लॉस
✝️
पहिले वाचन : तितास पत्र ३:१-७
वाचक : पौलचे तितास पत्र यातून घेतलेले वाचन
सर्वांनी सत्ताधीश आणि अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे, कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य आणि सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे. अशी सर्वांना आठवण दे. कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे आणि विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा आणि हेवा ह्यात आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र आणि एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपला तारणकर्ता देव ह्याची दया आणि मनुष्यांवरील प्रेम प्रकट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान आणि पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपल्यावर विपुल प्रमाणात ओतला आहे, ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे सार्वकालिक जीवनाचे वारस व्हावे.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :: Titus 3: 1-7
Admonish them to be subject to princes and powers, to obey at a word, to be ready to every good work. To speak evil of no man, not to be litigious, but gentle: shewing all mildness towards all men. For we ourselves also were some time unwise, incredulous, erring, slaves to divers desires and pleasures, living in malice and envy, hateful, and hating one another. But when the goodness and kindness of God our Saviour appeared: Not by the works of justice, which we have done, but according to his mercy, he saved us, by the laver of regeneration, and renovation of the Holy Ghost; Whom he hath poured forth upon us abundantly, through Jesus Christ our Saviour: That, being justified by his grace, we may be heirs, according to hope of life everlasting.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :स्तोत्र २३:१-६
प्रतिसाद : परमेश्वर माझा मेंढपाळ आहे
१)परमेश्वर माझा मेंढपाळ आहे,
मला काही उणे पडणार नाही.
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो,
तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजातवाना करतो.
२)तो आपल्या नामास्तव मला नीतिमार्गानी चालवतो.
मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो
तरी अरिष्टांस भिणार नाही.
कारण तू माझ्याबरोबर आहेस,
तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात.
३)तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस,
तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस,
माझे पात्र काठोकाठ भरले आहे.
४) खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण
आणि दया ही लाभतील आणि
परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.
Psalms 23: 1b-3a, 3bc-4, 5, 6
R. (1) The Lord is my shepherd; there is nothing I shall want.
1 The Lord ruleth me: and I shall want nothing.
2 He hath set me in a place of pasture.
He hath brought me up, on the water of refreshment:
3 He hath converted my soul.
R. The Lord is my shepherd;
there is nothing I shall want.
3 He hath led me on the paths of justice,
for his own name’s sake.
4 For though I should walk in the
midst of the shadow of death,
I will fear no evils, for thou art with me.
Thy rod and thy staff, they have comforted me.
R. The Lord is my shepherd;
there is nothing I shall want.
5 Thou hast prepared a table before
me against them that afflict me.
Thou hast anointed my head with oil;
and my chalice which inebriateth me, how goodly is it!
R. The Lord is my shepherd;
there is nothing I shall want.
6 And thy mercy will follow me all the days of my life.
And that I may dwell in the
house of the Lord unto length of days.
R. The Lord is my shepherd;
there is nothing I shall want.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर, तू आपल्या सत्पथाने मला चालव,
आलेलुया!
Acclamation: Alleluia, alleluia.
In all circumstances, give thanks, for this is the will of God for you in Christ Jesus.
Alleluia, alleluia.
शुभवर्तमान लूक १७:११-१९
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू येरुशलेमकडे चालला असता शोमरोन आणि गालील ह्यामधील एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटायला आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, "अहो येशू गुरुजी, आम्हांवर दया करा, " त्याने त्यांच्याकडे पाहून म्हटले, "तुम्ही जाऊन स्वत:ला याजकांना दाखवा." मग ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झालो आहो, असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णीत परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, "दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊजण कोठे आहेत? ह्या परक्यावाचून देवाचा गौरव करण्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? "आणि येशूने त्याला म्हटले," ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :
Luke 17: 11-19
And it came to pass, as he was going to Jerusalem, he passed through the midst of Samaria and Galilee. And as he entered into a certain town, there met him ten men that were lepers, who stood afar off; And lifted up their voice, saying: Jesus, master, have mercy on us. Whom when he saw, he said: Go, show yourselves to the priests. And it came to pass, as they went, they were made clean. And one of them, when he saw that he was made clean, went back, with a loud voice glorifying God. And he fell on his face before his feet, giving thanks: and this was a Samaritan. And Jesus answering, said, Were not ten made clean? and where are the nine? There is no one found to return and give glory to God, but this stranger. And he said to him: Arise, go thy way; for thy faith hath made thee whole.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात सांगण्यात आले आहे की जेव्हा मानव दुःख, संकटात असतो तेव्हा त्याला परमेश्वराची आठवण होते, पण इतर वेळी तो परमेश्वराला विसरून जातो . कुष्ठरोग हा एक महाभयंकर रोग होता आणि तो इतरांना होऊ नये म्हणून कुप्ठरोग्यांना गावाबाहेर ठेवले जात असे. लेवीय १३:४५ मध्ये असे सांगितले आहे की, "ज्या महारोग्याच्या अंगावर चट्टा असेल, त्याचे कपडे फाटके असावे, त्याच्या डोक्याचे केस मोकळे सोडलेले असावे . त्याने आपला वरचा ओठ झाकून ठेवावा आणि अशुद्ध, अशुद्ध असे ओरडत जावे ." दहा कुष्ठरोग्यापैकी सर्व जण शुद्ध झाले पण एकटया शोमरोनी माणसाने परत येऊन येशूला धन्यवाद दिले . येशूला त्या सर्वांनी येऊन "आभारी" म्हणावे याची गरज नव्हती पण परमेश्वराकडून मिळालेल्या देणगीवद्दल आभार मानावे हीच एक अपेक्षा होती. देवाच्या प्रेमावद्दल, कृपेवद्दल, दयेबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ असायला हवे . दैनंदिन जीवन जगत असताना आपण दररोज जो श्वास घेतो तोच एक मोठा चमत्कार आहे. आपणा प्रत्येकाला देवाकडून मिळालेल्या देणगीबद्दल त्याला धन्यवाद देऊ या.आत्मपरिक्षण केल्यास देवाच्या दयेसाठी आपण किती अपात्र आहोत याची आपल्याला जाणीव होईल. आपण अपात्र असूनही परमेश्वर आपणाला त्याच्या कवेत घेण्यास नेहमीच तयार आहे .
प्रार्थना :- प्रभो परमेश्वरा, तुझ्या अनंत उपकार बद्दल धन्यवाद, आम्ही कृतज्ञतेने तुझ्यासमोर नतमस्तक झालो आहोत आमचा स्वीकार कर, आमेन.
0 टिप्पण्या