सामान्य काळातील ३४वा सप्ताह
बुधवार २७ नोव्हेंबर २०२४
✝️
तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने खरे जीवन मिळवाल.”But a hair of your head shall not perish.In your patience you shall possess your souls.
✝️
पहिले वाचन : प्रकटीकरण १५:१-४
वाचन : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन
"ते मोशेचे गीत आणि कोकराचे गीत गातात.”
मी स्वत: योहानने फार मोठे आणि आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. सात पीडा घेतलेले सात देवदूत दृष्टीस पडले, त्या पीडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्यायोगे देवाचा क्रोध पूर्ण झाला.
मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काही तरी माझ्या दृष्टीस पडले, श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्यांच्या नामसंख्येवर जय मिळवलेले लोक हातात देवाच्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. ते देवाचा सेवक मोशे याचे गीत आणि कोकराचे गीत गात होते:
हे प्रभु देवा, हे सर्वसमर्था,
तुझी कृत्ये थोर आणि आश्चर्यकारक आहेत.
हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे आणि सत्य आहेत,
हे प्रभो, तुला कोण भिणार नाही ?
तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही ?
कारण तूच मात्र पवित्र आहेस
आणि तुझीन्यायकृत्ये प्रकट झाली आहेत.
म्हणून सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : : Revelation 15: 1-4
And I saw another sign in heaven, great and wonderful: seven angels having the seven last plagues. For in them is filled up the wrath of God. And I saw as it were a sea of glass mingled with fire, and them that had overcome the beast, and his image, and the number of his name, standing on the sea of glass, having the harps of God: And singing the canticle of Moses, the servant of God, and the canticle of the Lamb, saying: Great and wonderful are thy works, O Lord God Almighty; just and true are thy ways, O King of ages. Who shall not fear thee, O Lord, and magnify thy name? For thou only art holy: for all nations shall come, and shall adore in thy sight, because thy judgments are manifest.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद : ९८:१,२-३, ७-८, ९
प्रतिसाद : प्रभू तुझी सर्व कृत्ये किती महान आहेत !
१ )परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा.
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत.
त्याने आपल्या उजव्या हाताने,
आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे.
२) परमेश्वराने आपले तारणकार्य प्रकट केले,
राष्ट्रांसमोर आपले न्यायीपण प्रकट केले आहे.
त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली सत्यता
आणि आपली दया ह्यांचे स्मरण केले आहे.
३) समुद्र आणि त्यातील सर्व काही, जग
आणि त्यात राहणारे हर्षनाद करोत.
नद्या टाळ्या वाजवोत, पर्वत एकवटून
परमेश्वरासमोर आनंदाने गावोत.
४) कारण परमेश्वर पृथ्वीचा न्याय करायला आला आहे.
तो जगाचा न्याय यथार्थतेने करील
आणि लोकांचा न्याय सरळपणे करील
Psalms 98: 1, 2-3ab, 7-8, 9
R. (Rev.15:3b) Great and wonderful are all your works, Lord, mighty God!
1 Sing ye to the Lord a new canticle:
because he hath done wonderful things.
His right hand hath wrought for him salvation,
and his arm is holy.
R. Great and wonderful are all your works, Lord, mighty God!
2 The Lord hath made known his salvation:
he hath revealed his justice in the sight of the Gentiles.
3ab He hath remembered his mercy
his truth toward the house of Israel.
R. Great and wonderful are all your works, Lord, mighty God!
7 Let the sea be moved and the fulness thereof:
the world and they that dwell therein.
8 The rivers shall clap their hands,
the mountains shall rejoice together
R. Great and wonderful are all your works, Lord, mighty God!
9 At the presence of the Lord:
because he cometh to judge the earth.
He shall judge the world with justice,
and the people with equity.
R. Great and wonderful are all your works, Lord, mighty God!
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
जागृत आणि सिद्ध राहा, कारण कोणत्या दिवशी
मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia, alleluia.
Remain faithful until death, and I will give you the crown of life.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान लूक २१:१२-१९
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. "
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “लोक तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील, तुम्हांला सभास्थाने आणि तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे माझ्या नामासाठी नेतील. ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही असा मनाचा निर्धार करा, कारण मी तुम्हाला अशी वाचा आणि बुद्धी देईन की तिला अडवायला किंवा तिच्याविरुद्ध बोलायला तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत. आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातील काहीजणांना ठार मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने खरे जीवन मिळवाल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Luke 21: 12-19
But before all these things, they will lay their hands upon you, and persecute you, delivering you up to the synagogues and into prisons, dragging you before kings and governors, for my name’s sake. And it shall happen unto you for a testimony. Lay it up therefore into your hearts, not to meditate before how you shall answer: For I will give you a mouth and wisdom, which all your adversaries shall not be able to resist and gainsay. And you shall be betrayed by your parents and brethren, and kinsmen and friends; and some of you they will put to death. And you shall be hated by all men for my name’s sake. But a hair of your head shall not perish.In your patience you shall possess your souls.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
आजच्या पवित्र वाचनामध्ये जीवनातील विविध प्रकारच्या आपत्तीबद्दल मार्गदर्शन केले आहे. मानवी जीवन संकटमय आहे. शारीरिक, भावनिक, सामाजिक तसेच मानसिक, आर्थिक व आध्यात्मिक दुःखानी जीवन व्यापलेले आहे. दुःख व संकट यांना धैर्याने तोंड देण्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया संभवतात. कधी आपण त्यापासून दूर पळतो तर कधी देवाला दोष देतो. अशी संकटे व व्याधी आम्हावर पाठविल्याबाबत देवाच्या आम्हावरील प्रितीबद्दल साशांक होतो. आज चिंतन करून पाहू या की, माझी याबद्दल काय दृष्टी आहे? येशू आम्हाला सांगत आहे की, धीर धरणारा संकटावर मात करील व आत्मीक आनंद मिळवू शकेल. सहनशील होऊन दुःखाचे प्रसंग स्वीकारू या. येशू स्वतः दुःख संकटाना सामोरा गेला. कुसापासून पळून गेला नाही. हे सर्व दुःख व वधस्तंभ त्याने आमच्या मुक्तीसाठी सहन केले.
प्रार्थना: हे प्रभू परमेश्वरा, तुझ्यापासून आमचा कधी ही वियोग होऊ नये म्हणून तुझ्या संरक्षक पवित्र आत्म्याला आम्हामध्ये पाठव, आमेन.
✝️
0 टिप्पण्या