Marathi Bible Reading | Tuesday 26th November 2024 | 34 Week in Ordinary Time

सामान्य काळातील वा  सप्ताह 

मंगळवार २६ नोव्हेंबर  २०२४

  ✝️

जेव्हा तुम्ही लढाया आणि दंगे ह्यांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे, तरी एवढ्यात शेवट होत नाही.

And when you shall hear of wars and seditions, be not terrified: these things must first come to pass; but the end is not yet presently.

 ✝️ 



पोर्ट मॉरीसचे संत लिओनार्ड 
वर्तनसाक्षी (१६७६ - १७५१)

चिंतन : आपल्या विकृत वासनांना शमविण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या अडचणींना वेंगेत घेत असतो. परंतु त्या टाळण्यासाठी आपण बोटदेखील लावीत नाहीत. एक पैशाचेदेखील दुःख भोगण्यास आज कुणी तयार नाही हीच जीवनाची खरी शोकांतिका आहे. - पोर्ट मॉरीसचे संत लिओनार्ड

                                                ✝️

पहिले वाच :  प्रकटीकरण १४:१४-१९
वाचन : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन
"कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. "
मी स्वतः योहानने पाहिले आणि पाहा, पांढरा मेघ आणि त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोणीएक दृष्टीस पडला, त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट आणि त्याच्या हातात तीक्ष्ण धारेचा विळा होता. तेव्हा आणखी एक देवदूत मंदिरातून निघून जो मेघावर बसलेला होता त्याला उच्च वाणीने म्हणाला, “तू आपला विळा चालवून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीची कापणी झाली."
मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता. ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक देवदूत वेदीतून निघाला, त्याने ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्च वाणीने म्हटले, "तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षवेलींचे घड तोडून घे, तिची द्राक्ष पिकली आहेत.” तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : : Revelation 14: 14-19
And I saw, and behold a white cloud; and upon the cloud one sitting like to the Son of man, having on his head a crown of gold, and in his hand a sharp sickle. And another angel came out from the temple crying with a loud voice to him that sat upon the cloud: Thrust in thy sickle, and reap, because the hour is come to reap: for the harvest of the earth is ripe.
And he that sat on the cloud thrust his sickle into the earth, and the earth was reaped. And another angel came out of the temple which is in heaven, he also having a sharp sickle. And another angel came out from the altar, who had power over fire; and he cried with a loud voice to him that had the sharp sickle, saying: Thrust in thy sharp sickle, and gather the clusters of the vineyard of the earth; because the grapes thereof are ripe. And the angel thrust in his sharp sickle into the earth, and gathered the vineyard of the earth, and cast it into the great press of the wrath of God:
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद : :  ९६:१०-११,१२-१३
प्रतिसाद :परमेश्वर पृथ्वीचा न्याय करायला आला आहे.

१) राष्ट्रांमधील लोकांना जाहीर करा की, 
परमेश्वर राज्य करतो, जग स्थिर स्थापलेले आहे, 
ते डळमळणार नाही, तो सरळपणे लोकांचा न्याय करील. 
आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो, 
समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत

२ )शेत आणि त्यातील सर्वकाही उत्सव करोत, 
मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर 
आनंदाचा गजर करतील, कारण तो आला आहे, 
पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे. 
तो न्यायीपणाने जगाचा आणि सत्यतेने लोकांचा न्याय करील.

Psalms Psalms 96: 10, 11-12, 13
R. (13b) The Lord comes to judge the earth.

10 Say ye among the Gentiles, the Lord hath reigned. 
For he hath corrected the world, 
which shall not be moved: 
he will judge the people with justice.
R. The Lord comes to judge the earth.

11 Let the heavens rejoice, 
and let the earth be glad, 
let the sea be moved, 
and the fulness thereof:
12 The fields and all things that are in them shall be joyful. 
Then shall all the trees of the woods rejoice
R. The Lord comes to judge the earth.


13 Before the face of the Lord, because he cometh: 
because he cometh to judge the earth. 
He shall judge the world with justice, 
and the people with his truth.
R. The Lord comes to judge the earth.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
मरेपर्यंत तुम्ही विश्वासू राहा, 
म्हणजे मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन.
 आलेलुया!

Acclamation: 
 Alleluia, alleluia.
 Remain faithful until death, and I will give you the crown of life.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक २१:५-११
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“चिऱ्यावर चिरा राहणार नाही".
मंदिर उत्तम पाषाणानी आणि अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे, ह्याविषयी काहीजण बोलत असता येशूने म्हटले, “असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहा त्यातला पाडला जाणार नाही असा चिऱ्यावर चिरा राहणार नाही." तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “गुरुजी, ह्या गोष्टी केव्हा होतील? आणि ज्याकाळी ह्या गोष्टी घडून येतील त्या काळाचे चिन्ह काय ?" तो म्हणाला, "तुम्हांला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा. कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन, मीच तो आहे आणि तो काळ जवळ आहे, असे म्हणतील. त्यांच्या नादी लागू नका आणि जेव्हा तुम्ही लढाया आणि दंगे ह्यांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे, तरी एवढ्यात शेवट होत नाही.
मग त्याने त्यांना म्हटले, "राष्ट्रावर राष्ट्र आणि राज्यावर राज्य उठेल, मोठेमोठे भूमिकंप होतील, जागोजाग रोगराई येईल व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 21: 5-11
And some saying of the temple, that it was adorned with goodly stones and gifts, he said: These things which you see, the days will come in which there shall not be left a stone upon a stone that shall not be thrown down. And they asked him, saying: Master, when shall these things be? and what shall be the sign when they shall begin to come to pass? Who said: Take heed you be not seduced; for many will come in my name, saying, I am he; and the time is at hand: go ye not therefore after them. And when you shall hear of wars and seditions, be not terrified: these things must first come to pass; but the end is not yet presently. Then he said to them: Nation shall rise against nation, and kingdom against kingdom. And there shall be great earthquakes in divers places, and pestilences, and famines, and terrors from heaven; and there shall be great signs.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
आपण सारे उपासक देवाचे मंदिर आहोत. हे जसे व्यक्तीशः खरे आहे, तसेच विश्वासूच्या समुहाबाबत देखील सत्य आहे. या सत्याला बाधा येईल असे जीवन आम्ही जगू नये याबाबत येशू आम्हाला ताकिद देत आहे. “अयोग्य मार्गाने तुम्ही जाऊ नये म्हणून सावध राहा.” हे शब्द असे दर्शवितात की, प्रभू येशूला आपल्या सर्वांच्या हिताची काळजी आहे. तर मग कोणत्या गोष्टी आम्हाला खिस्तापासून दूर नेऊ शकतात याचा विचार करू या. खोटी महत्वाकांक्षा, संपत्तीचा लोभ, रागीट वृत्ती,व्यसने, स्वतः विषयी भलताच विश्वास (Ego)! या सर्व गोष्टी आम्हास ख्रिस्तापासून दूर नेण्यास कारणीभूत होतात. शुभवर्तमानात असेही नमूद केले आहे की, देवाचे मंदिर सुंदर पाषाणांनी आभुषित केले आहे. तर मग आपली शरीरे व अंतःकरणे आध्यात्मिक दानांनी सुशोभित करू या. प्रेम, धैर्य, दया, आशा, ममता अशा आभुषणाचा हार गुंफू या ! आज या गोष्टींचा विचार करून, यापैकी एखादा सुद्गुण स्वतःसाठी निवडू या. ज्या गोष्टी आम्हाला देवापासून दूर नेतात त्या निर्धारपूर्वक दूर करण्याचा प्रयत्न करू या.
प्रार्थना:  हे प्रभू परमेश्वरा, तुझ्यापासून आमचा कधी ही वियोग होऊ नये म्हणून तुझ्या संरक्षक पवित्र आत्म्याला आम्हामध्ये पाठव, आमेन.

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या