आगमनकाळातील पहिला सप्ताह
गुरुवार ५ डिसेंबर २०२४
✝️
माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्यांनाच केवळ स्वर्गराज्य मिळेल."but the one who does the will of my Father who is in heaven.
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले "मला प्रभुजी, प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाला स्वर्गराज्यात प्रवेश मिळेलच असे नाही. माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्यांनाच केवळ स्वर्गराज्य मिळेल." "तेव्हा, हे माझे बोल ऐकून त्याप्रमाणे वागणारा प्रत्येकजण आपले घर एखाद्या खडकावर बांधणाऱ्या माणसासारखा शहाणा ठरेल. पाऊस कोसळला, पूर आला आणि सोसाट्याचा वारा त्या घरावर आदळला पण ते पडले नाही कारण ते खडकावर बांधलेले होते. तसेच माझे हे वचन ऐकून त्याप्रमाणे न वागणारा प्रत्येकजण आपले घर वाळूवर बांधणाऱ्या माणसासारखा मूर्ख ठरेल. पाऊस कोसळला, पूर आला आणि सोसाट्याचा वारा त्या घरावर आदळला तेव्हा ते पडले. अगदी कोसळून पडले.
✝️

0 टिप्पण्या