आगमनकाळातील पहिला सप्ताह
बुधवार ४ डिसेंबर २०२४
✝️
"मला या जनसमुदायाची दया येते. गेले तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत."I have compassion on the crowd because they have been with me now three days
येशू सोर नि सिदोन भागातून निघून गालील सरोवराच्या बाजूने पुढे डोंगराळ भागात गेला आणि तेथे बसला. तेव्हा लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्याकडे लोटल्या. लंगडे, पांगळे, आंधळे, मुके अशा अनेकांना लोकांनी आणून येशूच्या पायांवर घातले. तेव्हा येशूने त्यांना बरे केले. मुके बोलू लागले, पांगळे बरे झाले, लंगडे चालू लागले आणि आंधळ्यांना दिसू लागले हे पाहून लोक चकित झाले आणि त्यांनी इस्राएलच्या देवाला धन्यवाद दिले.मग आपल्या शिष्यांना जवळ बोलावून येशू त्यांना म्हणाला, "मला या जनसमुदायाची दया येते. गेले तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत. त्यांना खायला काही नाही. त्यांना उपाशी परत पाठवायची माझी इच्छा नाही, कारण कदाचित वाटेत ते कासावीस होतील.” “या निर्जन प्रदेशात एवढ्या मोठ्या जमावाला खाऊ घालायला पुरेशा भाकरी आम्हांला कुठून मिळणार ?” शिष्यांनी त्याला विचारले. येशू त्यांना म्हणाला, “किती भाकरी आहेत तुमच्याजवळ ?" “सात आणि थोडे लहान मासे," ते म्हणाले. मग लोकांना जमिनीवर बसायची आज्ञा करून येशूने त्या सात भाकरी आणि मासे घेतले, देवाचे आभार मानून त्यांचे तुकडे केले आणि शिष्यांजवळ ते दिले. शिष्य ते लोकसमुदायाला वाढत गेले. तेव्हा ते सगळे जेवून तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे जमा केले ते सात पाट्या भरले.
✝️

0 टिप्पण्या