Marathi Bible Reading | Friday 24 January 2025| 2nd Week in Ordinary Time

सामान्य काळातील २रा सप्ताह   

शुक्रवार  दि.२४ जानेवारी  २०२५

येशू डोंगर चढून गेला आणि त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. And going up into a mountain, he called unto him whom he would himself: and they came to him



संत फ्रान्सिस डि सेल्स
• महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१५६७-१६२२)

जिथे जिथे फ्रान्सिस गेला तिथे तिथे लोकांची कुमसारं ऐकणे, प्रवचन देणे, धार्मिक व्रतस्थ संस्थांच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवून आणणे, साध्यासोप्या भाषेत युवक आणि प्रौढ ह्यांना धर्मशिक्षण देणे, धर्मगुरूंसाठी वार्षिक तपसाधना आणि धर्मपरिषदा भरविणे अशा प्रकारचे कार्यक्रम ते राबवित असत. पुढे पुढे ते छोटीछोटी प्रवचने द्यायला लागले. त्यांच्या मते 'तुम्ही जितके अधिक बोलता तितके लोकांना कमी आठवते. त्यामुळे प्रवचन देताना आपण प्रत्यक्ष जीवनात देखील किती प्रेमळ व मायाळू आहोत त्यावर प्रवचनाचा परिणाम अवलंबून असतो. '
हे सर्व करीत असताना संत फ्रान्सिस लिखाणासाठी व पत्रव्यवहारासाठी वेळ काढीत असे. त्याच्या पत्रव्यवहाराचे अनेक खंड उपलब्ध आहेत. तसेच “भक्तीमान जीवनाची (समर्पित जीवनाची) तोंडओळख, देवाचे प्रेम, आध्यात्मिक परिषदा” अशा अनेक ग्रंथांचे लेखनही करण्यास ते सवड काढीत असत.
इ. स. १६०७ साली संत जेन डी चॅटेल (सण १२ डिसेंबर) ह्यांच्यासह त्यांनी सिस्टरांसाठी 'विझीटेशन ऑर्डर' नावाची एक संस्था सुरू केली होती. ह्या संस्थेच्या आध्यात्मिक विकासासाठीदेखील त्यांनी साहित्यनिर्मिती केली. “समर्पित जीवनाची तोंडओळख" हा ग्रंथ त्यांनी खास प्रापंचिकांसाठी लिहिला होता. आजही त्या ग्रंथाचे महत्त्व कमी झालेले नाही.
पावित्र्याशी चुरस करू शकेल असे कोणतेही जीवन श्रेष्ठ आहे, हे मत निश्चितच ख्रिस्ती धर्मतत्वप्रणालीविरुद्ध आहे, असे संत फ्रान्सिस ह्याचे मत होते.
मरणोत्तर इ. स. १६६२ साली त्यांना धन्यवादित ही पदवी देण्यात आली व १६६५ मध्ये अवघ्या तीन वर्षांनी त्यांना संत म्हणून घोषित करण्यात आले. १८७७ साली त्यांना धर्मपंडित हा बहुमानाचा किताब बहाल करण्यात आला. पोप पायस अकरावे ह्यांनी त्यांना लेखकांचा आश्रयदाता म्हणून संबोधिलेले आहे.
चिंतन : प्रेमाविना बोललेल्या शब्दापेक्षा सौजन्यपूर्ण धारण केलेले मौन कितीतरी पटीने श्रेष्ठ असते. - संत फ्रान्सिस डि सेल्स


पहिले वाचन इब्री ८:६-१३
वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन  
        तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता. आता ज्या कराराचा मध्यस्थ येशु आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे.
लोकांना दोष लावून तो म्हणतो: "परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, त्यात इस्राएलचे घराणे आणि यहुदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन;मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही; कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रभू म्हणतो.
परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा: "मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन आणि मी त्यांना देव असा होईन आणि ते मला माझे लोक असे होतील. तेव्हा 'परमेश्वराला ओळखा,' असे प्रत्येकजण आपल्या सहनागरिकाला आणि प्रत्येकजण आपल्या बंधूला शिकवणार नाही; कारण त्यातील लहानांपासून थोरांपर्यंत, ते सर्व मला ओळखतील.
कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही. त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्या कराराला जुना असे ठरवले आहे आणि ते जुने आणि जीर्ण होत आहे, ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Hebrews 8: 6-13
But now he hath obtained a better ministry, by how much also he is a mediator of a better testament, which is established on better promises. For if that former had been faultless, there should not indeed a place have been sought for a second. For finding fault with them, he saith: Behold, the days shall come, saith the Lord: and I will perfect unto the house of Israel, and unto the house of Juda, a new testament: Not according to the testament which I made to their fathers, on the day when I took them by the hand to lead them out of the land of Egypt: because they continued not in my testament: and I regarded them not, saith the Lord. For this is the testament which I will make to the house of Israel after those days, saith the Lord: I will give my laws into their mind, and in their heart will I write them: and I will be their God, and they shall be my people: And they shall not teach every man his neighbour and every man his brother, saying, Know the Lord: for all shall know me from the least to the greatest of them: Because I will be merciful to their iniquities, and their sins I will remember no more. Now in saying a new, he hath made the former old. And that which decayeth and groweth old, is near its end.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद ८५:८,१०-१४
प्रतिसाद : दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत.

१) हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव येऊ दे 
आणि आम्हाला मुक्तिदान दे त्याचे भय धरणाऱ्यांना तारण समीप असते आणि आमच्या देशात त्याचे वैभव नांदेल.

२) दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत, नीती 
आणि शांती ह्यांनी एकमेकींना आलिंगन दिले आहे. 
पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, 
स्वर्गातून नीतिमत्त्व अवलोकन करीत आहे.

३) परमेश्वर आमची भरभराट करील आणि 
आमची भूमी आपले फळ देईल.
त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल आणि 
शांती त्याच्या पावलांचे अनुकरण करील.

Psalm:  85: 8 and 10, 11-12, 13-14
R. (11a) Kindness and truth shall meet.

8 shew us, O Lord, thy mercy; and grant us thy salvation.
10 Surely his salvation is near to them that fear him: that glory may dwell in our land.
R. Kindness and truth shall meet.

11 Mercy and truth have met each other: justice and peace have kissed.
12 Truth is sprung out of the earth: and justice hath looked down from heaven.
R. Kindness and truth shall meet.

13 For the Lord will give goodness: and our earth shall yield her fruit.
14 Justice shall walk before him: and shall set his steps in the way.
R. Kindness and truth shall meet.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
God was reconciling the world to himself in Christ, and entrusting to us the message of reconciliation.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान मार्क ३:१३-१९

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

येशू डोंगर चढून गेला आणि त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. त्यांनी आपणाबरोबर असावे आणि भुते काढण्याचा अधिकार देऊन, उपदेश करावयास त्यांस पाठवावे, यासाठी त्याने ह्या बारा जणांची नेमणूक केली; शिमोन याला त्याने पेत्र हे उपनाव दिले; जब्दीचा मुलगा याकोब आणि याकोबचा भाऊ योहान ह्यांस बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले; आंद्रेया, फिलीप, बार्थोलोम्यू, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी आणि त्याला धरून देणारा यहुदा इस्कार्योत.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Mark 3: 13-19
And going up into a mountain, he called unto him whom he would himself: and they came to him. And he made that twelve should be with him, and that he might send them to preach. And he gave them power to heal sicknesses, and to cast out devils. And to Simon he gave the name Peter:And James the son of Zebedee, and John the brother of James; and he named them Boanerges, which is, The sons of thunder: And Andrew and Philip, and Bartholomew and Matthew, and Thomas and James of Alpheus, and Thaddeus, and Simon the Cananean: And Judas Iscariot, who also betrayed him.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
जेव्हा प्रभू येशूने बारा प्रेषितांची निवड केली, तेव्हा त्याने त्यांच्यासाठी एक योजना आखली होती. आपल्या बाजूने उभे राहण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी प्रभू येशूने प्रेषितांना निवडले नाही; तर हेतूपुरस्सर त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांचे महत्त्व समजावण्यासाठी शुभवर्तमानकार त्यांची नावेदेखील जाहीर करतो. ख्रिस्तसभेच्या इतिहासामध्ये प्रेषित सर्वांत महत्त्वाचे मानले जातात, कारण ते प्रभू येशूच्या प्रेषित कार्याचे साक्षी आहेत. प्रभू येशूचे प्रेषितकार्य त्यांनीच पुढे चालू ठेवले आणि ते आजपर्यंत चालू आहे. परमेश्वर जेव्हा आपली निवड करतो, तेव्हा त्याला आशा असते की, ह्या जगात आपण त्याचे "हात आणि पाय" बनू. प्रभू येशू म्हणतो, "तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले व नेमले आहे, ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे." आपण स्वतःचे आत्मपरिक्षण केल्यानंतर आपणांस जाणीव झाली पाहिजे की, देवाने मला कशासाठी निवडले आहे? परमेश्वराला माझ्याकडून कोणते "फळ" हवे आहे ? आजच्या शुभवर्तमानाच्या प्रकाशात पाहिले तर देव मला शुभवर्तमानाचे सत्य धाडसाने घोषित करण्यासाठी बोलावत आहे. ही घोषणा सर्वप्रथम माझ्या आचरणातून झाली पाहिजे. घोषणा ओठाने केली परंतु ती घोषणा मी जगणाऱ्या कृतीशी सुसंगत नसेल तर इतर जण प्रभू येशूकडे आकर्षित होण्याऐवजी ते शुभवर्तमानाचा अवमान व प्रभू येशूला नाकारतील. म्हणून "बोले तैसा चाले” असे आपले जीवन असावे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी दैवी हाक ऐकून तुला अनुसरण्यास व तुझी सुवार्ता  पसरविण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या