Marathi Bible Reading | Saturday 25th January 2025| 2nd Week in Ordinary Time

सामान्य काळातील २रा सप्ताह   

शनिवार  दि.२५ जानेवारी  २०२५

तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि 'शौल, शौल, माझा छळ का करतोस ?" अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली. मी विचारले, 'प्रभुजी, तू कोण आहेस ?"Saul, Saul, why persecutest thou me?8 And I answered: Who art thou, Lord? 

✝️

  ✝️ 

 संत पौलाचे परिवर्तन - प्रेषित (सण)


  ख्रिस्तसभेतील सुवार्तिकांचा छळ करणारा, पुरुष व स्त्रियांना बांधून तुरुंगात टाकणारा, अनेकांना देहांताची शिक्षा फर्माविणारा शौल यरुशलेमेस चालला असताना दिमिष्काजवळ भर दुपारी जमिनीवर कोसळला. दिव्य प्रकाशाने त्याला अंध बनवले. शौलाला साक्षात्कार झाला आणि त्याचे परिवर्तन झाले. 
संत पौलाने आद्य ख्रिस्तसभेतील तेरा मंडळीना लिहिलेल्या पत्राद्वारे प्रभावी ख्रिस्ताची शिकवण दिली आहे. ख्रिस्त प्रेमाने प्रेरित झालेल्या पौलाने ख्रिस्तमंडळीचे जणू पालन पोषण केले. 
    परमेश्वर  जगाच्या दृष्टीने पापी, भ्रष्ट किंवा देवाला न मानणाऱ्यांना सुद्धा देव त्याच्या कार्यासाठी निवडतो. ख्रिस्तसभेच्या इतिहासात अशा अनेक माणसांचे जीवन परिवर्तन होऊन त्यांनी आपल्या शब्दाने व आचरणाने सुवार्तेची साक्ष जगाला दिली आहे.
आपल्या प्रेषितकार्यासाठी त्याने रोम, करिथ, इफिस, गलती आणि आशिया मानयर मधील लुस्त्र, त्राओस, मिलेत अशा अनेक ठिकाणचा दौरा केला. ह्या दौऱ्याच्या दरम्यान त्याला पीटर, मार्क, बर्णबा, प्रिस्का, अक्वीला, फिलेमोन, तिमथी, टायटस, लूक अशा प्रभृती भेटल्या. त्या सर्वांना त्याने आपल्या जीवन- उदाहरणाने ख्रिस्ताकडे आणले. तो जिथे जिथे गेला तिथे तिथे त्याने ख्रिस्ती मंडळ्या स्थापन केल्या आणि ह्या मंडळ्यांची काळजी घेण्यासाठी प्रेस्बुतर आणि धाकोन तसेच एपिस्कोपाय म्हणजेच विशप, धर्मगुरू आणि डिकन अशांची नियुक्ती केली.
संत पौलने अनेक पत्रे लिहून आपल्या ख्रिस्तमंडळ्यांना मार्गदर्शन केले. ख्रिस्तासाठी त्याला अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. उपासमार, दगडमार, छळ, अपमान, तुरूंगवास, अशा अनेक अपेष्टांना त्याला सामोरे जावे लागले. आजारी अवस्थेत त्याला लूक हा परराष्ट्रीय वैद्य भेटला. त्याचेही त्याने मनपरिवर्तन केले. अनेसिम नावाच्या गुलामाची भेट तुरूंगातच झाली. त्याच्या सुटकेसाठी त्याने अनेसिमचा मालक फिलेमोन ह्या ख्रिस्ती व्यक्तीला तुरूंगातून पत्र लिहिले. पौलचा इ. स. ६७ साली निरो राजांच्या कारकीर्दीत शिरच्छेद करण्यात आला.

आज ख्रिस्त येशू आपल्या सर्वांना त्याची देवराज्याची सुवार्ता  इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवाहन करीत आहे. 

✝️   

पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये २२:३-१६
वाचक :प्रेषितांची कृत्ये  पुस्तकातून घेतलेले वाचन

"ऊठ, येशूच्या नावाचा धावा करून स्नानसंस्कार घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर."

पौल लोकांना म्हणाला, "मी यहुदी आहे. माझा जन्म किलिकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलिएलाच्या चरणांजवळ लहानचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळालं आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहा तसा मीही होतो. पुरुष आणि स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्तशिक्षा देऊनसुध्दा मी ह्या पंथाचा पाठलाग केला, त्याविषयी प्रमुख याजक आणि सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे. मी त्यांच्यापासून बंधुजनांना पत्रे घेऊन दिमिष्क येथे चाललो होतो, ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून येरुशलेममध्ये शासन करण्यास आणावे.

“जाता जाता मी दिमिष्कजवळ पोहचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि 'शौल, शौल, माझा छळ का करतोस ?" अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली. मी विचारले, 'प्रभुजी, तू कोण आहेस ?" त्याने मला म्हटले, 'ज्या नाझरेथकर येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. मग मी म्हणालो, 'प्रभुजी, मी काय करावे ?' प्रभूने मला म्हटले, 'उठून दिमिष्कात जा, मग तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे, त्या सर्वाविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.' त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले, म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले.

"मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहुदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत. तो माझ्याकडे आला आणि जवळ उभा राहून मला म्हणाला, 'शीलभाऊ, इकडे पाहा.' तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले. मग तो म्हणाला, 'आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे आणि त्या नीतिमान पुरुषाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी, कारण जे तू पाहिले आहे आणि ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील. तर आता उशीर का करतोस ? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून स्नानसंस्कार घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर' " होईल." ही सर्व वचने आणि दर्शने यथार्थपणे नाथानने दावीदला कळवली.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद. 

First Reading :
Acts 22: 3-16 or Acts 9: 1-22

3 And he saith: I am a Jew, born at Tarsus in Cilicia, but brought up in this city, at the feet of Gamaliel, taught according to the truth of the law of the fathers, zealous for the law, as also all you are this day:4 Who persecuted this way unto death, binding and delivering into prisons both men and women.5 As the high priest doth bear me witness, and all the ancients: from whom also receiving letters to the brethren, I went to Damascus, that I might bring them bound from thence to Jerusalem to be punished.6 And it came to pass, as I was going, and drawing nigh to Damascus at midday, that suddenly from heaven there shone round about me a great light:7 And falling on the ground, I heard a voice saying to me: Saul, Saul, why persecutest thou me?8 And I answered: Who art thou, Lord? And he said to me: I am Jesus of Nazareth, whom thou persecutest.9 And they that were with me, saw indeed the light, but they heard not the voice of him that spoke with me.10 And I said: What shall I do, Lord? And the Lord said to me: Arise, and go to Damascus; and there it shall be told thee of all things that thou must do.11 And whereas I did not see for the brightness of that light, being led by the hand by my companions, I came to Damascus.12 And one Ananias, a man according to the law, having testimony of all the Jews who dwelt there,13 Coming to me, and standing by me, said to me: Brother Saul, look up. And I the same hour looked upon him.14 But he said: The God of our fathers hath preordained thee that thou shouldst know his will, and see the Just One, and shouldst hear the voice from his mouth.15 For thou shalt be his witness to all men, of those things which thou hast seen and heard.16 And now why tarriest thou? Rise up, and be baptized, and wash away thy sins, invoking his name.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र १७:१, २
प्रतिसाद :   सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.

१ आलेलुया ! अहो सर्व राष्ट्रांनो, 
परमेश्वराचे स्तवन करा, 
साऱ्या मानवांनो, 
त्याचे गुणगान गा.

२ त्याचे आमच्यावर अलोट प्रेम आहे, 
प्रभूची सत्यता अनंतकाळ टिकते.

PsalmsPsalms 117: 1bc, 2

R. (mark 16:15) Go out to all the world, and tell the Good News.or

1bc O praise the Lord, all ye nations: praise him, all ye people.

R. Go out to all the world, and tell the Good News.

2 For his mercy is confirmed upon us: and the truth of the Lord remaineth for ever.

 R. Go out to all the world, and tell the Good News.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
 प्रभू म्हणतो,
मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे, ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे.
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
 I chose you from the world, to go and bear fruit that will last, says the Lord.
Alleluia, alleluia.
शुभवर्तमान  मार्क  १६ : १५-१८
वाचक :   मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो आणि स्नानसंस्कार घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतील ते माझ्या नावाने भुते : काढतील, नव्यानव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील आणि कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही, त्यांनी दुखणाईतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.”
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Mark 16: 15-18
15 And he said to them: Go ye into the whole world, and preach the gospel to every creature.16 He that believeth and is baptized, shall be saved: but he that believeth not shall be condemned.17 And these signs shall follow them that believe: In my name they shall cast out devils: they shall speak with new tongues.18 They shall take up serpents; and if they shall drink any deadly thing, it shall not hurt them: they shall lay their hands upon the sick, and they shall recover.
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआज ख्रिस्तसभा प्रेषित संत पौल ह्याच्या परिवर्तनाचा सण साजरा करते. आजच्या पहिल्या वाचनात संत पौलच्या परिवर्तनाचे वर्णन करण्यात आले आहे आणि पौल स्वतः आपल्या परिवर्तनाची साक्ष देतो. ह्या साक्षीनुसार पौलच्या परिवर्तनाला काही काळ लोटला आहे आणि तो आपल्या पहिल्या प्रेषितकार्य प्रवासानंतर यरुशलेमला परतला आहे. यरुशलेममध्ये पौलला ख्रिस्ती लोकांशी शत्रुत्व असलेल्या यहुदी लोकांबरोबर सामना करावा लागतो आणि त्यामध्ये त्याला जबर मारहाण केली जाते. असे असतानाही पौल आपल्या बंधुजनांसमोर आपल्या परिवर्तनाची आणि येशूच्या नावाची साक्ष देतो. संत पौलचे परिवर्तन हे परमेश्वर आपल्यामध्ये कशाप्रकारे कार्य करतो, ह्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. सर्वांना परिवर्तनासाठी पाचारण आहे आणि आजचा सण संत पौलच्या परिवर्तनाच्या प्रवासाची आठवण करून देतो. आज संत पौलचे परिवर्तन आणि देवाने त्याला दिलेले प्रेषित कार्य हा सण साजरा करीत असताना चर्च संत पौलने केलेल्या शुभवर्तमानाच्या प्रसाराच्या महान कार्याची आठवण करून देताना आपणांस आवाहन करते की, आपण ह्या महान प्रेषिताच्या गुणांचे आणि उदाहरणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा. संत पौलने ख्रिस्ती श्रद्धा कोणावरही जुलुमाने लादली नाही, तर तो स्वतः जसा प्रभू येशूकडे शेवटी आकर्षित झाला तसे त्याने अनेकांना प्रभू येशूकडे आकर्षिले.

प्रार्थना : प्रभू येशू, तुझी तारणदायी कृपा अनुभवून तुझी सुवार्ता पसरविण्यासाठी आम्हाला प्रेरणा व योग्य ती कृपा दे, आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या