सामान्य काळातील २रा सप्ताह
सोमवार दि.२० जानेवारी २०२५
“वहाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय?
संत फेबियन
संत सेबेस्टीयन
(रक्तसाक्षी)
"जो आत्मा ख्रिस्ताच्या जवळ जाण्यास धडपडत असतात त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सैतान आपली संपूर्ण शक्ती पणाला लावीत असतो. अशा आत्म्यांना पुन्हा देवाकडे आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या परिश्रमाबद्दल आपण मुळीच कुरकूर करू नये. "- संत सेबेस्टीयन
परंपरावादी परुश्यांना प्रभू येशू नव्या द्राक्षरसाचे महत्त्व शुभवर्तमानात पटवून देत आहे, आपल्याला जशी शारीरिक भूक लागते तशीच आध्यात्मिक भूक लागणे गरजेचे आहे. आपल्या हृदयामध्ये तशी भूक असतेच ती म्हणजे देवाला पाहण्याची व देवाबरोबर हितगुज करण्याची. म्हणून तर स्तोत्रकार म्हणतो, 'हे देवा तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करीन, (स्तोत्र ६ ३:१). देवाचा ध्यास लागण्यासाठी त्याच्या आंतरिक सहवासाची गरज आहे. आपल्याला जर प्रभू येशूच्या सहवासात यायचे असेल तर आपल्या वाईट सवयी, दुष्ट प्रवृत्ती, स्वार्थीपणा आणि जे जे प्रभू येशूपासून आपल्याला दूर ठेवते अशा सर्वांचा त्याग किंवा उपवास करु या. अगदी क्षुल्लक गोष्टींचा उदा. टी.व्ही. पाहणे, उगाच कोणास दुखवणे वगैरे गोष्टींचा आपण त्याग करुन प्रार्थनेला प्राधान्य देऊन देवाची वचने ऐकुया.
पहिले वाचन इब्री ५:१-१०
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यातून घेतलेला असून देवाविषयक गोष्टींबाबत मनुष्यांकरिता नेमलेला असतो; त्याने दाने आणि पापांबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावी. अज्ञानी आणि बहकणारे ह्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वतः दुर्बलता वेष्टिलेला आहे आणि ह्या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वत:साठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे. हा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो. त्याचप्रमाणे ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपणा स्वत:ला गौरविले नाही, तर ज्याने त्याला म्हटले. "तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे," त्याने त्याला गौरविले. त्याप्रमाणेच दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो,
"मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस."
आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करीत आणि अश्रू गाळीत प्रार्थना आणि विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले त्याद्वारे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीच्या तारणाचा कर्ता झाला आणि त्याला मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले.
First Reading :: Hebrews 5: 1-10
1 For every high priest taken from among men, is ordained for men in the things that appertain to God, that he may offer up gifts and sacrifices for sins:
2 Who can have compassion on them that are ignorant and that err: because he himself also is compassed with infirmity.
3 And therefore he ought, as for the people, so also for himself, to offer for sins.
4 Neither doth any man take the honour to himself, but he that is called by God, as Aaron was.
5 So Christ also did not glorify himself, that he might be made a high priest: but he that said unto him: Thou art my Son, this day have I begotten thee.
6 As he saith also in another place: Thou art a priest for ever, according to the order of Melchisedech.
7 Who in the days of his flesh, with a strong cry and tears, offering up prayers and supplications to him that was able to save him from death, was heard for his reverence.
8 And whereas indeed he was the Son of God, he learned obedience by the things which he suffered:
9 And being consummated, he became, to all that obey him, the cause of eternal salvation.
10 Called by God a high priest according to the order of Melchisedech.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११०:१-४
प्रतिसाद : मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.
१ माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो: "तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस."
२ परमेश्वर तुझा राजदंड सियोनेतून पुढे नेईल; तो म्हणतो, आपल्या शत्रूंवर प्रभूत्व कर.
३ तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरूण तुला पहाटेच्या दंहिवरासारखे आहेत.
४ परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो ती बदलणार नाही. "मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस."
Psalm:
Psalms 110: 1, 2, 3, 4
R. (4b) You are a priest for ever, in the line of Melchizedek.
1 The Lord said to my Lord: Sit thou at my right hand:
Until I make thy enemies thy footstool.
R. You are a priest for ever, in the line of Melchizedek.
2 The Lord will send forth the sceptre of thy power out of Sion:
rule thou in the midst of thy enemies.
R. You are a priest for ever, in the line of Melchizedek.
3 With thee is the principality in the day of thy strength:
in the brightness of the saints: from the womb before the day star I begot thee.
R. You are a priest for ever, in the line of Melchizedek.
4 The Lord hath sworn, and he will not repent:
Thou art a priest for ever according to the order of Melchisedech.
R. You are a priest for ever, in the line of Melchizedek.
आलेलुया, आलेलुया!
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
The word of God is living and effective, able to discern reflections and thoughts of the heart.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क २: १८-२२
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
एके दिवशी योहानचे शिष्य आणि परुशी उपास करीत होते, तेव्हा लोक येऊन येशूला म्हणाले, “योहानचे शिष्य आणि परुश्यांचे शिष्य उपास करतात पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्यांचे कारण काय ?" येशू त्यांना म्हणाला, “वहाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय? त्यांच्याबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना उपास करणे शक्य नाही. तरी असे दिवस येतील की, त्यांच्यापासून वर काढून घेतला जाईल, तेव्हा त्या दिवसांत ते उपास करतील. कोणी कोऱ्या कपडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, लावले तर धड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्याला म्हणजे जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते. कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालत नाही; घातला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो आणि बुधलेही निकामी होतात; म्हणून नवा द्राक्षारस नव्याच बुधल्यात घालतात."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Mark 2: 18-22
And the disciples of John and the Pharisees used to fast; and they come and say to him: Why do the disciples of John and of the Pharisees fast; but thy disciples do not fast?
And Jesus saith to them: Can the children of the marriage fast, as long as the bridegroom is with them? As long as they have the bridegroom with them, they cannot fast. But the days will come when the bridegroom shall be taken away from them; and then they shall fast in those days. No man seweth a piece of raw cloth to an old garment: otherwise the new piecing taketh away from the old, and there is made a greater rent. And no man putteth new wine into old bottles: otherwise the wine will burst the bottles, and both the wine will be spilled, and the bottles will be lost. But new wine must be put into new bottles.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
धार्मिक जीवनात तीन गोष्टी महत्त्वाची कर्तव्ये मानली जातात : प्रार्थना, उपवास व दानधर्म. परंतु प्रत्येक कर्तव्य पार पाडण्यासाठी योग्य काळ, वेळ बघणे जरूरीचे आहे. There is a time for fasting, there is a time for feasting. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या मानून गरजेनुसार, प्रसंगाला धरून, त्या केल्या पाहिजेत. प्रभू येशूच्या शिष्यांना मसिहा सापडल्याचा आनंद अनावर झाला होता. पण ते पूथ्वीवरील संपूर्णपणे एकाच mode मध्ये, स्थितीमध्ये राहाणार नव्हते. वेळ येईल तेव्हा उपवास करण्यास त्यांची तयारी होती. पापाबद्दल पश्चात्ताप निश्चित केला पाहिजे. प्रभू जीवनात गवसला जातो, तेव्हा आनंद देखील साजरा होणे, देवाने दिलेला मानवी जीवनाचा भाग आहे. पण एकच गोष्ट घेऊन बसायचे नाही. Don't be "closed minded" Christians; ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारल्यावर, श्रद्धेविषयी नवीन गोष्टी शिकायच्या, श्रद्धा सखोल करायची, दृढ करायची. द्राक्षासव करण्याच्या प्रक्रियेसारखे ते आहे. द्राक्षासव ताबडतोब तयार होत नसतो. द्राक्षांचा रस आमवावा लागतो. विनेगर करण्याची प्रक्रिया बघा. तेच उदाहरण प्रभू ख्रिस्त देतात. श्रद्धा म्हणजे ready made वस्तू नाही. Faith needs to be cultivated; मशागत करण्याची देणगी. निगा राखण्याची जबाबदारी. मग जुने फेकून द्यायचे व नवे घ्यायचे असा अर्थ आपण काढावा का? नाही. दोन्ही either / or नाही; both. नव्याचा जन्म जुन्यातूनच होतो, हा जीवनाचा नियम आहे. ज्ञान हे परमेश्वराकडून येते, म्हणून आपण जुने आणि नवे ह्या दोन्हींची उत्कृष्ट उपयोग केला पाहिजे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सहवासाचा अनुभव घेण्यासाठी मला त्याग व तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या