Marathi Bible Reading | Thursday 30th January 2025| 3rd Week in Ordinary Time

सामान्य काळातील ३रा सप्ताह   

गुरुवार  दि.३० जानेवारी  २०२५

ज्यामापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.
In what measure you shall mete, it shall be measured to you again, 

संत मार्टिना व संत बेथिल्डिस

संत मार्टिना

- कुमारिका, रक्तसाक्षी ( २२८)

ख्रिस्तसभेच्या संतमालिकेमध्ये होऊन गेलेल्या अनेक रोमन रक्तसाक्षी संतांपैकी संत मार्टिना ही एक कुमारिका होय. तिच्या जीवनाविषयी इतिहासात फारशी माहिती उपलब्ध नसली तरी अगदी बालवयात ती अनाथ झाली आणि आलेक्झांडर सेवरस ह्या सम्राटाच्या छळवादामध्ये ख्रिस्ताला नाकारण्याऐवजी आपला प्राण गेला तरी बेहत्तर अशी ठाम भूमिका ह्या कुमारिकेने घेतली. त्यामुळे तिला आपल्या प्राणाची किंमत मोजावी लागली. रोमच्या सल्लागार मंडळातील एका क्रियाशील सभासदाची ती मुलगी असल्याचा उल्लेख सापडतो.

पुढे रोमन फोरम म्हटलेल्या व्यासपीठाच्या जागी सहाव्या शतकात तिच्या नावाने एक चर्च बांधण्यात आले. मध्ययुगीन काळात तिच्या सणाच्या दिवशी मेणबत्त्यांना आशीर्वाद देण्यासाठी एक खास मिस्सा अर्पण करीत व नंतर त्या श्रद्धावंतांना वाटून दिल्या जात अशी प्रथा सुरू झाली.

संत मार्टिना ही रोम शहराची एक प्रेरणादायी आश्रयदाती संत मानली जाते.
✝️

पहिले वाचन: :इब्री - १०:१९-२५
वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 
 बंधुजनहो, येशूने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन आणि जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने पवित्रस्थानात त्याच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले आणि निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंत:करणाने आणि विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. ज्या आशेविषयी आपण सांगत असतो तिच्याशी आपण न डळमळता दृढ़ राहू या, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे आणि प्रीती व सत्कर्मे करायला एकमेकांना प्रवृत्त कसे करता येईल ह्याकडे लक्ष देऊ या. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो बोध अधिक करावा.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
: Hebrews 10: 19-25
19 Having therefore, brethren, a confidence in the entering into the holies by the blood of Christ;
20 A new and living way which he hath dedicated for us through the veil, that is to say, his flesh,
21 And a high priest over the house of God:
22 Let us draw near with a true heart in fulness of faith, having our hearts sprinkled from an evil conscience, and our bodies washed with clean water.
23 Let us hold fast the confession of our hope without wavering (for he is faithful that hath promised),
24 And let us consider one another, to provoke unto charity and to good works:
25 Not forsaking our assembly, as some are accustomed; but comforting one another, and so much the more as you see the day approaching.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसादस्तोत्र २४:१-६

प्रतिसाद : प्रभो, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच लोक होत.

१) पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग आणि त्यात राहणारे सारे लोक परमेश्वराचे आहेत. कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला, त्यानेच जलप्रवाहावर तिला स्थिर केले.

२) परमेश्वराच्या पर्वतावर कोण चढेल ? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील ? ज्या माणसाचे हात निर्मळ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो निरर्थक वस्तूंची अभिलाषा बाळगत नाही तो.

३) त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल, आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो बक्षीसपात्र ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत, हे याकोबच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच.


Psalm: 24: 1-2, 3-4ab, 5-6
R. (6) Lord, this is the people that longs to see your face.

1 The earth is the Lord’s and the fulness thereof: the world, and all they that dwell therein.
2 For he hath founded it upon the seas; and hath prepared it upon the rivers.
R. Lord, this is the people that longs to see your face.

3 Who shall ascend into the mountain of the Lord: or who shall stand in his holy place?
4ab The innocent in hands, and clean of heart, who hath not taken his soul in vain.
R. Lord, this is the people that longs to see your face.

5 He shall receive a blessing from the Lord, and mercy from God his Saviour.
6 This is the generation of them that seek him, of them that seek the face of the God of Jacob.
R. Lord, this is the people that longs to see your face.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
A lamp to my feet is your word, a light to my path.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  मार्क ४:२१-२५
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  
        येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना ? कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही गुप्त राखलेले नसते. कोणाला ऐकावयास कान आहेत तर तो ऐको." पुन्हा तो त्यांना म्हणाला, "तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्यामापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल. ज्याला आहे त्याला दिले जाईल आणि ज्याला नाही त्याचे असेल नसेल तेही त्यांच्यापासून काढून घेतले जाईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
 Mark 4: 21-25
21 And he said to them: Doth a candle come in to be put under a bushel, or under a bed? and not to be set on a candlestick?
22 For there is nothing hid, which shall not be made manifest: neither was it made secret, but that it may come abroad.
23 If any man have ears to hear, let him hear.
24 And he said to them: Take heed what you hear. In what measure you shall mete, it shall be measured to you again, and more shall be given to you.
25 For he that hath, to him shall be given: and he that hath not, that also which he hath shall be taken away from him.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
परमेश्वर कोण आहे, त्याची आपणाकडून काय अपेक्षा आहे, आपण रोजचे जीवन कसे जगावे, ह्या प्रश्नांची उत्तरे समजून देण्याकरिता प्रभू येशू दाखले / दृष्टांत रूपाने शिकवतात. त्यालाच जोडून प्रभू येशू रोजच्या जीवनातील प्रकाश, दिवा अशा प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभे राहील, अशी उदाहरणे देऊन शिकवतात. प्रकाश-दिवा रोजच्या जीवनात, विशेषकरून विजेचा LED चा शोध लागला नव्हता, तेव्हा खूपच महत्त्वाच्या प्रतिमा होत्या. प्रकाश फक्त बाह्य सृष्टीतील गोष्ट नाही. अंतर्मन उजळून काढणारा, सौंदर्याचे दर्शन करणारा, सत्याविषयी स्पष्टीकरण देणारी प्रतिमा, परमेश्वराच्या चांगुलपणाविषयी खूप काही समजावून देणारा जीवनात प्रकाश असू शकतो. अंधारात अडखळण्यापासून सावध करणारा, रस्ता जीवनपथ हरवू नये, म्हणून योग्य व सुरक्षित रस्ता दाखविणारा प्रकाश असतो. “देवाचा शब्द प्रकाश आहे. त्या प्रकाशात आपली पाऊले न अडखळता योग्य व सुरक्षित दिशेने पडतात" असे स्तोत्र ११९:१०५ सांगतात. देवाच्या शब्दाशिवाय आपणाला सत्याची ओळख होत नसते. आपण देवाचा प्रकाश, त्याचे सत्य व त्याचे प्रेम, आहोत. जसा प्रकाश अंधारावर मात करतो, तसा जीवनात खोटे-नाटे, अंधश्रद्धा, मारक परंपरा, स्वार्थ, कपट, पापप्रवृत्ती ह्यांवर आपण मात करणे अत्यंत जरूरीचे आहे. आपण देवाचे जळते व सर्वांना प्रकाशीत करणारे दिवे-बत्ती बनले पाहिजेत.

प्रार्थना : हे सर्वशक्तीमान सनातन परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास व तुझी योजना पूर्णत्वास नेण्यास मला प्रेरणा दे, आमेन.

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या