Marathi Bible Reading | Tuesday 28th January 2025| 3rd Week in Ordinary Time

सामान्य काळातील ३रा सप्ताह   

मंगळवार  दि.२ जानेवारी  २०२५

जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई." For whosoever shall do the will of God, he is my brother, and my sister, and mother


संत थॉमस अक्वायनसचा सण 
(वर्तन साक्षी व धर्मपंडित (१२२५-१२०४)
✝️

इटलीमधील अत्यंत खानदानी घराण्यातील राजा फ्रेडरिक दुसरा ह्याच्या कुटुंबियांमध्ये थॉमसचा जन्म झाला. वयाच्या अगदी ५ व्या वर्षी मॉन्टे कॅसिनो येथे असलेल्या बेनेडिक्टाईन संघात त्याला दाखल करण्यात आले. वयाच्या ११ व्या वर्षी नेपल्सच्या महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला आणि वयाच्या १८ व्या वर्षी तो डॉमिनिकन बनला.

परंतु त्या भिक्षुकांच्या संस्थेत दाखल होण्याबाबत त्याचे कुटुंबीय खूप नाराज होते. एका खानदानी घराण्यातील सळसळत्या रक्ताचा युवक एका भिक्षुकांच्या संस्थेत दाखल होतो हे पाहून त्याच्या कुटुंबियांत इतकी कडवट प्रतिक्रिया उत्पन्न झाली की त्यांनी दोन वर्षे थॉमसला एका टॉवरमध्ये डांबून ठेवले.

प्रेषितांच्या कृत्यांमध्ये संत पौल दमास्कसमध्ये प्रभूची सुवार्ता पसरवित होते, त्यावेळी काही ख्रिस्ती धर्मविरोधी यहुदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला असताना त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी एका पाटीतून, गावकुसावरून खाली सोडले (प्रे. कृ. ९:२५). तशीच घटना थॉमसच्या बाबतीत घडली. डॉमनिकन सहकाऱ्यांनी त्याला एका टोपलीतून खाली उतरविले. तो अशा बंदिवासात असताना त्याच्या बहिणीने त्याला पवित्र शास्त्र आणि धार्मिक पुस्तके पुरविली. त्यात तत्त्वज्ञानाचीसुद्धा काही पुस्तके होती. लाखाच्या घरात गेली. “कॅथलिक इशज्ञानांचा राजकुमार” आणि “पवित्र धर्मपंडित" अशा पदव्या संपादन केलेल्या थॉमस ह्याने ॲरिस्टल ह्याचे तत्वज्ञान ख्रिस्ती धर्माच्या प्रकाशात विद्यार्थ्यांना शिकविले. अशा प्रकारे बौद्धिक तत्वज्ञान ह्या क्षेत्रातील तो पारंगत प्राध्यापक म्हणून जगभर मान्यता पावला.

फा. थॉमस केवळ ४९ वर्षे जगले, परंतु ह्या अल्पायुष्यात त्याने ६० पुस्तके लिहिली. "सुम्मा थिऑलॉजिए” किंवा “ख्रिस्ती तत्वज्ञान व ईशज्ञान ह्यांचे सार” ह्या त्याच्या लिखाणाचे अनेक खंड असंख्य भाषांमध्ये प्रसिद्ध झाले. ह्या ग्रंथामध्ये त्याने ख्रिस्ती तत्वज्ञान व ईशज्ञान पुढील शब्दात वर्णन केलेले आहे : ईशज्ञान व तत्वज्ञानाचा अंतिम उद्देश देवाविषयी ज्ञान प्रसारित करणे हाच होय. तो जसा आहे तसा समजून घेणे, तो सर्व गोष्टींचा विशेषतः मानवी जीवनाचा आदि व अंत आहे. त्यामुळे आपण प्रथम देवाविषयी देवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि शेवटी आपणासाठी मानव झालेला ख्रिस्त देवाकडे जाणारा मार्ग कसा आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही प्रकारचा अभ्यास व शिक्षण सुरू करण्याआधी संत थॉमस बराच वेळ प्रार्थना आणि मनन-चिंतनामध्ये घालवित असे आणि देवाचे सहाय्य मागत असे. तो त्याच कामामध्ये इतका गुंग होत असे की त्याने वेळेवर जेवण व झोप घ्यावी म्हणून त्याच्यावर एखादया धर्मबंधूची नेमणूक करावी लागे. बायबलमधील एखाद्या उताऱ्याचा अर्थ त्याला बऱ्याच अभ्यासानंतर जर समजलाच नाही तर तो उपवास करीत असे. त्याचा त्याला निश्चितच फायदा होई. ह्याच त्याच्या जीवनपद्धतीमुळे त्याच्यामध्ये पराकोटीचे पावित्र्य आणि उत्तुंग विचारवंत अशा दोहोंचा सुंदर मिलाफ घडवून आला.

ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताच्या सोहळ्यानिमित्ते करावयाची प्रार्थना, मिस्सामधील प्रार्थना, उपासना आणि “तांतुम एर्गो” “ओ सालतारिस होस्तीया” ही गाणी पोपमहाशयांच्या आज्ञेवरून त्यांनी रचली.

लिओन्स येथील परिषदेसाठी जात असतानाच संत थॉमस ह्यांना अचानक मृत्यू आला. त्याला कॅथलिक विद्यापीठे, महाविद्यालये व शाळा ह्यांचा आश्रयदाता संत म्हणून गौरविण्यात आले आहे.
✝️

पहिले वाचन:  इब्री - १०:१-१०

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन १०:१-१०

पुढे होणाऱ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे. वास्तविक स्वरूप नाही; म्हणून ते नियमशास्त्र प्रतिवर्षी नित्य अर्पिल्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना  पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. ते समर्थ असते तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापाची भावना नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय ? बैलाचे आणि बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून त्या यज्ञांमुळे वर्षानुवर्षे पापांची आठवण होत आहे.  

म्हणून ख्रिस्त जगात येतेवेळेस म्हणाला, "यज्ञ आणि अन्नार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती. तू माझ्यासाठी शरीर तयार केले; होमांनी आणि पापाबद्दलच्या अर्पण आणि तुला संतोष नव्हता." ह्यावरून मी म्हणालो, 'पाहा, हे देवा', ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, 'तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.' 

वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, "यज्ञ, अन्नार्पणे, होम आणि पापाबद्दलची अर्पणे, ह्यांची तुला इच्छा नव्हती आणि त्यात तुला संतोष नव्हता" आणि मग तो म्हणाला, “पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे." ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहे .

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Hebrews 10: 1-10
For the law having a shadow of the good things to come, not the very image of the things; by the selfsame sacrifices which they offer continually every year, can never make the comers thereunto perfect: For then they would have ceased to be offered: because the worshippers once cleansed should have no conscience of sin any longer: But in them there is made a commemoration of sins every year. For it is impossible that with the blood of oxen and goats sin should be taken away. Wherefore when he cometh into the world, he saith: Sacrifice and oblation thou wouldest not: but a body thou hast fitted to me: Holocausts for sin did not please thee. Then said I: Behold I come: in the head of the book it is written of me: that I should do thy will, O God.8 In saying before, Sacrifices, and oblations, and holocausts for sin thou wouldest not, neither are they pleasing to thee, which are offered according to the law.
 Then said I: Behold, I come to do thy will, O God: he taketh away the first, that he may establish that which followeth.
In the which will, we are sanctified by the oblation of the body of Jesus Christ once.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसादस्तोत्र ४०:२,४,७,८,१०,११
प्रतिसाद : हे माझ्या देवा, पाहा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.
१.  मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले.

२.  यज्ञपशू आणि अन्नार्पण यात तुला संतोष नाही; तू माझे कान उघडले आहेत. होम आणि पापाबद्दलचे अर्पण ही तू मागत नाहीस. यावरून मी म्हणालो, "पाहा, मी आलो आहे."

३.   महासभेत मी धार्मिकतेचे सुवृत्त सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद केले नाही हे तू जाणतोस. 

४.  मी आपल्या मनात तुझे न्यायीपण लपवून ठेवले नाही, परंतु तुझी दया आणि सत्यता प्रकट केली. महामंडळापासून तुझे वात्सल्य आणि तुझे सत्य मी गुप्त ठेवले नाही.

Psalm: 40: 2 and 4ab, 7-8a, 10, 11
R. (8a and 9a) Here am I Lord; I come to do your will.

2 With expectation I have waited for the Lord,
 and he was attentive to me.
4ab And he put a new canticle into my mouth, 
a song to our God.
R. Here am I Lord; I come to do your will.

7 Sacrifice and oblation thou didst not desire; 
but thou hast pierced ears for me. 
Burnt offering and sin offering thou didst not require:
8a Then said I, Behold I come.
R. Here am I Lord; I come to do your will.

10 I have declared thy justice in a great church, 
 I will not restrain my lips: O Lord, thou knowest it.
R. Here am I Lord; I come to do your will.

11 I have not hid thy justice within my heart: 
I have declared thy truth and thy salvation. 
I have not concealed thy mercy 
and thy truth from a great council.
R. Here am I Lord; I come to do your will.

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
 हे प्रभो, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमची अंत:करणे उघड.
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
 Blessed are you, Father, Lord of heaven and earth; you have revealed to little ones the mysteries of the Kingdom.

R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमानमार्क  ३:३१-३५ 
वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 येशूची आई आणि त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले. त्याच्याभोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, “पाहा, बाहेर आपली आई आणि आपले भाऊ आपले शोध करीत आहेत.' त्याने त्यांना उत्तर दिले "कोण माझी आई आणि माझे भाऊ?" मग जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, "पाहा, ही माझी आई आणि हे माझे भाऊ ! जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
 Mark 3: 31-35
And his mother and his brethren came; and standing without, sent unto him, calling him. And the multitude sat about him; and they say to him: Behold thy mother and thy brethren without seek for thee. And answering them, he said: Who is my mother and my brethren? And looking round about on them who sat about him, he saith: Behold my mother and my brethren. For whosoever shall do the will of God, he is my brother, and my sister, and mother.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
परमेश्वराने आपणाला जन्म दिला. त्याहीपुढे, कुटुंबात जन्म दिला, हे सत्य आपण कधीही विसरू शकत नाही. आपले संबंध जणू खूप विस्तारीत, विशाल होत जाण्यासाठी खूप संधी आपणाला कुटुंबांमुळे मिळते. सर्व नाते- संबंधांची सुरुवात तेथे सुरू होते. जीवनाचे धडे शिकण्याला सुरुवात तेथूनच होते. मग मित्र, शेजारी, सहकारी आपणाला लाभतात. आज एक प्रसंग नमूद करताना संत मार्क कथन करतो की, प्रभू येशूने त्याच्या नातेवाईकांवर दुर्लक्ष केले; त्यांचा जणू अपमान केला असे शुभवर्तमान ऐकणाऱ्या व्यक्तिला वाटते. शरीरधारी प्रभू येशूचे नातलग त्याला भेटण्यासाठी आले होते. आपल्या आईवरीलप्रेमाबद्दल प्रभू येशूला कोणीही, कधीही दोषी ठरवू शकणार नाही. शुभवर्तमानातील इतर प्रसंग आठवा : प्रभू येशूचे त्याच्या आईवर प्रेम, आदर, भक्ती, आस्था, चिंतासुद्धा जगाला आदर्श देणारी होती; परंतु, ह्या सर्वांचा समावेश ज्या एका मुख्य हेतूसाठी तो परमपित्याचा पुत्र माणूस झाला होता त्यात प्रभू येशूने केला. प्रभू येशूने कोणालाही जवळचे किंवा परके असा भेदभाव केला नाही. देवाला नक्की आपल्याकडून काय अपेक्षित आहे? लांबून हाय-बाय करीत राहायचे का? विश्वासाची नाती, विश्वास, ममता, मैत्री, बांधीलकी धरसोड नव्हे, तर एकनिष्ठता, सातत्य, विश्वासूपणा, दया, विचारशिलता, करुणा, सहकार्य, प्रोत्साहन, समर्थन ह्या दर्जाचे आपणामधील नातेसंबंध. परमेश्वर आपणाशी कसा वागतो? परमेश्वर कोणाचा कधीही विश्वासघात करत नाही, कधीही कोणाला विसरत नाही, कधीही कोणाशी तडजोड करत नाही, कधीही खोटेपणा नाही, कधीही कोणाची निराशा करणार नाही, आपण जरी दूर गेलो तरी परमेश्वर आप्ल्यावर दुर्लक्ष करणार नाही. तो आपल्या मागेच लागणार. त्याचा स्वभावधर्मच प्रीती, क्षमा, समजुतदारपणा आहे. पवित्र मरियेलादेखील हेच हवे होते व ती प्रभू येशूच्या प्रेषित कार्यात संपूर्णपणे सहभागी झाली व सर्वांची आई बनली.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्याशी एकनिष्ठ राहून आध्यात्मिकतेत वाढण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या