Marathi Bible Reading | Wednesday 22nd January 2025| 2nd Week in Ordinary Time

सामान्य काळातील २रा सप्ताह   

बुधवार  दि.२२ जानेवारी  २०२५

"शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यातून कोणते सशास्त्र आहे?" Is it lawful to do good on the sabbath days, or to do evil? to save life, or to destroy?

संत विन्सेंट पलोटी
वर्तनसाक्षी (१७९८-१८५०)


संत विन्सेंट पलोटीच्या उत्साहाची वेंग इतकी मोठी होती की त्यामध्ये जणू संपूर्ण जग, प्रत्येक आध्यात्मिक आणि ऐहिक गरज मावू शकली असती. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी त्यांनी धर्मगुरू / धर्मबंधू / प्रापंचिक इत्यादींसाठी "सोसायटी ऑफ कॅथलिक अपोस्टलेट” (फ्लोटियन्स) आणि मुलींसाठी “सिस्टर्स ऑफ कॅथलिक अपोस्टलेट" ह्या संस्था सुरू केल्या. आज प्रापंचिकांना ख्रिस्तसभेत जो सहभाग दिला जात आहे त्याचाच विचार १०७ वर्षापूर्वी फा. विन्सेंट पलोटी ह्यांनी केलेला होता.

पोप प्रायस अकरावे ह्यांनी त्याला ख्रिस्ती कार्याचा अग्रदूत आणि निष्ठावंत कार्यकर्ता अशा शब्दात गौरविले होते. फा. विन्सेंट ह्यांनी कामगारांची संघटना, कृषिविद्यालय, पतपेढी, अनाथालये, मुलींसाठी वसतिगृहे, अशा प्रकारचे सामाजिक प्रकल्पही राबविले. त्यांचा एक युवा मित्र पुढे पोप लिओ तेरावे ह्यांच्या रुपाने सामाजिक जीवनात अवतरला व त्यांनी “रेरुम नोवारुम” हे परिपत्रक लिहिले. त्यात कामगारांची आध्यात्मिकता व नैतिकता प्रकर्षाने वर्णन केलेली आहे.

वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी विन्सेंट ह्यांना २२ जाने. १८५० रोजी मृत्यू आला. शंभर वर्षानंतर पोप पायस बारावे ह्यांनी त्यांना धन्यवादित ही पदवी बहाल केली आणि मग लवकरच त्याची संतीकरणाची प्रक्रिया १९६३ साली पूर्णत्वास गेली. त्यावेळी दुसरी व्हॅटिकन विश्वपरिषद भरली होती.


पहिले वाचन इब्री ७:१-३,१५-१७

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 

      मलकीसदेक, शालेमचा राजा आणि परात्पर देवाचा याजक होता. आब्राहाम जेव्हा राजास ठार मारून परत आला तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला आणि आब्राहामने त्याला सर्व लुटीचा दशांश दिला. तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्त्वाचा राजा आणि दुसरे शालेमचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता. त्याची मातापितरे, वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट (ह्यांचा उल्लेख कोठेही सापडत) नाही. तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो नित्य याजक राहतो आणि दैहिक आज्ञेच्या नियमाने नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्यने झालेला असा मलकीसदेकसारखा निराळा याजक जर उद्भवला आहे, तर ह्यावरून आम्ही सांगितलेले ते अधिकच स्पष्ट होते. कारण त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, "तू मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक आहेस."

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
: Hebrews 7: 1-3, 15-17
For this Melchisedech was king of Salem, priest of the most high God, who met Abraham returning from the slaughter of the kings, and blessed him: To whom also Abraham divided the tithes of all: who first indeed by interpretation, is king of justice: and then also king of Salem, that is, king of peace: Without father, without mother, without genealogy, having neither beginning of days nor end of life, but likened unto the Son of God, continueth a priest for ever. And it is yet far more evident: if according to the similitude of Melchisedech there ariseth another priest, Who is made not according to the law of a carnal commandment, but according to the power of an indissoluble life: For he testifieth: Thou art a priest for ever, according to the order of Melchisedech.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ११०:१-४
प्रतिसाद :मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.
१) माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो : 
"मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस."

२) परमेश्वर तुझा राजदंड सियोनातून पुढे नेईल; 
तो म्हणतो, तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.

३) तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, 
पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दंहिवरासारखे आहेत.

४) परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही. "मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस."


Psalm: 
Psalms 110: 1, 2, 3, 4
R. (4b) You are a priest for ever, in the line of Melchizedek.

1 The Lord said to my Lord: Sit thou at my right hand: Until I make thy enemies thy footstool.
R. You are a priest for ever, in the line of Melchizedek.

2 The Lord will send forth the sceptre of thy power out of Sion: rule thou in the midst of thy enemies.
R. You are a priest for ever, in the line of Melchizedek.

3 With thee is the principality in the day of thy strength: 
in the brightness of the saints:
 from the womb before the day star I begot thee.
R. You are a priest for ever, in the line of Melchizedek.

4 The Lord hath sworn, and he will not repent: 
Thou art a priest for ever according to the order of Melchisedech.
R. You are a priest for ever, in the line of Melchizedek.

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, 
तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल..
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
Jesus preached the Gospel of the Kingdom and cured every disease among the people.

R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान मार्क :१-६

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

          येशु सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्बाथ दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहावयास ते टपून बसले होते. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, "असा पुढे ये.' मग तो त्यांना म्हणाला, "शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यातून कोणते सशास्त्र आहे?" पण ते उगेच राहिले. मग त्याने त्यांच्या अंत:करणाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले आणि त्या माणसाला म्हटले, "हात लांब कर." त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. मग परुशी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा ह्याविषयी लागलीच हेरोदियांबरोबर त्याच्याविरुद्ध मसलत करीत बसले.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Mark 3: 1-6
And he entered again into the synagogue, and there was a man there who had a withered hand. And they watched him whether he would heal on the sabbath days; that they might accuse him. And he said to the man who had the withered hand: Stand up in the midst. And he saith to them: Is it lawful to do good on the sabbath days, or to do evil? to save life, or to destroy? But they held their peace. And looking round about on them with anger, being grieved for the blindness of their hearts, he saith to the man: Stretch forth thy hand. And he stretched it forth: and his hand was restored unto him. And the Pharisees going out, immediately made a consultation with the Herodians against him, how they might destroy him.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
निर्गम ह्या बायबलमधील पुस्तकात "शब्बाथ पवित्र पाळ" (निर्गम २०:८), ह्या आज्ञेचा हेतू काय आहे? प्रभू येशूला विरोध करायचाच, हे ठरवून त्याला पकडण्यासाठी परुशी आणि शास्त्री टपले होते. “प्रभू येशूने सर्वांकडे रागाने पाहिले," असा उल्लेख संतमार्क करतो. "कारण त्यांच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे प्रभू ख्रिस्त खिन्न झाला होता. रास्त काय व चुकीचे काय, ह्या माणसाने केलेल्या कल्पना जेव्हा एखादी व्यक्ती देवावर लादते - म्हणजेच देवाचे मन समजून घेण्यास नकार - देवाला समजण्यासाठी दुर्लक्ष, उदासिनता ही पापाच्या मुळाशी असतात. काय अर्थ आहे आदितवाराचा? जीव घेण्यापेक्षा जीव वाचवणे आणि वाईट करण्यापेक्षा बरे करणे, हे ह्या दिवसाचे उद्दिष्ट आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने व्यक्तीचे (आत्मोन्नती), सर्वोदयासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे, समाजाचे, देशाचे, जगाचे भले करणे. आपण रविवार कसा घालवतो ह्याचे सखोल चिंतन करा. आळस, लावालावी, चव्हाट्यावर बसून केलेल्या चांभार चौकशा, कोणाला खाली पाडण्यासाठी चुगलीद्वारे रचलेले मनसुबे... रविवार हा प्रभू ख्रिस्ताने बहाल केलेल्या अविनाशी जीवनाची आठवण, आमचे पापप्रवृत्तीपासून केलेल्या सुटकेचे, म्हणून रविवारला "देवाचा दिवस" गणले जाते. आपल्या शब्दांनी, कृत्यांनी, वर्तनाने देवाची स्तुती करण्याचा दिवस. शेजार धर्म पाळण्याची संधी. कसे वागवतो मी दुसऱ्याला ? शेजाऱ्याला ? परक्याला? अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला? असा प्रश्न प्रभू ख्रिस्त अस्खलित शब्दांत विचारतात.

प्रार्थना : हे दयावंत प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या दयेवर विसंबून राहण्यास व तुला अनुसरण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या