सामान्य काळातील ५ था सप्ताह
सोमवार दि.१० फेब्रुवारी २०२५
आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत असत.
and as many as touched him were made whole.
- कुमारिका (४८०-५४७)
स्कोलास्टीका ही इटलीतील नर्सिया या ठिकाणी जन्मली होती. संत बेनेडिक्ट (सण ११ जुलै) ह्यांची ती जुळी बहीण होय. एकदम बालवयात तिने आपल्या भावाप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या संपत्ती व ऐश्वर्यावर पाणी सोडून त्याच्यासह सुबियाको येथे जाण्याचे व आयुष्यभर देवाची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते आणि मोठेपणी दोघेही सुबियाको येथे जाऊन ते स्वप्न पूर्ण केले. परंतु नंतर बेनेडिक्ट दक्षिण इटलीतील मोन्टे कॅसिनो येथे गेल्यामुळे तिने सुबियाको येथेच राहून बेनेडिक्टाईन आचारसंहितेवर आधारित एका कॉन्व्हेन्टची स्थापना केली. तिथे तिला बऱ्याच तरूण मुली येऊन मिळाल्या होत्या.
हे दोघे भाऊ-बहिणी वर्षातून केवळ एकदाच उपवासकाळामध्ये आध्यात्मिक गोष्टींवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी भेटत असत. दोघांची आध्यात्मिक प्रगती एवढी विलक्षण झालेली होती की त्यांचे समकालीन संत ग्रेगरी महान ह्यांनी त्यांच्या एकत्र भेटीतील मौल्यवान आध्यात्मिक विचारांचे संकलन केलेले आहे. दोघांच्या शेवटच्या भेटीचे त्यांनी केलेले हृदयस्पर्शी वर्णन तर आपल्याला दोघांच्या आध्यात्मिक उदात्ततेची जाणीव करून देते.
“आपला मरणकाळ जवळ येऊन ठेपला आहे असे जाणवताच स्कोलास्टिका हिने आपल्या पवित्र भावाला विनंती केली की, आपण रात्रभर व पहाटेपर्यंत आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा करू." परंतु बेनेडिक्ट हे आपल्या मठवासीय आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणारे होते. त्यामुळे अंधार पडण्याआधी आपल्याला आपल्या मठाच्या नियमानुसार परतले पाहिजे ह्याविषयी त्यांनी ठाम भूमिका घेतली. अशा वेळी स्कोलॅस्टिका हिने देवाजवळ कळकळीची याचना केली की, बेनेडिक्टच्या मनातील विचार बदलून त्याने रहावे कारण ही रात्र शेवटची रात्र आहे. तिची विनंती ऐकली गेली. एकाएकी आभाळ भरून आले. सोसाट्याचा वारा सुटला. विजा चमकू लागल्या. मुसळधार पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या प्रचंड गडगडाटाने भूमी हादरून गेली. ह्या परिस्थितीपुढे बेनेडिक्टने हात टेकले. ही देवाची इच्छा आहे असे मानून बेनेडिक्टने आपल्या मठात परतण्याचा बेत रद्द केला. न्याय आणि शिस्तीचा कायदा प्रेमाच्या सामर्थ्यापुढे जणू पांगळा ठरला होता. दोन्ही संतांनी रात्रभर आध्यात्मिक मेजवानी झोडली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे आपापल्या संघात निघून गेले.
तिसऱ्या दिवशी बेनेडिक्टला निरोप मिळाला की, आपली बहीण स्वर्गवासी झालेली आहे. त्यावेळी दोघे ६७ वर्षांचे होते. बेनेडिक्टने मॉन्टेकॅसिनो येथे स्वत:साठी एक थडगे तयार ठेवले होते. त्यात त्याने आपल्या स्वतःच्या हातांनी स्कोलास्टिकाला मूठमाती दिली. थोड्याच दिवसांनी २१ मार्च रोजी त्याचीही प्राणज्योत मालवली. त्याला तिच्या शेजारीच पुरण्यात आले.
अशा प्रकारे दोन महान संतांचा एकत्र जन्म व एकत्र मृत्यू झाला (४८० -५४७). ह्या दोन संतांनी स्थापन केलेल्या व्रतस्थ संघातून १४ शतकात जवळजवळ ५०० संत ख्रिस्तसभेला देण्यात आलेले आहेत. वादळवाऱ्यात संत स्कोलास्टिकाचा धावा केला जातो.
पहिले वाचन उत्पत्ती १:१-१९
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"देव बोलला आणि तसे झाले. "
प्रारंभी देवाने आकाश आणी पृथ्वी ही उत्पन्न केली. तेव्हा पृथ्वी आकारविरहीत आणि शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंध:कार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता.
तेव्हा देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला तो आवडला. देवाने प्रकाश आणि अंध:कार हे वेगवेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस आणि अंध:काराला रात्र म्हटले आणि सायंकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस.मग देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो आणि ते जलास दुभागणारे होवो.” असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या आणि वरच्या जलास दुभागिले आणि तसे झाले. देवाने अंतराळाला आकाश म्हटले आणि सायंकाळ झाली आणि सकाळ झाली; हा दुसरा दिवस.
मग देव बोलला, “आकाशाखाली जलांचा एके स्थळी संचय होवो आणि कोरडी जमीन दृष्टीस पडो” आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीला भूमी म्हटले आणि जलांच्या संचयाला समुद्र म्हटले. देवाने पाहिले की हे चांगले आहे तेव्हा देव बोलला, "हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपआपल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो.” आणि तसे झाले. हिरवळ, आपआपल्या परी बीज देणारी वनस्पती आणि आपआपल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की है। चांगले आहे. सायंकाळ झाली आणि सकाळ झाली; हा तिसरा दिवस.
मग देव बोलला, “दिवस आणि रात्र हे भिन्न करण्यासाठी आकाशमंडळात ज्योती होवोत; त्या चिन्हे, ऋतू, दिवस आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत, पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशमंडळात त्या दीप होवोत.” आणि तसे झाले. देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या, दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योत आणि तारेही केले. पृथ्वीवर प्रकाश पाडावा, दिवस आणि रात्र यावर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार यांस भित्र करावे, म्हणून देवाने आकाशमंडळात त्या ज्योती ठेवल्या, देवाने पाहिले की हे चांगले आहे. सायंकाळ झाली आणि सकाळ झाली; हा चौथा दिवस.
प्रभूचा शब्द आहे.
First Reading :: Genesis 1: 1-19
In the beginning, God created heaven and earth. And the earth was void and empty, and darkness was upon the face of the deep; and the spirit of God moved over the waters. And God said: Be light made. And light was made. And God saw the light that it was good; and he divided the light from the darkness. And he called the light Day, and the darkness Night; and there was evening and morning one day. And God said: Let there be a firmament made amidst the waters: and let it divide the waters from the waters. And God made a firmament, and divided the waters that were under the firmament, from those that were above the firmament, and it was so. And God called the firmament, Heaven; and the evening and morning were the second day. God also said: Let the waters that are under the heaven, be gathered together into one place: and let the dry land appear. And it was so done. And God called the dry land, Earth; and the gathering together of the waters, he called Seas. And God saw that it was good. And he said: Let the earth bring forth the green herb, and such as may seed, and the fruit tree yielding fruit after its kind, which may have seed in itself upon the earth. And it was so done. And the earth brought forth the green herb, and such as yieldeth seed according to its kind, and the tree that beareth fruit, having seed each one according to its kind. And God saw that it was good. And the evening and the morning were the third day. And God said: Let there be lights made in the firmament of heaven, to divide the day and the night, and let them be for signs, and for seasons, and for days and years: To shine in the firmament of heaven, and to give light upon the earth. And it was so done. And God made two great lights: a greater light to rule the day; and a lesser light to rule the night: and the stars. And he set them in the firmament of heaven to shine upon the earth. And to rule the day and the night, and to divide the light and the darkness. And God saw that it was good. And the evening and morning were the fourth day.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १०४:१-२अ, ५-६, १०.१२, २४-३५क
प्रतिसाद : परमेश्वराला आपल्या कृतीपासून आनंद होवो !
१) हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे.
हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस,
तू सन्मान आणि महिमा ह्यांनी मंडित आहेस;
तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस.
२) तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापिली आहेस
की ती कधीही ढळणार नाही.
तिला तू वस्त्राप्रमाणे जलाशयाने आच्छादले,
पर्वतांवर जले स्थिर राहिली.
३) तो खोऱ्यातून झरे काढतो,
ते डोंगरांमधून वाहतात.
त्यांच्याजवळ आकाशातील पक्षी वस्ती करतात;
ते वृक्षांच्या फांद्यांवरून गातात.
४) हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत !
ती सर्व तू सुज्ञतेने केली.
तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.
हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे.
Psalm: Psalms 104: 1-2a, 5-6, 10 and 12, 24 and 35c
R. (31b) May the Lord be glad in his works.
1 For David himself. Bless the Lord, O my soul: O Lord my God, thou art exceedingly great. Thou hast put on praise and beauty:
2a And art clothed with light as with a garment.
R. May the Lord be glad in his works.
5 Who hast founded the earth upon its own bases: it shall not be moved for ever and ever.
6 The deep like a garment is its clothing: above the mountains shall the waters stand.
R. May the Lord be glad in his works.
10 Thou sendest forth springs in the vales: between the midst of the hills the waters shall pass.
12 Over them the birds of the air shall dwell: from the midst of the rocks they shall give forth their voices.
R. May the Lord be glad in his works.
24 How great are thy works, O Lord? thou hast made all things in wisdom: the earth is filled with thy riches.
35c O my soul, bless thou the Lord.
R. May the Lord be glad in his works.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Jesus preached the Gospel of the Kingdom and cured every disease among the people.
Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क ६:५३-५६
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशूला जितके स्पर्श करीत तितके बरे होत असत."
येशू आणि त्याचे शिष्य पलीकडे जाऊन गनेसरेतच्या किनाऱ्यास पोहचले तेव्हा त्यांनी मचवा बांधून ठेवला. ते मचव्यातून उतरताच लोकांनी त्याला ओळखले आणि ते आसपासच्या सर्व भागात चोहोकडे धावपळ करीत सुटले आणि जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले तेथे तेथे ते आजाऱ्यांना बाजेवर घालून नेऊ लागले. तो खेड्यापाड्यांत, नगरात किंवा शेतामळ्यांत कोठेही जावो, तेथे ते आजाऱ्यांना भर बाजारात आणून ठेवीत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत असत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Mark 6: 53-56
53 And when they had passed over, they came into the land of Genezareth, and set to the shore.54 And when they were gone out of the ship, immediately they knew him:55 And running through that whole country, they began to carry about in beds those that were sick, where they heard he was.56 And whithersoever he entered, into towns or into villages or cities, they laid the sick in the streets, and besought him that they might touch but the hem of his garment: and as many as touched him were made whole.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आजची वाचने आपणांस विश्वाच्या निर्मितीपासून प्रभू येशू, देव आणि मानव आहे, ह्या अनुभवापर्यंत घेऊन जातात. निर्मितीची कथा आपणांस सखोल आठवण करून देते की, प्रत्येक गोष्टींमध्ये देवाचे अस्तित्व आहे. आपण आपल्या पृथ्वीचे आणि सर्व सजीव वनस्पती व प्राण्यांचे चांगले संरक्षक असणे आवश्यक आहे. आपली एकमेकांबद्दलची काळजी ह्या संदेशातून प्रतिबिंबीत होते. जेव्हा मी जगाला सर्वांसाठी चांगले निवास स्थान बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मी देवाच्या काळजीवाहक मशागतीचा पुनरुच्चार करीत असतो. मी सर्व गोष्टींमध्ये देव शोधला पाहिजे, चराचर सृष्टी व जीवन त्याचीच निर्मिती आहे. आजचे शुभवर्तमान आपल्याला प्रभू येशूमध्ये देवाचे अस्तित्व दर्शविते. आजारीलोकांचा असा विश्वास होता की, प्रभू येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला साधा स्पर्श केल्यानेसुद्धा ते बरे होतील. किती दांडगा हा विश्वास. आपण देखील प्रभू येशूजवळ त्याच विश्वासाने आले पाहिजे. मी जेव्हा निराश असतो आणि माझा विश्वास डळमळीत होतो, तेव्हा मला प्रभू येशूच्या वस्त्ररूपी गोंड्याची आठवण झाली पाहिजे. त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला केलेला स्पर्श मला बरे करू शकतो. आपला असा विश्वास असला पाहिजे, म्हणजे देव आपल्या सोबतीला आहे आणि आपली काळजी घेतो हे निश्चित
प्रार्थना :हे प्रभू येशू ख्रिस्ता, मला स्पर्श कर आणि मला शुद्ध करून नवजीवनाचे वरदान दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या