सामान्य काळातील ५ था सप्ताह
गुरुवार दि.१३ फेब्रुवारी २०२५
तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा; तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे."For this saying go thy way, the devil is gone out of thy daughter.
- कुमारिका (१५२२-१५९०)
कॅथरीनचे बालपणीचे नाव आलेक्सांद्रा रोमोला असे होते. इटलीतील फ्लॉरेन्स येथे जन्मलेल्या ह्या नीतिमान व देवभिरू मुलीचे कुटुंब व्यापारी आणि सावकारी घराण्यातील होते. घरात ख्रिस्ती धर्माचा कुठलाही लवलेश नव्हता. मात्र आलेक्सांद्रा हिला इटलीत राहिल्यामुळे येशूविषयी आणि त्याची सेवा भक्तिभावाने करणाऱ्या जोगिणीविषयी खूप आदर वाटे. त्यामुळे बालपणापासूनच ती एकांतात प्रार्थना करीत असे.
देवाने या निष्पाप मुलीचे पावित्र्य पाहून वयाच्या १३ व्या वर्षी डॉमिनिकन कॉन्व्हेन्टमध्ये प्रवेश मिळावा म्हणून तिच्या जीवनात अनुकूल परिस्थिती निर्माण केली. प्रातो ह्या ठिकाणच्या कॉन्व्हेन्टमध्ये आपल्या व्रतविधीच्या वेळी तिने कॅथरीन हे नाव धारण केले. तेथील पहिल्या पाच वर्षात तिची अतिधार्मिक वृत्ती पाहून तिच्याविषयी फार मोठा गैरसमज निर्माण झाला. परंतु हा गैरसमज फार काळ टिकला नाही.तिचे पवित्र व सभ्य वर्तन पाहून तिच्या सहकारी जोगीणींनी तिचा आदर सन्मान करायला सुरुवात केली. लवकरच तिला नवशिष्यिणींचे प्रमुख (नॉव्हीस मिस्ट्रेस) नेमण्यात आले. त्यानंतर तिला व्रतस्थ संघाचे उपप्रमुख आणि शेवटी १५६० साली प्रमुख पद देण्यात आले. त्यानंतर आपल्या आयुष्याची उर्वरित ३० वर्षे ती ह्या प्रमुखपदी अत्यंत नम्रपणे कार्यरत होती.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहनात ती अतिशय तन्मयतेने सहभागी होई. इतकी की शेवटी १५४२ साली गुरुवारी दुपारी १ वाजेपासून शुक्रवारी संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत ती देहभान हरपून त्यातच गुंग होती. तिला तहानभूक व झोपेची शुद्ध नव्हती. दर आठवड्याला हे आकस्मितपणे घडू लागले. अशा प्रकारचा तिचा आध्यात्मिक अनुभव पुढे १२ वर्षे चालू राहिला.
दरम्यानच्या काळात ह्या भयंकर आत्मक्लेशापासून आपली मुक्तता व्हावी म्हणून कॅथरीनने प्रार्थना करायला सुरुवात केली परंतु तोपर्यंत ह्याविषयीची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. तिच्या दर्शनासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागले. त्यात तीन भावी पोप महाशयांचाही समावेश होता. ह्या घटनेमुळे आपल्या कॉन्व्हेंटमधील दैनंदिन कार्यक्रमावर परिणाम होत असल्याचे पाहून ती कमालीची त्रस्त होई.
तिच्या ह्या आत्मक्लेशाची ख्रिस्तसभेने बारीक चिकित्सात्मक चौकशी केल्यावर तात्कालीन ख्रिस्ती लोकांना असे आढळून आले की, ह्या आत्मक्लेशाच्या काळात कॅथरीन प्रभूयेशूच्या संपूर्ण दुःखसहनात शारीरिकदृष्ट्या सहभागी होई. तिच्या मस्तकावर काटे खुपसल्याच्या खूणा व रक्त दिसून येई. शुक्रवारी दुपारपर्यंत आपल्या खांद्यांवर क्रुसाचे अवजड ओझे घेऊन ती चालत अडखळत वाहात असल्याचे दिसे. त्यानंतर तिच्या हातापायाला क्रुसावर खिळलेल्या येशूच्या जखमांचे व्रण दिसत असत.
कॅथरीनला अद्भुत कृत्ये करण्याचीदेखील देणगी लाभलेली होती. रोमच्या संत फिलीप नेरी आणि फ्लॉरेन्सच्या संत मेरी माग्दालेन डी पाइझी ह्या संतांशी तिने आपले प्रातो येथील कॉन्व्हेंटमध्ये राहूनच चमत्कारिकरित्या संभाषण केल्याचे आढळून आले.
कॅथरीन दीर्घकालीन आजारानंतर २ फेब्रुवारी १५९० रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी मरण पावल्या.
✝️
पहिले वाचन उत्पत्ती २:१८-२५
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
“परमेश्वराने तिला आदांमकडे नेले; ती दोघे एकदेह झाली."
परमेश्वर देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्यांच्यासाठी अनुरूप मदतनीस मी करीन." परमेश्वर देवाने सर्व वनपशू आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले, तेव्हा आदामने प्रत्येक सजीव प्रण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामने सर्व ग्रामपशू, आकाशातील पक्षी आणि सर्व वनपशू यांना नावे दिली; पण आदामला कोणी अनुरूप मदतनीस मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला,
“आता ही मात्र माझ्या हाडातले हाड आणि मांसातले मांस आहे; हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे.” यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एकदेह होतील. आदाम आणि त्याची स्त्री ही दोघे नग्न होती, तरी त्यांना संकोच वाटत नसे.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Genesis 2: 18-25
And the Lord God said: It is not good for man to be alone: let us make him a help like unto himself. And the Lord God having formed out of the ground all the beasts of the earth, and all the fowls of the air, brought them to Adam to see what he would call them: for whatsoever Adam called any living creature the same is its name. And Adam called all the beasts by their names, and all the fowls of the air, and all the cattle of the field: but for Adam there was not found a helper like himself. Then the Lord God cast a deep sleep upon Adam: and when he was fast asleep, he took one of his ribs, and filled up flesh for it. And the Lord God built the rib which he took from Adam into a woman: and brought her to Adam. And Adam said: This now is bone of my bones, and flesh of my flesh; she shall be called woman, because she was taken out of man. Wherefore a man shall leave father and mother, and shall cleave to his wife: and they shall be two in one flesh. And they were both naked: to wit, Adam and his wife: and were not ashamed.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १२८:१,२-३, ४-५
प्रतिसाद : जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो तो धन्य !
१ जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो,
जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य !
तू आपल्या श्रमाचे फळ खाशील;
तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.
2) तुझ्या माजघरात तुझी स्त्री
सफळ द्राक्षवेलीसारखी होईल,
तुझ्या मेजासभोवती तुझी
मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील.
३) पाहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला
असा आशीर्वाद मिळेल.
परमेश्वर सियोनतून तुला तुझ्या
आयुष्याचे सर्व दिवस आशीर्वाद देवो!
Psalm:
Psalms 128: 1-2, 3, 4-5
R. (1a) Blessed are those who fear the Lord.
1 Blessed are all they that fear the Lord:
that walk in his ways.
2 For thou shalt eat the labours of thy hands:
blessed art thou, and it shall be well with thee.
R. Blessed are those who fear the Lord.
3 Thy wife as a fruitful vine,
on the sides of thy house.
R. Blessed are those who fear the Lord.
4 Behold, thus shall the man be blessed that feareth the Lord.
5 May the Lord bless thee out of Sion:
and mayest thou see the good things of
Jerusalem all the days of thy life.
R. Blessed are those who fear the Lord.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
जे देवाचे वचन ऐकतात, सालस आणि चांगल्या अंत:करणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. ते धन्य होत.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Humbly welcome the word that has been planted in you and is able to save your souls
Alleluia, alleluia.
शुभवर्तमान
मार्क ७ :२४-३०
वाचक : मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"घरची कुत्रीही मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात."
गनेसरेत येथून निघून येशू सोर प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लागलेच ऐकले आणि ती येऊन त्याच्या पाया पडली. ती बाई हेल्लेणी असून सुरफूनीकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली “माझ्या मुलीतून भूत काढा.” तो तिला म्हणाला, “मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही." यावर तिने उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात." तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा; तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे." मग ती आपल्या घरी गेली, तो मुलीला अंथरुणावर टाकले आहे आणि भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Mark 7: 24-30
And rising from thence he went into the coasts of Tyre and Sidon: and entering into a house, he would that no man should know it, and he could not be hid. For a woman as soon as she heard of him, whose daughter had an unclean spirit, came in and fell down at his feet. For the woman was a Gentile, a Syrophenician born. And she besought him that he would cast forth the devil out of her daughter. Who said to her: Suffer first the children to be filled: for it is not good to take the bread of the children, and cast it to the dogs. But she answered and said to him: Yea, Lord; for the whelps also eat under the table of the crumbs of the children. And he said to her: For this saying go thy way, the devil is gone out of thy daughter. And when she was come into her house, she found the girl lying upon the bed, and that the devil was gone out.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
आजच्या वाचनांतून आपल्याबद्दलची दोन सत्ये प्रभू शब्दांद्वारे आपणांसमोर मांडण्यात आली आहेत. पहिले आपल्याला देवाच्या निर्मितीत त्याचे सहकारी होण्यासाठी एकत्रितपणे बोलावण्यात आले आहे आणि दुसरे, आपण नेहमीच परमेश्वरासमोर नम्र असले पाहिजे. लक्षात घ्या - परमेश्वर व्यक्तीला नव्हे तर सर्वांना एकत्र बोलावतो. आदामप्रमाणेच, देव आपल्याला सृष्टीच्या अद्याप अविरत चालू असलेल्या निर्मितीच्या कार्यात त्याच्याबरोबर सहभागी होण्याचे आमंत्रण देतो. परमेश्वराने सर्वकाही निर्माण केले आहे आणि ह्या निर्मितीमध्ये परमेश्वर आपणांस सक्रिय सहभागी करतो. नवीन मानवी जीवाच्या निर्मितीसाठी आई आणि वडिल अविभाज्य असले, तरी ते स्वतः हे साध्य करू शकत नाही, तर ते देवाच्या सहकार्यानेच निर्मिती करतात. आजचे शुभवर्तमान आपणांस परमेश्वरासमोर नम्र होण्याची आठवण करून देते. प्रभू येशूच्या मदतीची याचना करताना एक हेल्लेणी स्त्री त्याच्या पाया पडते. तेव्हा ती स्वतःची तुलना टेबलावरून पडलेल्या चुरा खाणाऱ्या श्वानाशी करते. ही स्त्री विनम्रपणे विश्वासाने प्रभू येशूला शरण जाते. तिची नम्रता आणि विश्वास तिच्या मुलीला अशुद्ध आत्म्यापासून वाचवतो. विश्वासाचे प्रतिफळ नेहमी गोड असते. मी देवाच्या निर्मितीमध्ये त्याचा सहकारी आहे का? मी परमेश्वरासमोर नम्र आहे का?
प्रार्थना : हे प्रभू येशू, आम्हा पाप्यावर दया कर, आमची श्रद्धा दृढ बनव, आमेन..
✝️

0 टिप्पण्या