Marathi Bible Reading | Second Sunday of Easter Divine Mercy Sunday 27th April 2024

पुनरुत्थानकाळातील 

दुसरा रविवार 

दैवीदयेचा रविवार   २७ एप्रि २०२५

 “तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो."

"Peace be with you. As the Father has sent me, even so I am sending you."

✝️


दैवीदयेचा रविवार 
✝️ 
 पुनरुत्थानकाळातील दुसरा रविवार दैवी दयेचा रविवार म्हणून साजरा केला जावा असा संदेश संत मारिया फॉस्टीना कोवाल्स्का हिला मिळाल्याचे खिस्तसभा मानते. प्रभू येशूख्रिस्ताची ही दैवी दया त्याच्या जीवनात, कार्यात दुःखसहनात व मरणात आणि मरणानंतर झालेल्या त्याच्या पुनरुत्थानातही दिसून येते. पुनरुत्थित ख्रिस्ताने प्रेषितांना एकूण सहा देणग्या दिल्याचे आजच्या शुभवर्तमानात सांगण्यात आलेले आहे. 
१) दैवी आनंद : वेळ संध्याकाळची. प्रेषित यहुद्यांच्या भीतीमुळे दारे बंदर करून एका खोलीत लपून बसलेले होते. प्रभूला पाहून शिष्यांना आनंद होतो. आता भीतीची जागा आनंदाने घेतलेली असते. आध्यात्मिक प्रगतीचे पहिले लक्षण म्हणजे आंतरिक / दैवी आनंद! 
२) दैवी शांती : 'तुम्हांस शांती असो!' अस्वस्थ झालेल्या प्रेषितांना शांतचित्त करणारी ती एक दैवी देणगी होती.
३) दैवी मिशनकार्य : पित्याने जसे येशूला पाठविले होते. तसे येशू आपल्या प्रेषितांना मिशनकार्यावर पाठवितो.
४) दैवी सामर्थ्य : येशू प्रेषितांवर फुंकर घालतो आणि त्यांना पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देतो.
५) दैवी जीवनशैली : नवीन जीवनशैलीत सूडभावनेला जागा नव्हती. त्याची जागा क्षमाशीलतेने घेतलेली होती. लोकांच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार त्यांना मिळाला होता. 
६) दैवी स्पर्श : संशय व्यक्त करणाऱ्या थोमाला येशू आणखी एक देणगी देतो. साक्षात देवाला स्पर्श करण्याची.  थोमा त्याच्यावरील विश्वास व्यक्त करणारे उद्गार काढतो 'माझा प्रभू, माझा देव!
✝️

✝️   
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये ५:१२-१६
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
 "पुष्कळ श्रद्धावंत प्रभूला मिळत गेले."
प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुत गोष्टी घडत असत आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनच्या देवडीत जमत असत. त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे, तरी लोक त्यांना थोर मानीत असत. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया ह्यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले, इतके की लोक दुखणेकऱ्यांना रस्त्यात आणून पलंगांवर आणि खाटांवर ठेवीत; कारण पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणखी येरुशलेमच्या आसपासच्या चोहोकडल्या गावांतून लोकसमुदाय दुखणेकऱ्यांना आणि अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
First Reading: Acts 5: 12-16
And by the hands of the apostles were many signs and wonders wrought among the people. And they were all with one accord in Solomon’s porch. But of the rest no man durst join himself unto them; but the people magnified them. And the multitude of men and women who believed in the Lord, was more increased:Insomuch that they brought forth the sick into the streets, and laid them on beds and couches, that when Peter came, his shadow at the least, might overshadow any of them, and they might be delivered from their infirmities. And there came also together to Jerusalem a multitude out of the neighbouring cities, bringing sick persons, and such as were troubled with unclean spirits; who were all healed.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र ११८:२४, १३-१५,२२-२४
प्रतिसाद :परमेश्वराचे उपकारस्मरण करा.

१ कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. 
इस्राएलने म्हणावे, “त्याची दया सनातन आहे." 
अहरोनच्या घराण्याने म्हणावे, "त्याची दया सनातन आहे.'
 देवाला भिणाऱ्यांनी म्हणावे, “त्याची दया सनातन आहे.'

२ मी पडावे म्हणून मला जोराने धक्का दिला. 
पण परमेश्वराने मला सावरले. 
परमेश्वर माझे बल आणि माझा स्तोत्रविषय आहे.
 तो माझा उद्धारक झाला आहे. 
उत्सवाचा व विजयाचा शब्द धार्मिकांच्या वस्तीत आहे.

३ बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे.
 ही परमेश्वराची करणी आहे. ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे.
प्रभूचा हा दिवस आहे
ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करुया.

 Psalms 118: 2-4, 13-15, 22-24

R. (1) Give thanks to the Lord for he is good, his love is everlasting.

2 Let Israel now say that he is good: 

that his mercy endureth for ever.

3 Let the house of Aaron now say, 

that his mercy endureth for ever.

4 Let them that fear the Lord now say, 

that his mercy endureth for ever.

R. Give thanks to the Lord for he is good, his love is everlasting.


13 Being pushed I was overturned that I might fall: 

but the Lord supported me

14 The Lord is my strength and my praise: 

and he is become my salvation.

15 The voice of rejoicing and of salvation is in 

the tabernacles of the just.

R. Give thanks to the Lord for he is good, his love is everlasting.


22 The stone which the builders rejected; 

the same is become the head of the corner.

23 This is the Lord’s doing: 

and it is wonderful in our eyes.

24 This is the day which the Lord hath made: 

let us be glad and rejoice therein.

R. Give thanks to the Lord for he is good, his love is everlasting.



दुसरे वाचन प्रकटी १:९-१३.१७-१९

वाचक : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन 

 “मी मेलो होतो तरी पाहा मी जिवंत आहे."


मी योहान, तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य आणि धीर ह्यांचा तुम्हांबरोबर भागीदार आहे. मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्याखातर पात्म नावाच्या बेटात होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो, तेव्हा मी आपल्यामागे कर्ण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती अशी : “तुला जे दिसते ते पुस्तकात लिही आणि ते इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलादेल्फिया आणि लावदिकीया येथील सात मंडळींकडे पाठव.

माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या सात समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायांजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, “भिऊ नकोस, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे, मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुगे जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. ह्यास्तव जे तू पाहिले, जे आहे "तू आणि ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

 Revelation 1: 9-11a, 12-13, 17-19
 I John, your brother and your partner in tribulation, and in the kingdom, and patience in Christ Jesus, was in the island, which is called Patmos, for the word of God, and for the testimony of Jesus. I was in the spirit on the Lord’s day, and heard behind me a great voice, as of a trumpet, Saying: What thou seest, write in a book. And I turned to see the voice that spoke with me. And being turned, I saw seven golden candlesticks: And in the midst of the seven golden candlesticks, one like to the Son of man, clothed with a garment down to the feet, and girt about the paps with a golden girdle. And when I had seen him, I fell at his feet as dead. And he laid his right hand upon me, saying: Fear not. I am the First and the Last, And alive, and was dead, and behold I am living for ever and ever, and have the keys of death and of hell. Write therefore the things which thou hast seen, and which are, and which must be done hereafter.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष
आलेलुया, आलेलुया !
येशूने म्हटले, “थोमा, तू मला पाहिले म्हणून श्रद्धा ठेवलीस. पाहिल्यावाचून श्रद्धा ठेवणारे ते धन्य." 
आलेलुया !

R. Alleluia, alleluia.

29 You believe in me, Thomas, because you have seen me, says the Lord; blessed are those who have not seen me, but still believe!

R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमानयोहान  २०:१९-३१
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"आठ दिवसांनंतर येशू आला."

आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला  आणि मध्ये उभा राहून म्हणाला, "तुम्हांला शांती असो." असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो." असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर घातली आणि त्यांना म्हटले, "पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत." 
येशू आला तेव्हा बारातील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले." पण त्याने म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून आणि त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही."
मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो." नंतर त्याने थोमाला म्हटले, “तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पाहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको, तर विश्वास ठेवणारा ऐस." थोमाने त्याला म्हटले, "माझा प्रभू व माझा देव!" येशूने त्याला म्हटले, "तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य!"
ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे, म्हणून ही लिहिली आहेत.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 20:19-31

On the evening of that day, the first day of the week, the doors being locked where the disciples were for fear of the Jews, Jesus came and stood among them and said to them, "Peace be withyou." When he had said this, he showed them his hands and his side. Then the disciples were glad when they saw the Lord, Jesus said to them again, "Peace be with you. As the Father has sent me, even so I am sending you." And when he had said this, he breathed on them and said to them, "Receive the Holy Spirit. If you forgive the sins of any, they are forgiven them; if you withhold forgiveness from any, it is withheld Now Thomas, one of the twelve, called the Twin, was not with them when Jesus came. So the other disciples told him, "We have seen the Lord. But he said to then, "Unless I see in his hands the mark of the nails, and place my finger into the mark of the nails, and place my hand into his side, I will never believe." Eight days later, his disciples were inside again, and Thomas was with them. Although the doors were locked, Jesus came and stood among them and said, "Peace be with you." Then he said to Thomas, "Put your finger here, and see my hands; and put out your hand, and place it in my side. Do not disbelieve, but believe." Thomas answered him, "My Lord and my God! Jesus said to him, "Have you believed because you have seen me? Blessed are those who have not seen and yet have believed." Now Jesus did many other signs in the presence of the disciples, which are not written in this book; but these are written so that you may believe that Jesus Christ, the Son of God, and that by believing you may have life in his name.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
                                                 
चिंतन:आज आपण ईस्टर ऑक्टेव्हमधील शेवटचा दिवस साजरा करीत आहोत आणि प्रभू येशूने संत फॉस्टीनाला दिलेल्या आज्ञेप्रमाणे आजचा रविवार दैवी दयेचा रविवार म्हणून साजरा केला जात आहे. आजचा दिवस किती कृपेने भरलेला दिवस आहे, कारण आजच्या दैवी दयेच्या दिवशी परमेश्वराच्या करुणामय दयेचे विपूल भांडार मानवजातीसाठी पूर्णपणे खुले केले जाते. परमेश्वर आपल्यावर आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त दया करतो. आजचा दिवस दर्शवितो की परमेश्वराच्या दयेला सीमा नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहन, मरण आणि पुनरुत्थान ह्यामुळे परमेश्वराची दैवी दया आपणांस विपुल प्रमाणात उपलब्ध झाली आहे. प्रभू येशूच्या दैवी हृदयातून वाहणारा त्याच्या दैवी दयेचा रक्त आणि पाण्याचा झरा अखंडितपणे वाहात आहे आणि परमेश्वर आपण प्रत्येकाला ह्या दैवी दयेच्या झऱ्यातून पिण्यासाठी बोलावत आहे. प्रभू येशू संत फॉस्टीनाद्वारे आपणांस सांगतो की आजच्या सणाच्या दिवशी त्याच्या कोमल कृपेचा दरवाजा उघडा असतो आणि त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येकावर तो कृपेचा संपूर्ण सागर ओततो. प्रभू येशू सांगतो की कोणत्याही व्यक्तीने माझ्याजवळ येण्यास घाबरू नये, जरी त्याची पापे खूप असली तरी माझी दया इतकी मोठी आहे की कोणतेही मन, मग ते माणसाचे असो वा देवदूतांचे, ते अनंतकाळपर्यंत त्याचे आकलन करू शकणार नाही. प्रभू येशूचे पुनरुत्थान हे परमेश्वराची आपल्यावर झालेल्या दयेची गॅरंटी आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. आम्हावर व अखिल जगावर दया कर, आमेन.


✝️        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या