सामान्यकाळातील १० वा सप्ताह
शनिवार दिनांक १४ जून २०२५
मी तर तुम्हांला सांगतो, शपथ वाहूच नका;
But I say to you not to swear at all,
संत मेथोडिअस
कॉन्स्टॉन्टिनोपलचे पेट्रिआर्क (... ८४७)
आपण सर्वजण ह्या जगातील देवाची निर्मिती आहोत. ह्या जगातील आपण प्रवासी आहोत म्हणूनच आपले स्वतःचे असे येथे काहिच नाही. आपल्यावर पूर्णपणे देवाची अधिसत्ता आहे. म्हणूनच, स्वर्गाची, पृथ्वीची, स्वतःची किंवा आपल्या वस्तुची आणि माणसांची शपथ वाहू नये. सत्य हे सत्यच असते ते बदलू शकत नाही किंवा सत्य अंधारात दडपून ठेवले जाऊ शकत नाही. आपला स्वार्थ साधण्यासाठी किंवा आपला स्वाभिमान व अहंकार जोपासण्यासाठी खोटी साक्ष देऊन शपथ वाहणे खरोखरच चुकीचे आहे. अनेकदा खूप बढाया मारण्याची सवय आपल्याला असते.
परंतु देवाच्या कृपेशिवाय आणि त्याच्या इच्छेशिवाय आपण काहिच करु शकत नाही. म्हणूनच आज आपण सर्वस्वी प्रभूला शरण जाऊ या आणि त्याच्या वचनाप्रमाणे खरे ख्रिस्ती जीवन आचरण करण्यासाठी प्रयत्नशील बनू या.
पहिले वाचन : २ करिंथकरांस ५:१४-२१
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले. "
ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले आणि तो सर्वांसाठी ह्याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करिता नव्हे तर जो त्यांच्यासाठी मेला आणि पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे.
तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पाहा, हे नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वत: बरोबर आपला समेट ख्रिस्ताच्याद्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हांला दिली, म्हणजे जगातील लोकांची पापे त्यांच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले, म्हणून देव आम्हाकडून विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Second Corinthians 5: 14-21
For the charity of Christ presseth us: judging this, that if one died for all, then all were dead. And Christ died for all; that they also who live, may not now live to themselves, but unto him who died for them, and rose again. Wherefore henceforth, we know no man according to the flesh. And if we have known Christ according to the flesh; but now we know him so no longer. If then any be in Christ a new creature, the old things are passed away, behold all things are made new. But all things are of God, who hath reconciled us to himself by Christ; and hath given to us the ministry of reconciliation. For God indeed was in Christ, reconciling the world to himself, not imputing to them their sins; and he hath placed in us the word of reconciliation. For Christ therefore we are ambassadors, God as it were exhorting by us. For Christ, we beseech you, be reconciled to God. Him, who knew no sin, he hath made sin for us, that we might be made the justice of God in him.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १०३:१-२,३-४,८-९, ११-१२
प्रतिसाद : परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे.
१ हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे,
हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद दे.
हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे,
त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.
२ तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो,
तो तुझे सर्व रोग बरे करतो,
तो तुझा जीव विनाशगर्तेतून उध्दारतो,
तो तुला दया आणि करुणा ह्यांचा मुकूट घालतो.
३ परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे,
तो मंदक्रोध आणि दयामय आहे.
तो सर्वदाच दोष देत राहणार नाही,
आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही.
४ कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे,
तशी त्याची दया आणि त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे.
पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे,
तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.
Psalms 103: 1-2, 3-4, 9-10, 11-12
R. (8a) The Lord is kind and merciful.
1 Bless the Lord, O my soul:
and let all that is within me bless his holy name.
2 Bless the Lord, O my soul, and never forget
all he hath done for thee.
R. The Lord is kind and merciful.
3 Who forgiveth all thy iniquities:
who healeth all thy diseases.
4 Who redeemeth thy life from destruction:
who crowneth thee with mercy and compassion.
R. The Lord is kind and merciful.
9 He will not always be angry:
nor will he threaten for ever.
10 He hath not dealt with us according to our sins:
nor rewarded us according to our iniquities.
R. The Lord is kind and merciful.
11 For according to the height of the heaven above the earth:
he hath strengthened his mercy towards them that fear him.
12 As far as the east is from the west,
so far hath he removed our iniquities from us.
R. The Lord is kind and merciful.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभो, तुझी वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia: John 13: 34
R. Alleluia, alleluia.
Incline my heart, O God, to your decrees;
and favor me with your law.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मत्तय ५ : ३३-३७
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन“
"मी तुम्हास सांगतो, शपथ वाहूच नका."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “खोटी शपथ वाहू नको, तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, शपथ वाहूच नका; स्वर्गाची नका, कारण ते देवाचे राजासन आहे; पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पदासन आहे; येरुशलेमचीही नका, कारण ती थोर राजाची नगरी आहे. आपल्या मस्तकाची शपथ वाहू नको, कारण तुम्ही आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाही. तर तुमचे बोलणे, 'होय' किंवा 'नाही,' एवढेच असावे, ह्याहून जे अधिक ते वाइटापासून आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Matthew 5: 33-37
Again you have heard that it was said to them of old, Thou shalt not forswear thyself: but thou shalt perform thy oaths to the Lord. But I say to you not to swear at all, neither by heaven, for it is the throne of God: Nor by the earth, for it is his footstool: nor by Jerusalem, for it is the city of the great king: Neither shalt thou swear by thy head, because thou canst not make one hair white or black. But let your speech be yea, yea: no, no: and that which is over and above these, is of evil.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
प्रभू येशू ख्रिस्त सर्वांसाठी मरण पावला. त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानाद्वारे त्याने परमेश्वराशी आपले सख्य व समेट करून आपली नवनिर्मिती केली आहे. आपणही त्याची नवनिर्मिती म्हणून जुन्या विचार-प्रवृत्तीला जीवनात थारा न देता ह्यापुढे स्वतःसाठी नाही तर ख्रिस्तासाठी जगले पाहिजे ह्यावर संत पॉल आजच्या पहिल्या वाचनात भर देत त्यासाठीच आपल्याला आमंत्रित करीत आहे. ह्याचाच पुढचा भाग म्हणून शुभवर्तमान आपल्याला उगाच कुणाची शपथ न घेता आपल्या शब्दांशी प्रामाणिक राहून नैतिकतेचे जीवन जगण्यास आवाहन करीत आहे. प्रभू येशू 'शपथ' ही संज्ञा आपल्यापुढे मांडताना सांगतो की आपण स्वर्गाची, पृथ्वीची, यरूशलेमची आणि स्वतःच्या मस्तकाची देखील शपथ वाहू नये. शपथ न वाहता आपले बोलणे 'होय' किंवा 'नाही' एवढेच असावे. आपण मोहाला बळी पडून वाईटाच्या तावडीत सापडू नये म्हणून प्रभू येशू आपणांस हे आवाहन करीत आहे. सत्य वचनामध्ये खूप ताकद असते आणि म्हणून आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात सचोटीने वागल्यास आपल्याला उगाच कुणाची शपथ वाहण्याची मूळात गरज न भासता आपल्या प्रामाणिक शब्दांनाच वजन प्राप्त होईल.
प्रार्थना : हे प्रभू येशू, सत्याने व प्रामाणिकपणे जीवन आचरण करण्यास व तुझी कृपा अनुभवण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️

0 टिप्पण्या