सामान्यकाळातील १२ वा सप्ताह
बुधवार दि.२५ जून २०२५
त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते.
So, every healthy tree bears good fruit, but the diseased tree bears bad fruit.
मौन्टे व्हर्जिनेचे संत विल्यम
- मठाधिपती, वर्तनसाक्षी (१०८५-११४२)
पहिले वाचन : उत्पत्ती १५:१-१२,१७-१८
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"अब्रामने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्याच्या विश्वासाने तो नीतिमान ठरला. परमेश्वराने अब्रामशी करार केला. "
अब्रामला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे:“अब्राम, भिऊ नकोस, मी तुझी ढाल आहे; तुला मोठे प्रतिफळ मिळेल." अब्राम म्हणाला, " हे प्रभू, परमेश्वरा, तू मला काय देणार ? मी तर निःसंतान जाणार आणि दिमिष्की अलियेजर माझ्या घराचा मालक होणार." अब्राम आणखी म्हणाला, “आणि पाहा, तू मला काही संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार आहे.” तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की, "हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल.” मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, “आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजता येतील तर मोज.” मग त्याने त्याला सांगितले, “तुझी संतती अशीच होईल." अब्रामने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामच्या ह्या विश्वासामुळे परमेश्वरासमोर तो नीतिमान ठरला.
परमेश्वर त्याला म्हणला, " तुला हा देश वतन द्यावा म्हणून खास्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे.” पण अब्राम म्हणाला, “प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून?" त्याने त्याला सांगितले, "माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका, एक होला आणि पारव्याचे एक पिल्लू घे.” त्याने ती सर्व घेतली आणि मधोमध चिरूनत्यांचे दोनदोन तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले, पक्षी मात्र त्याने मधोमध चिरले नाहीत. त्या शवांवर हिस्र पक्ष्यांनी झडप घातली पण अब्रामने त्यांना हाकून दिले.
सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामला गाढ निद्रा लागली तेव्हा घोर भीती, निबिड अंधार त्याच्यावर पडला.
नंतर सूर्य मावळला आणि निबिड अंधार पडला तेव्हा असे झाले की, धुमसती आगटी आणि जळती मशाल त्या शवांच्या तुकडयांमधून जाताना दिसली. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामशी करार करून सांगितले, " इजिप्तच्या नाईल नदीपासून ते महानदी फरात येथपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानांना देतो.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Genesis 15:1-12, 17-18
In those days: The word of the Lord came to Abram in a vision: "Fear not, Abram, I am your shield; your reward shall be very great." But Abram said, "O Lord God, what will you give me, for I continue childless, and the heir of my house is Eliezer of Damascus?" And Abram said, "Behold, you have given me no offspring, and a member of my household will be my heir." And behold, the word of the Lord came to him: "This man shall not be your heir; your very own son shall be your heir." And he brought him outside and said, "Look towards heaven, and number the stars, if you are able to number them." Then he said to him, "So shall your offspring be." And he believed the Lord, and he counted it to him as righteousness. And he said to him, "I am the Lord who brought you out from Ur of the Chaldeans to give you this land to possess." But he said, "O Lord God, how am I to know that I shall possess it?" He said to him, "Bring me a heifer three years old, a female goat three years old, a ram three years old, a turtle-dove, and a young pigeon." And he brought him all these, cut them in half, and laid each half over against the other. But he did not cut the birds in half. And when birds of prey came down on the carcasses, Abram drove them away. As the sun was going down, a deep sleep fell on Abram. And behold, dreadful and great darkness fell upon him. When the sun had gone down and it was dark, behold, a smoking fire pot and a flaming torch passed between these pieces. On that day the Lord made a covenant with Abram, saying, "To your offspring I give this land, from the river of Egypt to the great river, the river Euphrates.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १०५ :१-४, ६-९
प्रतिसाद : परमेश्वर आपला करार सदैव आठवतो.
१ ) परमेश्वराचे उपकारस्मरण करा,
त्याच्या नावाचा धावा करा,
राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा,
त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा;
त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा.
२) त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा,
जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत
त्यांचे मन हर्षित होवो.
परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा;
त्यांच्या दर्शनासाठी सदा आतुर असा.
३) त्याचा सेवक आब्राहाम ह्याच्या वंशजांनो,
त्याने निवडलेल्या याकोबच्या वंशजांनो,
परमेश्वर आपला देव आहे;
त्याची न्यायकृत्ये सर्व जगभर आहेत.
४) तो आपला करार म्हणजे हजारो पिढयांसाठी
आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो,
हा करार त्याने आब्राहामशी केला.
आणि त्याविषयी इसहाकजवळ शपथ वाहिली.
Psalm 105:1-2, 3-4, 6-7, 8-9
R. The Lord remembers his covenant forever.
Give thanks to the Lord; proclaim his name.
Make known his deeds among the peoples.
O sing to him, sing his praise;
tell all his wonderful works! R
Glory in his holy name;
let the hearts that seek the Lord rejoice.
Turn to the Lord and his strength;
constantly seek his face.
R O children of Abraham, his servant,
O descendants of the Jacob he chose,
he, the Lord, is our God;
his judgments are in all the earth. R
He remembers his covenant forever:
the promise he ordained for a thousand generations,
the covenant he made with Abraham,
the oath he swore to Isaac. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंत:चक्षू प्रकाशित करो, म्हणजे त्यामुळे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही तुम्ही ओळखून घ्यावी.
आलेलुया!
Acclamation:
Abide in me, and I in you, says the Lord;
he who abides in me bears much fruit.
शुभवर्तमान मत्तय ७:१५-२०
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.”
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतर्यामी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय ? त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Matthew 7:15-20
At that time: Jesus said to his disciples, "Beware of false prophets, who come to you in sheep's clothing but inwardly are ravenous wolves. You will recognise them by their fruits. Are grapes gathered from thorn bushes, or figs from thistles? So, every healthy tree bears good fruit, but the diseased tree bears bad fruit. A healthy tree cannot bear bad fruit, nor can a diseased tree bear good fruit. Every tree that does not bear good fruit is cut down and thrown into the fire. Thus you will recognise them by their fruits."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: उत्पत्तिच्या पुस्तकात परमेश्वर आब्राहामाशी एक करार स्थापन करतो. त्यावेळी कल्पनाही करता येणार नाही अशा उज्वल भविष्याचे अभिवचन देतो व भरपूर आशीर्वादही देतो. पुढे, देवाची वचने अतूट असतात त्यात कधीही बदल होत नाही हेच देव व आब्राहाम ह्यांच्यामध्ये झालेल्या कराराद्वारे आपल्याला दिसून येते. आजचे स्तोत्र म्हणूनच जीवनातील सर्व वेळी व क्षणी परमेश्वराचे अस्तित्व शोधण्यासाठी व त्याला धन्यवाद देण्यासाठी आपल्याला आमंत्रित करते. झाडाची ओळख ही त्याच्या फळांवरून होते. म्हणूनच शुभवर्तमान आपल्याला परमेश्वराचे उपकार आठवून त्याच्या चिरस्थायी प्रेमाबद्दल त्याचे आभार मानून त्याच्याशी एकनिष्ठ राहून चांगल्या हेतूनेअधिकाधिक फलद्रुप होण्यासाठी आपल्याला हाक देत आहे. दिलेल्या शब्दांशी व वचनांशी एकनिष्ठ राहणे ही माझी कुटुंबात व समाजात ओळख आहे का ?
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्वदा, सत्याचा, चांगुलपणाचा आणि तुझ्या आज्ञेचा पुरस्कार करुन आमचे व इतरांचे जीवन फुलविण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ति दे, आमेन.
✝️

0 टिप्पण्या