Marathi Bible Reading | 15th week in ordinary Time| Thursday 17th July 2025

सामान्यकाळातील १५ वा सप्ताह 

गुरुवार  दिनांक १७ जुलै  २०२५

 "अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. "Come to me, all who labour and are heavy laden, and will give you rest.


संत आलेक्सियस
वर्तनसाक्षी (५ वे शतक)

बालपणीच त्याला गोरगरिबांची आणि दुर्दैवी / अभागी लोकांची सेवा करण्याची विलक्षण ओढ लागलेली होती. ज्यांना आपण मदत करतो तेच खऱ्या अर्थाने आपले हितचिंतक असतात, ही गोष्ट त्याच्या मनावर बिंबविण्यात आलेली होती. त्यामुळे या जगातील कोणत्याही गोष्टींमध्ये आपले मन गुंतून जाऊ नये म्हणून आलेक्सियस खूप दक्षता घेत असे. शेवटी त्याचे पर्यवसान या जगाचा पूर्णत: त्याग करण्यामध्ये झाले.
आपल्या लग्नाच्या रात्री देवाच्या प्रेरणेने त्याने गुपचूपपणे रोम शहर सोडले. व एडेसाच्या दिशेने प्रयाण केले. आपल्याकडे असलेल्या सर्व गोष्टी त्याने गोरगरिबांना वाटून टाकल्या व पवित्र मरियेच्या चर्चसमोर भिक्षा मागून त्यावर तो गुजराण करण्यात धन्यता मानू लागला. अशी तब्बल १७ वर्षे त्याने घालविली.
एके दिवशी असाच भिक्षा मागण्यासाठी उभा असताना त्याला स्वर्गीय तेज पांघरलेली एक स्त्री दिसली. तिने त्याला 'देवाचा माणूस' ह्या शब्दांत हाक मारली. ती हाक इतकी मोठ्या आवाजातील होती की, आजूबाजूला लोकांनी देखील ती ऐकली आणि त्यावेळी त्यांना आलेक्सिअस ह्यांच्या पावित्र्याविषयी समजले. त्यामुळे सर्व लोकांनी त्याच्याभोवती गराडा घातला. त्यांनी त्याचा मानसन्मान करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यापूर्वीच तो जमावातून हळूच निसटला आणि आपल्या घरी गेला.
त्याच्या वडिलांनी त्याला मुळीच ओळखले नाही. एखाद्या भणंग भिकाऱ्याप्रमाणे आपल्या घरातील एका कोपऱ्यात त्याला जागा दिली आणि घरकाम करायला लावले.
पुन्हा १७ वर्षे तो एखाद्या अपरिचिताप्रमाणे आपल्या घरात राहिला. त्याच्याच दास-दासींनी त्याला वेड्यासारखे वागविले. पुढे त्याचे लग्न झाल्यावर त्याच्या पालकांनी आणि पत्नीने त्याला अतिशय घृणास्पद वागणूक दिली. शेवटी मृत्यूशय्येवर असताना त्याने लिहिलेल्या स्वत:च्या अक्षरातील एका पत्रामुळे तो कोण होता ते त्याच्या घरातील लोकांना समजले परंतु तोपर्यंत त्याचा देह निष्प्राण झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर झालेल्या चमत्कारांमुळे आणि विविध लोकांना झालेल्या साक्षात्कारांमुळे त्याचे चरित्र जगापुढे आले.
                                    ✝️            
प्रभूयेशूच्या प्रेमाचा झरा सतत त्याच्या प्रेमळ हृदयातून आपल्या सर्वांसाठी | वाहत असतो. प्रभू येशू त्याच्या दयेचा, कृपेचा व प्रेमाचा वर्षाव करुन आपल्याला ऊर्जा, शक्ती, सामर्थ्य, धैर्य व कृपा देण्यास तयार आहे. प्रभू  आपल्या प्रत्येकाला नावाने हाक मारुन बोलवित आहे. आपण त्याच्या हाकेला प्रतिसाद देउन त्याच्या अखंड प्रेमाच्या विसाव्यात जाऊ या.
                                    ✝️            
पहिले वाचन :  निर्गम  ३:१३-२०
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“मी आहे तो आहे, मी आहे त्याने मला तुम्हाकडे पाठवले आहे." 

मोशे देवाला म्हणाला, “ “पाहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठवले आहे', असे मी इस्राएल वंशजाकडे जाऊन त्यांना सांगितले असता त्याचे नाव काय' असे मला ते विचारतील. तेव्हा मी त्यांना काय सांगू ?" देव मोशेला म्हणाला, “मी आहे तो आहे.” “तू इस्राएल वंशजांना सांग 'मी आहे याने मला तुम्हाकडे पाठवले आहे.' आणखी देवाने मोशेला सांगितले, “तू इस्राएल लोकांस सांग, 'तुमच्या पुर्वजांचा देव, आब्राहामचा देव, इसहाकचा देव, आणि याकोबचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठवले आहे: हेच माझे सनातन नाव आहे आणि याच नावाने पिढ्यान्पिढ्या माझे स्मरण होईल. तू जा आणि इस्राएलच्या वडीलजनांना जमवून सांग, 'तुमच्या पूर्वजांचा देव, आब्राहामचा, इसहाकचा, आणि याकोबचा देव परमेश्वर याने मला दर्शन देऊन म्हटले की, “माझे तुम्हांकडे खरोखर लक्ष गेले आहे आणि इजिप्त देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे. इजिप्त देशातल्या विपत्तीतून सोडवून कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांच्या देशात, जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात, तुम्हांला घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळव."" तुझे सांगणे ते ऐकतील; मग तू आणि इस्राएलचे वडीलजन इजिप्त देशाच्या राजाकडे जा आणि त्यांना सांग, 'इब्यांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे; तर आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करावा, म्हणून आम्हांला तीन दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे.' पण मला ठाऊक आहे की, इजिप्त देशाचा राजा तुम्हांला जाऊ देणार नाही. मग मी आपला हात पुढे करून इजिप्त देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मारा मी त्यांच्यावर करीन; मग तो तुम्हांला जाऊ देईल."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Exodus 3:13-20 
In those days: [Hearing the voice of the Lord out of the midst of the
bush, Then Moses said to God, "If come to the people of Israel and them, 'The God of your fathers has sent me to you', and they ask me, 'What is his name? What shall I say to them?" God said to Moses, "I am who I am." And he said, "Say this to the people of Israel: 'I am has sent me to you."" God also said to Moses, "Say this to the people of Israel: The Lord, the God of your fathers, the God of Abraham, the God of Isaac, and the God of Jacob, has sent me to you. This is my name for ever, and thus I am to be remembered throughout all generations. Go and gather the elders of Israel together and say to them, The Lord, the God of your fathers, the God of Abraham, of Isaac, and of Jacob, has appeared to me, saying, "I have observed you and what has been done to you in Egypt, and I promise that I will bring you up out of the affliction of Egypt to the land of the Canaanites, the Hittites, the Amorites, the Perizzites, the Hivites, and the Jebusites, a land flowing with milk and honey." And they will listen to your voice, and you and the elders of Israel shall go to the king of Egypt and say to him, The Lord, the God of the Hebrews, has met with us; and now, please let us go a three days' journey into the wilderness, that we may sacrifice to the Lord our God.' But I know that the king of Egypt will not let you go unless compelled by a mighty hand. So I will stretch out my hand and strike Egypt with all the wonders that I will do in it; after that he will let you go."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १०५ :१-५,८-९,२४-२७
प्रतिसाद : तो आपला करार सर्वकाळ आठवतो.

१) आलेलुया !
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, 
त्याच्या नावाचा धावा करा; 
राष्ट्रांस त्याची कृत्ये जाहीर करा 
त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार 
आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. 

२) तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी 
आज्ञापिलेले हा करार त्याने आब्राहामशी केला
 आणि त्याविषयी इसहाकजवळ शपथ वाहिली.
आपले वचन सर्वकाळ आठवतो;

३) परमेश्वराने आपले लोक संख्येने पुष्कळ वाढवले,
 त्यांच्या शत्रूपेक्षा त्यांना बलिष्ट केले; 
आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा 
आणि आपल्या सेवकांशी कपटाने वागावे 
म्हणून त्याने त्यांच्या शत्रूंचे मन फिरवले.

४) त्याने आपला सेवक मोशे आणि 
आपण निवडलेला अहरोन ह्यांना पाठवले. 
त्यांनी त्यांच्यामध्ये परमेश्वराची चिन्हे, 
हामाच्या देशात अद्भुत कृत्ये करून दाखवली.


Psalm 105:1 and 5, 8-9, 24-25, 26-27 
The Lord remembers his covenant forever.

Give thanks to the Lord; proclaim his name.
 Make known his deeds among the peoples.
 Remember the wonders he has done,
his marvels and his words of judgment. R

He remembers his covenant forever:
the promise he ordained for a thousand generations,
the covenant he made with Abraham, 
the oath he swore to Isaac. R

He gave his people great increase; 
he made them stronger than their foes, 
whose hearts he turned to hate his people,
 and to deal with his servants. R

Then he sent Moses his servant, 
and Aaron whom he had chosen.
They performed God's signs among them, 
and his wonders in the land of Ham. R

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
  हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.
 आलेलुया!

Acclamation: 
 Come to me, all who labour and are heavy laden, and I will give you rest,says the Lord. 

शुभवर्तमान   मत्तय ११:२८-३०
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 " मी मनाचा सौम्य आणि लीन आहे."
येशूने म्हटले, "अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या मनाला शांती मिळेल. कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Matthew 11:28-30

At that time: Jesus declared, "Come to me, all who labour and are heavy laden, and will give you rest. Take my yoke upon you, and learn from me, for I am gentle and lowly in heart, and you will find rest for your souls. For my yoke is easy, and my burden is light."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:'माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे.' आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्तफार मौलिक शिकवण देत आहे. येशू म्हणतो, "अहो दुःखीकष्टी आणि भाराक्रांत जनहो, माझ्याकडे या. मी तुम्हाला विसावा देईन." आपण सर्वजण कोणत्या न कोणत्या कारणाने दुःखीकष्टी आणि भाराक्रांत आहोत. आपल्या सर्वांना खऱ्या सुखाची, आनंदाची आणि विसाव्याची गरज आहे. मात्र या आनंदाचा, सुखाचा शोध आपण कुठे घेतो? ख्रिस्तामध्ये आपण शोध घेतो की या जगातील आकर्षण, मौजमजा व सुखसोयी यांमध्ये आपण त्याचा शोध घेतो? ख्रिस्त म्हणतो, 'माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.' आपण ख्रिस्ताचे जू व त्याचे ओझे स्वीकारतो का? त्याच्यापासून शिकल्यास निश्चितच आपल्याला खऱ्या सुखाचा आणि आनंदाचा अनुभव येईल. तशाच प्रकारचा अनुभव पहिल्या वाचनात मोशेला आला. त्याला परमेश्वराने दर्शन दिले. परमेश्वर त्याच्याशी बोलला. जेव्हा मोशेने परमेश्वराला त्याचो नाव विचारले, तेव्हा परमेश्वर म्हणाला, 'मी जो आहे तो आहे.' म्हणजेच 'मी तुझ्याबरोबर आहे, तू माझ्याबरोबर आहे.'

प्रार्थना : हे प्रभू येशू, मी सर्वस्वी तुझाच / तुझीच आहे. तुझ्या कृपासनाजवळ येण्यास व तुझे प्रेम अनुभवण्यास मला प्रेरणा दे, आमेन.

✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या