Marathi Bible Reading | 16th week in ordinary Time| Saturday 26th July 2025

सामान्यकाळातील १६ वा सप्ताह 

शनिवार  दिनांक २६ जुलै  २०२५

"धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत
blessed are your eyes because they see, 


संत जोकिम आणि आन्ना

पवित्र मरियेचे मातापिता (पहिले शतक)

नव्या करारातील शुभवर्तमानांमध्ये धन्य कुमारी पवित्र मरियेचे मातापिता कोण होते ह्याचा उल्लेख आलेला नाही. मात्र दुसऱ्या शतकापासून चालत आलेल्या एका परंपरेनुसार पवित्र मरियेच्या आईचे नाव आन्ना (कृपा) असे होते आणि वडिलांचे नाव जोकिम (देव तयारी करतो) असे होते. मरिया हे या दांपत्याला त्यांच्या म्हातारपणी झालेले अपत्य होते आणि ते त्यांच्या प्रार्थनेचे फळ होते असे मानले जाते. कारण दोघेही वयातीत असून निःसंतान होती. संत आन्ना ही येशूची 'आजी' होती, हे सत्य पौर्वात्य ख्रिस्तसभेत चौथ्या शतकात आणि पाश्चिमात्य ख्रिस्तसभेत आठव्या शतकात लोकांच्या भक्तीचा विषय बनले आणि चौदाव्या शतकात तर ते संपूर्ण जगभरच्या भक्तीमध्ये सामावले गेले. इ. स. १५४८ साली विश्वव्यापी ख्रिस्तसभेत त्यांचा सण समाविष्ट करण्यात आला. प्रसूतीवेदना सहन करणाऱ्या स्त्रियांची ती आश्रयदाती संत म्हटली जाते.

जोकिम हे पवित्र मरियेचे पिता अत्यंत धार्मिक होते. एका प्राचीन दंतकथेनुसार ते मूळचे गालिली येथील होते. तेथून ते येरुशलेम येथे आले आणि तिथेच मरण पावले. त्यांच्या राहत्या घराशेजारीच त्यांना पुरण्यात आले. पुढे हेल्लेना या राणीने (सण १८ ऑगस्ट) त्यांच्या थडग्यावर संत जोकीम व आन्ना ह्यांच्या स्मरणार्थ एक चर्च बांधले. तिथून त्यांची भक्ती फोफावत गेली.

 ख्रिस्तसभा आज धन्य कुमारी मरीयेचे आई-वडिल, संत आन्ना व संत ज्योकिम ह्यांचा सण साजरा करीत आहे. परमेश्वराच्या वचनावर आणि त्याने दिलेल्या दहा आज्ञांवर चिंतन करीत असताना आपण आपल्या जीवनावर चिंतन करु या. परमेश्वराने प्रत्येक माता-पित्याला संतान प्राप्तिचे वरदान दिलेले आहे. जन्मदाते मातापिता परमेश्वराचे वरदानाचे भागिदार आहेत, म्हणजेच परमेश्वरानेच आपल्याला आपल्या माता-पित्याचे वरदान दिलेले आहे. संत ज्योकिम व आन्ना ह्यांचा सन्मान करीत असताना आपण आपल्या मात्या- पित्यांच्या सन्मान करु या. अनेकदा आपण आपले मात-पिता गृहित धरतो. मात्र त्यांच्या कष्टामुळे आणि प्रेमामुळेच आपण आज मोठे झालो आहोत.  

पहिले वाचन :बेनसिरा ४४ : १.१०-१५
वाचन :बेनसिरा ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"त्यांचे नाव पिढ्यान्पिढ्या आठवले जात आहे."

आता आपण कालानुक्रमे आपल्या सुप्रसिध्द पूर्वजांची प्रशंसा करू या. आमचे पूर्वज सात्विक होते. त्यांची सत्कृत्ये अजूनही आठवली जातात. त्यांनी संपादन केलेली कीर्ती हाच त्यांच्या वंशजाचा मोठा वारसा आहे. त्यांचे वंशज कराराला जागतात. त्यांच्यामुळे त्यांच्या मुलांची मुलेही तेच करतात. त्यांचे वंशज सर्वकाळ राहतील, त्यांचे वैभव लयास जाणार नाही. त्यांच्या देहाने आता चिरविश्रांती घेतली आहे. तरी त्यांचे नाव पिढ्या‌न्पिढ्या आठवले जात आहे. सर्व लोक त्यांच्या ज्ञानाची वाहवा करतील. भक्तगण त्यांची स्तुती गातील.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Sirach 44:1a, 10b-15

Now will I praise those godly people, our ancestors …
… whose virtues have not been forgotten;
Their wealth remains in their families,
their heritage with their descendants;
Through God’s covenant with them
their family endures, their posterity, for their sake.
And for all time their progeny will endure,
their glory will never be blotted out;
Their bodies are peacefully laid away,
but their name lives on and on.
At gatherings their wisdom is retold,
and the assembly proclaims their praise.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र :  १३2:११,१३-१४, १७-१८
प्रतिसाद : प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल.

१ परमेश्वराने दावीदजवळ खरी शपथ वाहिली आहे, 
तो माघार घेणार नाही. ती शपथ अशी की, 
"मी तुझ्या पोटच्या फळातले तुझ्या राजासनावर बसवीन."

२ परमेश्वराने सीयोन निवडून घेतले आहे, 
आपल्या निवासासाठी त्याला ते आवडले आहे. 
"हे सर्वकाळ माझे विश्रामस्थान आहे, 
येथे मी राहीन, कारण तशी मी इच्छा केली."

३ "तेथे दावीदवंशाची प्रतिष्ठा वाढेल असे मी करीन. मी आपल्या अभिषिक्तांसाठी दीप मांडला आहे. मी त्याच्या शत्रूना लज्जेने वेष्टित करीन, पण त्याच्या मस्तकावर त्याचा मुकुट झळकेल."


Psalm 126:1-2ab, 2cd-6 
'I promise that I will set a son of yours upon your throne.

 Yahweh has sworn to David, and will always remain true to his word, 'I promise that I will set a son of yours upon your throne.

13 For Yahweh has chosen Zion, he has desired it as a home.
14 'Here shall I rest for evermore, here shall I make my home as I have wished.

17 'There I shall raise up a line of descendants for David, light a lamp for my anointed;
18 I shall clothe his enemies with shame, while his own crown shall flourish.'

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
ते इस्राएलच्या सांत्वनाची वाट पाहत होते आणि त्यांच्यावर पवित्र आत्मा होता.
 आलेलुया!

Acclamation: 
 I chose you and appointed you that you should go and bear fruit and that your fruit should abide, says the Lord.

शुभवर्तमान   मत्तय १३ : १६-१७
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही जे पाहात आहा ते पाहाण्यास पुष्कळ संदेष्टे आणि नीतिमान जन उत्कंठित होते."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हांला खचित सांगतो की, तुम्ही जे पाहात आहा ते पाहाण्यास पुष्कळ संदेष्टटे आणि नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहाण्यास मिळाले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्यास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Matthew 13:16-17

 'But blessed are your eyes because they see, your ears because they hear! In truth I tell you, many prophets and upright people longed to see what you see, and never saw it; to hear what you hear, and never heard it.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: आईवडिलांचा पर्यायाने आजी-आजोबा व वडिलधारी माणसांचा मान सन्मान करण्याची शिकवण परमेश्वराने जुन्या करारात दहा आज्ञांद्वारे आपल्याला दिली आहे. हजारो वर्षे ही प्राचीन आज्ञा आजही तितकीच महत्त्वाची आहे. आपल्या भारतात अनेक संस्कृती आहेत. हया संस्कृतीत आईवडिलांचा मान हा देवोभवाशी समतुल्य मानलेला आहे. जगातील सर्व देशात, सर्व संस्कृतीत या आज्ञेला पर्याय नाही म्हणजेच ही आज्ञा वैश्विक आहे. संत अन्ना व संत जोकीम यांचा सण साजरा करीत असताना ख्रिस्तसभा आपल्याला आपल्या कुटुंबातील मातापिता, आजी-आजोबा व वडीलधाऱ्या माणसांचा मानसन्मान करण्यासाठी त्यांना आनंदीत ठेवण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी बोध करत आहे. आपले आईवडील, आजी-आजोबा हे श्रद्धेचे वाहक आहेत. जी श्रद्धा त्यांना प्राप्त झाली ती जोपासून त्यांनी ती आपल्याला दिली आहे. म्हणून त्यांची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे. बेनसिरा आपल्या बोधपत्रात म्हणतो, 'आईवडील हे परमेश्वराच्या आशीर्वादाची साधने आहेत. त्यांचा मानसन्मान केल्यास आपणांस सात प्रकारचे आशीर्वाद प्राप्त होतात, आज आजी-आजोबा दिवस साजरा करताना आपल्या आईवडिलांबद्दल देवाचे आभार मानूया व त्यांच्यासाठी प्रार्थना करूया

प्रार्थना :   हे परमेश्वरा, आमच्या आई-वडिलांबद्दल तुला धन्यवाद देतो. त्यांना तुझी कृपा दे, आमेन.
✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या