Marathi Bible Reading | 27th July 2025 | 17th Sunday in Ordinery Time

सामान्यकाळातील १७ वा सप्ताह 

रविवार  दि. २७ जुलै   २०२५

कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. 
And I tell you, ask, and it will be given to you; seek, and you will find; knock, and it will be opened to you.


हे पित्या तुझे नाम पवित्र मानले जावो.

सोदोम आणि गोमोरा ह्या पापी व भ्रष्ट झालेल्या शहरांचा विध्वंस  करण्याचे परमेश्वराने ठरवले असताना आब्राहामाने मध्यस्थीची प्रार्थना व याचना  केली. परमेश्वराने ती ऐकली व त्यांस अभय दिले . 
 प्रभू येशू आज आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवित असतानाच आपली आग्रही प्रार्थना फलदायी बनते ह्याचा दृष्टांत संदेश देत आहे. 'हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो.' हीच ती  प्रार्थना ख्रिस्ती माणसांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या ह्या प्रार्थनेवर आपण आज चिंतन करु या.  
 दररोजच्या अन्नासाठी आपण| देवाकडे विनंती करतो. आपल्या परस्परसंबंधात आपण उणे पडू नये म्हणून  आपल्या अपराध्यांना क्षमा करीत असताना आपण देवाकडे स्वतःसाठी क्षमेची याचना करतो. हे जग अनेक प्रकारच्या दुष्टाईने भरलेले आहे, वाईटापासून आपले रक्षण व्हावे ह्यासाठी आपण देवाला साकडे घालतो. म्हणूनच सर्व |आपल्या नित्याच्या प्रार्थनेत खंड पडू नये व आपण सर्वदा परमेश्वरावर  अवलंबून राहायला शिकावे, म्हणून प्रार्थनेला आपल्या जीवनात प्राधान्य देऊ या.  तसेच परस्परांसाठी मध्यस्थी करु या.

  
पहिले वाचन :उत्पत्ती  १८:२०-३२
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"मी बोलतो याचा प्रभूला राग न यावा."

परमेश्वर म्हणाला, “सदोम आणि गमोरा यांच्याविषयींची ओरड फारच झाली आहे आणि खरोखर त्यांचे पाप फार भारी आहे, म्हणून त्यांच्याविषयींची जी ओरड माझ्या कानी आली आहे, तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहायला मी खाली जातो; तसे नसेल तर मला कळून येईल.”
तेथून ते पुरुष वळून सदोमकडे चालते झाले; पण आब्राहाम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला आब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, "तू दुर्जनाबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय ? त्या नगरात कदाचित पन्नास नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय ? त्यांच्यातल्या पन्नास नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय ? या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय ?" परमेश्वर म्हणाला, “मला सदोम नगरात पन्नास नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन.” आब्राहाम म्हणाला, “पाहा, मी केवळ धूळ आणि राख असून प्रभूशी बोलण्याचे धाडस करीत आहे. कदाचित पन्नासात पाच कमी नीतिमान असतील तर पाच कमी म्हणून तू सर्व नगराचा नाश करशील काय ?” तेव्हा तो म्हणाला, "मला तेथे पंचेचाळीस आढळले तर मी त्यांचा नाश करणार "नाही." त्याने पुन्हा म्हटले, "तेथे कदाचित चाळीसच आढळले. तर?" तो म्हणाला, "त्या चाळीसांकरिता मी तसे करणार नाही." मग तो म्हणाला, "मी बोलतो याचा प्रभूला राग न यावा; तेथे कदाचित तीसच आढळले तर?" तो म्हणाला, “मला तीसच आढळले तर मी तसे करणार नाही." मग तो म्हणाला, “पाहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करत आहे; तेथे कदाचित वीसच आढळले तर ?” तो म्हणाला, “त्या वीसांकरिता मी त्यांचा नाश करणार नाही.” तो म्हणाला, “प्रभूला राग न यावा; मी आणखी एकदाच बोलतोः तेथे कदाचित दहाच आढळले तर ?” तो म्हणाला, "त्या दहांकरिता त्याचा नाश करणार नाही. 
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :  : Genesis 18:20-32

In those days the LORD said, "Because the outcry against Sodom and Gomorrah is great and their sin is very grave, I will go down to see whether they have done altogether according to the outcry that has come to me. And if not, I will know." So the men turned from there and went towards Sodom, but Abraham still stood before the LORD. Then Abraham drew near and said, "Will you indeed sweep away the righteous with the wicked? Suppose there are fifty righteous within the city. Will you then sweep away the place and not spare it for the fifty righteous who are in it? Far be it from you to do such a thing, to put the righteous to death with the wicked, so that the righteous fare as the wicked! Far be that from you! Shall not the Judge of all the earth do what is just?" And the LORD said, "If I find at Sodom fifty righteous in the city, I will spare the whole place for their sake." Abraham answered and said, "Behold, I have undertaken to speak to the LORD, I who am but dust and ashes. Suppose five of the fifty righteous are lacking. Will you destroy the whole city for lack of five?" And he said, "I will not destroy it if I find forty-five there." Again he spoke to him and said, "Suppose forty are found there." He answered, "For the sake of forty I will not do it." Then he said, "Oh let not the LORD be angry, and I will speak. Suppose thirty are found there." He answered, "I will not do it, if I find thirty there." He said, "Behold, I have undertaken to speak to the LORD. Suppose twenty are found there." He answered, "For the sake of twenty I will not destroy it." Then he said, "Oh let not the LORD be angry, and I will speak again but this once. Suppose ten are found there." He answered, "For the sake of ten I will not destroy it."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र :१३८:१-३,६-८
प्रतिसाद :  प्रभो, मी तुझा धावा केला, तो तू त्याच दिवशी ऐकला. 

१)मी अगदी मनापासून तुझे उपकारस्मरण करीन 
देवदूतांसमक्ष तुझी स्तोत्रे गाईन. 
तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. 

२) तुझ्या दयेमुळे आणि तुझ्या सत्यामुळे 
मी तुझ्या नामाचे उपकारस्मरण करीन; 
कारण तू आपल्या संपूर्ण नामापेक्षा 
आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस. 
मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला;
 तू मला हिम्मत दिली तेव्हा मला सामर्थ्य प्राप्त झाले.

३) परमेश्वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो;
 पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो. 
मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस; 
माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस.

४) तुझा उजवा हात माझा बचाव करतो, 
परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल;
हे परमेश्वरा तुझी दया सनातन आहे;
तू आपल्या हातचे काम सोडू नकोस.

Psalm: 
  138: 1-2. 2-3.6-7.7-8
On the day I called, you answered me, O Lord.

I thank you, LORD, with all my heart; 
you have heard the words of my mouth. 
In the presence of the angels I praise you. 
I bow down toward your holy temple.

I give thanks to your name
for your merciful love and your faithfulness. 
You have exalted your name over all. 
On the day I called, you answered me; 
you increased the strength of my soul.

The LORD is high, yet he looks on the lowly, 
and the haughty he knows from afar. 
You give me life though I walk amid affliction; 
you stretch out your hand 
against the anger of my foes. R

With your right hand you save me, 
the LORD will accomplish this for me. 
O LORD, your merciful love is eternal; 
discard not the work of your hands. R

दुसरे वाचन  कलस्सै २: १२-१४
वाचक:  पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
 "देवाने आपल्या सर्व अपराधाची क्षमा करून आपल्याला त्यांच्याबरोबर जिवंत केले आहे."
तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेले आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृती वरील विश्वासाच्याद्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेला. जे तुम्ही आपल्या अपराधांनी आणि देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हास त्याने त्यांच्याबरोबर जिवंत केले, देवाने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली; आपल्याविरूद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले आणि क्रुसाला खिळून त्याने ते रद्द केले.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second reading : Colossians 2:12-14

Brethren: "Having been buried with Christ in baptism, in which you were also raised with him through faith in the powerful working of God, who raised him from the dead. Anc you, who were dead in your trespasses and the uncircumcision of your flesh, God made alive together with him, having forgiven us all our trespasses, by cancelling the record a debt that stood against us with its legal demands. This he set aside, nailing it to the cross..
This is the word of God 
Thanks be to God


जयघोष                             
      आलेलुया, आलेलुया !   
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे; 
माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. 
आलेलुया!
आलेलुया!
Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
 You have received the Spirit of adoption as sons, by whom we cr "Abba! Father!"
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  लूक ११:१-१३
वाचक : लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल."
येशू एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, "प्रभुजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले तसे आपणही आम्हांला शिकवा.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणाः
'हे पित्या तुझे नाम पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. आमची रोजची भाकरी आज आम्हाला दे आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला क्षमा करतो आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस."
मग त्याने त्याला म्हटले, “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, 'मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे; कारण माझा एक मित्र प्रवासाहून आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही' आणि तो आतून उत्तर देईल, 'मला त्रास देऊ नकोस, आता दार लावले आहे आणि माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत; तर उठून तुला देऊ शकत नाही.' मी तुम्हांला सांगतो, तो तुमचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला जितके पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोणी बाप आहे की जो, आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाइट असताही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल ?"
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :
 Luke 11:1-13

Jesus was praying in a certain place, and when he finished, one of his disciples said him, "Lord, teach us to pray, as John taught his disciples." And he said to them, "Whe you pray, say: "Father, hallowed be your name. Your kingdom come. Give us each d our daily bread, and forgive us our sins, for we ourselves forgive everyone w is indebted to us. And lead us not into temptation." And he said to the Which of you who has a friend will go to him at midnight and say to him, "Friend, lend me three loaves, for a friend of mine has arrived on a journey, and I have nothing to set before him', and he will answer from within, 'Do not bother me; the door is now shut, and my children are with me in bed. I cannot get up and give you anything? I tell you, though he will not get up and give him anything because he is his friend, yet because of his impudence he will rise and give him whatever he needs. And I tell you, ask, and it will be given to you; seek, and you will find; knock, and it will be opened to you. For everyone who asks receives, and the one who seeks finds, and to the one who knocks it will be opened. What father among you, if his son asks for a fish, will instead of a fish give him a serpent, or if he asks for an egg, will give him a scorpion? If you then, who are evil, know how to give good gifts to your children, how much more will the heavenly Father give the Holy Spirit to those who ask him!"
Praise the Lord Jesus Christ .


चिंतनप्रार्थना म्हणजे परमेश्वराशी संवाद. प्रार्थनेद्वारे आपण आपल्या भावना परमेश्वरापुढे सादर करतो आणि विश्वासाने व आशेने त्याची इच्छा स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. अंत:करणापासून केलेल्या प्रार्थनेत परमेश्वर आपल्या गरजा, अपेक्षा स्वतःकडे घेतो आणि त्याच्या इच्छा-आकांक्षा आपणापुढे सादर करतो. त्याच्या वचनांमध्ये वाढणे, त्याच्या योजनेशी सहकार्य करणे आणि त्याचे दर्शनइतरांना घडविणे हीच खऱ्या अर्थाने प्रार्थना होय. अशाच प्रकारच्या प्रार्थनेचा अनुभव घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात आपल्याला आमंत्रित करीत आहे. ख्रिस्ती असणे म्हणजे प्रार्थना करणारी व्यक्ती होणे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. प्रार्थना करणारी व्यक्ती होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तीन गोष्टी करण्यास आपणास आमंत्रित करीत आहे. 
१. परमेश्वर पित्याशी नाते संबंध जोडणे. 
२. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागणे. 
३. परमेश्वर आपला सांभाळकर्ता आहे म्हणून आनंदी असणे. 
    आज आपण तांत्रिक युगामध्ये प्रसार माध्यमाच्या संस्कृतीमध्ये जगत आहोत. आपले जीवन घाईगर्दीचे, स्पर्धेचे व जीवघेणे होत चालले आहे. अशा परिस्थितीत संवाद दुर्मीळ होत चालला आहे. एकमेकांसाठी वेळेचा अभाव आपल्याला जाणवत आहे. "परमेश्वरासाठी वेळ...?" एक प्रश्नचिन्ह आहे; मात्र प्रभू आपल्याला सावध करत आहे. परमेश्वर आपला पाया आहे. आपला उगम आहे. आपल्या जीवनाचा अल्फा आणि ओमेगा आहे. म्हणून प्रार्थनेद्वारे त्याच्याशी आपला संवाद वाढवून त्याच्या बरोबर आपले नाते संबंध दृढ करूया.

प्रार्थना :हे आमच्या स्वर्गीय पित्या, ही प्रार्थना सावकाश व अर्थपूर्ण करावी, आमेन.
✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या