Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 19th week in ordinary Time| Saturday 16th August 2025

सामान्यकाळातील १९ वा सप्ताह 

शनिवार  दि. १६ ऑगस्ट  २०२५

बालकांना माझ्याकडे येऊ द्या; त्यांना मनाई करू नका,

"Let the little children come to me and do not hinder them, 


हंगेरीचे संत स्टीफन

- राजा, वर्तनसाक्षी (९६९-१०३८) 

प्रभू येशूने म्हटले, 'बाळकांना माझ्‌याकडे येऊ द्या.' बाळकांतील नम्रता, निरागसता, शुद्धता, आज्ञाधारकपणा व सत्य आचरण हे सर्व प्रौढांना अनुकरणीय असे आहे. खऱ्या अर्थाने धार्मिकतेचे व नीतिमत्तेचे शिक्षण आपण बाळकांकडून घ्यायला हवे. विशेषतः प्रभू जेव्हा म्हणतो की 'स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे', तेव्हा बाळकांतील सर्व गुणांचे अनुकरण आपण करायला हवे. परमेश्वरा समोर आपण सर्वजण नम्रता धारण करुन यावे कारण त्याच्यासाठी आपण सर्व बाळकेच आहेत. परमेश्वर सर्वांचा पिता आहे.
आपल्याला बाळकांसदृश्य आचरण करण्याची प्रेरणा मिळावी आणि नम्रतेने व आज्ञाधारकपणे परमेश्वराला आपण शरण जावे म्हणून त्याच्या चरणी  नतमस्तक बनू या.

पहिले वाचन : यहोशवा २४ :१४-२०
वाचक :यहोशवा या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा."

यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, “तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्त्विकतेने आणि खऱ्या मनाने करा आणि महानदीपलीकडे आणि इजिप्त देशात ज्या देवाची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहा त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार."
तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो; कारण आमचा देव परमेश्वर ह्यानेच आम्हाला आणि आमच्या पूर्वजांना इजिप्त देशातून, दास्यगृहातून काढून आणले, त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला व ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे तेथे त्याने आमचे संरक्षण केले. ह्या देशात राहणाऱ्या अमोरी वगैरे सर्व लोकांना त्याने आमच्यापुढून घालवून दिले. आम्हीही परमेश्वराचीच सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे."
यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्ही परमेश्वराची सेवा करणार नाही, कारण तो पवित्र देव आहे, तो ईर्ष्यावान देव आहे, तो तुमच्या अपराधांची आणि पापांची क्षमा करणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग करून परक्या देवांची सेवा कराल तर, जरी त्याने तुमचे कल्याण केले असले तरी तो उलटून तुमचे अनिष्ट करील आणि तुमचा संहार करील.” लोक यहोशवाला म्हणाले, “नाही, आम्ही परमेश्वराचीच सेवा करणार.” यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्ही सेवेसाठी परमेश्वराला निवडले आहे, ह्याविषयी तुमचे तुम्हीच साक्षी आहा.” ते म्हणाले, “आम्हीच साक्षी आहो." यहोशवा म्हणाला, “आपल्यामधले परके देव तुम्ही टाकून द्या, आपले मन इस्राएलचा देव परमेश्वर ह्याच्याकडे लावा.” लोक यहोशवाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार.” तेव्हा यहोशवाने त्या लोकांबरोबर करार केला आणि शखेम येथे त्यांना विधी आणि नियम लावून दिले. ह्या गोष्टी यहोशवाने देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहून ठेवल्या आणि एक मोठी शिला घेऊन परमेश्वराच्या पवित्रस्थानाजवळील एका एला झाडाखाली ती उभी केली. यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, “पहा, ही शिला आपल्याविरूद्ध साक्षीदार होईल कारण परमेश्वराने आम्हांला सांगितलेली सर्व वचने हिने ऐकली आहेत; एखाद्या वेळी तुम्ही परमेश्वराला नाकाराल तेव्हा ही तुमच्याविरूद्ध साक्षीदार होईल.” मग यहोशवाने प्रत्येक माणसाला आपआपल्या वतनाकडे रवाना केले.
ह्या गोष्टी घडल्यानंतर परमेश्वराचा सेवक नूनचा मुलगा यहोशवा आपल्या वयाच्या एकशेदहाव्या वर्षी मरण पावला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Joshua 24:14-29: 

In those days: Joshua spoke to the people, saying "Now fear the Lord and serve him in sincerity and in faithfulness, Put away the gods that your fathers served beyond the River and in Egypt, and serve the Lord. And if it is evil in your eyes to serve the Lord, choose this day whom you will serve, whether the gods your fathers served in the region beyond the River, or the gods of the Amorites in whose land you dwell. But as for me and my house, we will serve the Lord." Then the people answered, "Far be it from us that we should forsake the Lord to serve other gods, for it is the Lord our God who brought us and our fathers up from the land of Egypt, out of the house of slavery, and who did those great signs in our sight and preserved us in all the way that we went, and among all the peoples through whom we passed. And the Lord drove out before us all the peoples, the Amorites who lived in the land. Therefore we also will serve the Lord, for he is our God." But Joshua said to the people, "You are not able to serve the Lord, for he is a holy God. He is a jealous God; he will not forgive your transgressions or your sins. If you forsake the Lord and serve foreign gods, then he will tum and do you harm and consume you, after having done you good." And the people said to Joshua, "No, but we will serve the Lord." Then Joshua said to the people, "You are witnesses against yourselves that you have chosen the Lord, to serve him." And they said, "We are witnesses." He said, "Then put away the foreign gods that are among you, and incline your heart to the Lord, the God of Israel." And the people said to Joshua, "The Lord our God we will serve, and his voice we will obey." So Joshua made a covenant with the people that day, and put in place statutes and rules for them at Shechem. And Joshua wrote these words in the Book of the Law of God. And he took a large stone and set it up there under the terebinth that was by the sanctuary of the Lord. And Joshua said to all the people, "Behold, this stone shall be a witness against us, for it has heard all the words of the Lord that he spoke to us. Therefore it shall be a witness against you, lest you deal falsely with your God." So Joshua sent the people away, every man to his inheritance. After these things Joshua the son of Nun, the servant of the Lord, died, being one hundred ten years old.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १६:१-२,५,७-८,११
प्रतिसाद :  हे परमेश्वरा, तूच माझा वाटा सांभाळणारा आहेस.

१) हे देवा, माझे रक्षण कर,
 कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. 
मी परमेश्वराला म्हटले, “तूच माझा प्रभू आहेस." 
परमेश्वर माझ्या वतनाचा आणि 
प्याल्याचा वाटा आहे. 
माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस.

२) परमेश्वराने मला बोध केला आहे 
त्याला मी धन्यवाद देतो, 
माझे अंतर्यामही मला रात्री मार्गदर्शन शिक्षण देते. 
मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे; 
ती माझ्या उजवीकडे आहे, 
म्हणून मी ढळणार नाही

३) जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; 
तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे.
 तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहेत.


Psalm 16:1-2a and 5, 7-8, 11
R. It is you, O Lord, who are my portion.

Preserve me, O God, for in you I take refuge. 
I say to the Lord, "You are my Lord.
O Lord, it is you who are my portion and cup; 
you yourself who secure my lot. R.

I will bless the Lord who gives me counsel, 
who even at night directs my heart.
I keep the Lord before me always; 
 with him at my right hand,
I shall not be moved. R

You will show me the path of life, 
 the fullness of joy in your presence, 
 at your right hand, bliss forever. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथमफळ व्हावे, आलेलुया!
म्हणून पित्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला.
 आलेलुया!

Acclamation: 
Blessed are you, Father, Lord of heaven and earth, that you have revealed to little children the mysteries of the kingdom. 

शुभवर्तमान   मत्तय १९:१३-१५
वाचक :मतयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे."
येशूने बालकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. तेव्हा येशू म्हणाला, “बालकांना माझ्याकडे येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे." मग त्याच्यावर हात ठेवल्यानंतर तो तेथून निघून गेला
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Matthew19:13-15:
 At that time: Children were brought to Jesus that he might lay his hands on them and pray. The disciples rebuked the people, but Jesus said, "Let the little children come to me and do not hinder them, for to such belongs the kingdom of heaven." And he laid his hands on them and went away"
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
मोशेचा उत्तराधिकारी, जोशुआ, लोकांना एकाच पवित्र देवाची ओढ लावतो, मोशेने घालून दिलेल्या परमेश्वराबरोबरील कराराची कटाक्षाने कार्यवाही करतो ते पहिल्या वाचनात स्पष्ट होते. ताजेपणा, शुद्धता, निरागसता, ग्रहणक्षमता, परस्परावलंबन आणि प्रायः ज्येष्ठांवर विश्वास ही बालकांची वैशिष्ट्ये होत. मुले ही परमेश्वराची देणगी असते पण काही लोकांना मुले नकोशी वाटतात. अर्थात, "मुले ही देवाघरची फुले" हे बहुतेकांना पटते. प्रत्येक जन्मणारे बाळ (गर्भातील बाळदेखील) दाखवून देते की अजूनही परमेश्वराचा माणसांवर विश्वास आहे, पालकांची जबाबदारी पार पडण्यासाठी परमेश्वर बालकांना माणसांच्या हाती सोपवतो, परमेश्वर घेतो तशी माणसांनी त्यांची काळजी वाहावी म्हणून. आज येशू आपणाला आठवण करून देतोय की बालकाना येशूकडे येऊ द्या कारण बालके स्वर्गीय राज्याचे भाग आहेत; बाळांचे संगोपन, संवर्धन व रक्षण-संरक्षण करणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे... बालकांमुळे मला काही शिकायला मिळाले आहे का?

प्रार्थना :    हे प्रभू येशू, तुझ्या स्वर्गाराज्याचे वारस बनण्यास आम्हामध्ये नम्रता, प्रामाणिकपणे, आज्ञाधारकपणा व शुद्धता वाढीस लाव, आमेन.