Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 20th week in ordinary Time| Friday 22nd August 2025

सामान्यकाळातील २०वा सप्ताह 

शुक्रवार २२ ऑगस्ट २०२५

पाहा मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणें मला होवो.

"Behold, am the servant of the Lord; let it be to me according to your word."


 पवित्र मरियेचे राणीपद

आज ख्रिस्तसभा पवित्र मरियेच्या राणीपदाचा सोहळा साजरा करीत आहे. युगानुयुग राज्य करणाऱ्या देवपुत्राची ती कुमारी माता होती म्हणून देवाने तिला स्वर्ग आणि पृथ्वीची राणी म्हणून गौरविले. 
पवित्र मरियेच्या स्वर्गनयन सोहळ्यानंतर अवघ्या आठवड्याभरात ख्रिस्तसभा पवित्र मरियेच्या राणीपदाचा सोहळा साजरा करते. याकोबच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करणाऱ्या देवपुत्राची ती कुमारी माता होती म्हणून देवाने तिला स्वर्ग आणि पृथ्वीची राणी म्हणून गौरविले. पवित्र मरियेच्या जीवनातील आणि तारणाच्या वीस रहस्यांतील मरियेचा हा सर्वात मोठा सन्मान समजला जातो.
ख्रिस्ती धर्मपरंपरेतील पुष्कळ विद्वान पंडितांनी पवित्र मरियेचा उल्लेख 'प्रभूची माता'
'राजांच्या राजाची आई' 
'विश्वाच्या सम्राटाची जननी' असा केलेला आहे. 
संत ग्रेगरी नाझियांझन ह्यांच्या मते 'संपूर्ण जगाला ख्रिस्ताच्या रूपाने एका सम्राटाची देणगी देवाने जिच्यातर्फे दिली अशी ती कुमारी माता होय.' 'पवित्र मरिया ही सर्व चराचर सृष्टीची राणी आणि या पृथ्वीतलावरील सर्व मनुष्य प्राण्यांची सम्राज्ञी मानली जाते.'
पोप पायस बारावे ह्यांनी “आद कोयेली रेजिनाम" ह्या परिपत्रकाद्वारे पवित्र मरियेच्या राणीपदाच्या सोहळ्याचा पुरस्कार केला.
पोप पायस नववे ह्यांनी पवित्र मरियेच्या राणीपदसंदर्भात या आधीच पुढील विधाने केलेली होती : “पवित्र मरियेला संपूर्ण मानव जातीची काळजी आहे म्हणून ती आपल्या मातृवात्सल्याने आपणा प्रत्येकाच्या तारणासाठी झटत असते. प्रभूने तिला स्वर्ग आणि पृथ्वीची राणी म्हणून सन्मानित केले. स्वर्गातील सर्व दूत, महादूत आणि संतगणाहून तिला अधिक प्रतिष्ठेचे स्थान दिले. आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या उजव्या हाताशी ती आपल्यासाठी प्रार्थना करीत असते आणि ती जे काही मागेल ते प्रभू परमेश्वर तिला बहाल करतो.”
त्यालाच पुस्ती जोडत पोप पायस बारावे ह्यांनी म्हटले, "या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण मानवजात पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयास समर्पित करण्यात येत आहे. देवदुतांची राणी आणि मानवाची माता असलेल्या ह्या स्वर्गपृथ्वीच्या राणीला सर्वांनी या दिवशी अभिवादन करावे. या पृथ्वीतलावर शांती, प्रेम व ऐक्याचे देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी देवाजवळ कळकळीची मध्यस्थी करणारी ती एकमेव आणि खरीखुरी राणी आहे.” त्यामुळेच आपण सर्वजण मोठ्या आत्मविश्वासाने तिच्या कृपासनाजवळ जाऊ या.

चिंतन : “पवित्र मरियेला राजांच्या राजाची आई होण्याचे भाग्य मिळाले म्हणून देखील ती राणीपदास पात्र ठरते." संत अल्फान्सोस डी लिगरी

या पृथ्वीतलावर शांती, प्रेम व ऐक्याचे देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी देवाजवळ कळकळीची मध्यस्थी करणारी ती एकमेव आणि खरीखुरी राणी आहे. आपण आज सर्वजण मोठ्या आत्मविश्वासाने तिच्या कृपासनाजवळ जाऊ या.
पवित्र मरियेच्या विनंती माले मध्ये, पवित्र मरियेला अनेक प्रकारच्या बिरुदावली लावलेल्या आहेत. त्यामध्ये एकूण १३ वेळा पवित्र मरियेला ‘राणी’ संबोधून आळवण्यात येत असते. 

  
पहिले वाचन : यशया ९:२-७
वाचन :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 

अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे, मृत्युछायेच्या प्रदेशात वसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. तू राष्ट्राची वृद्धी केली आहेस, त्याला महानंदप्राप्ती करून दिली आहेस, हंगामाच्या उत्सवसमयी करण्याच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे, ते तुझ्यासमोर आनंद करतात. कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणाऱ्याचा सोटा मोडला आहेस. युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्धयांचे जोडे आणि रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सरपण झाली आहेत. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला “अद्भुत मंत्री. समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील.” त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार, तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने आणि धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Isaiah 9:2-7: 
The people who walked in darkness have seen a great light those who dwelt in a land of deep darkness, on them has light shone. You have multiplied the nation; you have increased its joy; they rejoice before you as with joy at the harvest, as they are glad when they divide the spoil. For the yoke of his burden, and the staff for his shoulder, the rod of his oppressor, you have broken as on the day of Midian. For every boot of the tramping warrior in battle tumult and every garment rolled in blood will be burned as fuel for the fire. For to us child is born, to us a son is given; and the government shall be upon his shoulder, and his name shall be called Wonderful Counsellor, Mighty God, Everlasting Father, Prince of Peace. Of the increase of his government and of peace there will be no end, on the throne of David and over his kingdom, to establish it and to uphold it with justice and with righteousness from this time forth and for evermore. The zeal of the Lord of hosts will do this.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र   ११३: १ -८
प्रतिसाद :सर्वकाळ परमेश्वराच्या नांवाचा धन्यवाद होवो.

 १) परमेशाचें स्तवन करा. परमेश्वराचे सेवकहो, 
तुम्ही त्याचें स्तवन करा; परमेश्वराच्या नामाचें स्तवन न करा.
येथून पुढे सर्वकाळ परमेश्वराच्या नांवाचा धन्यवाद होवो.

२) सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत 
परमेश्वराचें नांव स्तवनीय आहे 
 परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे;
त्याचें वैभव आकाशाहून उंच आहे; 

३) परमेश्वर आमचा देव
जो उच्च स्थळीं राजासनारूढ आहे,
जो आकाश व पृथ्वी ह्यांचें अवलोकन करण्यास लवतो,
त्याच्यासारखा कोण आहे ?

४) तो कंगालांस धुळींतून उठवितो, 
दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलितो;
 आणि त्यांस अधिपतींच्या, 
आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीसबसवितो


Psalm 113:1b-2, 3-8
R   May the name of the Lord be blest forevermore.

Praise, O servants of the Lord, 
praise the name of the Lord! 
May the name of the Lord be blest
 both now and forevermore! R

From the rising of the sun to its setting, 
praised be the name of the Lord! 
High above all nations is the Lord, 
above the heavens his glory. R 

Who is like the Lord, our God,
who dwells on high, 
who lowers himself to look down
 upon heaven and earth?R

From the dust he lifts up the lowly, 
from the ash heap he raises the poor, 
to set them in the company of princes, 
yes, with the princes of his people.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
  हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो; 
प्रभु तुझ्याबरोबर असो'.“स्त्रियांमध्ये तू धन्य 
आणि तुझ्या पोटचे फळ धन्य !
 आलेलुया!

Acclamation: 

Hail, Mary, full of grace, the Lord is with you.
 Blessed are you among women.

शुभवर्तमान   लूक  १ :२६-३८
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
मरीये, भिऊं नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे;  
नंतर सहाव्या महिन्यांत देवानें गालीला तील नासरेथ नांवाच्या गांवीं एका कुमारी कडे गब्रीएल देवदूताला पाठविलें. ती दावीदाच्या घराण्यांतील योसेफ नांवाच्या पुरुषाला वाग्दत्त होती; आणि त्या कुमारीचें नांव मरीया होतें.  देवदूत तिच्याकडे आंत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो; प्रभु तुझ्याबरोबर असो'.  ह्या बोलण्याने तिच्या मनांत खळबळ उडाली आणि हें अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करूं लागली.  देवदूतानें तिला ( म्हटलें, मरीये, भिऊं नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे;  पाहा, तूं गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचें नांव येशू ठेव.  तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचें राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील,' व त्यांच्या राज्याचा अंत होणार नाहीं.  मरीयेनें देवदूताला म्हटलें, हें कसें होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाहीं.  देवदूतानें उत्तर दिलें, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचें। सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; ह्या कारणानें ज्याचा जन्म होईल. त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असें म्हणतील. पाहा, तुझ्या नात्यांतली अलीशिबा हिलाहि म्हातारपणीं पुत्रगर्भ राहिलाआहे; आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे; कारण 'देवाला कांहींच अशक्य होणार नाहीं.'  तेव्हां मरीया म्हणाली, पाहा मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणें मला होवो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :  Luke 1:26-38: 
At that time: The angel Gabriel was sent from God to a city of Galilee named Nazareth, to a virgin betrothed to a man whose name was Joseph, of the house of David. And the virgin's name was Mary. And he came to her and said, "Hail, full of grace, the Lord is with you!" But she was greatly troubled at the saying, and tried to discern what sort of greeting this might be. And the angel said to her, "Do not be afraid, Mary, for you have found favour with God. And behold, you will conceive in your womb and bear a son, and you shall call his name Jesus. He will be great and will be called the Son of the Most High. And the Lord God will give to him the throne of his father David, and he will reign over the house of Jacob for ever, and of his kingdom there will be no end." And Mary said to the angel, "How will this be, since I am a virgin?" And the angel answered her, "The Holy Spirit will come upon you, and the power of the Most High will overshadow you; therefore the child to be born will be called holy the Son of God. And behold, your relative Elizabeth in her old age has also conceived a son, and this is the sixth month with her who was called barren. For nothing will be impossible with God." And Mary said, "Behold, am the servant of the Lord; let it be to me according to your word." And the angel departed from her.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
पवित्र मरिया स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली. देवाने पवित्र मरियेला एवढा मान का दिला ? मरिया ही एक कुमारी होती. इतर मुलींसारखीच ती एक मुलगी होती. देवाने तिला स्वःपुत्राची आई म्हणून निवडले. त्यावेळेपासून तीदेवाची दासी बनली. स्वतः गर्भवती असतानाही एलिझाबेथला मदत केली. त्याग व प्रार्थनामय जीवन ती जगत राहिली. येशूच्या सुवार्ता प्रसार कार्याची ती साक्षीदार बनली. स्वतःच्या दुःखाचे भान ती हरपली. येशूच्या दुःखसहनाशी ती समरस झाली. येशूचे मरण आणि स्वर्गरोहणानंतर ही प्रेषितांना संघटित करीत ती त्यांची मार्गदर्शिका बनली. अशाप्रकारे मरिया देवाला आदर्शमयी जीवन जगली म्हणून देवाने तिला स्वर्गाची राणी म्हणून गौरविले. देव जेव्हा एखाद्याची निवड करतो तेव्हा तो देवच त्याच्या जीवनात कार्य करतो. मात्र निवड झालेल्याने विश्वासू राहिले पाहिजे. मी देवाच्या योजनेशी विश्वासू आहे का ?

प्रार्थना :हे पवित्र व कृपापूर्ण आई, तुझ्यासारखे शुद्ध व सेवाभावी जीवन
जगण्यासाठी कृपा मिळावी म्हणून तुझ्यापुत्रापाशी आम्हांसाठी विनंती कर, आमेन.