Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 20th week in ordinary Time| Wednesday 20th August 2025

सामान्यकाळातील २०वा सप्ताह 

बुधवार २ ऑगस्ट २०२५

“तुम्ही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हांला देईन आणि ते गेले." 'You go into the vineyard too, and whatever is right I will give you. 


 संत बर्नर्ड

- मठाधिकारी, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१०९१-११५३)

संत बर्नर्डच्या जीवनातील सर्वात हृदयस्पर्शी आणि ऐतिहासिक घटना म्हणजे दुसऱ्या क्रुसेडच्या (धर्मयुद्ध) वेळी त्याने केलेले नेतृत्व  पोप महाशयांच्या आज्ञेनुसार त्याने या कुसेडच्या वेळी जे प्रवचन दिले त्यामुळे फ्रान्स आणि जर्मनीमध्ये धर्मयोद्धयांचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. जर्मन सम्राट कॉन्राड तिसरा आणि त्याचा पुतण्या बार्बारोसा ह्यांना तर अश्रू आवरणे कठीण झालेसंपूर्ण युरोप खंडाचे रूप पालटले. बाजारपेठा बंद पडल्या. पुरुषांनी हातात क्रूस घेतल्यामुळे स्त्रियांनी बाजारपेठा हाती घेतल्या. पावलोपावली चमत्कार दिसून येऊ लागले.

मात्र पुढे काही कारणास्तव धर्मयोद्ध्यांमध्ये बेशिस्त, अतिउत्साह आणि फुटीरवृत्ती वाढली तेव्हा कुसेडवर अवकळा पसरली. त्यावेळी साऱ्या अपयशाचे खापर संत बर्नर्डवर फोडण्यात आले.

संत बर्नर्ड ह्यांना पवित्र मरियेविषयी देखील नितांत आदर होता. त्यांनी मरियेविषयी लिहिलेले साहित्य मध्ययुगातील अभिजात साहित्याचा नमुना ठरावा असेच आहे.

संत बर्नार्ड २० ऑगस्ट ११५३ रोजी मरण पावले, त्यांना ११७४ साली संतपद आणि १८३० साली धर्मपंडित हे पद बहाल करण्यात आले.

चिंतन : जो मनुष्य निष्काळजीपणे प्रार्थना करतो आणि देवाकडून मोठ्या कृपादानांची अपेक्षा करतो तो गिरणीत वाईट धान्य टाकून चांगल्या पीठाची अपेक्षा करणाऱ्या माणसासारखा आहे. संत बर्नर्ड

पहिले वाचन :  शास्ते ९:६-१५
वाचक :शास्ते या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तुम्ही म्हणालात की, एखाद्या राजाने आमच्यावर राज्य करावे; परंतु तुमचा राजा तर परमेश्वर आहे."
शखेमातील सर्व प्रमुख नागरिक आणि बेथ-मिल्लो येथील सर्व लोक एकत्र झाले आणि त्यांनी शखेमच्या स्तंभाजवळील मोठ्या वृक्षापाशी अबीमलेखला राजा केले.
हे वर्तमान ऐकून योथाम हा गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर गेला आणि उभा राहून मोठ्याने म्हणाला, "शखेमकरांनो, माझे ऐका, म्हणजे देव तुमचे ऐकेल. एकदा झाडे कोणाला तरी अभिषेक करून आपणावर राजा नेमावे म्हणून निघाली. ती जैतुनाकडे जाऊन म्हणाली, 'तू आमच्यावर राज्य कर.' जैतुन त्यांना म्हणाला, 'जिच्या योगाने देवांचा आणि माणसांचा सन्मान होतो ती माझी स्निग्धता देण्याचे सोडून झाडांसमोर हालत डोलत राहू का ?' मग झाडे अंजिराला म्हणाली, “चल, तू आमच्यावर राज्य कर. अंजीर त्यांना म्हणाला, "मी आपले माधुर्य आणि उत्तम फळे देण्याचे सोडून झाडांसमोर हालत डोलत राहू का ?" मग झाडे द्राक्षवेलीकडे जाऊन म्हणाली, "चल, तू आमच्यावर राज्य कर." द्राक्षवेली म्हणाली, "देवांना आणि मानवाला संतुष्ट करणारा माझा रस देण्याचे सोडून मी झाडांसमोर हालत डोलत राहू का ?" तेव्हा ती सर्व झाडे काटेरी झुडपाला म्हणाली, “चल, तू आमच्यावर राज्य कर.” ते काटेरी झुडूप झाडांना म्हणाले, “तुम्ही खरोखर मला अभिषेक करून आपणावर नेमणार असला तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या, नाहीतर काटेरी झुडपातून अग्नी निघून तो लबानोनचे गंधसरू भस्म करील."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Judges 9:6-15
At that time: All the leaders of Shechem came together, and all Beth- millo, and they went and made Abimelech king, by the oak of the pillar at Shechem. When it was told to Jotham, he went and stood on top of Mount Gerizim and cried aloud and said to them, "Listen to me, you leaders of Shechem, that God may listen to you. The trees once went out to anoint a king over them, and they said to the olive tree, 'Reign over us? But the olive tree said to them, "Shall I leave my abundance, by which gods and men are honoured, and go to hold sway over the trees?' And the trees said to the fig tree, "You come and reign over us. But the fig tree said to them, 'Shall I leave my sweetness and my good fruit and go to hold sway over the trees?' And the trees said to the vine, 'You come and reign over us. "But the vine said to them, 'Shall I leave my wine that cheers God and men and go to hold sway over the trees?" Then all the trees said to the bramble, 'You come and reign over us. And the bramble said to the trees, If in good faith you are anointing me king over you, then come and take refuge in my shade, but if not, let fire come out of the bramble and devour the cedars of Lebanon."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र २१:२-७
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो.

१ ) हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो. 
तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्हास होतो! 
त्यांच्या तोंडचे मागणे तू अमान्य केले नाहीस.

२) कल्याणदायी वरदाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस, 
तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालतोस, 
त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले, 
तू त्याला युगानुयुगाचे दीर्घ आयुष्य दिलेस.

३) तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचा मोठा गौरव होतो. 
तू त्याला प्रताप आणि महिमा ह्यांनी भूषित करतोस, 
त्याने सर्वकाळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करतोस. 
तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करतोस.


Psalm 21:2-3, 4-5, 6-7
In your strength, O Lord, the king rejoices. 

In your strength, O Lord, the king rejoices; 
how greatly your salvation makes him glad! 
You have granted him his heart's desire; 
you have not withheld the prayer of his lips. R

You came to meet him with blessings of prosperity: 
you have set on his head a crown of pure gold.
 He asked you for life and this you have given: 
days that will last from age to age.R

By your saving help great is his glory; 
you have bestowed upon him majesty and splendour; 
you have granted him blessings forever,
made him rejoice with the joy of your presence.  R 

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
माझ्या देवा, तुझा पथ मला प्रकट कर,
 तू आपल्या सत्पथाने मला चालव.
 आलेलुया!

Acclamation: 
The word of God is living and active, 
discerning the thoughts and intentions of the heart.

शुभवर्तमान   मत्तय २०:१-१६
वाचक :मतयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत का सलते ?"
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “स्वर्गाचे राज्य कोणा एका घरधन्यासारखे आहे, तो आपल्या द्राक्षमळयात मोलाने कामकरी लावावयास मोठ्या पहाटेस बाहेर गेला आणि त्याने कामकऱ्यांना रोजचा शेकेल ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले. मग तो तिसऱ्या तासाच्या सुमाराला बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हांला देईन आणि ते गेले." पुन्हा सहाव्या आणि नवव्या तासाच्या सुमाराला त्याने बाहेर जाऊन तसेच केले. मग अकराव्या तासाच्या सुमाराला तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, “तुम्ही संबंध दिवस तेथे रिकामे का उभे राहिले आहा?" ते त्याला म्हणाले, “आम्हांला कोणी कामावर घेतले नाही म्हणून." त्याने त्यांना म्हटले, “तुम्हीही द्राक्षमळ्यात जा." मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, "कामकऱ्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे." तेव्हा जे अकराव्या तासाच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना एकेक शेकेल मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, तरी त्यांनाही एकेक शेकेल मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधन्याविरूद्ध कुरकुर करत म्हटले, “ह्या शेवटल्यांनी एकच तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हातान्हांत कष्ट केले आणि आम्हाला आणि त्यांना आपण सारखे लेखले." तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, "गड्या मी तुझ्यावर अन्याय करीत नाही. तू माझ्याबरोबर शेकेलचा ठराव केला की नाही? तू आपला शेकेल घेऊन चालायला लाग. जसे तुला तसे ह्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करायला मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय? ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होतील.".
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Matthew 20:1-16a
At that time: Jesus told his disciples this parable: "For the kingdom of heaven is like a master of a house who went out early in the morning to hire labourers for his vineyard. After agreeing with the labourers for a denarius a day, he sent them into his vineyard. And going out about the third hour he saw others standing idle in the market-place, and to them he said, 'You go into the vineyard too, and whatever is right I will give you. So they went. Going out again about the sixth hour and the ninth hour, he did the same. And about the eleventh hour he went out and found others standing. And he said to them, "Why do you stand here idle all day?' They said to him, 'Because no one has hired us.' He said to them, "You go into the vineyard too. And when evening came, the owner of the vineyard said to his foreman, 'Call the labourers and pay them their wages, beginning with the last, up to the first.' And when those hired about the eleventh hour came, each of them received a denarius. Now when those hired first came, they thought they would receive more, but each of them also received a denarius. And on receiving it they grumbled at the master of the house, saying, 'These last worked only one hour, and you have made them equal to us who have borne the burden of the day and the scorching heat.' But he replied to one of them, 'Friend, I am doing you no wrong. Did you not agree with me for a denarius? Take what belongs to you and go. I choose to give to this last worker as give to you. Am I not allowed to do what I choose with what belongs to me? Or do you begrudge my generosity?' So the last will be first."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
अबिमेलेखला चुकीच्या पद्धतीने राजा करतात म्हणून जोथाम भूमिका घेतो आणि बोधकथेद्वारे त्यांना खडसावतो. गिडीएनने शेखेमकरांवर उपकार केले तरी त्यांनी गिडीएनच्या मुलांची हत्या केली. एकंदरीत संदर्भ देवाला गृहीत धरण्यामुळे आपण अनर्थ ओढवून घेतो त्यासंबधी आहे. 'कृपा' ही आपल्या मानवी सत्कृत्यांचे फळ नसते, आपली कमाई नसते; कृपा ही परमेश्वरी दया, माया, करुणेमुळे असते हे समजावून देण्यासाठी येशू दृष्टांत सांगतो. द्राक्षमळ्याचा मालक, भिन्न वेळी बोलावलेले कामगार व त्यांना दिलेले समान वेतन ह्या दृष्टांताद्वारे समाजातील पारंपरिक मजुरी व न्यायव्यवस्थेला धक्का दिला आहे. परमेश्वर मानवांप्रमाणे देत नसतो तर ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे पुरवित असतो; आपण मागतो / अपेक्षित करतो तेवढेच तो देतो असे नव्हे, तर देताना आपल्या माणसांचादेखील विचार करतो अशी परमेश्वरी हृदय जाणणारी माणसे वागतात हे स्पष्ट होते. सज्जन व उशिरा परिवर्तन झालेल्या पाप्यांचा एकाच स्वर्गराज्यात प्रवेश ह्याबद्धलसुद्धा हा दृष्टांत आहे...मी कुणाच्या उदारतेबद्धल कुरकुर तर करीत नाही ना?

प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या विपूल कृपादानांबद्धल आम्ही तुझे आभार
मानतो, आमेन.