Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 20th week in ordinary Time| Saturday 23rd August 2025

सामान्यकाळातील २०वा सप्ताह 

शनिवार २३ ऑगस्ट २०२५

जो कोणी स्वतःला उंच करील तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल.

Whoever exalts himself will be humbled, and whoever humbles himself will be exalted."

लिमाची संत रोझ
कुमारिका (१५८६-१६१७)

पेरू देशाची राजधानी लिमा येथे एका गरीब घराण्यात इजाबेला डी फ्लोरेझ हिचा जन्म झाला. वयाच्या ११ व्या वर्षी जेव्हा तिला आर्चबिशप (संत) तुरिबियुस (सण २३ मार्च) ह्यांनी दृढीकरण संस्कार दिला तेव्हा तिने रोझ मारी असे नाव धारण केले. सिएनाच्या संत कॅथरीनप्रमाणे (सण २९ एप्रिल) ती प्रार्थनामय आणि साधे वैराग्यवृत्तीचे जीवन जगू लागली. उपासतापास आणि आत्मक्लेश ह्याद्वारे ती आपल्या कुटुंबातच व्रतस्थाचे जीवन जगत असे. घरची गरिबी असल्यामुळे भरतकाम आणि इतर हलकी फुलकी कामे करून ती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चार पैसे कमावीत असे.
आपल्या घरापाठीमागे असलेल्या बागेत तिने व तिच्या भावाने भाजलेल्या विटांची एक छोटीशी झोपडी उभारली होती. तिथे ती प्रार्थना करी, रात्री काचेचे तुकडे व फुटलेल्या भांड्यांचे तुकडे यावर फक्त थोडे तास विश्रांती घेई. दिवसभर गोरगरिबांना मदत करणे आणि अतिपवित्र साक्रामेंताची भक्ती यामध्ये ती गढलेली असे. त्या विचित्र वातावरणात तिला दररोज कम्युनियन देण्याची व्यवस्था तिच्या आध्यात्मिक सल्लागार धर्मगुरूंनी केली होती.
तब्बल २० वर्षांनी तिच्या कुटुंबातील वातावरण तिच्या दृष्टीने पोषक बनले. आता ती तिच्या मनाप्रमाणे उघडपणे व्रतस्थाचे जीवन जगू शकत होती. कुटुंबातील थट्टामस्करी व विरोध आता मावळला होता. तिने लगेच डॉमनिकन संघात प्रवेश घेतला.
इथे तिने आपल्या आत्मक्लेशाचे प्रमाण वाढविले. क्वचितच कधीतरी जेवण घेणे, कमरेभोवती काटेरी साखळदंड करकचून आवळून बांधणे आणि डोक्याला काटेरी मुकूट घालणे अशा विविध मार्गांनी तिने आपल्या लहानसहान पापांबद्दल पश्चात्ताप करायला व प्रायश्चित्त घ्यायला सुरुवात केली. शुद्धीस्थानातील आत्म्यासाठी तिने बऱ्याच यातना सहन केल्या.
तिच्या मते 'प्रत्येक दुःखसहनामध्ये स्वर्गीय आनंद दडलेला असतो.मात्र त्या दु:खाकडे मानवी नजरेतून न पाहता देवाच्या दृष्टीने पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते.'
२४ ऑगस्ट १६१७ रोजी झालेल्या तिच्या मृत्यूनंतर असंख्य चमत्कार घडून येऊ लागले. त्यावेळी तिचे वय अवघे ३१ वर्षे इतके होते. पोप क्लेमेंट दहावे ह्यानी १६७१ साली तिला संतमालिकेत समाविष्ट केले. अमेरिकेतून झालेली ती पहिलीच संत होय. तिला लॅटीन अमेरिका व फिलिपाईन्स या देशांची आश्रयदाती संत मानले जाते.

स्वतःला धार्मिक, नीतिमान व सेवक मानणाऱ्या शास्त्री - परुश्यांना प्रभू येशूने सावधानतेचा इशारा दिला.  आपल्यातील अहंकार व खोटा अभिमान आपण काढून टाकायला हवा. आपल्यामध्ये असलेला स्वार्थ व ढोंगीपणा बाजूला सारुन प्रामाणिकणा व सत्यनिष्ठा आपण आचरणात आणायला हवी. म्हणूनच प्रभू येशू  म्हणत आहे. 'तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.'
आपल्यामध्ये देवाठायी नम्रता धारण करता यावी म्हणून आपण सतत प्रयत्नशील असावे  विशेषत: आपले विचार, आपले बोलणे व आपले आचरण आपण प्रत्येक वेळी तपासून त्यामध्ये सतत सुसंगती यावी म्हणून प्रार्थना करूया 
✝️             

हिले वाचन  रूथ  २:१-३, ८-११,४:१३-१७
वाचक :रूथ  या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“परमेश्वराने तुला तुझे वतन सोडवणाऱ्या जवळच्या आप्ताविना ठेवले नाही. तो इशायचा बाप व दावीदचा आजा होय."

नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता. तो अलीमलेख याच्या कुळातला असून मोठा धनवान माणूस होता. त्याचे नाव बवाज असे होते. मवाबी रुथ नामीला म्हणाली, मला शेतात जाऊ द्या म्हणजे कोणाची माझ्यावर कृपादृष्टी झाल्यास त्याच्यामागून मी धान्याचा सरवा वेचीत जाईन. ती म्हणाली, “मुली, जा." ती जाऊन शेतात कापणी करणाऱ्यांच्या मागून सरवा वेचू लागली. सुदैवाने शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलीमलेखच्या कुळातल्या बवाजचा होता. बवाज रुथला म्हणाला, “मुली ऐकतेस ना? तू दुसऱ्यांच्या शेतात सरवा वेचावयास येथून जाऊ नकोस, येथेच माझ्या नोकरिणींबरोबर राहा. हे ज्या शेताची कापणी करीत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा. तुला काही त्रास पोहोचू नये अशी आज्ञा मी या गड्यांस दिली आहे. तुला तहान लागल्यास तू भांड्यांकडे जाऊन त्या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी. तेव्हा ती त्याला दंडवत घालून म्हणाली, “माझ्यासारख्या परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे काय कारण बरे ?" बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस आणि तू कशाप्रकारे आपली मातापितरे आणि जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकांत आलीस, ही सविस्तर हकीकत मला समजली आहे.
मग बवाजने रुथशी लग्न केले आणि ती त्याची पत्नी झाली. परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. तेव्हा स्त्रिया नामीला म्हणाल्या, “परमेश्वर धन्य आहे, त्याने तुला तुझे वतन सोडवणाऱ्या जवळच्या आप्ताविना ठेवले नाही. त्याचे नाव इस्राएलमध्ये प्रख्यात होवो ! हा तुझे पुनरुज्जीवन करणारा आणि वृद्धापकाळी तुझा प्रतिपाळ करणारा होवो, कारण तुझी सून जी तुझ्यावर प्रीती करते आणि जी तुला सात पुत्रांहून अधिक आहे तिला हा पुत्र झाला आहे.” मग नामीने ते मूल उचलून आपल्या उराशी धरले आणि ती त्याची दाई बनली. “नामीला पुत्र झाला," असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद असे ठेवले. तो इशायचा बाप आणि दावीदचा आजा होय.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Ruth 2:1-3, 8-11; 4:13-17
Naomi had a relative of her husband's, a worthy man of the clan of Elimelech, whose name was Boaz. And Ruth the Moabite said to Naomi, "Let me go to the field and glean among the ears of grain after him in whose sight I shall find favour." And she said to her, "Go, my daughter." So she set out and went and gleaned in the field after the reapers, and she happened to come to the part of the field belonging to Boaz, who was of the clan of Elimelech. Then Boaz said to Ruth, "Now, listen, my daughter, do not go to glean in another field or leave this one, but keep close to my young women. Let your eyes be on the field that they are reaping, and go after them. Have I not charged the young men not to touch you? And when you are thirsty, go to the vessels and drink what the young men have drawn." Then she fell on her face, bowing to the ground, and said to him, "Why have found favour in your eyes, that you should take notice of me, since I am a foreigner?" But Boaz answered her, "All that you have done for your mother-in-law since the death of your husband has been fully told to me, and how you left your father and mother and your native land and came to a people that you did not know before. So Boaz took Ruth, and she became his wife. And he went in to her and the Lord gave her conception, and she bore a son. Then the women said to Naomi, "Blessed be the Lord, who has not left you this day without a redeemer, and may his name be renowned in Israel! He shall be to you a restorer of life and a nourisher of your old age, for your daughter-in-law who loves you, who is more to you than seven sons, has given birth to him." Then Naomi took the child and laid him on her lap and became his nurse. And the women of the neighbourhood gave him a name, saying, "A son has been born to Naomi." named him Obed. He the father of Jesse, the father of David.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १२७:१- २अ, २ब-३, ४-५
प्रतिसाद : पाहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या माणसाला आशीर्वाद मिळेल.

१ जो माणूस परमेश्वराचे भय धरतो, 
जो त्याच्याच मार्गानी चालतो तो धन्य !
 तू आपल्या श्रमाचे फळ खाशील.

२ तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल, 
तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल,
 तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील.

३ पाहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या माणसाला 
असा आशीर्वाद मिळेल. 
परमेश्वर सियोनातून तुला तुझ्या आयुष्याचे 
सर्व दिवस आशीर्वाद देवो!

Psalm Psalm 128:1-2, 3, 4, 5
Indeed thus shall be blessed the man who fears the Lord.

Blessed are all who fear the Lord, 
and walk in his ways!
By the labour of your hands you shall eat.
You will be blessed and prosper. R

Your wife like a fruitful vine
 in the heart of your house;
your children like shoots of the olive
around your table. R

Indeed thus shall be blessed
 the man fears the Lord. R

May the Lord bless you from Sion. 
May you see Jerusalem prosper 
all the days of your life! R
 
जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत, ते सदासर्वकाळ अढळ आहेत.
 आलेलुया!

Acclamation: 
You have one Father, who is in heaven; and you have one instructor,
the Christ.

शुभवर्तमान   मत्तय २३:१-१२
वाचक :मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  "ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत."
येशू लोकसमुदायांना आणि आपल्या शिष्यांना म्हणाला, शास्त्री आणि परुशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतील ते सर्व आचरत आणि पाळत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांदयावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावणार नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करतात, ते आपली मंत्रपत्रे रुंद आणि आपले गोंडे मोठे करतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे, आणि लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यास आवडते. तुम्ही तरी आपणाला गुरुजी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एक आहे आणि तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणाला स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Matthew 23:1-12
Pharisees sit on Moses' seat, so do and observe whatever they tell you, but not the At that time: Jesus said to the crowds and to his disciples, "The scribes and the works they do. For they preach, but do not practise. They tie up heavy burdens, hardto bear, and lay them on people's shoulders, but they themselves are not willing to move them with their finger. They do all their deeds to be seen by others. For they make their phylacteries broad and their fringes long, and they love the place of honour at feasts and the best seats in the synagogues and greetings in the market- places and being called rabbi by others. But you are not to be called rabbi, for you have one teacher, and you are all brothers. And call no man your father on earth, for you have one Father, who is in heaven. Neither be called instructors, for you have one instructor, the Christ. The greatest among you shall be your servant. Whoever exalts himself will be humbled, and whoever humbles himself will be exalted."

This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
रुथची गोष्ट आणखीन जिज्ञासा निर्माण करण्याचे थांबत नाही. बोआझ रुथच्या प्रेमात पडतो आणि त्यांना मुलगा होतो त्याचे नाव ओबेद, ओबेदचा मुलगा जेस्से आणि जेस्सेचा मुलगा दावीद. अशाप्रकारे रुथचा पुनर्विवाहझाल्याने येशूच्या १४+१४+१४ पिढ्यांच्या वंशावळीमध्ये रुथचे नाव कोरलंय. त्या दावीद राजाच्या कुळातला येशू होता ही उल्लेखनीय बाब होय. शुभवर्तमानामध्ये नियम, विधी आणि उपनियम ह्यांच्या कार्यवाही व (कोणी चुकले की) कारवाई करण्याकडे फारच लक्ष देणाऱ्या शास्त्री-परुशी लोकांना येशू कठोर शब्दात खडसावतो, त्यांच्यासाठी वापरलेले शब्द खूप तिखट, तीक्ष्ण वाटतातः ते सांगतात ते ऐका पण त्यांच्याप्रमाणे वागू नका; ते देखावा करतात, मानमरातबासाठी ते हपापलेले असतात, इत्यादी. कुणालाही गुरु, पिता, मार्गदर्शक म्हणू नये असा येशूचा आग्रह आहे... मोठा समजतो त्याने सेवक असावे हा मोलाचा संदेश देतो... दिवसागणिक मी सकारात्मक होतोय की कडवट ते मी शोधू शकेन...?..

प्रार्थना :हे प्रभू येशू, नम्रपणे तुझा खरा अनुयायी बनून सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.