सामान्यकाळातील २१वा सप्ताह
सोमवार २५ ऑगस्ट २०२५
तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता, तुम्ही स्वतःही आत जात नाही आणि आत जाणाऱ्यांना जाऊ देत नाही.
For you neither enter yourselves nor allow those who would enter to go in.
संत लुईस नववे
राजा, वर्तनसाक्षी (१२१४-१२७०)
“पाप करण्याऐवजी कोणतेही दुःख सहन करण्यास तयार असा.”- संत लुईस नववे -
“अहो, आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. "
येशू म्हणाला, “अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता, तुम्ही स्वतःही आत जात नाही आणि आत जाणाऱ्यांना जाऊ देत नाही.
अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता आणि ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता, ह्यामुळे तुम्हाला अधिक शिक्षा होईल.
अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही एका मतानुयायी मिळवण्यासाठी समुद्र आणि भूमी पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणाहून दुप्पट असा नरकपुत्र करता.
"“अहो, आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही म्हणता, कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु जो कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर मात्र तो बांधला जातो. अहो, मूर्खानो आणि आंधळ्यांनो, ह्यातून मोठे कोणते ? ते सोने किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर ? तुम्ही म्हणता, कोणी वेदीची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर तो बांधला जातो. अहो आंधळ्यांनो, ह्यातून मोठे कोणते ? अर्पण किंवा अर्पण पवित्रकरणारी ती वेदी ? म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो तो तिची आणि तिच्यावर जे काही आहे त्याची शपथ घेतो आणि जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची आणि त्यात राहणाऱ्यांची शपथ घेतो आणि जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या राजासनाची आणि त्याच्यावर बसणाऱ्याची शपथ घेतो."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.