सामान्यकाळातील २१वा सप्ताह
बुधवार २७ ऑगस्ट २०२५
ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार!
Woe to you scribes and Pharisees, hypocrites;
संत मोनिका
- विधवा (३३१-३८७)
जन्माने ख्रिस्ती असलेल्या मोनिका हिचे लग्न वयाच्या २० व्या वर्षी उत्तर आफ्रिकेतील तागास्ते शहरातील पॅट्रिशिअस नामक श्रीमंत (परंतु मूर्तीपूजक) अधिकाऱ्याशी झाले. हा अधिकारी मोनिकापेक्षा वयाने खूप मोठा होता. त्यांना तीन मुले झाली.
तिचे पती परधर्मीय असल्यामुळे आणि अत्यंत तापट स्वभावाचे असल्याने मोनिकाला खूप मनस्ताप सहन करावा लागला. त्याने मुलांना ख्रिस्ती शिक्षण देणे खूप जिकिरीचे केले. परंतु मोनिकाच्या प्रार्थनेचे सामर्थ्य इतके विलक्षण होते की तब्बल अठरा वर्षांच्या वैवाहिक जीवनातील कसोटीच्या काळानंतर अखेर पॅट्रिशिअस हा अधिकारी विश्वाचा सम्राट प्रभू येशू ख्रिस्त ह्याला शरण आला. त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. परंतु लवकरच मृत्यूने त्याला मोनिकाच्या जीवनातून हिरावून नेले. एका डोळ्यात पतीनिधनाचे दुःख, तर दुसऱ्या डोळ्यात त्याने ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारल्याचे समाधान अशा मिश्र भावनांनी मोनिकाचे जीवन व्यापले गेले.
आता मोनिकाने आपले सर्व लक्ष आपल्या मुलांवर केंद्रित करण्यास सुरुवात केली. तिचा मोठा मुलगा अगस्तीन हा कार्थेज येथे अभ्यास करीत असताना 'मानिकेइझम' नावाच्या पाखंडी विचारसरणीचा बळी बनलेला होता. या विचारसरणीनुसार जगात 'चांगली व वाईट' अशा दोन शक्ती आहेत असे मानले जाते. अगस्तीनने ह्या विचारसरणीनुसार जीवन जगायला सुरुवात केली होती. तब्बल १५ वर्षे तो एका स्त्रीच्या मोहपाशात अडकून पडलेला होता.
आपल्या मुलाचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून मोनिका अश्रू ढाळून प्रार्थना करीत असे. तिला भेटलेल्या एका बिशपांना तिने विनंती केली की, 'तुम्ही तरी अगस्तीनला समजावून सांगा.' हे बिशप स्वतः मानिकेइझम ह्या पाखंडवादाच्या विचारसरणीतून बाहेर पडलेले होते. त्यांनी अगस्तीनची अवस्था पाहिल्यावर या तरुणाचा कायापालट होण्यास खूप वेळ लागेल हे जाणले आणि तात्पुरते का होईना मोनिकाचे सांत्वन करीत म्हटले, “ज्या तुझ्या मुलासाठी तू अश्रू ढाळीत आहेस तो तुझा मुलगा कधीच वाया जाणार नाही.” त्या विशपांचे नाव होते संत अंब्रोज (सण : ७ डिसेंबर).
पुढे अगस्तीनला रोम शहरात भाषाशास्त्र शिकविण्याची संधी चालून आली. मोनिकाने त्याच्याबरोबर रोम शहरात जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. परंतु त्याने एकटेच जाण्याचा मनोदय तिच्याकडे व्यक्त केला आणि एका जहाजाने तो रोम शहरात पोहोचला. तेथून तो मिलान शहरात गेला व त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करू लागला. मोनिकाने तिथेही त्याचा पाठलाग केला आणि मिलानचे बिशप अंब्रोज ह्यांच्याशी तिने जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. बिशप अंब्रोज ह्यांच्या वक्तृत्वाने व पावित्र्याने अगस्तीन इतका भारावून गेला की त्याने तात्काळ ख्रिस्ताला आपले जीवन अर्पण केले व इ.स. ३८७ सालच्या इस्टरच्या दिवशी त्याने बाप्तिस्मा घेतला.
मोनिकाची आयुष्यभराची आशा सफळ झाली. ती म्हणाली, “माझ्या मुला, माझ्या जीवनात तुला कॅथलिक झालेला पाहणे इतकेच एक ध्येय होते. देवाने मला माझ्या अपेक्षेपेक्षा अधिकच दिले आहे. येशूचे अनुकरण अधिक
जवळून करता यावे म्हणून या जगातील सर्व ऐहिक सुखांचा त्याग करण्याचे दान देवाने तुला बहाल केलेले आहे इतके मला पुरे आहे! माझे शरीर कुठेही पुरले तरी चालेल मात्र “तू देवाच्या वेदीपाशी जाशील तेव्हा माझी आठवण ठेव!"
कार्थेज येथे परतण्याच्या हेतूने मायलेक दोघे रोमहून निघाले. वाटेत ऑस्ट्रिया बंदरावर थांबलेले असतानाच मोनिकाने आपल्या मुलाच्या, अगस्तीनच्या बाहुपाशात सुखाने प्राण सोडला. त्यावेळी तिचे वय ५६ वर्षे इतके होते.
चांगल्याने वाईटावर मात कशी करायची ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत मोनिका हिचे जीवन! तिच्याच स्मरणार्थ पॅरीस येथे 'ख्रिश्चन मदर्स असोशिएशनची स्थापना करण्यात आलेली आहे. हाताबाहेर गेलेल्या पती व मुलांसाठी या स्त्रिया विशेष प्रार्थना करीत असतात.
चिंतन : तिचे माझ्यावर किती प्रेम होते ते शब्दबद्ध करणे कठीण आहे. तिच्या केवळ शब्दांनीच नव्हे तर करुणायुक्त नजरेने ती आमची हृदये प्रभूकडे लावण्यास आम्हाला प्रेरणा देई... हे माझ्या देवा, 'मी जर तुझे बाळ असेन तर ते केवळ तू मला दिलेल्या प्रेमळ आईमुळेच होय.-संत अगस्तीन
✝️
पहिले वाचन : १ थेस्सलनिकाकरांस २:९-१३
वाचक : पौलचे थेस्सलनिकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
" आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुम्हापुढे देवराज्याच्या सुवार्तेची घोषणा केली."
बंधूंनो, आमचे श्रम आणि कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे, तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने, नीतीने, आणि निर्दोषतेने कसे वागलो ह्याविषयी तुम्ही साक्षी आहा आणि देवही आहे, कारण तुम्हांला ठाऊकच आहे की, बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करत, धीर देत आणि आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो की, जो देव आपल्या राज्यात आणि गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे.ह्या कारणामुळे आम्हीही देवाची निरंतर उपकारस्तुती ह्यामुळे करतो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकार ते माणसाचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक ते असेच आहे, ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये कार्य करत आहे
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
: First Thessalonians 2: 9-13
For you remember, brethren, our labour and toil:
working night and day, lest we should be chargeable to any of you, we preached among you the gospel of God. You are witnesses, and God also, how holily, and justly, and without blame, we have been to you that have believed: As you know in what manner, entreating and comforting you, (as a father doth his children,) We testified to every one of you, that you would walk worthy of God, who hath called you unto his kingdom and glory. Therefore, we also give thanks to God without ceasing: because, that when you had received of us the word of the hearing of God, you received it not as the word of men, but (as it is indeed) the word of God, who worketh in you that have believed.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र : १३९:७-१२
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस.
१)मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ ?
मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ ?
मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस..
तू अधोलोकी मी आपले अंथरूण केले,
तरी पाहा, तेथे तू आहेस.
२) मी पहाटेचे पंख धारण करून
समुद्राच्या अगदी पलीकडल्या
तीरावर जाऊन राहिलो.
तरी तेथेही तुझा हात मला चालवील
तुझा उजवा हात मला धरून ठेवील.
३ )अंध:कार मला लपवो,
माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख होवो,
असे जरी मी म्हणालो, तरी अंधःकारदेखील
तुझ्यापासून काहीएक लपवत नाही,
रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते.
Psalm
Psalms 139: 7-8, 9-10, 11-12ab
R. (1) You have searched me and you know me, Lord.
7 Whither shall I go from thy spirit?
or whither shall I flee from thy face?
8 If I ascend into heaven, thou art there:
if I descend into hell, thou art present.
R. You have searched me and you know me, Lord.
9 If I take my wings early in the morning,
and dwell in the uttermost parts of the sea:
10 Even there also shall thy hand lead me:
and thy right hand shall hold me.
R. You have searched me and you know me, Lord.
11 And I said: Perhaps darkness shall cover me:
and night shall be my light in my pleasures.
12ab But darkness shall not be dark to thee,
and night shall be light as day.
R. You have searched me and you know me, Lord.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia: First John 2: 5
R. Alleluia, alleluia.
Whoever keeps the word of Christ, the love of God is truly perfected in him.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मत्तय २३:२७-३२
वाचक :मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहा."
येशू म्हणाला, “अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहा, त्या बाहेरून खरोखरच सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी आणि सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. तसेच तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने आणि अनीतीने भरलेले आहा." “अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि नीतिमान लोकांची थडगी सजविता आणि म्हणता, आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो, तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो. ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहा, अशी स्वतः विरुद्ध साक्ष देता, तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :
Matthew 23: 27-32
Woe to you scribes and Pharisees, hypocrites; because you are like to whited sepulchres, which outwardly appear to men beautiful, but within are full of dead men’s bones, and of all filthiness. So you also outwardly indeed appear to men just; but inwardly you are full of hypocrisy and iniquity. Woe to you scribes and Pharisees, hypocrites; that build the sepulchres of the prophets, and adorn the monuments of the just, And say: If we had been in the days of our Fathers, we would not have been partakers with them in the blood of the prophets. Wherefore you are witnesses against yourselves, that you are the sons of them that killed the prophets. Fill ye up then the measure of your fathers.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
परमेश्वर चांगला आहे आणि परमेश्वराने निर्मिलेली माणसे देखील चांगली राहायला हवीत त्यासाठी प्रभू येशूची सुवार्ता घोषित करताना दिवस-रात्र काबाडकष्ट करणे, कुणाला आपले जीवन ओझे होऊ नये म्हणून खुद्द संत पॉल आपल्या जीवनाची साक्ष देताना सर्वाना परमेश्वरी साम्राज्यात सहभागी होण्यासाठी पहिल्या वाचनातील वचनांद्वारे खुणावत आहे. शुभवर्तमानात येशू दोनदा शास्त्री व परुशी ह्यांच्या वरवरच्या 'दुहेरी' जीवनाबद्धल तीन बाबतीत निषेध करतोः (१) शिकवतात त्याप्रमाणे ते वागत नाहीत (२) यहुदी धर्मग्रंथ 'तोराह' चा अन्वयार्थ ते नीट लावत नाहीत, सोयीस्कर अर्थ लावतात आणि (३) परमेश्वराचा गौरव न करता, ते स्वतःच्या स्तुती-गौरवाला प्राधान्य देतात. नम्रतेने आत्मपरीक्षण, पश्चाताप, क्षमादानाद्वारे आपण प्रामाणिक बदल घडायला हवा, सुंदर सजविलेल्या कबरा; परंतु आत असलेल्या हाडे-सांगाडे ह्याप्रमाणे आपण असू नयेत हा तो आपल्याला संदेश आहे... माझे जीवन माझ्या मर्यादा, अहंकार लपविणारा 'मुखवटा' आहे की मी आहे तसा दाखवणाऱ्या पारदर्शक आरशाप्रमाणे आहे?
प्रार्थना :प्रभू येशू, मनापासून तुझी उपासना करण्यास व सेवा करण्यास सामर्थ्य दे, आमेन.