सामान्यकाळातील २१वा सप्ताह
गुरुवार २८ ऑगस्ट २०२५
“जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.Stay awake, for you do not know on what day your Lord is coming.
- महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपाल, धर्मपंडित (३५४-४३०)
ख्रिस्तसभा आज महान धर्मपंडित संत आगस्टीनचा सन्मान करीत आहे. पाप कितीही मोठे असले तरी देवाची दया व कृपा त्यापेक्षा खूप महान आहे. पापी आगस्टीनचे परिवर्तन झाले आणि पश्चातापी अंत:करणाने देवाला शरण गेलेल्या आगस्टीनने आपले संपूर्ण जीवन ख्रिस्ताला वाहीले. संत आगस्टीन म्हणतात, आपली हृदये परमेश्वरासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत, ती त्या परमेश्वराठायी विसावा पावल्याशिवाय शांत होऊ शकत नाही."
बिशप अगस्तीन जगातील प्रकांडपंडितांपैकी ख्रिस्तसभेचे विख्यात विद्वान धर्मपंडित होते. त्यांनी तत्त्वज्ञान व ईशज्ञान या दोन्ही क्षेत्रांत आपला असा वेगळा ठसा उमटविलेला होता. 'कृपा' या विषयावरील त्यांचे विचार देवाचा सार्वभौम अधिकार आणि मानवाची स्वतंत्र इच्छाशक्ती या दोहोंचा सुंदर संगम घालताना दिसतात. आपल्या पश्चात्तापाची व परिवर्तनाची प्रक्रिया व श्रद्धेचा प्रवास त्यांनी 'आत्मनिवेदन' (Confessions) या जगप्रसिद्ध आत्मचरित्रामध्ये वर्णन केलेला आहे. परमेश्वराचे निर्मितीकार्य वर्णन करणारे 'सिटी ऑफ गॉड' हे पुस्तक तर नाशवंत वस्तूंमध्ये देवाचे अविनाशी सामर्थ्य कसे भरून राहिलेले आहे त्याचे सुंदर वर्णन करणारे आहे.
संत अगस्तीन २८ ऑगस्ट ४३० साली मरण पावले. त्यांच्या शरीराचे अवशेष आठव्या शतकापासून 'पाविया' येथे ठेवण्यात आलेले आहेत.
चिंतन : हे प्रेमाचे जळते भट्टी! माझ्या प्रभो! तू साक्षात प्रेम आहेस! माझ्या हृदयात प्रेमाचा अग्नी प्रज्वलित कर - संत अगस्तीन
आपण आपल्या देवावरील विश्वासात दृढ राहावे, परस्परांवर प्रेम व दया करुन प्रभूमध्ये सर्वदा प्रार्थनेद्वारे स्थिर बनावेत. आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करुन देवासमोर निर्दोष बनावे. देवाच्या आज्ञा पाळून प्रभूच्या वचनांनुसार जीवन आचरण करावे. अशी आपल्या प्रभूची अपेक्षा आहे. सर्वाना सर्वकाळचे स्वर्गीय जीवन लाभावे. मात्र जगातील केवळ क्षणभंगूर गोष्टींचा ध्यास घेऊन देवाच्या कृपेपासून आपण बहकलो तर ज्यावेळी प्रभू येशू आपल्या पवित्र जनांसह परत येईल तेव्हा आपण बेसावध नसावे, अन्यथा आपला सर्वनाश होईल. म्हणूनच प्रभू म्हणत आहे, ‘तुम्ही जागृत राहा. 'मृत्यु आपल्याला ठावूक नाही म्हणूनच सर्वदा जागृत राहणे गरजेचे