Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 21st week in ordinary Time| Saturday 30th August 2025

सामान्यकाळातील २१वा सप्ताह 

शनिवार  ३०  ऑगस्ट २०२५

“शाबास, भल्या आणि विश्वासू दासा, तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन,
'Well done, good and faithful servant. You have been faithful over a little; I will set you over much.

संत युफ्रेसिया
ख्रिस्तसभा आज कार्मेलाईट संस्थेची मदर संत युफ्रेसीया ह्यांचा सण साजरा करीता आहे. केरळ मध्ये जन्मलेली मदर युफ्रेसीया ह्यांनी आपले सर्वस्व  त्याग करून दयाकृत्ये करून व प्रार्थनामय जीवन सर्वांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. त्यांना प्रार्थना करणारी मदर म्हणून देखिल संबोधले जाई.  विशेष म्हणजे त्यांनी पवित्र कुटुंबाच्या भक्तीला प्राधान्य दिले होते. मदर  युफ्रेसीया ह्यांचे अनुसरण करीत आपण सुद्धा त्यागमय, व प्रार्थनामय जीवन  जगत असतांना इतरांसाठी मध्यस्थी करावी.


 परमेश्वराने प्रत्येकाला  जीवनाचे वरदान देऊन ते समृद्धपणे जगता यावे म्हणून अनेक देणग्या बहाल केलेल्या असतात. त्या देणग्यांचा योग्य तो वापर करुन आपण आपले स्वतःचे तसेच इतरांचे जीवन सुखकर समृद्ध बनवायचे आहे. परमेश्वर आपल्याला दिलेल्या ह्या जबाबदारी बद्धल जाब विचारणार आहे व त्याप्रमाणे आपणास योग्य ते बक्षीस देऊन त्याच्या आनंदात सहभागी करणार आहे. आपल्याला परमेश्वराने कोणकोणत्या देणग्या दिलेल्या आहेत हे तपासून पाहू . त्या देणग्यांच्या आधारे स्वतःचे कुटुंब व समाज या संबंधाने आपण आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडू या 


✝️             

हिले वाचन १ थेस्सलनिकाकरांस ४:९-११
वाचक : पौलचे थेस्सलनिकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हांला देवानेच शिकवले आहे. "

बंधुप्रेमाविषयी आम्ही लिहावे ह्याची तुम्हांला गरज नाही, कारण एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हांला देवानेच शिकवले आहे आणि अखिल मासेदोनियातील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करतच आहा. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हांला बोध करतो की, ती उत्तरोत्तर अधिक करावी. बाहेरच्या लोकांसमोर सभ्यतेने वागावे आणि तुम्हांला कशाचीही गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे, आपआपला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे ह्यांची हौस तुम्हांला असावी.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : 1 Thessalonians 4:9-11
Brethren: Concerning brotherly love you have no need for anyone to write to you, for you yourselves have been taught by God to love one another, for that indeed is what you are doing to all the brothers throughout Macedonia. But we urge you, brothers, to do this more and more, and to aspire to live quietly, and to mind your own affairs, and to work with your hands, as we instructed you.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र   ९८:१,७-९
प्रतिसाद :  परमेश्वर लोकांचा न्याय सरळपणे करतो.
१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, 
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत, 
त्याने आपल्या उजव्या हाताने, 
आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधला आहे.

२) समुद्र आणि त्यातील सर्वकाही, जग 
आणि त्यात राहणारे हर्षनाद करोत, 
नद्या टाळ्या वाजवोत. 
पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावोत,
 कारण तो पृथ्वीचा न्याय करायला आला आहे.

३). तो जगाचा न्याय यथार्थतेने करील 
आणि लोकांचा न्याय सरळपणे करील.

Psalm 98:1, 7-8, 9
The Lord comes to judge the peoples with fairness.

O sing a new song to the Lord, 
for he has worked wonders. 
His right hand and his holy arm
 have brought salvation. R

Let the sea and all within it thunder;
 the world, and those who dwell in it.
Let the rivers clap their hands, 
and the hills ring out their joy
 at the presence of the Lord, for he comes, 
he comes to judge the earth. R

He will judge the world with justice,
and the peoples with fairness. R
 
जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे
 आलेलुया!

Acclamation: 
A new commandment I give to you, says the Lord, that you love one another as I have loved you.

शुभवर्तमान   मत्तय २५:१४-३०
वाचक :मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो."

येशूने आपल्या शिष्यांना पुढील दाखला सांगितलाः “परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, एकाला त्याने पाच हजार रूपये, एकाला दोन हजार रूपये आणि एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेच जाऊन त्यावर व्यापार केला आणि आणखी पाच हजार मिळवले. तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्याने आणखी दोन हजार मिळवले. परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली आणि तिच्यामध्ये आपल्या धन्याचा पैसा लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला आणि त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते. तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, “महाराज, आपण माझ्यावर पाच हजार रुपये सोपवून दिले होते. पाहा, त्यांवर मी आणखी पाच हजार रुपये मिळवले आहेत." त्याला त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या आणि विश्वासू दासा, तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.” मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, "महाराज, आपण माझ्यावर दोन हजार रुपये सोपवून दिले. होते. पाहा, त्यांवर मी आणखी दोन हजार रुपये मिळवले आहेत." त्याला त्याच्या धन्याने म्हटले, "शाबास भल्या आणि विश्वासू दासा, तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, .मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो." नंतर ज्याला एक हजार मिळाले होते. तोही येऊन म्हणाला, “महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहा, जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता आणि जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता, म्हणून मी भ्यालो आणि तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते, पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत.” तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, “अरे दुष्ट आणि आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो आणि पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय? तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते हजार रुपये त्याच्यापासून काढून घ्या आणि ज्याच्याजवळ आहेत त्याला दया. त्याला भरपूर होईल; परंतु ज्या कोणाजवळ नाही त्यांच्याजवळ जे असेल तेदेखील त्यांच्यापासून काढून घेतले. जाईल. ह्या निरुपयोगी दासाला अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल."


प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :Matthew 25: 14-30: 
At that time: Jesus told his disciples this parable: "It will be like a man going on a journey, who called his servants and entrusted to them his property. To one he gave five talents, to another two, to another one, to each according to his ability. Then he went away. He who had received the five talents went at once and traded with them, and be made five talents more. So also he who had the two talents made two talents more. But he who had received the one talent went and dug in the ground and hid his master's money. Now after a long time the master of those servants came and settled accounts with them. And he who had received the five talents came forward, bringing five talents more saying 'Master, you delivered to me five talents; here, I have made five talents more. His master said to him, "Well done, good and faithful servant. You have been faithful over a litle: I will set you over much. Enter into the joy of your master. And he also who had the two talents came forward, saying, 'Master, you delivered to me two talents; here, I have made two talents more. His master said to him, 'Well done, good and faithful servant. You have been faithful over a little; I will set you over much. Enter into the joy of your master.' He also who had received the one talent came forward, saying, 'Master, I knew you to be a hard man, reaping where you did not sow, and gathering where you scattered no seed, so I was afraid, and I went and hid your talent in the ground. Here, you have what is yours." But his master answered him, "You wicked and slothful servant! You knew that I reap where have not sown and gather where I scattered no seed? Then you ought to have invested my money with the bankers, and at my coming should have received what was my own with interest. So take the talent from him and give it to him who has the ten talents. For to everyone who has will more be given, and he will have an abundance. But from the one who has not, even what he has will be taken away. And cast the worthless servant into the outer darkness. In that place there will be weeping and gnashing of teeth.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
रुपयांचा दाखला हा जागृत राहण्यासंबंधी आहे: मालक आपल्या तीन दासांना तीन रकमा देतो; एकाला पाच तालांत (एकाची किंमत हजारो रुपये), दुसऱ्याला दोन व तिसऱ्याला एक ह्याप्रमाणे प्रत्येकाच्या लायकीप्रमाणे जबाबदारी देतो. प्रवासावरून आल्यावर मालक हिशोब घेतो; पहिले दोन दास तेवढेच कमावतात म्हणून मालक त्यांना आणखीन जबाबदारी देतो; परंतु एका तालांतची जबाबदारी सोपविलेल्या दासाने तालांत पुरून ठेवली; आणि मालकाला 'कठोर' व 'जाचक' असे संबोधतो म्हणून मालक ते तालांत आधीच आहे त्याच्याकडे सोपवितो. अन्वयार्थः (१) देवाने दिलेली देणगी, बुद्धी, शक्ती, कलागुण, क्षमता आदींचे प्रतीक तालांत (२) मालक 'पुरस्कार व शिक्षा' पद्धती वापरतो (३) 'लायकीप्रमाणे' म्हणजे कार्यक्षमतेप्रमाणे (४) 'गाडून ठेवणे' म्हणजे फलद्रूपतेपेक्षा सुरक्षिततेला महत्व देणे (५) प्रभुसाठी 'तयार असणे' म्हणजे स्वस्थ बसणे नाही, तर इतरांसाठी दिलेल्या संधीचा लाभ घेणे... ईश्वरदत्त देणग्यांचा विवेकबुद्धी वापरून, जबाबदारीने, एक 'विश्वस्त' म्हणून आपण श्रद्धा फलदायी करतो का ?

प्रार्थना :हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमची कर्तव्ये व जबाबदाऱ्या योग्यरितीने पार पाडण्यास व सर्वकाळच्या आनंदात सहभागी होण्यास आम्हाला पात्र बनव,  आमेन.