प्रतिसाद स्तोत्र ९६:१,३-५,११-१३
प्रतिसाद : परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यासाठी आला आहे.
१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
पृथ्वीवरील सर्व जनहो, परमेश्वराचे गुणगान करा,
राष्ट्रांमध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
२ ) कारण परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे
सर्व देवांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे,
कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत,
परमेश्वर तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे.
३) आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो,
समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत,
शेत आणि त्यातील सर्वकाही उत्सव करोत,
मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर
आनंदाचा गजर करतील. कारण तो आला आहे,
पृथ्वीचा न्याय करण्यासाठी तो आला आहे.
४) तो न्यायीपणाने जगाचा आणि सत्यतेने लोकांचा न्याय करील.
Psalm 96:1 and 3, 4-5, 11-12, 13
The Lord comes to judge the earth.
O sing a new song to the Lord;
sing to the Lord, all the earth.
Tell among the nations his glory,
and his wonders among all the peoples. R
For the Lord is great and highly to be praised,
to be feared above all gods.
For the gods of the nations are naught.
It was the Lord who made the heavens. R
Let the heavens rejoice and earth be glad;
let the sea and all within it thunder praise.
Let the land and all it bears rejoice. R
Then will all the trees of the wood shout for joy
at the presence of the Lord, for he comes,
he comes to judge the earth.
He will judge the world with justice;
he will govern the peoples with his truth. R
Acclamation:
The Spirit of the Lord is upon me; he has anointed me to proclaim good news to the poor.
शुभवर्तमान लूक ४:१६-३०
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने माझा अभिषेक केला आहे. "
ज्या नाझरेथ येथे येशू लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्ट्यांचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेले आहे:“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे.परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. म्हणून त्याने मला पाठवले आहे, धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे.”मग ग्रंथपट गुंडाळून आणि तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यांना म्हणू लागला की, “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्यांविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, “हा योसेफचा पुत्र ना ?" त्याने त्यांना म्हटले, “खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर, कफर्णहूमात ज्या ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथेही आपल्या गावी कर. पुढे तो म्हणाला, "मी तुम्हांला नक्की सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हांला खरे ते सांगतो की, एलियाच्या काळी साडेतीन वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता, त्या काळी इस्राएलमध्ये पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यातील एकीच्याहीकडे एलियाला पाठवले नव्हते, तर सिदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेष्ट्यांच्या काळी इस्राएलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, पण सुरियाचा नामान मात्र शुद्ध झाला. हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यासाठी तेथपर्यंत नेले. पण तो त्यांच्यामधून निघून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.