Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 22nd week in ordinary Time| Tuesday 2nd September 2025

सामान्यकाळातील २२वा सप्ताह 

मंगळवार  दिनांक २ सप्टेंबर  २०२५

तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, “गप्प राहा आणि ह्याच्यातून नीघ."
 But Jesus rebuked him, saying, "Be silent and come out of him!" 


पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेना 

 ✝️

जर प्रभू येशूवर विश्वास  ठेवून व त्याला आपले सर्वस्व समर्पित करुन प्रभू येशूच्या अधिकाराचा आपण वापर केला तर अशुद्ध आत्म्याला आपण घालवून देवू शकतो. कोणत्याहि दुष्ट शक्तिला न घाबरता आपण प्रभू येशूच्या अधिकारात व आज्ञेत जीवन जगण्याच्या प्रयत्न करु या.
प्रभू येशू त्याच्या सामर्थ्यशाली अधिकाराने सर्व प्रकारच्या अंधकारमय शक्तीवर विजय मिळविणार प्रभू आहे. प्रभूच्या प्रकाशात स्थिर राहून आपण त्याच्या सामर्थ्यशाली कृपेवर अवलंबून राहण्यासाठी कृपा मागू या. 

✝️
पहिले वाचन : १थेस्सलनिकाकरांस  ५:१-६,९-११
वाचक : पौलचे थेस्सलनिकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
“आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे, म्हणून ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. " 
बंधूंनो, काळ आणि समय ह्यांविषयी तुम्हांला काही लिहिण्याची गरज नाही. कारण तुम्हांला स्वतःला पक्के माहीत आहे की, जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. "शांती आहे, निर्भय आहे." असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना चालू होतात, त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावरणारच नाहीत. बंधुजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हांला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा आणि दिवसाची प्रजा आहा, आपण रात्रीचे आणि अंधाराचे नाही. म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे आणि सावध राहावे. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, म्हणून आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे. म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उन्नती करा, असे तुम्ही करतच आहा.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : 1 Thessalonians 5:1-6, 9-11
Concerning the times and the seasons, brothers, you have no need to have anything written to you. For you yourselves are fully aware that the day of the Lord will come like a thief in the night. While people are saying, "There is peace and security", then sudden destruction will come upon them as labour pains come upon a pregnant woman, and they will not escape. But you are not in darkness brothers, for that day to surprise you like a thief. For you are all children of light, children of the day. We are not of the night or of the darkness. So then let us not sleep, as others do, but let us keep awake and be sober. For God has not destined us for wrath, but to obtain salvation through our Lord Jesus Christ, who died for us so that whether we are awake or asleep we might live with him. Therefore encourage one another and build one another up, just as you are doing.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र   तिसाद स्तोत्र   २७:१,४,१३-१४
प्रतिसाद :  जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील.

१) परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे, 
मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझा दुर्ग आहे,
 मी कोणाचे भय धरू ?

२) परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, 
त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, ते हे की, 
आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी,
 म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन 
आणि त्याच्या मंदिरात ध्यान करीन.

३) ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर 
खात्रीने माझे कल्याण करील.
 परमेश्वराची प्रतीक्षा कर, 
खंबीर हो, हिम्मत धर, 
परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.


Psalm 27:1, 4, 13-14 
R I believe I shall see the Lord's goodness in the land of the living

The Lord is my light and my salvation; 
whom shall I fear?
The Lord is the stronghold of my life; 
whom should I dread? R

There is one thing ask of the Lord, 
only this do I seek: 
to live in the house of the Lord
all the days of my life,
to gaze on the beauty of the Lord, 
to inquire at his temple. R

I believe I shall see the Lord's goodness
in the land of the living.
Wait for the Lord; be strong; 
be stouthearted, and wait for the Lord! R

 
जयघोष                                             
जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
मी परमेश्वराची प्रतीक्षा करतो, मी त्यांच्या वचनावर विसंबून आहे.
 आलेलुया!

The Spirit of the Lord is upon me; he has anointed me to proclaim good news to the poor.


शुभवर्तमान   लूक ४:३१-३७ 
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "तू देवाचा पवित्र पुरुष आहेस हे मला ठाऊक आहे."
येशू गालिलातील कफर्णहूम गावी खाली आला. तो शब्बाथ दिवशी त्यांना शिक्षण देत असे. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. तेव्हा अशुद्ध भुताच्या आत्म्याने पछाडलेला कोणीएक माणूस सभास्थानात होता, तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “अरे येशू नाझरेथकर! तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस का? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र पुरुष तो." तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, “गप्प राहा आणि ह्याच्यातून नीघ." मग भूत त्या मनुष्याला त्यांच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले. तेव्हा सर्व जण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “काय हे बोलणे? ह्या अधिकाराने आणि सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात!” नंतर त्याच्याविषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 4:31-37
At that time: Jesus went down to Capernaum, a city of Galilee. And he was teaching them on the Sabbath, and they were astonished at his teaching, for his word possessed authority. And in the synagogue there was a man who had the spirit of an unclean demon, and he cried out with a loud voice, "Ha! What have you to do with us, Jesus of Nazareth? Have you come to destroy us? know who you are the Holy One of God." But Jesus rebuked him, saying, "Be silent and come out of him!" And when the demon had thrown him down in their midst, he came out of him, having done him no harm. And they were all amazed and said to one another, "What is this word? For with authority and power he commands the unclean spirits, and they come out!" And reports about him went out into every place in the surrounding region.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
पहिल्या वाचनातील कालच्या उताऱ्यात व्यक्त करण्यात आलेली मृत व्यक्तींच्या भवितव्याविषयीची चिंता आजच्या पहिल्या वाचनातील उताऱ्यात संत पॉल चर्चेसाठी घेतो. प्रभूच्या आगमनाची पूर्वतयारी करीत असताना आपण पूर्णपणे सावध असावे अशी भूमिका तो मांडतो त्यासाठी तो प्रभूचा दिवस चोरासारखा येईल असे भाकीत करतो. चोर कोणाला सांगून चोरी करीत नाही. मृत्यूदेखील माणसाला अचानक गाठत असतो. मात्र अशा सर्व प्रसंगी परमेश्वर मात्र आपल्याला कधीही सोडून जात नाही. तीच गोष्ट आपल्याला शुभवर्तमानात सांगण्यात आलेली आहे. शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर अशुद्ध आत्मा लागलेल्या माणसाची कथा सादर करण्यात आलेली आहे. हा मनुष्य अशुद्ध आत्म्याने पछाडलेला आहे परंतु तो सभास्थानात प्रार्थनेला आलेला आहे. त्याच्यामध्ये एकाच वेळेस अनेक व्यक्तिमत्त्वे दडलेली आहेत. एकदा तो स्वतःचा अनेकवचनी उल्लेख करतो ("तू आमच्याकडे का पडतोस?") तर दुसऱ्यांदा तो स्वतःचा एकेरी उल्लेख करतो ("तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे.") येशू आपल्या दैवी शक्तीने त्याला बरे करून मानवी जीवनातील सुखदुःखाशी एकरूप होतो.
माझ्या जीवनाच्या शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून मी जागरूक राहून कोणकोणत्या प्रकारची तयारी करीत आहे ?

प्रार्थना :हे सामर्थ्यशाली प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्यावरील श्रद्धेत दृढ राहून तुझ्या प्रकाशात चालण्या मला प्रेरणा दे, आमेन.


पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना 

हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी,

आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर    

(इथे  आपली विनंती सांगावी)

आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. साधन बनावेततू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी कॅले ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.

हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. 

हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. 

हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.