Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 22nd week in ordinary Time| Wednesday 3rd September 2025

सामान्यकाळातील २२वा सप्ताह 

बुधवार  दिनांक ३ सप्टेंबर  २०२५

त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले, तेव्हा तिचा ताप निघाला.
And he stood over her and rebuked the fever, and it left her,




पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेना 

आजच्या पहिल्या वाचनात संत पौल कलसैकरांस त्यांच्या प्रभू येशूवरील विश्वासाबद्दल त्यांची प्रशंसा करीत आहे. देवाच्या सत्य वचनात सदैव आपण वाढत राहावे आणि सर्वानी विश्वासाची ढाल घेऊन चालावे, म्हणून संत पौल सर्वांना मार्गदर्शन करीत आहे. आपल्याला मिळालेली ही श्रद्धा फलद्रूप होण्याची अपेक्षा सर्वांकडून आहे.

स्तुती, आराधना व निरंतर प्रार्थना ह्याद्वारे पवित्र आत्म्याठायी आपल्या सर्वांना प्रभू येशूच्या कृपेचा गुणकारी स्पर्श व्हावा म्हणून प्रेरणा मागू या. प्रभूचा प्रेमळ स्पर्श अनुभवून तो आपल्या सभोवतालच्या सर्वांना अनुभवता यावा म्हणून प्रार्थना करु या..
देवाचा शब्द एका चिरकाल टिकणाऱ्या नात्यांसाठी आपणांस आमंत्रण देत असतो. इस्रायली जनतेने ह्यास कराराचे नातेसंबंध असे संबोधिले. एखाद्याला वाटेल की बायबल मध्ये जे काही आहे ते एका विशिष्ट कालखंडासाठी लिहिले होते त्याच्या सध्याच्या जीवनात आपणाला काहीही उपयोग नाही. मात्र तसे मुळीच नाही बायबलमध्ये आपण जे काही वाचतो ते आपल्याला प्रत्येक घटकेत आणि प्रसंगात उपयोगी पडत असते. जीवनाच्या प्रत्येक प्रसंगी आनंददायक आणि दुःखद प्रसंगीही ते आपणाला प्रेरणा देत राहते. त्याच आपणांस दैवी सांत्वन देखिल लाभत असते. 

आपण मरियेच्या जन्मदिन नोव्हेनासाठी एकत्र जमले असताना तिच्याप्रमाणे देवशब्दावरील आपलीही श्रद्धा दैनंदिन जीवनात बळकट व्हावी म्हणून  आपण प्रार्थना करू या.

✝️             

हिले वाचन कलस्सैकरांस  १:१-८
वाचक : पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"सुवार्ता तुम्हाकडे आणि सर्व जगाकडे येऊन पोहोचली आहे."

कलस्सै येथील पवित्र जनांना म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूंना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमथी ह्यांच्याकडूनः  देव आपला पिता ह्याच्यापासून तुम्हांला कृपा आणि शांती असो ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास आणि तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती, ह्यांविषयी ऐकून, आम्ही तुम्हांसाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुम्हांसाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याची उपकारस्तुती करतो, ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्यवचनाच्या पूर्वी ऐकले. सुवार्ता तुम्हाकडे येऊन पोहोचली आहे. तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले आणि खरेपणाने तिची माहिती करून घेतली, त्या दिवसापासून जशी तुम्हामध्ये तशीच सर्व जगातही ही सुवार्ता फळ देत आणि वृद्धिंगत होत चालली आहे. एपफ्रास, आमच्या सोबतीचा प्रिय दास, तुमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकला. आत्म्याच्या योगे उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हांला कळवले.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Colossians 1:1-8

Paul, an apostle of Christ Jesus by the will of God, and Timothy our brother, to the saints and faithful brothers in Christ at Colossae; Grace to you and peace from God our Father. We always thank God, the Father of our Lord Jesus Christ, when we pray for you, since we heard of your faith in Christ Jesus and of the love that you have for all the saints, because of the hope laid up for you in heaven. Of this you have heard before in the word of the truth, the gospel, which has come to you, as indeed in the whole world it is bearing fruit and increasing - as it also does among you, since the day you heard it and understood the grace of God in truth, just as you learned it from Epaphras our beloved fellow servant. He is a faithful minister of Christ on your behalf and has made known to us your love in the Spirit.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र   ५२:१०-११

प्रतिसाद :  देवाच्या दयेवर सदासर्वकाळ माझा भरवसा आहे.

१) मी तर देवाच्या घरी हिरव्यागार 
जैतून झाडासारखा असतो.
देवाच्या दयेवर सदासर्वकाळ माझा भरवसा आहे.

२) हे तू घडवून आणले आहेस म्हणून मी 
सर्वकाळ तुझे उपकारस्मरण करीन. 
तुझ्या भक्तासमोर तुझ्या नावाची घोषणा करीन, 
कारण ते उत्तम आहे.


Psalm 52:10, 11 

R   I trust in the mercy of God, forever and ever.

I am like a growing olive tree
in the house of God. 
I trust in the mercy of God, 
 forever and ever. R.

I will thank you forever more,
 for this is your doing. 
 I will hope in your name, 
for it is good,
in the presence of your faithful. R
 
जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू आपल्या वचनाला जागतो, त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते.
 आलेलुया!

Acclamation: 
The Lord has anointed me to proclaim good news to the poor, to proclaim liberty to the captives.

शुभवर्तमान   लूक ४:३८-४४
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 “मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.'
येशू सभास्थानातून उठून शिमोनच्या घरी गेला. शिमोनची सासू कडक तापाने पडली होती, तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले, तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली.

सूर्यास्ताच्या वेळी, ज्यांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांनी त्यांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले. "तू देवाचा पुत्र आहेस," असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली. त्याने त्यांना धमकावले आणि बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते.

दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आला आणि आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते, परंतु तो त्यांना म्हणाला, मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.मग तो यहुदियांच्या सभास्थानांमध्ये उपदेश करत फिरला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :Luke 4:38-44

At that time: Jesus arose and left the synagogue and entered Simon's house. Now Simon's mother-in-law was ill with a high fever, and they appealed to him on her behalf. And he stood over her and rebuked the fever, and it left her, and immediately she rose and began to serve them. Now when the sun was setting, all those who had any who were sick with various diseases brought them to him, and he laid his hands on every one of them and healed them. And demons also came out of many, crying, "You are the Son of God!" But he rebuked them and would not allow them to speak, because they knew that he was the Christ. And when it was day, he departed and went into a desolate place. And the people sought him and came to him, and would have kept him from leaving them, but he said to them, "I must preach the good news of the kingdom of God to the other towns as well; for I was sent for this purpose." And he was preaching in the synagogues of Judea.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
श्रद्धा माणसाच्या जीवनात आमूलाग्र असा बदल घडवून आणीत असते. कलस्से येथील लोकांनी संत पौलच्या उपदेशाला चांगलाप्रतिसाद दिलेला होता. त्यांच्या श्रद्धेला भरभरून पीक आणि फळ आलेलं होतं. त्याबद्दल संत पॉल आजच्या पहिल्या वाचनात आनंद व्यक्त करतो. त्यांच्यात श्रद्धेत त्यांनी टिकन रहावे म्हणून तो त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. सभास्थानातील प्रार्थना आटोपल्यानंतर येशू पेत्राच्या घरी जातो आणि तिला तापासून बरे करतो. तीदेखील येशूच्या सामर्थ्याला उचित प्रतिसाद देत येशू आणि त्याचे शिष्य ह्यांची यथायोग्य सेवा करते. इस्राएलमध्ये सूर्यास्त म्हणजे नवीन दिवसाची सुरुवात! अशा वेळी येशू बऱ्याच लोकांना रोगमुक्त करतो. त्यांच्या जीवनात सृदृढ आरोग्याची पहाट उगवते. येशू मात्र जसा आधी सभास्थानात प्रार्थनेला गेलेला होता तसा आताही रानात एकांती प्रार्थनेला जातो. सामुदायिक प्रार्थनेइतकीच वैयक्तिक प्रार्थनाही तो महत्त्वाची मानतो.
मी परमेश्वराच्या कार्याला कथा प्रकारे प्रतिसाद देतो? माझ्या जीवनात सामुदायिक प्रार्थनेइतकीच वैयक्तिक प्रार्थनाही मी महत्त्वाची मनतो/ते का?
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझा आरोग्यदायी व मुक्तीचा स्पर्श अनुभवण्यास आमचे अंत:करण तुझ्या कृपेने भरून टाक, आमेन.


पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना 

हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी,

आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर    

(इथे  आपली विनंती सांगावी)

आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. साधन बनावेततू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी कॅले ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.

हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. 

हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. 

हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.