Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 22nd week in ordinary Time| Thursday 4th September 2025

सामान्यकाळातील २२वा सप्ताह 

गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर  २०२५

 “भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील." 
Jesus said to Simon, "Do not be afraid; from now on you will be catching men."


पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेना 

रात्रभर कष्ट करून समुद्रात काहीच मासळी न लागलेल्या शिमोन पेत्राला प्रभू येशू प्रतिकात्मक पद्धतीने बोलावित आहे. प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे जाळे समुद्रात टाकल्यावर जाळ्यात भरपूर मासे आले. तो चमत्कार पाहून पेत्राला आणि त्याच्या सहकाऱ्यांना भिती वाटली मात्र प्रभू येशूने पेत्राला म्हटले, 'भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा 'होशील!' प्रभू येशूचे सामर्थ्यशाली प्रकटीकरण पाहणाऱ्या पेत्राला आणि त्याचे सोबती तसेच याकोब व योहान ह्या सर्वांना प्रभूने माणसे धरण्यास म्हणजेच देवराज्याची सुवार्ता सांगण्यासाठी पाचारण केले.सर्वांना त्याची देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास आणि सेवाकार्य करण्यास बोलवित आहे

आपण मरियेच्या जन्मदिन नोव्हेनासाठी एकत्र जमले असताना तिच्याप्रमाणे देवशब्दावरील आपलीही श्रद्धा दैनंदिन जीवनात बळकट व्हावी म्हणून  आपण प्रार्थना करू या.


✝️             

हिले वाचन  कलस्सैकरांस  १:९-१४
वाचक : पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"देवाने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आहे."
आम्ही तुम्हाविषयी ऐकल्या दिवसांपासून तुम्हांसाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, सर्व अध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धी ह्यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. सर्व प्रकारचा धीर आणि सहनशक्ती ही तुम्हांला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्यांच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे आणि ज्याने तुम्हांला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाने भागीदार होण्याजोगे केले त्या पित्याची तुम्ही उपकारस्तुती करावी. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले, त्या पुत्राच्या ठायी, खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Colossians 1:9-14
Brethren: From the day we heard, [your love in the Spirit] ceased to pray for you, asking that you may be filled with the knowledge of his will in all spiritual wisdom and understanding, so as to walk in a manner worthy of the Lord, fully pleasing to him: bearing fruit in every good work and increasing in the knowledge of God; being strengthened with all power, according to his glorious might, for all endurance and patience with joy; giving thanks to the Father, who has qualified you to share in the inheritance of the saints in light. He has delivered us from the domain of darkness and transferred us to the kingdom of his beloved Son, in whom we have redemption, the forgiveness of sins. 
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ९८:२-६
प्रतिसाद :   परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे.

१) परमेश्वराने आपण सिद्ध केलेले 
तारण जाहीर केले आहे, 
राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे.
 इस्राएलच्या घराण्यावरील आपली दया 
आणि सत्यता यांचे स्मरण केले आहे.

२) पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाने 
सिद्ध केलेले तारण पाहिले आहे. 
अहो, पृथ्वीवरील सर्व लोकहो, 
परमेश्वराचा जयजयकार करा. 
उच्च स्वराने, आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा.

३) परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा, 
वीणेवर सुस्वर स्तोत्र गा.
कर्णा आणि शिंग वाजवून 
परमेश्वर राजासमोर जयघोष करा.

Psalm 98:2-3ab, 3cd-4, 5-6
The Lord has made known his salvation.
The Lord has made known his salvation, 
has shown his deliverance to the nations. 
He has remembered his merciful love
 it o and his truth for the house of Israel. R

All the ends of the earth have seen
the salvation of our God. 
boog misloo Shout to the Lord, all the earth;
break forth into joyous song,
and sing out your praise. R

Sing psalms to the Lord with the harp, 
with the harp and the sound of song. 
With trumpets and the sound of the horn, 
raise a shout before the King, the Lord. R
 
जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा. तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.
 आलेलुया!

Acclamation: 
Follow me, says the Lord; and I will make you fishers of men.

शुभवर्तमान   लूक :१-११
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 “सर्व सोडून देऊन ते ख्रिस्ताचे अनुयायी झाले."
लोकसमुदाय येशूजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले दोन मचवे पाहिले; त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनचा होता, त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा आत लोटावा म्हणून त्याने त्याला सांगीतले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनला म्हटले, “खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.” शिमोनने त्याला उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो." मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली, तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून. त्यांनी त्यांना खुणाविले. मग तो आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभो, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे.” कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो आणि त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते; तसेच शिमोनचे भागीदार, जब्दीचे मुलगे याकोब आणि योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनला म्हणाला, “भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील." मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 5:1-11
At that time: On one occasion, while the crowd was pressing in on Jesus to hear the word of God, he was standing by the lake of Gennesaret, and he saw two boats by the lake, but the fishermen had gone out of them and were washing their nets. Getting into one of the boats, which was Simon's, he asked him to put out a little from the land. And he sat down and taught the people from the boat. And when he had finished speaking, he said to Simon, "Put out into the deep and let down your nets for a catch." And Simon answered, "Master, we toiled all night and took nothing! But at your word I will let down the nets." And when they had done this, they enclosed a large number of fish, and their nets were breaking. They signalled to their partners in the other boat to come and help them. And they came and filled both the boats, so that they began to sink. But when Simon Peter saw it, he fell down at Jesus' knees, saying, "Depart from me, for I am a sinful man, O Lord." For he and all who were with him were astonished at the catch of fish that they had taken, and so also were James and John, sons of Zebedee, who were partners with Simon. And Jesus said to Simon, "Do not be afraid; from now on you will be catching men." And when they had brought their boats to land, they left everything and followed him.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
परमेश्वराच्या दिशेने वाटचाल करायची म्हणजे अंधारातून प्रकाशाच्या दिशेने पावले उचलीत रहायचे. संत पॉल कलससै येथील लोकांना त्याची जाणीव करून देतो की, देवानेतुम्हाला अंधारातून बाहेर काढून त्याच्या पुत्राच्या राज्यात आणून सोडले आहे. संत पीटर शुभवर्तमानात तश्याच प्रकारचा अनुभव घेतो.

एक हाडाचा कोळी असूनही रात्रभर कष्ट करून सुद्धा त्याच्या जाळयात काहीच पडलेले नव्हते. मात्र येशूने त्याला अमुक ठिकाणी जाळे टाक असे सांगितले आणि ते फाटेपर्यंत आणि दोन्ही मचवे बुडायला लागेपर्यंत त्यांना मासळी मिळाली. त्यावेळी पेत्राच्या डोक्यात प्रकाश पडला आपल्याबरोबर असलेला मनुष्य काही साधासुधा माणूस नाही तो साक्षात देवाचा पुत्र आहे. हा चमत्कार अनुभवल्यांनंतर पेत्राला स्वतःच्या पापी जीवनाची लाज वाटू लागते. तो येशूला सांगतो माझ्यापासून निघून जा कारण मी पापी मनुष्य आहे. येशूने त्याला प्रकाशाची वाट दाखविलीः भिऊ नकोस. यापुढे तू माणसे धरणारा होशील. स्वतः प्रकाशाची वाट चालायला सुरुवात केल्यानंतर माणसाने इतरांना जगाचा प्रकाश असलेल्या येशूकडे आणायचे असते.
मी अंधाराची कृत्ये करीत आहे की प्रकाशमय जीवन जगत आहे?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या वचनात वाढण्यास व देवराज्याची सुवार्ता घोषविण्यास आम्हाला प्रेरणा व बळ दे, आमेन.

पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना 

हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी,

आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर    

(इथे  आपली विनंती सांगावी)

आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. साधन बनावेततू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी कॅले ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.

हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. 

हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. 

हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.