सामान्यकाळातील २२वा सप्ताह
शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५
“मनुष्याचा पुत्र शब्बाथचा प्रभू आहे."
"The Son of Man is lord of the Sabbath."
शब्बाथ पाळणे म्हणजे विसावा घेऊन प्रार्थना उपासना करणे व देवकृपा मिळविणे. दैनंदिन जीवन सुरळीतपणे चालावे ह्यासाठी समाजात सर्व स्तरावर नियम बनवले जातात. नियम म्हणजे बंधने नसून शिस्तप्रिय जीवन आचरणासाठी नियम महत्वाचे आहेत. नियमांपेक्षा माणूस व त्याच्या दैनंदिन गरजा महत्वाच्या आहेत. नियमांपेक्षा माणूस महत्वाचा आहे. आजच्या शुभवर्तमानात शब्बाथ दिवशी प्रभूच्या शिष्यांनी शेतातील कणसे काढून खाल्ली म्हणून शास्त्री परुश्यांनी प्रभूला जाब विचारला. प्रभू येशूने म्हटले, 'मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे. ' शब्बाथा ऐवजी आपण रविवार हा प्रभूचा दिवस म्हणून पाळतो. ह्या दिवशी उपासनेत सहभागी होऊन सत्कृत्ये करणे महत्वाचे आहे.
✝️
पहिले वाचन : कलस्सैकरांस १:२१-२३
वाचक : पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"तुम्हांला पवित्र आणि निष्कलंक असे उभे करावे, ह्यासाठी देवाने 'तुमचा समेट केला आहे. "
जे तुम्ही पूर्वी परके आणि दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता, त्या तुम्हांला पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. म्हणून तुमचा त्याने स्वतःच्या रक्तामांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, त्याने जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले आणि अढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली आणि जिचा मी पौल सेवक झालो आहे, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही तर हे होईल.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Colossians 1:21-23
Brethren: You, who once were alienated and hostile in mind, doing evil deeds, he has now reconciled in his body of flesh by his death, in order to present you holy and blameless and above reproach before him, if indeed you continue in the faith, stable and steadfast, not shifting from the hope of the gospel that you heard, which has been proclaimed in all creation under heaven, and of which 1, Paul, became a minister.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ५४:३-४, ६-८
प्रतिसाद : देव माझा आधार आहे.
१) हे देवा, तू आपल्या नावाच्या सामर्थ्याने मला तार.
आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर,
हे देवा, माझी प्रार्थना ऐक,
माझ्या मुखातील शब्दांकडे कान दे.
२) देव माझा आधार आहे, तो मला वाचवतो.
मी स्वखुशीने तुला यज्ञबली अर्पीन,
हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वोत्तम आहे,
मी स्तवन करीन.
Psalm Psalm 54:3-4, 6 and 8
R See, I have God for my help.
O God, save me by your name;
by your power, defend my cause.
O God, hear my prayer,
give ear to the words of my mouth. R
See, I have God for my help.
The Lord sustains my soul.
I will sacrifice to you with willing heart,
and praise your name, for it is good. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे पवित्र कुमारी मरिये, तू धन्य असून गौरवास पात्र आहेस, कारण न्यायसूर्य ख्रिस्त, आमचा परमेश्वर, तुझ्या पोटी जन्मला.
आलेलुया!
Acclamation:
I am the way, and the truth, and the life, says the Lord; no one comes to the Father except through me..
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"शब्बाथ दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता ? "
एका शब्बाथ दिवशी येशू शेतांमधून जाताना त्यांचे शिष्य कणसे मोडून हातांवर चोळून खाऊ लागले. तेव्हा परुश्यांतील कोणी म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता? येशूने त्यांना उत्तर दिले, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले ? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्या बरोबरच्यांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथचा प्रभू आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Luke 6:1-5
On a sabbath, while Jesus was going through the cornfields, his disciples plucked and ate some ears of corn, rubbing them in their hands. But some of the Pharisees said, "Why are you doing what is not lawful to do on the Sabbath?" And Jesus answered them, "Have you not read what David did when he was hungry, he and those who were with him: how he entered the house of God and took and ate the bread of the Presence, which is not lawful for any but the priests to eat, and also gave it to those with him?" And he said to them, "The Son of Man is lord of the Sabbath."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
शब्बाथ पालनाविषयीचा नियम मोशेच्या काळापासून यहुदी समाजात प्रचलित होता.
इस्त्रायली जनता पवित्र भूमीत स्थायिक झाल्यानंतर ती काटेकोरपणे त्याचे पालन करू लागली. मुळात ह्या नियमानुसार शब्बाथ दिवस हा पवित्र पाळण्यासाठी विश्रांती आण्णि देवाची स्तुती आराधना अशा गोष्टींची शिफारस करण्यात आलेली होती. पुढे जेरुसलेमचे मंदिर पाडण्यात आले आणि लोकांना हदपार अवस्थेत नेण्यात आले. तिथे शब्बाथचा नियम आणखी कडक करण्यात आला. त्यानुसार शब्बाथ दिवशी कुठलेच काम करायचे नाही, गुपचूप एकत्र येऊन देवाची भक्ती करायची अशी लोकांची अवस्था झालेली होती. येशू चित्रात येईपर्यंत शब्बाथ हा आनंदाचा नव्हे नियम आणि निर्बंध ह्यांत जखडला गेलेला दुःख कष्टाचा दिवस बनलेला होता. येशूने त्यातून लोकांना मुक्त करण्यासाठी अनेक चमत्कार मुद्दाम त्या दिवशी घडवून आले, त्याच्यासाठी शब्बाथापेक्षा माणूस आणि खुद्द येशूसुद्धा मोठा आहे.
कायदेकानून आणि मानवी प्रतिष्ठा ह्यांची सांगड मी माझ्या जीवनात कशी घालतो/ते?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी वचने पाळण्यास व सात्विकतेने तुझी उपासना । करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना
हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी,
आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर
(इथे आपली विनंती सांगावी)
आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. साधन बनावेततू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी कॅले ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर.
हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर.
हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.
0 टिप्पण्या