सामान्यकाळातील ३१ वा सप्ताह
सोमवार दि.३ नोव्हेंबर २०२५
नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल.
For you will be repaid at the resurrection of the just."
संत मार्टिन डी पोरेस
वर्तनसाक्षी (१५६९-१६३९)
✝️
पेरू देशातील लिमा ह्या ठिकाणी एका प्रेमप्रकरणामधून मार्टिन ह्याचा जन्म झाला. त्याचे वडील स्पेन देशातील अल्कांतारा येथील राजदरबारात सरदारकी करीत होते. त्यांचे नाव होते डॉन जुआन डी पोरेस. त्यांनी पनामा येथल्या एका निग्रो स्त्रीवर प्रेम केले. मात्र मार्टिनच्या जन्मानंतर त्याने तिला टाकून दिले. त्यामुळे मार्टिनचे बालपण अत्यंत दारिद्र्यात गेले. परंतु त्यामुळे त्याला गरिबांविषयी खूप कळवळा वाटू लागला. अगदी वयाच्या बाराव्या वर्षी त्याने शस्त्रक्रियेमध्ये प्राविण्य मिळविले आणि आसपासच्या इस्पितळात तो सराव (प्रॅक्टिस) करू लागला. आपल्या उत्पन्नाचा काही भाग तो गरीब रुग्णांना देई.
वयाच्या १५ व्या वर्षी तो डॅमिणिकन संघाचा सदस्य बनला. त्याच्याठायी आज्ञाधारकपणा, गरिबीचे व्रत आणि प्रेम इतके प्रभावी होते की, नऊ वर्षाच्या खडतर तपश्चर्येनंतर डॉमिणिकन संघाच्या अधिकाऱ्यांनी त्याला व्रतस्थ बंधू म्हणून दीक्षा दिली. बऱ्याच रात्री त्याने आध्यात्मिक साधना, प्रायश्चित्त, आध्यात्मिक वाचन ह्यामध्ये घालविल्या.
आपल्या ठायी असलेले चमत्काराचे अद्भूत सामर्थ्य लपविण्याचा मार्टिनने खूप प्रयत्न केला, परंतु लवकरच लोकांमध्ये तो एक संत म्हणून प्रसिद्धीस आला. केवळ स्पर्शाने, पवित्र क्रुसाच्या खुणेने किंवा प्रार्थनेने तो आजारी लोकांना रोगमुक्त करी. देवाने त्याला अंतर्ज्ञानाची देणगी दिलेली होती. शिवाय संदेश देण्याचे दानही त्याला मिळाले होते. तो जणू प्रीती आणि शांतीचा मूर्तिमंत पुतळाच होता.
अगदी दूरूनही एखाद्या व्यक्तीच्या मनातील विचार किंवा आजार त्याला कळून येत असे. त्यामुळे त्याने लिमाबाहेर प्रवास केल्याची नोंद नसूनही मेक्सिको, फ्रान्स, आल्जिएर, फिलीपाईन्स, चीन आणि जपानसारख्या ठिकाणी तो व्यक्तिश: हजर राहून रुग्णसेवा करीत असे अशी साक्ष लोकांनी दिलेली आहे. कधी कधी तर त्याच्या भोवती देवदूत उभे असल्याचे आपण पाहिले असे डॉमणिकन संघाचे सदस्य सांगत.
मार्टिन सर्वांना समभावनेने वागवीत असे. आपल्या डॉमणिकन संघातील बंधूंना तो अगदी जिव्हाळ्याने मार्गदर्शन करी. हा स्पेनचा, तो भारतीय, हा निग्रो असा भेदभाव तो कधी करीत नसे. त्याच्या मठामधून दररोज १६० गरीब लोकांना आणि परित्यक्त स्त्रियांना भोजन पाठवून दिले जाई. इतकेच नव्हे तर दर आठवड्याला तो २६,००० रुपयांचा दानधर्म करीत असे. अनेक श्रीमंत आणि धनवान लोक त्याला देणग्या देण्यासाठी मठासमोर रांगा लावीत.
वयाच्या सत्तराव्या वर्षी मार्टिन जेव्हा मरण पावला तेव्हा संपूर्ण लिमा प्रांत शोकसागरात बुडाला. पेरूचे व्हॉईसरॉय, रॉयल चेंबर्सचे सदस्य, दोन महागुरू ह्यांनी मार्टिनच्या शवपेटिकेला खांदा दिला. त्याच्या २५ व्या स्मृतिदिनी त्याचे शरीर अविनाशी म्हणजेच न कुजलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले. ६ मे १९६२ रोजी त्याला संतांच्या मालिकेत स्थान देण्यात आले. तो सामाजिक न्यायाचा आश्रयदाता मानला जातो.
✝️
पहिले वाचन :रोम ११:२९-३६
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवले आहे.'
देवाला आपल्या कृपादानांचा आणि पाचारणाचा अनुताप होत नाही. ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करत होता परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगाचे दया प्राप्त झाली आहे, त्याचप्रमाणे तुम्हांवरील ममतेने त्यांनाही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोडवाड्यात कोंडून ठेवले आहे.
अहाहा, देवाच्या बुद्धीची आणि ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!
"प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता ?"
"त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे?"
कारण सर्व काही त्याच्यापासून, त्याच्याच द्वारे आणि प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.
First Reading :Romans 11:29-36
Brethren: The gifts and the calling of God are irrevocable. For just as you were at one time disobedient to God but now have received mercy because of their disobedience, so they too have now been disobedient in order that by the mercy shown to you they also may now receive mercy. For God has consigned all to disobedience, that he may have mercy on all. Oh, the depth of the riches and wisdom and knowledge of God! How unsearchable are his judgments and how inscrutable his ways! "For who has known the mind of the Lord, or who has been his counsellor?" "Or who has given a gift to him that he might be repaid?" For from him and through him and to him are all things. To him be glory for ever. Amen.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ६८:३०-३१,३३-३४,३६-३७
प्रतिसाद : हे देवा, तू मला उत्तर दे.
१ मी तर दीन आणि दुःखी आहे,
हे देवा, तू सिद्ध केलेले तारण मला
उच्च स्थानी नेऊन ठेवील.
गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन,
त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन.
२ दीनजन हे पाहून हर्ष करतील,
देवाचा शोध करणाऱ्यांनो,
तुमच्या हृदयात नवजीवन येवो,
कारण परमेश्वर गरजवंतांचे ऐकतो,
बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानत नाही.
३ कारण देव सीयोनाचे तारण करील,
तो यहुदाची नगरे बांधील, लोक तेथे राहतील
आणि ते त्यांच्या ताब्यात येईल.
ते त्यांच्या सेवकांच्या संततीचेही वतन होईल,
ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते त्यात वस्ती करतील.
Psalm 69:30-31, 33-34, 36-37
In your great mercy, answer me, O Lord.
As for me in my poverty and pain,
let your salvation, O God, raise me up.
Then I will praise God's name with a song;
I will glorify him with thanksgiving.
The poor when they see it will be glad,
and God-seeking hearts will revive:
for the Lord listens to the needy,
and does not spurn his own in their chains.
For God will bring salvation to Sion,
and rebuild the cities of Judah,
and they shall dwell there in possession.
The children of his servants shall inherit it;
those who love his name shall dwell there.
आलेलुया, आलेलुया!
ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो, आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
If you abide in my word, you are truly my disciple, and you will know the truth, says the Lord.
R. Alleluia, alleluia.