सामान्यकाळातील ३३ वा सप्ताह
गुरुवार दि. २० नोव्हेंबर २०२५
शाबास, भल्या नोकरा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास "Well done, good servant! Because you have been faithful in a very little,
✝️
वालोइसचे संत फेलिक्स
वर्तनसाक्षी (११२७-१२१२)
संत फेलिक्स ह्यांना वालोईस हे आडनाव कोणत्यातरी राजघराण्यात जन्माला आल्यामुळे नव्हे तर फ्रान्समधील एका प्रांताच्या नावावरून प्राप्त झालेले आहे. तरुणपणीच त्याने आपले सर्वस्व विकून टाकले आणि मिऑक्स नजीकच्या अरण्यात तो निघून गेला तेथे त्याने आपले आयुष्य एक संन्यस्त वृत्तीचा भिक्षूक म्हणून व्यतित केले.
माथाचे संत जॉन (सण ८ फेब्रुवारी) ह्यांच्या वयाच्या ७१ व्या वर्षी फेलिक्स ह्याने एक तपसाधना केली. त्यांच्या मार्गदर्शनाने हा ३८ वर्षीय युवक इतका प्रभावित झाला की, त्यांनी फेलिक्स ह्या ऋषीतुल्य भिक्षुकाला एक व्रतस्थांची संस्था स्थापन करण्यास सांगितले. दक्षिण आफ्रिका आणि स्पेनमध्ये गुलामगिरीत असलेल्या मूर लोकांच्या मुक्ततेसाठी ही संस्था स्थापन करावी असेही त्याने सुचविले.
ह्या दोन्ही संतांना झालेल्या एका साक्षात्कारामुळे ते इ.स. ११९८ साली रोमला जाण्यास निघाले. वेगवेगळ्या कार्डिनल्सच्या संभांमधून सल्लामसलत घेऊन व पूर्ण विचार विनिमय करून पोप इनोसेंट तिसरे ह्यांनी "गुलामांच्या मुक्ततेसाठी पवित्र त्रैक्याची संस्था" स्थापन करण्यास त्यांना परवानगी दिली.
संत फेलिक्स जेव्हा फ्रान्सला परतले तेव्हा राजा फिलीप आगस्तस ह्याने त्यांचे मोठ्या धाटामाटात स्वागत केले आणि आपली नवीन संस्था स्थापन करण्यासाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. फेलिक्सच्या मठाशेजारीच ह्या संस्थेचे मुख्य केंद्र उघडण्यात आले. अगदी अल्पावधीत म्हणजे ४० वर्षांत जगभर ह्या संस्थेच्या ६०० शाखा उघडण्यात आल्या.
संत फेलिक्स मात्र फ्रान्स येथेच राहिले व वयाच्या ८५ व्या वर्षी मरण पावले. माथाचे संत जॉन मात्र रोममध्ये कार्य करीत होते. पुढे पोप आलेक्झांडर सातवे ह्यांनी १६६६ रोजी फेलिक्स ह्यांना संतपदाचा बहुमान दिला.
पहिले वाचन : मक्काबी २: १५-२९
वाचक :मक्काबीच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“आम्ही आमच्या पूर्वजांशी केलेल्या कराराचे पालन करू."
लोकांना धर्मत्याग करण्यास भाग पाडणारे अंमलदार मोदीन शहरात येऊन थडकले. यज्ञ अर्पण करण्यास लोकांना बळजबरी करण्यासाठी ते आले होते. इस्राएलमधील कित्येक लोक त्यांच्याकडे आले, मताथियास आणि त्याचे पुत्रही तेथे हजर झाले. मग राजाचे अंमलदार मताथियासला म्हणाले “आपण या शहरातील पुढारी, मानसन्मानीत आणि थोर आहात. आपणाला आपल्या पुत्रांचे आणि बांधवांचे पाठबळ आहे. आता आपणच प्रथम पुढे होऊन राजाच्या आज्ञेप्रमाणे करा. सर्व विधर्मियांनी, यहुदा देशातील माणसांनी व येरुशलेमात शिल्लक राहिलेल्यांनी राजाज्ञा मान्य केली आहे. तसे केल्यास आपण व आपली मुले राजाचे मित्र समजले जातील. सोने, चांदी व इतर पुष्कळ नजराणे देऊन आपला व पुत्रांचा सन्मान केला जाईल."
परंतु मताथियास मोठ्याने उत्तर देत म्हणाला, “राजाच्या अधिकाराखाली असलेल्या सर्व देशांनी जरी आज्ञा पाळली आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे करण्याचे ठरवले आणि त्यांच्यातील प्रत्येकजण जरी आपल्या पूर्वजांच्या धर्मापासून दूर गेला, तरी मी, माझी मुले आणि माझे बांधव आमच्या पूर्वजांशी केलेल्या कराराचे पालन करू. धर्मशास्त्र आणि विधीनियम यांचा आम्ही कधीही त्याग करणार नाही, आम्ही राजाज्ञा मान्य करणार नाही आणि आमच्या धर्माचरणापासून उजवीकडे व डावीकडे तसूभरही ढळणार नाही.”त्याने आपले हे म्हणणे संपवले तेव्हा एक यहुदी मोदीनं नगराच्या वेदीसमोर राजाज्ञेप्रमाणे यज्ञ अर्पण करण्यास सर्वासमक्ष पुढे झाला. त्या इसमाला पाहताच मताथियास आवेशाने तापला आणि त्वेषाने भडकला. त्याच्या सात्त्विक क्रोधाला वाट देत त्याने पळत जाऊन त्या माणसाचा त्याच वेदीवर वध केला. त्याचप्रमाणे यज्ञ अर्पण करण्यास बळजबरी करणाऱ्या अधिकाऱ्यालाही त्याने ठार केले आणि ती वेदी पाडून टाकली. धर्मशास्त्रावरील त्याचा हा आवेश सालूचा पुत्र जिग्री याला मारणाऱ्या पिनहाससारखा तीव्र होता.
मग मताथियासने शहरभर ऐकू जाईल अशी आर्त किंकाळी फोडून म्हटले, “ज्यांना धर्मशास्त्राबाबत चाड आहे आणि जेकराराची बाजू घेतात त्यांनी माझ्याबरोबर पळावे" मग तो व त्याचे पुत्र आपले सर्व काही शहरात सोडून डोंगरवटीत पळून गेले.
धर्म व न्यायनीती यांना अनुसरणारे अनेक जण आपली मुले, बायका आणि जनावरे घेऊन अरण्यात गेले आणि तेथे राहिले.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Maccabees 2:15-29: In those days: The king's officers who were enforcing the apostasy came to the city of Modein to make them offer sacrifice. Many from Israel came to them; and Mattathias and his sons were assembled. Then the king's officers spoke to Mattathias as follows: "You are a leader, honoured and great in this city, and supported by sons and brothers. Now be the first to come and do what the king commands, as all the Gentiles and the men of Judah and those who are left in Jerusalem have done. Then you and your sons will be numbered among the friends of the king, and you and your sons will be honoured with silver and gold and many gifts. But Mattathias answered and said in a loud voice: "Even if all the nations which live under the rule of the king obey him and have chosen to do his commandments, departing each one from the religion of his fathers, yet I and my sons and my brothers will live by the covenant of our fathers. Far be it from us to desert the law and the ordinances. We will not obey the king's words by turning aside from our religion to the right hand or to the left. When he had finished speaking these words, a Jew came forward in the sight of all to offer sacrifice upon the altar in Modein, according to the king's command. When Mattathias saw it, he burned with zeal and his heart was stirred. He gave vent to righteous anger, he ran and slaughtered him upon the altar. At the same time he killed the king's officer who was forcing them to sacrifice, and he tore down the altar. Thus he burned with zeal for the law, as Phinehas did against Zimri son of Salom. Then Mattathias cried out in the city with a loud voice, saying: "Let everyone who is zealous for the law and supports the covenant come out with me!" And he and his sons fled to the hills and left all that they had in the city. Then many who were seeking righteousness and justice went down to the wilderness to dwell there.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ४९:१-२,५-६,१४-१५
प्रतिसाद : सरळ मार्गाने चालणाऱ्यांना मी तारण प्राप्त करून देईन.
१) देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे,
त्याने सूर्याच्या उगवतीपासून
मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे.
सौंदर्याचा केवळ कळस असा
जो सियोन डोंगर त्यावरून देव प्रकाशला आहे.
२) "ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे,
त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा."
आकाश त्याची न्यायपरायणता प्रकट करते.
देव स्वतः न्याय करणारा आहे.
३) देवाला आभाररूपी यज्ञ कर,
परात्परापुढे आपले नवस फेड
संकटसमयी माझा धावा कर.
मी तुला मुक्त करीन
आणि तू माझा गौरव करशील.
Psalm 50:1-2, 5-6, 14-15
R To one whose way is blameless, I will show the salvation of God.
The God of gods, the Lord,
has spoken and summoned the earth,
from the rising of the sun to its setting.
Out of Sion, the perfection of beauty.
God is shining forth. R
"Gather my holy ones to me
who made covenant with me by sacrifice."
for he, God, is the judge. R
Give your praise as a sacrifice to God,
and fulfil your vows to the Most High.
Then call on me in the day of distress.
I will deliver you and you shall honour me. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे
अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Today harden not your hearts, but listen to the voice of the Lord.
R. Alleluia, alleluia.