Marathi Bible Reading | 34th week in ordinary Time | Saturday 29th November 2025

सामान्यकाळातील ३४ वा सप्ताह 

शनिवार दि. २९ नोव्हेंबर २०२५

 मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.
 praying that you may have strength to escape all these things that are going to take place, and to stand before the Son of Man."
  ✝️ 


संत फ्रान्सिस अँटॉनी  फासानी 
Francis Antony Fasani

ह्या भूतलावरील आपले जीवन संपुष्टात येणार असून, आपण ते कशाप्रकारे देवशब्दाप्रमाणे जगलो ह्याचा हिशोब घेतला जाणार आहे. प्रभू येशू आज पुन्हा आठवण करून देत आहे की जगातील गोष्टींमध्ये आपण गुरफटलो असताना तो दिवस (न्यायाचा दिवस) कधी येईल ते कळणार नाही. अकस्मात 'पाशाप्रमाणे तो दिवस येईल असे प्रभू म्हणत आहे.
'मुक्तिसमय' ओळखता यावा आणि जागृत राहून तो जाणावा म्हणून प्रभू येशू आज महत्वाचा सल्ला आपल्याला देत आहे. प्रभू म्हणतो, 'सर्व प्रसगी  प्रार्थना करीत जागृत राहा.' प्रार्थना करणे म्हणजेच सर्व प्रसंगी परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून परमेश्वराबरोबर संवाद साधायचा परमेश्वराची आपल्या जीवनातील इच्छा समजून घ्यायची आणि त्याच्या आज्ञा पाळून वचनाप्रमाणे आचरण करायचे. प्रार्थना म्हणजे केवळ देवाकडे केलेली विनवणी किंवा मागणे नसून परमेश्वराबरोबर सतत निकटचा संबंध जोडण्याची प्रबळ  इच्छा आणि मनाची तळमळ होय. प्रभू सर्व प्रसंगी प्रार्थना करावयास सांगत आहे. 
आपण आज आपल्या प्रार्थनामय जीवनावर चिंतन करु या. 

पहिले वाचन : दानिएल  ७:१५-२७
वाचक :दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन
"राज्य आणि प्रभुत्व ही परात्पर देवाची प्रजा जे पवित्र जन यांना देण्यात येतील."
मी दानिएल ह्याचा जीव अंर्तयामी अस्वस्थ झाला, माझ्या डोक्यात घोळणाऱ्या दृष्टान्तामुळे मी चितांक्रांत झालो. जवळ उभे असलेल्यांपैकी एकाकडे मी गेलो आणि या सर्व गोष्टींचे मर्म त्याला विचारले. तेव्हा त्याने मला ते कथन केले आणि या सर्व गोष्टींचा अर्थ मला समजावून सांगितला. ती मोठाली चार श्वापदे पृथ्वीवर उदयास येणारे चार राजे होत. तथापि परात्पर देवाचे जे पवित्र जन त्यांना राज्य प्राप्त होईल, ते राज्य सदासर्वकाळ, युगानुयुग, त्यांच्या ताब्यात राहील.
मग ते चौथे श्वापद, जे इतरांहून भिन्न असून अतिविक्राळ होते, ज्याचे दात लोखंडाचे आणि नखे पितळेची होती, जे सर्व काही चावून त्याचा चुरा करी आणि उरलेले आपल्या पायांखाली तुडवी, त्याचे काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शविली. त्याच्या डोक्याला दहा शिंगे असून आणखी एक शिंग निघाले त्यामुळे तीन शिंगे गळून पडली, ह्या शिंगाला डोळे आणि मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड असून ते आपल्या बरोबरच्या इतर शिंगांहून मोठे दिसत होते. त्या सगळ्यांचे मर्म काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली. मी पाहिले तो त्या शिंगाने पवित्र जनांबरोबर युद्ध केले आणि त्यांचे त्यांच्यावर प्राबल्य झाले. शेवटी पुराणपुरुष आला तेव्हा परात्पर देवाच्या पवित्र जनांना न्याय मिळाला आणि त्या पवित्र जनांना राज्याचे स्वामित्व मिळण्याचा समय आला, याचेही मर्म कळावे म्हणून इच्छा दर्शवली.
“त्याने सांगितले, चौथे श्वापद हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल. ते इतर राज्यांहून भिन्न होईल.
ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकील, तिचे सर्वांग तुडवून चूर्ण करील. आता दहा शिंगांविषयी विचारशील तर त्या राज्यातून दहा राजे निघतील आणि त्यानंतर आणखी एक राजा निघेल, तो त्या पूर्वीच्या राजांहून भिन्न असून तिघा राजांना पादाक्रांत करील.
तो परात्पर देवाविरूद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनांचा पाठलाग करून त्यांचा छळ करील, तो नेमलेल्या सणांत आणि घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहील.
एक काळ, दोन काळ, आणि अर्धा काळपर्यंत ते त्याच्या कब्जांत राहतील.
पण न्यायसभा भरेल, त्याचे प्रभुत्व काढून घेतील, त्याचा नाश करतील आणि त्याचा कायमचा नायनाट करतील.
राज्य, प्रभुत्व आणि संपूर्ण आकाशाखालील राज्याचे वैभव ही परात्पर देवाची प्रजा पवित्र जन ह्यांना देण्यात येतील, त्यांचे राज्य सनातन आहे, सर्व सत्ताधीश त्यांची सेवा करतील, त्यांच्या अंकित होतील."
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Daniel 7:15-27
As for me, Daniel, my spirit within me was anxious, and the visions of my head alarmed me, I approached one of those who stood there and asked him the truth concerning all this. So he told me and made known to me the interpretation of the things. These four great beasts are four kings who shall arise out of the earth. But the saints of the Most High shall receive the kingdom and possess the kingdom for ever, for ever and ever. Then I desired to know the truth about the fourth beast, which was different from all the rest, exceedingly terrifying, with its teeth of iron and claws of bronze, and which devoured and broke in pieces and stamped what was left with its feet, and about the ten horns that were on its head, and the other horn that came up and before which three of them fell, the horn that had eyes and a mouth that spoke great things, and that seemed greater than its companions. As I looked, this horm made war with the saints and prevailed over them, until the Ancient of Days came, and judgment was given for the saints of the Most High, and the time came when the saints possessed the kingdom. Thus he said: 'As for the fourth beast, there shall be a fourth kingdom on earth, which shall be different from all the kingdoms, and it shall devour the whole earth, and trample it down, and break it to pieces. As for the ten horns, out of this kingdom ten kings shall arise, and another shall arise after them; he shall be different from the former ones, and shall put down three kings. He shall speak words against the Most High, and shall wear out the saints of the Most High, and shall think to change the times and the law; and they shall be given into his hand for a time, times, and half a time. But the court shall sit in judgment, and his dominion shall be taken away, to be consumed and destroyed to the end. And the kingdom and dominion and the greatness of the kingdoms under the whole heaven shall be given to the people of the saints of the Most High; his kingdom shall be an everlasting kingdom, and all dominions shall serve and obey him.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र दानिएल ३ : ८२-८७
प्रतिसाद : प्रभूची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.

१) अहो, मानवपुत्रांनो, प्रभूला धन्यवाद द्या: 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा. 
अहो इस्राएली लोकांनो, प्रभूला धन्यवाद द्या: 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.

२) प्रभूच्या पुरोहितांनो, प्रभूला धन्यवाद द्या: 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा. 
प्रभूच्या सेवकांनो, प्रभूला धन्यवाद द्याः 
त्याची स्तवने गा आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.

३) नीतिमानांच्या आत्म्यांनो आणि जिवांनो, 
प्रभूला धन्यवाद द्या: त्याची स्तवने गा 
आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.
 पवित्र व विनयशील जनांनो, 
प्रभूला धन्यवाद द्याः त्याची स्तवने गा 
आणि सर्वकाळ त्याची प्रशंसा करा.


Daniel 3:82, 83, 84, 85, 86, 87
R. Sing praise to him and highly exalt him forever.

Bless the Lord, you sons of men, sing praise to him and highly exalt him forever. R

Bless the Lord, O Israel,
sing praise to him and highly exalt him forever. R

Bless the Lord, you priests,
sing praise to him and highly exalt him forever.

Bless the Lord, you servants of the Lord
sing praise to him and highly exalt him forever. R

Bless the Lord, spirits and souls of the righteous,
sing praise to him and highly exalt him forever. R

Bless the Lord, you who are holy and humble in heart,
sing praise to him and highly exalt him forever. R
R
जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
मरेपर्यंत तुम्ही विश्वासू राहा, म्हणजे मी तुम्हांला जीवनाचा मुकुट देईन.
 आलेलुया!
Acclamation: 
Alleluia:  alleluia.
Stay awake at all times, praying that you may have strength to stand before the Son of Man.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान लुक  २१:३४-३६
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "तुम्ही होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी आणि संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांला फासाप्रमाणे अकस्मात पकडील, कारण तो साऱ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याचप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास आणि मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 21:34-36
At that time: Jesus said to his disciples, "Watch yourselves lest your hearts be weighed down with dissipation and drunkenness and cares of this life, and that day come upon you suddenly like a trap, For it will come upon all who dwell on the face of the whole earth. But stay awake at all times, praying that you may have strength to escape all these things that are going to take place, and to stand before the Son of Man."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:
प्रभू येशू आजच्या सुवार्तत आपल्याला सावध व जागृत राहायचा आदेश देतो. “चंगळवाद, भोगवादात पडू नका.” तुमचा प्रभू तुम्हाला कधी भेटण्यास व नेण्यास येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. “प्रार्थना करीत जागृत असा. म्हणजे तुम्हाला त्या प्रसंगाला सामोरे जाता येईल. आज आपण प्रभूपाशी प्रार्थना करू या की आपण नेहमी प्रार्थना करीत सज्ज व तयार असावे. नाही तर अचानक तो प्रसंग आपल्याला पकडील व मग आपण पूर्वतयारी न करता सापडले जाऊ. तर मग आपली निराशा होईल... दुर्दशा होईल.

प्रार्थनाहे प्रभू परमेश्वरा, तुझा सहवास नित्य घडावा म्हणून प्रार्थनेद्वारे तुझ्या संपर्कात राहण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या