सामान्यकाळातील पहिला सप्ताह
सोमवार दि. १२ जानेवारी २०२६
✝️
“पश्चात्ताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.”
✝️
“पश्चात्ताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.”
the kingdom of God is at hand: repent, and believe the gospel.
प्रभू येशूने देवराज्याची घोषणा केली परंतु देवराज्यात प्रवेश मिळविण्यासाठी आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करुन अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत आंतरिक परिवर्तन होऊ शकत नाही. अंतःकरणाचे परिवर्तन झाल्यानंतरच देवाची सुवार्ता समजू शकते. प्रभू येशूने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आणि अनेकांचे जीवन परिवर्तन झाले. आज पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त देवराज्याचे कार्य करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला आवाहन करीत आहे. प्रभूने पश्चात्ताप करण्याची संधी आपल्याला दिली आहे. पश्चात्ताप करुन पूर्णपणे प्रभूच्या वचनावर म्हणजेच देवाच्या सुवार्तेवर विश्वास ठेवू या. देवराज्याचे सहभागीदार बनण्यासाठी आपल्या जीवनाचे परिवर्तन करण्यास कृपा मागू या. विश्वासाने सुवार्तेचा स्वीकार करुन प्रभूची साक्ष देण्यासाठी कार्यरत बनू या.
पहिले वाचन शमुवेल १:१-८
वाचक :शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“परमेश्वराने तिला मूलबाळ दिले नव्हते म्हणून हन्नाची सवत तिला टोचून बोलत असे."
एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामाथाईम सोफीम या गावात कोणी एक मनुष्य राहात होता. त्याचे नाव एलकाना असे होते. तो एफ्राइम वंशातला असून त्याच्या वडिलांचे नाव यरोहाम, आजोबांचे नाव एलीहू, पणजोबांचे नाव तोहू, आणि खापरपणजोबांचे नाव सूफ असे होते. एलकानाला दोन बायका होत्या. एकीचे नाव हन्ना आणि दुसरीचे नाव पनिन्ना असे होते. पनिन्नेला मुलेबाळे होती, पण हन्नेला मूल नव्हते.
हा मनुष्य सेनाधीश परमेश्वराची उपासना करायला आणि यज्ञ करायला आपल्या नगराहून निघून शिलो इथे दरवर्षी जात असे. एलीचे दोन मुलगे हफनी आणि फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. एलकाना यज्ञ करी त्या दिवशी तो आपली बायको पनिन्ना हिला आणि तिच्या सर्व मुलांमुलींना हिस्से देत असे. हन्नेला मात्र तो एकच हिस्सा देई. जरी ती त्याची आवडती होती तरी परमेश्वराने तिला मूलबाळ दिले नव्हते. म्हणून तिची सवत तिला मनस्वी चिडवी आणि तिची मानहानी करी. असे वर्षानुवर्षे चालले होते. परमेश्वराच्या मंदिरात हन्ना जात असे • तेव्हा प्रत्येक वेळी पनिन्ना तिला छळत असे. मग हन्ना रडे आणि जेवत नसे. तिचा पती एलकाना तिला म्हणाला, "हन्ना, तू का रडतेस ? तू का जेवत नाहीस? तू मनाला का लावून घेतेस ? मी तुला दहा मुलांपेक्षा अधिक नाही काय?
प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : First Samuel 1: 1-8
There was a man of Ramathaimsophim, of mount Ephraim, and his name was Elcana, the son of Jeroham, the son of Eliu, the son of Thohu, the son of Suph, an Ephraimite: And he had two wives, the name of one was Anna, and the name of the other Phenenna. Phenenna had children: but Anna had no children. And this man went up out of his city upon the appointed days, to adore and to offer sacrifice to the Lord of hosts in Silo. And the two sons of Heli, Ophni and Phinees, were there priests of the Lord. Now the day came, and Elcana offered sacrifice, and gave to Phenenna his wife, and to all her sons and daughters, portions: But to Anna he gave one portion with sorrow, because he loved Anna. And the Lord had shut up her womb. Her rival also afflicted her, and troubled her exceedingly, insomuch that she upbraided her, that the Lord had shut up her womb: And thus she did every year, when the time returned that they went up to the temple of the Lord: and thus she provoked her: but Anna wept, and did not eat. Then Elcana her husband said to her: Anna, why weepest thou? and why dost thou not eat? And why dost thou afflict thy heart? Am not I better to thee than ten children?
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद ११६: १२-१९
प्रतिसाद : प्रभो, मी तुला आभारप्रदर्शक यज्ञ अर्पण करीन.
१) प्रभूच्या अनंत उपकारांबद्दल
मी त्याचा कसा उतराई होऊ ?
माझ्या उद्धाराचे पेयार्पण घेऊन
मी येईन आणि प्रभूच्या नामाचा धावा करीन.
२) प्रभूला केलेले नवस मी त्याच्या
साऱ्या प्रजेसमक्ष फेडीन. प्रभूच्या भक्तांचे
मरण त्यांच्या दृष्टीने अमोल आहे.
३ मी तर तुझा दास आहे ना प्रभू ?
मी तुझ्या सेविकेचा पुत्र आहे.
तू माझी बंधने सोडली आहेत.
मी तुला आभारप्रदर्शक यज्ञ अर्पण करीन.
प्रभूच्या नामाचा धावा करीन.
४ प्रभूला केलेले नवस, मी त्याच्या
साऱ्या प्रजेसमक्ष, प्रभूच्या मंदिरातल्या चौकात,
येरुशलेम नगरात फेडीन.
Psalms 116: 12-13, 14-16, 18-19
R. (17a) To you, Lord, I will offer a sacrifice of praise.
12 What shall I render to the Lord,
for all the things he hath rendered unto me?
13 I will take the chalice of salvation;
and I will call upon the name of the Lord.
R. To you, Lord, I will offer a sacrifice of praise.
14 I will pay my vows to the Lord before all his people:
15 Precious in the sight of the Lord is the death of his saints.
16 O Lord, for I am thy servant:
I am thy servant, and the son of thy handmaid.
Thou hast broken my bonds:e Lord, in the midst of thee, O Jerusalem.
R. To you, Lord, I will offer a sacrifice of praise.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे प्रभो, तुझे शब्द हृदयाला आनंदित करतात, ते नेत्रांना प्रकाश देतात.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
15 The Kingdom of God is at hand;
repent and believe in the Gospel.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क १:१४-२०
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“पश्चाताप करा आणि शुभवर्तमानावर विश्वास ठेवा."
योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाचे शुभवर्तमान प्रकट करीत गालिलात आला आणि म्हणाला, "काळाची पूर्णता झाली आहे आणि देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा आणि शुभवर्तमानावर विश्वास ठेवा."
नंतर गालिल समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते आणि येशू त्यांना म्हणाला, "माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन.” मग ते लागलेच जाळी सोडून त्याला अनुसरले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले आणि त्याने त्यांना लागलेच बोलावले. मग ते आपला बाप जब्दी ह्याला भाडोत्री चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्यामागे गेले.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Mark 1: 14-20
And after that John was delivered up, Jesus came into Galilee, preaching the gospel of the kingdom of God, And saying: The time is accomplished, and the kingdom of God is at hand: repent, and believe the gospel. And passing by the sea of Galilee, he saw Simon and Andrew his brother, casting nets into the sea (for they were fishermen). And Jesus said to them: Come after me, and I will make you to become fishers of men. And immediately leaving their nets, they followed him. And going on from thence a little farther, he saw James the son of Zebedee, and John his brother, who also were mending their nets in the ship: And forthwith he called them. And leaving their father Zebedee in the ship with his hired men, they followed him.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
पहिल्या शिष्यांच्या पाचारणाबद्दलच्या या शुभवर्तमान उताऱ्यातून आपल्याला ख्रिस्ती म्हणून आपल्या स्वतःच्या पाचारणावर विचार करण्यासाठी तीन गोष्टी मिळतातः पहिली गोष्ट म्हणजे, येशू आपल्याला सध्याच्या काळातील आपल्या सामान्य कामांमध्ये बोलावतो. येशूने 'शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना समुद्रात जाळे टाकताना पाहिले; ते मच्छीमार होते.' ते काम करत आहेत आणि त्यांचे दैनंदिन काम पूर्ण करत आहेत आणि ख्रिस्त त्यांच्या जीवनात आश्चर्यकारकपणे प्रवेश करतो आणि त्यांना त्याचे प्रेषित होण्यासाठी बोलावतो. ते 'हो' असे उत्तर देतात दुसरे म्हणजे, येशूचे आवाहन तातडीचे आहे. तो म्हणतोः ही पूर्णतेची वेळ आहे. देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. येशूचे शब्द निकडीची भावना आणि त्याचे अनुसरण करण्याची मागणी व्यक्त करतात. सायमन आणि आंद्रिया या क्षणाचे महत्त्व जाणतात आणि प्राप्त परिस्थिती व व्यावहारिक विचार न करता येशूचे अनुकरण करतात. तिसरे, येशूचे अनुसरण करणे म्हणजे आपल्या जीवनातील काही पैलू बदलणे. तो आपल्याला त्याच्या वचनावर पूर्णपणे विश्वास ठेवण्यासाठी आणि त्यानुसार जगण्यासाठी आपल्या जुन्या सवयी, विचारसरणी आणि जगण्याच्या पद्धतींपासून बदल करण्यास सांगतो.
प्रार्थना:हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यास व देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या