Marathi Bible Reading | Sunday 11thJanuary 2026| Baptism ofThe Lord

प्रभूच्या स्नानसंस्काराचा सण 

रविवार  दि.११ जानेवारी  २०२

"हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे."
Thou art my beloved Son; in thee I am well pleased. 


प्रभूच्या स्नानसंस्काराचा सण 

प्रभू येशूचा बाप्तिस्मा सोहळा साजरा करीत असताना प्रभू येशू देवाचा निवडलेला सेवक, परमाप्रिय पुत्र तसेच सर्व राष्ट्रांवर व पृथ्वीवर न्याय स्थापन  करणारा, सामर्थ्यशाली प्रभू आहे.  प्रभू येशूने आपल्या बाप्तिस्माद्वारे यहुदी समाजाशी आणि सर्व मानवजातीशी आपली सहभागिनां प्रस्थापित केली. 

आपण सर्वजण देवाची प्रिय मुले बनावित, सर्वांनी प्रेमाने, सलोख्याने ऐक्याने आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगावे तसेच पृथ्वीवर प्रकाशाचे व शांतीचे राज्य पसरविण्यास कार्यरत बनावे, हीच प्रभूची इच्छाआहे. आपणा सर्वांना आपल्या बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे जी कृपा व प्रेरणा  लाभली आहे 

पहिले वाचन यशया  ४२:१-४,६-७
वाचक :यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“पाहा, हा माझा सेवक आहे. त्याच्याविषयी माझा आत्मा संतुष्ट आहे."
प्रभू म्हणतो, “पाहा हा माझा सेवक याला मी आधार आहे. पाहा, हा माझा निवडलेला, याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. याच्याठायी मी आपला आत्मा घातला आहे. तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल. तो गवगवा करणार नाही. तो आपला स्वर उंच करणार नाही. तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझवणार नाही. तो प्रामाणिकपणे न्याय प्रस्थापित करील. पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही व भंगणार नाही. द्वीपे त्याच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करतात.
मी परमेश्वर आहे. मी न्यायानुसार तुला बोलावले आहे. तुझा हात धरला आहे. तुला राखले आहे. तू लोकांना मी करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन. आंधळ्याचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून बंदिवानांना व अंधारात बसलेल्यांना कारागृहातून बाहेर काढावे म्हणून मी असे करीन."
प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद. 

First Reading :: Isaiah 42: 1-4, 6-7 or Isaiah 40: 1-5, 9-11
Behold my servant, I will uphold him: my elect, my soul delighteth in him: I have given my spirit upon him, he shall bring forth judgment to the Gentiles. He shall not cry, nor have respect to person, neither shall his voice be heard abroad. The bruised reed he shall not break, and smoking flax he shall not quench: he shall bring forth judgment unto truth. He shall not be sad, nor troublesome, till he set judgment in the earth: and the islands shall wait for his law.
 I the Lord have called thee in justice, and taken thee by the hand, and preserved thee. And I have given thee for a covenant of the people, for a light of the Gentiles: That thou mightest open the eyes of the blind, and bring forth the prisoner out of prison, and them that sit in darkness out of the prison house.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  २८:१-४, ९-१०
प्रतिसाद : परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देईल.
१) अहो देवपुत्रांनो, परमेश्वराला श्रेय द्या.
 परमेश्वराला गौरव व सामर्थ्य यांचे श्रेय द्या. 
परमेश्वराला त्याच्या वैभवी नामाचे श्रेय द्या. 
पावित्र्याने युक्त होऊन त्याची आराधना करा.

२) परमेश्वराचा ध्वनी जलामधून उठत आहे. 
रमेश्वर जलाशयावर आहे. परमेश्वराचा ध्वनी प्रबल आहे. 
परमेश्वराचा ध्वनी प्रतापमय आहे.

३ )वैभवशाली परमेश्वर गर्जना करतो.
त्याच्या मंदिरात महिमा ! असे ते म्हणतात. 
परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो. 
परमेश्वर राजासनावर सर्वकाळ बसलेला आहे.

Psalm: 
 Psalms 29: 1-2, 3-4, 9-10
R. (11b) The Lord will bless his people with peace.

1 Bring to the Lord, O ye children of God: bring to the Lord the offspring of rams.
2 Bring to the Lord glory and honour: bring to the Lord glory to his name: adore ye the Lord in his holy court.
R. The Lord will bless his people with peace.

3 The voice of the Lord is upon the waters; the God of majesty hath thundered, The Lord is upon many waters.
4 The voice of the Lord is in power; the voice of the Lord in magnificence.
R. The Lord will bless his people with peace.

9 The voice of the Lord prepareth the stags: and he will discover the thick woods: and in his temple all shall speak his glory.
10 The Lord maketh the flood to dwell: and the Lord shall sit king for ever.
R. The Lord will bless his people with peace.

दुसरे वाचन : प्रेषितांची कृत्ये : १०:३४-३८
वाचक : प्रेषितांची कृत्ये यातून घेतलेले वाचन 
पेत्रने बोलण्यास आरंभ केला आणि तो म्हणाला, "देव पक्षपाती नाही, हे माझ्या पक्के ध्यानात आहे. तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. येशू ख्रिस्ताच्या (तोच सर्वांचा प्रभू आहे) द्वारे देवाने शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले जे वचन इसरायलच्या संततीस पाठवले ते हे. योहानने जो बाप्तिस्मा गाजवला त्यानंतर गालिलपासून प्रारंभ होऊन सर्व यहुदियामध्ये घडलेली गोष्ट तुम्हांला तर माहीत आहे. नाझरेथकर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला. कारण देव त्याच्याबरोबर होता."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading:
Acts 10:34–38
So Peter opened his mouth and said: “Truly I understand that fGod gshows no partiality, 35 but fin every nation anyone who fears him and hdoes what is right is acceptable to him. 36 As for ithe word that he sent to Israel, jpreaching good news of kpeace through Jesus Christ (lhe is Lord of all), 37 you yourselves know what happened throughout all Judea, mbeginning nfrom Galilee after the baptism that John proclaimed: 38 how oGod anointed Jesus of Nazareth pwith the Holy Spirit and with qpower. He went about doing good and healing all rwho were oppressed by the devil, sfor God was with him.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
यहुदियांना प्रकट झालेल्या ख्रिस्ताचा गौरव असो, 
जगात ज्यावर विश्वास ठेवला गेला त्या ख्रिस्ताचा गौरव असो.
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
 The heavens were opened and the voice of the Father thundered: This is my beloved Son, listen to him.
R. Alleluia, alleluia.

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
मेघातून अशी वाणी झाली की, "हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका.”
  आलेलुया!
Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
2 We saw his star at its rising and have come to do him homage.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान मत्तय  ३:१३-१७
वाचक :  मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  "
"बाप्तिस्मा घेतल्यानंतर परमेश्वराचा आत्मा येशूवर उतरला. "
योहानाच्या हातून वाप्तिस्मा घेण्याकरिता येशू गालिलाहून यार्देनवर आला, परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, "आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे ?” येशूने त्याला उत्तर दिले, “असू दे, कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्ण करणे हे आपणाला उचित आहे." तेव्हा त्याने तसे होऊ दिले. मग बाप्तिस्मा घेतल्यानंतर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले; तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, "हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Gospel: Matthew 3: 13-17
Then cometh Jesus from Galilee to the Jordan, unto John, to be baptized by him. But John stayed him, saying: I ought to be baptized by thee, and comest thou to me? And Jesus answering, said to him: Suffer it to be so now. For so it becometh us to fulfill all justice. Then he suffered him. And Jesus being baptized, forthwith came out of the water: and lo, the heavens were opened to him: and he saw the Spirit of God descending as a dove, and coming upon him. And behold a voice from heaven, saying: This is my beloved Son, in whom I am well pleased.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
आज आपण प्रभूच्या बाप्तिस्म्याचा सण साजरा करत आहोत. योहानाने जॉर्डनमध्ये येशूला दिलेल्या बाप्तिस्म्याकडे पाहिल्यास. येशूला पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता नव्हती कारण तो अनंतकाळापासून देवाचा पुत्र होता. त्याच्याकडे शुद्ध करण्यासाठी कोणतेही मूळ पाप नव्हते. येशूला दीक्षेची आवश्यकता होती का? हो. मानव असल्याने, येशूला देवराज्याच्या कार्याला चालना देण्यासाठी समर्पित असलेल्या पुरुष आणि स्त्रियांच्या समुदायाशी सहवास आणि ओळख निर्माण करण्याची आवश्यकता होती. आपल्याला देवाच्या इतर मुलांशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे. येशूप्रमाणेच आपल्याला विश्वासाच्या समुदायाची आवश्यकता आहे. आपल्याला चर्चची आवश्यकता आहे. पवित्रीकरणः येशूसाठी बाप्तिस्मा हा आत्म-पवित्रीकरण आणि आत्म-समर्पणाचा क्षण होता. त्याच्यासाठी पृथ्वीवर देवाच्या राज्याच्या कार्याला चालना देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही करण्याची वचनबद्धता होती. सशक्तीकरणः पवित्र आत्मा ही सर्वोच्च देवाची शक्ती आहे. त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी येशूवर उतरलेल्या आत्म्याने त्याला बळकटी दिली आणि सक्षम केले. दुसऱ्या वाचनात बाप्तिस्म्याच्या वेळी देवाने नाझरेथच्या येशूला पवित्र आत्म्याने आणि सामर्थ्याने अभिषेक केला; तो चांगले कार्य करत फिरला आणि सैतानाने छळलेल्या सर्वांना बरे केले. आपल्याला बाप्तिस्म्याच्या वेळी, देवाची मुले म्हणून मिशन मिळाले. शुभवर्तमानात संत योहानाने बाप्तिस्मा स्वीकारण्याच्या आवाहनाला येशूने दिलेल्या नम्र प्रतिसादाबद्दल आणि त्याच्या पित्याला कसे संतुष्ट केले याबद्दल सांगते.
प्रार्थना:हे प्रभू येशू ख्रिस्ता, देवाची प्रिय मुले बनण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

नवीन वर्षाच्या २०२६  हार्दिक शुभेच्छा  

✝️                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या