सामान्यकाळातील पांचवा
रविवार दि.८ जानेवारी २०२६
“तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा;
You are the salt of the earth.
"तुम्ही जगाचा प्रकाश आहात. "
You are the light of the world.
✝️
प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांना दोन महान उपमा दिल्या आहेत. मीठ आणि प्रकाश. मीठामुळे अन्न पदार्थ रुचकर बनतात. मीठ घालून अनेक पदार्थ खूप दिवस टिकवून ठेवता येतात. मीठाचा गुणधर्म विशेषतः रुचकरपणा आणण्यासाठी आहे, व तो गुणधर्म म्हणजे खारटपणा. प्रकाश म्हणजे अंधाराचे नाहिसेपण. प्रकाश म्हणजे आनंद, प्रकाश म्हणजे पारदर्शकता, प्रकाश म्हणजे प्रसन्नता. ख्रिस्ती माणसाने दुसऱ्यांसाठी मीठ आणि प्रकाश बनावे ह्यासाठी प्रभूयेशू बोलावित आहे.
ख्रिस्ती माणसांना पवित्र व प्रकाशाचे जीवन जगून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास व त्यांना ख्रिस्ताचा तारणदायी प्रकाश देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. जिथे दुःख आहे, भूकेने व्याकूळ माणसे आहेत, ज्यांच्या जीवनात निबिड अंधकार आहे तिथे प्रकाशाचा दीप लावण्यासाठीच ख्रिस्ती माणसाचे जीवन आहे. म्हणूनच तर प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला म्हणत आहे, 'तुम्ही जगाचे प्रकाश आहेत.' मीठा प्रमाणे आपल्या जीवनातील रुचकरपणा कायम टिकवून इतरांच्या जीवनात रुचकरपणा आणण्यासाठी आपण प्रयत्नशील बनूया.
पहिले वाचन यशया ५८:७-१०
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल."
परमेश्वर म्हणतो, “तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे, तू लाचारांना आणि निराश्रितांना आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे. तू आपल्या बांधवांपुढे तोंड लपवू नये हाच तो उपवास आहे असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्यापुढे चालेल आणि परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल. जेव्हा तू हाक मारशील तेव्हा ती परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे."
“जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखविण्याचे आणि दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, जर तू आपल्या मनाला योग्य ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जिवांना तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंध:कारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल."
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : : Isaiah 58: 7-10
Deal thy bread to the hungry, and bring the needy and the harbourless into thy house: when thou shalt see one naked, cover him, and despise not thy own flesh. Then shall thy light break forth as the morning, and thy health shall speedily arise, and thy justice shall go before thy face, and the glory of the Lord shall gather thee up. Then shalt thou call, and the Lord shall hear: thou shalt cry, and he shall say, Here I am. If thou wilt take away the chain out of the midst of thee, and cease to stretch out the finger, and to speak that which profiteth not. When thou shalt pour out thy soul to the hungry, and shalt satisfy the afflicted soul then shall thy light rise up in darkness, and thy darkness shall be as the noonday.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११२:४-५, ६-७,८अ - ९
