सामान्यकाळातील ४ था सप्ताह
शनिवार दि ७ फेब्रुवारी २०२६
✝️
आपल्या सहकाऱ्यांना पौलाने, सकारात्मकतेने मार्गदर्शन केले म्हणूनच सर्वजण प्रभूच्या सुवार्ता प्रचारात आणि सेवाकार्यात तत्पर राहिले. त्या सर्वांनी विश्वासात दृढराहून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ख्रिस्ताची सहभागिता अनुभवली.
प्रभू येशू आपल्या शिष्यांना सुवार्ता प्रचारासाठी पाठवित असताना संभाव्य परिस्थितीला कसे सामोरे जायचे ह्याचे मार्गदर्शन करीत आहे. सुवार्ता पसरविणे सहज सोपे नाही तर त्यासाठी विरोधाला सामोरे छळ सोसावा लागतो, न्यायालयासमोर उभे रहावे लागते व प्रसंगी शिक्षा भोगावी लागते. अशावेळी सर्वस्वी पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन करीलअसे आश्वासन देत आहे. प्रभू म्हणत आहे 'जो शेवटपर्यंत टिकेलतोच जगेल.'शेवटपर्यंत विश्वासात टिकून राहण्यासाठी प्रभू आपल्याला सामर्थ्य व कृपा बहालकरीत आहे. आपली तयारी आहे का ?
ख्रिस्तसभा आज वसईचा सुपुत्र संत गोन्सालो गार्सियाचा स्मृतिदिन साजरा करीत आहे. ख्रिस्ताची व सुवार्तेची साक्ष देताना नागासकी येथे संत गोन्सालो ह्यांना क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले. पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले संत गोन्सालो व सहकाऱ्यांनी धैर्याने सुवार्ता पसरविली. त्यांना आपण आज वंदन करु या. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी | कृपा मिळावी म्हणून मध्यस्थी मागू या.
पहिले वाचन २ करिंथ. ६ : ४-१०
वाचक :पौलचे करिंथकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“आम्ही मरणोन्मुख असे मानलेले आहोत तरी पाहा, आम्ही जिवंत आहो."
सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फार धीराने, संकटात, विपत्तीत, पेचप्रसंगात, फटके खाण्यात, बंदिवासात, दंगाधोप्यात, काबाडकष्टात, जागरणात, उपवासात तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने, ममतेने, पवित्र आत्म्याने निष्कपट प्रीतीने, सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने आणि उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्त्वाच्या शस्त्रास्त्रांनी, गौरवाने आणि अपमानाने, अपकीर्तीने आणि सत्कीर्तीने, आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे, अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असे मानलेले तरी पाहा आम्ही जिवंत आहो. शिक्षा भोगणारे असे मानलेले तरी जिवे मारलेले नाही. दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे, नि मानलेले तरी पुष्कना सचन करणारे, काफल्लक असे मानलेले सवपत्र, अशो आम्ही आपली पात्रता पटवून देतो.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : 2 Corinthians 6:4-10
Brethren: As servants of God we commend ourselves in every way: by great endurance, in afflictions, hardships, calamities, beatings, imprisonments, riots, labours, sleepless nights, hunger, by purity, knowledge patience, kindness, the Holy Spirit, genuine love, by truthful speech, and the power of God; with the weapons of righteousness for the right hand and for the left through honour and dishonour, through slander and praise. We are treated as impostors, and yet are true; as unknown, and yet well known as dying, and behold, we live, as punished, and yet not killed; as sorrowful, yet always rejoicing; as poor, yet making many rich; as having nothing, yet possessing everything.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ३०:२-४,११-१२
प्रतिसाद : मी सर्वकाळ तुझें उपकारस्मरण करीन.
१)हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा धांवा केला
आणि तू मला रोगमुक्त केलें.
हे परमेश्वरा, तूं माझा जीव अधोलोकांतून वर काढिला;
गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखिलें
२ अहो परमेश्वराचे भक्तहो, त्याचे गुणगान गा;
आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण
करितांना त्याचा धन्यवाद करा.
त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो.
त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो;
रात्री विलापाने बिहाड केले तरी प्रातःकाळी हर्षध्वनि होतो.
३ मी तर आपल्या संपत्काली म्हटले,
मी कधी ढळणार नाही.
तूं माझा विलाप दूर करून मला
नाचावयास लाविले आहे;
तूं माझें गोणताट काढून मला
हर्षरूपि वस्त्र नेसविलें आहे;
४) ह्यासाठी की माझ्या आत्म्याने
तुझें गुणगान गावें, गप्प राहू नये
हे परमेश्वरा, माझ्या देवा,
मी सर्वकाळ तुझें उपकारस्मरण करी
Psalm 30:2 and 4, 5-6, 11-12a and 13b
R I will extol you, Lord, for you have raised me up.
I will extol you, Lord,
for you have raised me up.
and have not let my rejoice over me.
O Lord, you have lifted up my soul
from the grave,
restored me to life from those
who sink into the pit. R
Sing psalms to the Lord,
you faithful ones;
give thanks to his holy name.
His anger lasts a moment:
his favour all through life.
At night come tears, but dawn brings joy.
Hear, O Lord, and have mercy on me;
be my helper, O Lord.
You have changed my mourning into dancing,
O Lord my God, I will thank you forever. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो
तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Whoever hats his life in this world will keep it for eternal life.
Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मत्तय १० :१७-२२
वाचक :मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल."
माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानांत तुम्हांला फटके मारतील, आणि तुम्हांला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यांत येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करितील तेव्हां कसें अथवा काय बोलावें ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावें हे त्याच घटकेस तुम्हांस सुचविलें जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायीं बोलणारा आहे. भाऊ भावाला व बाप मुलाला जिवें सारण्यासाठी धरून देईल, 'मुले आईबापांवर उठून त्यांस ठार करतील; आणि माझ्या नांवामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करितील; तथापि जो शेवट पर्यंत टिकेल तोच तरेल.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Matthew 10:17-22
At that time: Jesus said to the apostles, "Beware of men, for they will deliver you over to councils and flog you in their synagogues, and you will be dragged before governors and kings for my sake, to bear witness before them and the Gentiles. When they deliver you over, do not be anxious how you are to speak or what you are to say, for what you are to say will be given to you in that hour. For it is not you who speak, but the Spirit of your Father speaking through you. Brother will deliver brother over to death, and the father his child, and children will rise against parents and have them put to death, and you will be hated by all for my name's sake. But the one who endures to the end will be saved.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: वसईचा सुपुत्र, संत गोन्सालो गार्सिया, आपल्या भूमीत जन्मलेला, पण ख्रिस्तासाठी जगाच्या टोकापर्यंत गेलेला. गोन्सालोचे जीवन संत मत्तयच्या आजच्या सुवार्तेचे सजीव प्रतिरूप आहे. येशू आपल्या शिष्यमंडळींना सावध करतोः तुम्हांला छळ सोसावा लागेल, न्यायालयात ओढले जाल, आप्तेष्टही दगा देतील. पण या सर्वांत एक आश्वासन तेजासारखे चमकते- "भीऊ नका परमेश्वराचा आत्मा तुमच्या सोबत आहे.” संत गोन्सालो यांच्या आयुष्यात हे अगदी अक्षरशः खरे ठरले. जपानमध्ये त्यांच्या मिशनदरम्यान त्यांनीद्वेष, छळ, अटक, अपमान आणि अखेरीस क्रूर मृत्यू-या सर्वांवर विश्वासाच्या धैर्याने मात केली. ख्रिस्ताच्या प्रेमासाठी त्यांनी दिलेली साक्ष म्हणजे शेवटपर्यंत टिकून राहण्याचे जिवंत उदाहरण. मतभेद येतील, आक्षेप येतील, धैर्य ढासळेल, लोक गैरसमज करतील. पण देवाची निष्ठा कायम आहे. आपण निष्ठावान राहिलो तर तो आपल्याला सोडणार नाही. प्रार्थनाः हे संत गोंसालो गार्सिया, आम्हालाही तुझ्यासारखे विश्वासात दृढ आणि प्रेमात उदार होण्याची कृपा मिळावी म्हणून आम्हासाठी मध्यस्थी कर.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यास आम्ही पात्र बनावेत म्हणून तुझ्या धैर्याचा आत्मा आम्हाला दे, आमेन.
0 टिप्पण्या