उपवासकाळातील दुसरा रविवार
दि.१ मार्च २०२६
मेघातून वाणी झाली, "हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे. ह्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्याचे तुम्ही ऐका."
This is my beloved Son, in whom I am well pleased: hear ye him.
येशूमध्ये परमेश्वर पित्याचे स्वरुप असून त्याच्या सहवासात देवाच्या सहवासाचा अनुभव येत असतो. आपल्या सर्वांना प्रभू येशूच्या रुपांतरात सहभागी होण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. धैर्याने, श्रद्धेने आणि देवाची इच्छा प्रामाण मानून आपण प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करु या.
देवाच्या सहवासाचा अनुभव घेऊन तो कृतीत उतरविण्यास आणि देवाची सुवार्ता पसरविण्यास आपण कृतीशील जीवन जगण्यासाठी कृपा मागू या.
✝️
पहिले वाचन उत्पत्ती १२:१-४
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"परमेश्वराच्या लोकांचा पिता आब्राहाम याचे पाचारण."
परमेश्वराने आब्रामाला सांगितले, “तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्रे निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील." परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading: First Reading:
Genesis 12: 1-4a
1 And the Lord said to Abram: Go forth out of thy country, and from thy kindred, and out of thy father’s house, and come into the land which I shall shew thee.
2 And I will make of thee a great nation, and I will bless thee, and magnify thy name, and thou shalt be blessed.
3 I will bless them that bless thee, and curse them that curse thee, and IN THEE shall all the kindred of the earth be blessed:
4a So Abram went out as the Lord had commanded him.
This is the word of God
Thanks be to God
स्तोत्र ३३:४-५,१८-१९,२०-२२