Marathi Bible Reading | 21st June 2026 |12th Sunday in Ordinary Time

सामान्यकाळातील १ वा रविवार 

१ जुन  २०२६ 

तुमच्या डोक्यावरले सर्व केसदेखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका.But the very hairs of your head are all numbered. Fear not therefore: 
 भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. 

 आपल्या सर्वांचा सांभाळकर्ता व रक्षणकर्ता प्रभू आहे. प्रभूने आपल्याला प्रेमाचा व शांतीचा संदेश देऊन ह्या जगातील त्याचे सुवर्ताकार्य करण्यासाठी निवडले आहे. म्हणुनच प्रभू म्हणत आहे 'भीऊ नका, पुष्कळ चिमण्यापेक्षा तुमचे मोल अधिक आहे'. सुवार्ता प्रसार करतांना जगातील आव्हाने आहेत. प्रभूसाठी व सुवार्तेसाठी इतिहासात अनेकांनी छळ सोसला व आजसुद्धा अनेक ठिकाणी ख्रिस्ती जनांचा छळ होत आहे. अशा वेळी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करीत असतानांच धैर्याने सुवार्ता प्रसरविण्यासाठी पुढाकार घेऊया. आपले सर्वांचे मोल देवाच्या दृष्टीने खूप मोठे आहे. म्हणून आपल्या संकटसमयी देवाची कृपादृष्टी आपल्यावर सतत असते. न डगमगता धैर्याने आपण प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी त्याची प्रेरणा व धैर्याचा आत्मा मागू या.

पहिले वाचन यिर्मया २०:१०-१३
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"परमेश्वर दुष्टांच्या हातून दीनजनांचा जीव वाचवतो."
यिर्मया म्हणाला, “मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो. चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की, 'त्याच्याविरुद्ध गिल्ला करा. आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू' 'कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू. तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्याबरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत. ते शहाणपणाने वागले नाहीत म्हणून ते अत्यंत फजीत होतील. विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल. तरी हे धार्मिकांचे सत्त्व पाहणाऱ्या अंतर्याम आणि हृदय पारखणाऱ्या, सेनाधीश परमेश्वरा, तू त्यांचा सूड घेशील तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे सादर केली आहे.
परमेश्वरापुढे गाणे गा, परमेश्वराचे स्तवन करा, कारण तो दुष्टांच्या हातून दीन जनांचा जीव वाचवतो."
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
 : Jeremiah 20: 10-13
For I heard the reproaches of many, and terror on every side: Persecute him, and let us persecute him: from all the men that were my familiars, and continued at my side: if by any means he may be deceived, and we may prevail against him, and be revenged on him. But the Lord is with me as a strong warrior: therefore they that persecute me shall fall, and shall be weak: they shall be greatly confounded, because they have not understood the everlasting reproach, which never shall be effaced. And thou, O Lord of hosts, prover of the just, who seest the reins and the heart: let me see, I beseech thee, thy vengeance on them: for to thee I have laid open my cause.Sing ye to the Lord, praise the Lord: because he
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ६९ :८ - १०, १४.१७, ३३-३५
प्रतिसाद :  हे देवा, मला उत्तर दे. 
१) तुझ्याकरिता मी निंदा सहन केली आहे,
लज्जेने माझे मुख व्याप्त झाले आहे, 
मी आपल्या भावांना नवखा, 
माझ्या सहोदरांना परका असा झालो आहे.
 तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे,
 निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा ही माझी निंदा झाली आहे.

२) मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल 
अशा समयी तुझी प्रार्थना करतो. 
हे देवा, तू आपल्या महान दयेस अनुसरून 
आणि आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास 
अनुसरून मला उत्तर दे. 
हे परमेश्वरा, माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे;
आपल्या करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ.

३) दीनजन हे पाहून हर्ष करतील, 
देवाचा शोध करणाऱ्यांनो, तुमच्या हृदयात नवजीवन येवो. 
कारण परमेश्वर दीनजनांचे ऐकतो 
आणि बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानत नाही.
आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यात संचार करणारे 
सर्व प्राणी त्याचे स्तवन करोत.

: Psalms 69: 8-10, 14, 17, 33-35
R. (14c) Lord, in your great love, answer me.

8 Because for thy sake I have borne reproach; shame hath covered my face.
9 I am become a stranger to my brethren, and an alien to the sons of my mother.
10 For the zeal of thy house hath eaten me up: and the reproaches of them that reproached thee are fallen upon me.
R. Lord, in your great love, answer me.

14 But as for me, my prayer is to thee, O Lord; for the time of thy good pleasure, O God. In the multitude of thy mercy hear me, in the truth of thy salvation.
17 Hear me, O Lord, for thy mercy is kind; look upon me according to the multitude of thy tender mercies.
R. Lord, in your great love, answer me.

33 Let the poor see and rejoice: seek ye God, and your soul shall live.
34 For the Lord hath heard the poor: and hath not despised his prisoners.
35 Let the heavens and the earth praise him; the sea, and every thing that creepeth therein.
R. Lord, in your great love, answer me.

दुसरे वाचन  रोम ५:१२-१५
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"जशी अपराधाची गोष्ट आहे तशी कृपादानाची नाही."

एका माणसाच्याद्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्याद्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे भरण पसरले. कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. तथापि, आदामपासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे.
परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही. कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता विशेषकरून विपुल झाली.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second reading :   Romans 5: 12-15
Wherefore as by one man sin entered into this world, and by sin death; and so death passed upon all men, in whom all have sinned. For until the law sin was in the world; but sin was not imputed, when the law was not.But death reigned from Adam unto Moses, even over them also who have not sinned after the similitude of the transgression of Adam, who is a figure of him who was to come. But not as the offence, so also the gift. For if by the offence of one, many died; much more the grace of God, and the gift, by the grace of one man, Jesus Christ, hath abounded unto many.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
 प्रभो म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्याकडून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
आलेलुया!

Acclamation: 
Alleluia: John 15: 26b, 27a
R. Alleluia, alleluia.
 The Spirit of truth will testify to me, says the Lord; and you also will identify.
R. Alleluia, alleluia.

 शुभवर्तमान  मत्तय  १०:२६:३३
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "जे शरीराचा घात करतात त्यांना भिऊ नका."
येशूने आपल्या बारा शिष्यांना पुढीलप्रमाणे बोध केला : “ह्यास्तव भिऊ नका, कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते घराच्या गच्चीवरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा आणि शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या. दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही ? तथापि तुमच्या पित्यावाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केसदेखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन, पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading:  Matthew 10: 26-33
Therefore fear them not. For nothing is covered that shall not be revealed: nor hid, that shall not be known. That which I tell you in the dark, speak ye in the light: and that which you hear in the ear, preach ye upon the housetops. And fear ye not them that kill the body, and are not able to kill the soul: but rather fear him that can destroy both soul and body in hell. Are not two sparrows sold for a farthing? and not one of them shall fall on the ground without your Father. But the very hairs of your head are all numbered. Fear not therefore: better are you than many sparrows. Every one therefore that shall confess me before men, I will also confess him before my Father who is in heaven. But he that shall deny me before men, I will also deny him before my Father who is in heaven.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआजच्या पहिल्या वाचनामध्ये यिर्मया सागंत आहे की जरी जीवनामध्ये छळाचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू माझ्यासोबत आहे अशा विश्वास जागृत करतो.
संत पौल आपल्याला आठवण करून देतो की ख्रिस्ताद्वारे, आपण पाप आणि मृत्यूच्या तावडीतून मुक्त झालो आहोत. येशू आपल्याला खात्री देतो की आपल्या जीवनाला मूल्य आहे. जे देवावर विश्वास ठेवतात त्यांचे संरक्षण देवपिता करील आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांस दोन वेळा म्हणतो, भिऊ नका. तो त्यांना धीर देत आहे आणि त्यांचे सांत्वन करीत आहे. परमपिता हा प्रेमळ पिता आहे ह्याची जाणीव तो आपल्या शिष्यांस करून देत आहे. आपल्या दररोजच्या जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते अशामुळे आपली मानसिकता बदलते मात्रयेशू आपल्या बरोबर आहे असा विश्वास आपण बाळगूया. मी माझ्या विश्वासामध्ये वाढण्यासाठी प्रयत्न करीत आहे का ?

प्रार्थनाहे प्रभू येशू, तुझ्या सत्यस्वरुप प्रेमाचे व करुणेचे दर्शन इतरांना | घडविण्यासाठी, आम्ही सर्वदा पुढाकार घ्यावा म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या