सामान्यकाळातील ६वा सप्ताह
मंगळवार दि १७ फेब्रुवारी २०२६
"सांभाळा, परुश्यांचे खमीर आणि हेरोदचे खमीर ह्यांविषयी जपून राहा."
"Watch out; beware of the leaven of the Pharisees and the leaven of Herod."
सेर्वाईट संस्थेचे सात पवित्र संस्थापक
- (तेरावे शतक)
✝️
इ. स. १२३३ साली इटलीतील फ्लॉरेन्स ह्या ठिकाणी ख्रिस्तसभेतील भिक्षुकांच्या पाचव्या संस्थेची स्थापना झाली. शहरातील अत्यंत प्रतिष्ठीत कुटुंबांतील सात तरूण मुलांना पवित्र मरियेने आपल्या स्वर्गनयन सोहळ्याच्या दिवशी दर्शन दिले. ही मुले त्यावेळी “पवित्र मरियेचे भक्त” “लॉडेसी” नामक संघटनेमध्ये प्रार्थना व भक्ती करण्यात गुंग होते. पवित्र मरियेने सेवक (सेवाईट) नामक संघ स्थापन करण्याची इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली.
पवित्र मरियेने आपल्याला दिलेली आज्ञा प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी हे तरूण शहरापासून ११ मैल दूर मोन्ते सिनारियो नामक एकांत जागी गेले. ह्या ठिकाणी पवित्र मरिया पुन्हा त्यांना भेटली व आपल्या दुःखाचे आणि क्रुसाजवळील वेदनेचे प्रतीक म्हणून ह्या तरुणांनी काळे अंगरखे वापरावेत अशी मार्गदर्शक सूचनादेखील केली आणि संत अगस्तीनच्या आचारसंहितेवर आधारीत संघ स्थापन करण्याच्या विनंतीचा तिने पुनरुच्चार केला.
हा नवा संघ अगदी अद्भुतरित्या पसरत गेला. ५० वर्षामध्ये १०,००० • युवकांनी भिक्षुक म्हणून संघात प्रवेश केला आणि १४ व्या शतकापासून क्रेत बेटावर आणि भारतात १०० हून अधिक शाखा त्यांनी उघडल्या. याशिवाय बंदिस्त खोलीत राहून प्रार्थना करू इच्छिणाऱ्या तरूणींसाठी “क्लॉईस्टर्ड नन्स” (बंदीस्त व्रतस्थ) ची दुसरी संघटना आणि परोपकाराची व शिक्षणदानाची कृत्ये करणाऱ्या उत्साही तरूण तरुणींसाठी एक तिसरी संघटना त्यांनी तेराव्या शतकाच्या अखेरीस स्थापन केली. ह्या तिसऱ्या संघटनेच्या स्थापनेमध्ये संत ज्युलियाना फाल्कोनिएरी (सण ७ फेब्रुवारी) ह्यांचा सिंहाचा वाटा होता.
सेर्वाईट संघाची स्थापना करणाऱ्या संस्थापकांना १८८७ साली संत मालिकेतसामील करण्यात आले. त्यांचे अवशेष एकाच थडग्यांत, मोन्टे सिनारिओच्या, मठख्रिस्तालयात भाविकांसाठी ठेवलेले आहेत.
प्रभू येशूचे शिष्य अशा परिस्थितीत गोंधळलेले होते. हा काळ म्हणजे जणू कसोटीचा काळ होता. सर्व शिष्य येशूच्या सहवासात होते तरी त्यांना येशूच्या सामर्थ्याचे आकलन होत नव्हते. आपण सुद्धा शिष्यांप्रमाणे गोंधळतो किंबहुना जगाच्या गोष्टींकडे आकर्षित होत असतो. सभोवतालच्या दुष्ट प्रवृत्तींचा आपल्यावर विपरीत परिणाम होत असतो. संत याकोब आजच्या पहिल्या वाचनात सांगत आहे, 'जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य.' आपली बुद्धी, शहाणपण व आकलन शक्ती देवाचे वचन ग्रहन करण्यास कमी पडते. आपल्या सर्वांचे तारण करावयास प्रभूचे प्रभावी आणि समर्थ वचन स्वीकारल्यास सर्व परिस्थितीत आपण सुरक्षित राहू.
पहिले वाचन याकोब १:१२-१८
वाचक :याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन
“परमेश्वर कोणाला मोहात पाडीत नाही."
जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य! कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकूट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. कोणाची परीक्षा होत असता, "देवाने मला मोहात घातले," असे त्याने म्हणू नये. कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडीत नाही. प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो, भुलवला जातो आणि मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : James 1:12-18
Blessed is the man who remains steadfast under trial, for when he has stood the test he will receive the crown of life, which God has promised to those who love him. Let no one say when he is tempted, "I am being tempted by God", for God cannot be tempted with evil and he himself tempts no one. But each person is tempted when he is lured and enticed by his own desire. Then desire when it has conceived gives birth to sin, and sin when it is fully grown brings forth death. Do not be deceived, my beloved brothers. Every good gift and every perfect gift is from above, coming down from the Father of lights, with whom there is no variation or shadow due to change. Of his own will he brought us forth by the word of truth, that we should be a kind of first fruits of his creatures.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ९४:१२-१५,१८-१९
प्रतिसाद : हे परमेश्वरा, ज्याला तू शिस्त लावतोस तो धन्य.
१) हे परमेश्वरा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस,
ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस, तो धन्य.
त्याला तू विपत्काली आराम देशील.
२) परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही,
तो आपले वतन सोडून देणार नाही.
न्याय नीतिमानांकडे वळेल आणि
सरळ मनाचे सर्व जन तो अनुसरतील..
३) "माझा पाय घसरला" असे मी म्हणालो,
तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला.
माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा
तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते..
Psalm 94:12-13a, 14-15, 18-19
Blessed the man whom you discipline, O Lord.
whom you discipline, O Lord,
whom you train by means of your law;
to whom you give peace in evil days. R
The Lord will not abandon his people,
nor forsake those who are his heritage,
for judgment shall again be just,
and all true hearts shall uphold it. R
When I think, "I have lost my foothold,
your mercy, O Lord, holds me up.
When cares increase in my heart,
your consolation calms my soul. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
देव ख्रिस्तामध्ये स्वत:बरोबर जगाचा समेट करत होता
आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दि
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
If anyone loves me, he will keep my word, says the Lord; and my Father will love him, and we will come to him
Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क ८:१४-२१
वाचक :मार्कलिखितपवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“परुश्यांचे खमीर आणि हेरोदचे खमीर ह्यांविषयी जपून राहा."
शिष्य भाकरी घ्यावयास विसरले होते आणि मचव्यात त्यांच्याजवळ एकच भाकरी होती. मग येशूने त्यांना निक्षून सांगितले, "सांभाळा, परुश्यांचे खमीर आणि हेरोदचे खमीर ह्यांविषयी जपून राहा." तेव्हा “आपल्याजवळ भाकरी नाहीत" अशी ते आपसांत चर्चा करू लागले. हे जाणून येशू त्यांना म्हणाला, "तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करता? तुम्ही अजून ध्यानात आणत नाही आणि समजतही नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? डोळे असून तुम्हाला दिसत नाही काय? कान असून तुम्हाला ऐकू येत नाही काय? तुम्हाला आठवत नाही काय? मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटून दिल्या तेव्हा तुम्ही उरलेल्या तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या ?" ते त्याला म्हणाले, "बारा." "तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकडे भरून घेतले?" ते म्हणाले, “सात.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अजून तुम्हाला समजत नाही काय?"
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Mark 8:14-21
At that time: The disciples had forgotten to bring bread and they had only one loaf with them in the boat. And Jesus cautioned them, saying, "Watch out; beware of the leaven of the Pharisees and the leaven of Herod." And they began discussing with one another, the fact that they had no bread. And Jesus, aware of this, said to them, "Why are you discussing the fact that you have no bread? Do you not yet perceive or understand? Are your hearts hardened? Having eyes do you not see, and having ears do you not hear? And do you not remember? When I broke the five loaves for the five thousand, how many baskets full of broken pieces did you take up?" They said to him, "Twelve." "And the seven for the four thousand, how many baskets full of broken pieces did you take up?" And they said to him, "Seven." And he said to them, "Do you not yet understand?.
Praise the Lord Jesus Christ .