Marathi Bible Reading | Holy Thursday Evening Mass of the Lord's Supper | 2nd April 2026

उपवासकाळातील (पवित्र आठवडा)

पवित्र गुरुवार दि. २ एप्रिल  २०२६

 प्रभू भोजन विधी 

सायंकाळचा मिस्साबली.

मी प्रभू व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.

If I then, your Lord and Teacher, have washed your feet, you also ought to wash one another's feet

आजपासून आपण पवित्र त्रिदिनाला सुरूवात करीत आहोत. आजचा दिवस हा आज्ञा गुरूवार म्हणून ही प्रसिद्ध आहे. आजच्या दिवशी येशूने पवित्र मिस्साबली व धर्मगुरूपद ह्यांची प्रस्थापना केली. आपल्या प्रेषितांचे पाय  धुवून त्यांच्यावरील प्रीतीचे सेवेत रूपांतर केले व त्यांना प्रीतीची नवी आज्ञा दिली. येशूचे हे प्रेम त्याच्या शिकवणुकीतून व कार्यातून दिसून येते. 

आज पवित्र ख्रिस्तशरीर सक्रामेंत, धर्मगुरुप्रसाद आणि सेवाव्रत तिहेरी सोहळा. आपण साजरा करीत आहोत. आपण सर्वांना त्याच्या धर्मगुरुपदात सहभादित्व मिळाले आहे. आपल्या सर्वांना सेवा करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. आपण प्रभू येशूचे प्रमाणिक व एकनिष्ठ अनुयायी बनण्यासाठी आज प्रेरणा मागू या.

  
पहिले वाचन निर्गम १२:१-८,११-१४
वाचक  निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 "प्रभूच्या वल्हांडणाचे नियम."

परमेश्वराने इजिप्त देशात मोशे व अहरोन यांस सांगितले की, “हा महिना तुम्हांला आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा, इस्राएलच्या सर्व मंडळीला सांग की ह्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपआपल्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे एकाएका घराण्यामागे एकेक कोकरू घ्यावे आणि एक कोकरू खपावयाचे नाही इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसांना पुरेल याचा हिशोब करावा. कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून तो एक वर्षाचा नर असावा, हा नर मेंढरातला किंवा बोकडातला तुम्हांला वाटेल तो घ्यावा, या महिन्याच्या चतुर्दशीपर्यंत ते राखून ठेवावे आणि संध्याकाळी इस्राएल मंडळीतील लोकांनी ते वधावे. त्याचे रक्त घेऊन ज्या घरात त्या कोकराचे मांस खाणार त्याच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला लावावे आणि त्यांनी त्याच रात्री
मांस विस्तवावर भाजून ते बेखमीर भाकरीबरोबर आणि कडू भाजीबरोबर खावे. ते तुम्ही या रितीने खावे: तुमच्या कंबरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वल्हांडण सण होय. कारण या रात्री इजिप्त देशात फिरून त्यांतील मनुष्य व पशू या व सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि इजिप्तमधील सर्व देवांचे मी शासन करीन. मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असणार त्यावर ते रक्त तुम्हाप्रीत्यर्थ खूण होईल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हाला ओलाडून जाईन, इजिप्त देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुम्हांवर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही.
हा दिवस तुम्हांला स्मारकादाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ मेळा भरवून सण पाळावा, पिढ्यांन्पिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा.
प्रभूचा शब्द -
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Exodus 12:1-8.11-14

In those days: The Lord said to Moses and Aaron in the land of Egypt, "This month shall be for you the beginning of months. It shall be the first month of the year for you. Tell all the congregation of Israel that on the tenth day of this month every man shall take a lamb according to their fathers' houses, a lamb for a household. And if the household is too small for a lamb, then he and his nearest neighbor shall take according to the number of persons; according to what each can eat you shall make your count for the lamb. Your lamb shall be without blemish, a male a year old. You may take it from the sheep or from the goats, and you shall keep it until the fourteenth day of this month, when the whole assembly of the congregation of Israel shall kill their lambs at twilight. "Then they shall take some of the blood and put it on the two doorposts and the lintel of the houses in which they eat it. They shall eat the flesh that night, roasted on the fire; with unleavened bread and bitter herbs they shall eat it. In this manner you shall eat it with your belt fastened, your sandals on your feet, and your staff in your hand. And you shall eat it in haste. It is the Lord's Passover. For I will pass through the land of Egypt that night, and I will strike all the firstborn in the land of Egypt, both man and beast; and on all the gods of Egypt I will execute judgments: I am the Lord. The blood shall be a sign for you, on the houses where you are. And when I see the blood, I will pass over you, and no plague will befall you to destroy you, when I strike the land of Egypt. "This day shall be for you a memorial day, and you shall keep it as a feast to the Lord, throughout your generations, as a statute forever, you shall keep it as a feast.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  ११६:१२-१३,१५-१६
प्रतिसाद : आपण आशीर्वादित करतो तो प्याला ख्रिस्तरक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे.

१) परमेश्वराने माझ्यावर केलेल्या उपकारांचा 
मी कसा उतराई होऊ ? परमेश्वराच्या नामाचा धावा करीन.
मी तारणाचा प्याला हाती घेऊन

२) परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे. 
हे परमेश्वरा, मी तुझा दास, मी खरोखर तुझा दास आहे, 
तू माझी बंधने सोडली आहेत.

३) मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ अपन, 
मी परमेश्वराच्या नामाचा धावा करीन.
 परमेश्वराला नेलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन.

Psalm 116:12-13, 15 and 16bc, 17-18

The cup of blessing is a participation in the blood of Christ.

How can I repay the Lord for 
all his goodness to me? 
The cup of salvation I will raise,
I will call on the name of the Lord. R 

How precious in the eyes of the Lord
is the death of his faithful.
Your servant am I, the son of your handmaid
you have loosened my bonds.

A thanksgiving sacrifice I make
I will call on the name of the Lord.
My vows to the Lord I will fulfil
before all his people.


दुसरे वाचन  १ करिंथ ११:२३-२६
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 
"जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची घोषणा करता."
पौल म्हणतो, जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, “हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा." मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, "हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता."
प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.


1 Corinthians 11:23-26

Brethren I received from the Lord what I also delivered to you
that the Lord Jesus on the night when he was betrayed book
bread, and when he had given thanks, he broke it, and said "This is my body, which is for you. Do this in remembrance of me" in the same way also he took the chalice, after supper saying, "This chalice is the new covenant in my blood Do this as often as you drink it, in remembrance of me  as often as you eat this bread and drink the chalice, you proclaim the Lord's death until he comes

जयघोष  
प्रभू म्हणतो मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, 
तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, 
जशी मी तुम्हांवर प्रीती केली 
तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.

Acclamation: 
  A new commandment I give to you, says the lord that you love one another just as I have loved you  

शुभवर्तमान योहान १३: १-१५
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "येशूने त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रेम केले. "
वल्हांडण सणापूर्वी येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनचा मुलगा यहुदा इस्कार्योत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन कमरेला बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “प्रभो, आपण माझे पाय धुता काय ?" येशूने त्याला उत्तर दिले “मी जे करतो ते तुला आता कळणार नाही, ते तुला पुढे कळेल.” पेत्र त्याला म्हणाला, “मी तुम्हांला माझे पाय कधीही धुवू देणार नाही.' येशूने त्याला उत्तर दिले, "मी तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुझा वाटा नाही.” शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, माझे केवळ पाय धुऊ नका, तर हात व डोकेही धुवा!” येशूने त्याला म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. कारण तो सर्वांगी शुद्ध आणि तुम्ही शुद्ध आहा, पण सगळेजण नाही.” कारण आपणांला धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता. म्हणून तो म्हणाला, “तुम्ही सगळेजण शुद्ध नाही."
मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, "मी तुम्हांला काय केले आहे हे तुम्हांला समजले काय ? तुम्ही मला गुरू व प्रभू असे संबोधता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. ह्यास्तव मी प्रभू व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हांला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.”

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 13:1-15

Before the Feast of the Passover, when Jesus knew that his hour had come to depart out of the world to the Father, having loved his own who were in the world, he loved them to the end. During supper when the devil had already put it into the heart of Judas Iscariot, samon's son, to betray him, Jesus, knowing that the Father had given all things into his hands, and that he had come from God and was going back to God, rose from supper. He laid aside his outer garments, and taking a towel, tied it around his waist. Then he poured water into a basin and began to wash the disciples feet and to wipe them with the towel that was wrapped around him. He came to Simon Peter, who said to him, "Lord, do you wash my feet? Jesus answered him, "What I am doing you do not understand now, but afterward you will understand." Peter said to him, "You shall never wash my feet." Jesus answered him, "If I do not wash you, you have no share with me." Simon Peter said to him, "Lord, not my feet only but also my hands and my head!" Jesus said to him, "The one who has bathed does not need to wash, except for his feet, but is completely clean. And you are clean, but not every one of you." For he knew who was to betray him; that was why he said, "Not all of you are clean." When he had washed their feet and put on his outer garments and resumed his place, he said to them, "Do you understand what I have done to you! You call me Teacher and Lord, and you are right, for so I am. If I then, your Lord and Teacher, have washed your feet, you also ought to wash one another's feet. For I have given you an example, that you also should do just as I have done to you.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन अपेक्षेशिवाय प्रेम करा, सेवा करा आणि द्याः आज रात्री, आपण स्मरण करतो तीन महान रहस्येः पवित्र युकारिस्टची स्थापना, येशूने त्याच्या शिष्यांचे पाय धुण्याचे नम्र कृत्य आणि याजकत्वाची स्थापना यासह प्रेमाची त्याची सर्वोच्च आज्ञा. ही रहस्ये आपल्याला अपेक्षा न करता प्रेम करण्यास  नम्रतेने सेवा करण्यास आणि पवित्र युकरिस्टवरील आपली भक्ती अधिक दृढ करण्यास प्रेरित करोत. येशू आपल्याला शिकवतो की खरे प्रेम म्हणजे इतरांसाठी स्वतःला रिकामे करणे. प्रेम म्हणजे परस्परसंवाद नाही; ते त्या बदल्यात काहीही अपेक्षा न करता देण्याबद्दल आहे. आपल्याला निःस्वार्थपणे प्रेम करण्यास, उदारतेने सेवा करण्यास आणि इतरांनीही असेच करावे अशी अपेक्षा न करता देण्यास बोलावले आहे. आपली अंतःकरणे आनंदाने भरून जावोत आणि आपल्या कृती प्रेम आणि नम्रता प्रतिबिंबित करतात, ख्रिस्ताच्या निःस्वार्थ सेवेचे उदाहरण अनुसरतात. क्रूसः मुक्तीचा मार्गः आज, आपण क्रुसाच्या पायथ्याशी उभे आहोत, ख्रिस्ताचे साक्षीदार आहोत.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुझ्या महान संस्कारातील कृपा अनुभवण्यास व सेवामय जीवन जगण्यास आम्हाला कृपा व प्रेरणा दे, आमेन.
✝️      
                   धर्मगुरूंसाठी प्रार्थना

हे प्रेमळ प्रभो, /आमच्या धर्मगुरूंचा / सांभाळ कर. / ते तुझे आहेत. तुझ्या पवित्र मंदिरात / त्यांच्या जीवनाचे दीपतेवत आहेत./ ते जगात आहेत, परंतु जगाचे नाहीत. / जेंव्हा त्यांना ऐहिक सुखाचा / मोह होईल तेव्हा तुझ्या हृदयात / तू त्यांना सुरक्षित ठेव. / ते एकाकी असताना, / तू त्यांना सांभाळ./ धर्मगुरू म्हणून / आपण करीत असलेला त्याग / व्यर्थ आहे, असे त्यांना वाटू लागेल / तेव्हा त्यांना दिलास दे. त्यांना तुझ्या शिवाय / कोणीच नाही, तरीही त्यांना संवेदनशील / मानवी हृदय आहे./ देहाचा दुर्बलपणा आहे, ह्याची आठवण ठेव. / जी पवित्र श्माकर / ते दररोज हाती घेतात, त्या भाकरीसारखे / त्यांना अतिनिष्कलंक ठेव. / त्यांचे सर्व विचार, शब्द आणि कृती / ह्यांना तू आशीर्वाद दे / आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या