उपवासकाळातील पाचवा सप्ताह
मंगळवार दि. २४ मार्च २०२६
“जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हांला समजेल की, तो मी आहेWhen you shall have lifted up the Son of man, then shall you know, that I am he,
स्वीडनच्या संत कॅथरीन
- कुमारिका (१३३१-१३८१)
स्वीडनचा राजपुत्र गुडमार्सन आणि संत ब्रिजिटा (सण २३ जुलै)
ह्यांचे चौथे अपत्य कॅथरीन ही राईसबर्ग येथील कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली होती. वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या वडिलांच्या आग्रहाखातर जर्मन सरदारपुत्र हगार्त वॉन कुऐर्नन ह्याच्याशी तिचे लग्न झाले. हा सरदारपुत्र नपुसंक होता. त्यामुळे कॅथरीन हिला वैवाहिक जीवनातील सुखाला पारखे व्हावे लागले. मात्र ही देवेच्छा मानून तिने आमरण कौमार्यपद हृदयाशी कवटाळले.
त्यांच्या लग्नानंतर अवघ्या तीन चार वर्षांनीच इ. स. १३४९ साली कॅथरीन विधवा झाली. त्यानंतर आपल्या आईला (संत ब्रिजिटा) तिच्या दानधर्माच्या व परोपकाराच्या कार्यामध्ये मदत करण्यासाठी कॅथरीन रोम येथे निघून गेली. त्याआधी तिची विधवा आई रोममध्ये विरक्तावस्थेत जीवन जगत होती.
इ. स. १३७२ साली ह्या दोन विधवा पवित्र स्त्रियांनी पवित्र भूमीची तीर्थयात्रा केली. दोनच वर्षांनी ब्रिजीटा रोम येथे मरण पावली. कॅथरीनने आपल्या आईचा मृतदेह स्वीडन येथे आणला आणि वाडस्टेना येथील ब्रिजेटाईन कॉन्व्हेंटमध्ये तिला पुरण्यात आले. आपल्या आईच्या मृत्यूनंतर कॅथरीनने त्या कॉन्व्हेंटची धूरा आपल्या खांदयावर घेतली आणि मोठ्या कौशल्याने व कर्तव्यतत्परतेने ही जबाबदारी पेलली.
त्यानंतर रोममधील प्रदीर्घ अशा भेटीनंतर २४ मार्च १३८१ रोजी कॅथरीनला देवाघरचे बोलावणे आले. तिने लिहिलेल्या "मानवी आत्म्याचा जल्लोष" नामक भक्तीमय पुस्तकाची प्रत दुर्दैवाने काळाच्या ओघात नष्ट झाली.
पहिले वाचन : गणना २१:४-९
