उपवासकाळातील पाचवा सप्ताह
बुधवार दि. २५ मार्च २०२६
पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव.
behold, you will conceive in your womb and bear a son, and you shall call his name Jesus.
प्रारंभापासून म्हणजे निर्मिती पासूनच देव मानवासोबत होता, मानवावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या देवाने वेळोवेळी मानवाला पश्चात्ताप करुन परत बोलाविले. आजच्या यशया संदेष्ट्याद्वारे देवाने महान संदेश दिला तो म्हणजे 'पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नांव इम्मानुएल (आमच्या सानिध्य देव) असे ठेविल.'
ख्रिस्तसभा आज, देवपुत्राच्या आगमनाचा दुताने मरियेला दिलेला संदेश हा सण साजरा करीत आहे. मानवाच्या तारणाची योजना अमलात आणण्यासाठी देवाने पापाचा कलंक नसलेल्या पवित्र मरियेची निवड केली. मरिया देवाला शरण गेली. आपल्या जीवनांचे समर्पण करुन मरियेने होकार दिला . देवाच्या सामर्थ्याचा अविष्कार पवित्र मरियेच्या जीवनात घडला आणि ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, असा राजा प्रभू येशू ख्रिस्त जगात आला.
पवित्र मरियेद्वारे इम्मानुएल (आमच्या सान्निध्य देव) ह्या भूतलावर
आला. प्रभू येशूने देवाचे प्रेम, देवाची शांती, देवाची दया, देवाची कृपा व देवाचा सहवास आम्हाला घडविला आहे. पवित्र मरिया मातेसारखे देवाच्या हाकेला प्रतिसाद देऊन समर्पित जीवन जगण्यासाठी प्रेरणा मागू या.
पहिले वाचन यशया ७ : १०-१४
वाचक : यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
परमेश्वर आहाजला म्हणाला, "तुझा देव परमेश्वर याच्याजवळ तू आपणासाठी चिन्ह माग, ते खाली अधोलोकात असो किंवा उर्ध्वलोकात असो." आहाज म्हणाला, "मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहाणार नाही." तेव्हा तो म्हणाला, "हे दावीदच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक : तुम्ही मनुष्यांना कंटाळा आणता हे थोडे झाले म्हणून माझ्या देवालाही कंटाळविता काय? म्हणून प्रभू स्वत: तुम्हास चिन्ह देत आहे. पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल आणि त्याचे नाव इम्मानुएल, म्हणजे, 'आम्हासह देव', असे ठेवील."
प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Isaiah 7:10-14; 8:10
In those days: The LORD spoke to Ahaz, "Ask a sign of the LORD your God; let it be deep as Sheol or high as heaven." But Ahaz said, "I will not ask, and I will not put the LORD to the test." And he said, "Hear then, O house of David! Is it too little for you to weary men, that you weary my God also? Therefore the Lord himself will give you a sign. Behold, the virgin shall conceive and bear a son, and shall call his name Immanuel. Take counsel together, but it will come to nothing speak a word, but it will not stand, for God is with us.
.jpg)