पुनरुत्थान पहिला सप्ताह
शनिवार ११ एप्रिल २०२६
"सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा."
"Go into all the world and proclaim the gospel to the whole creation.
संत स्टॅनिस्लॉस
महागुरु, रक्तसाक्षी (१०३०-१००५)
एक आदर्श महागुरू या नात्याने त्यांनी सत्य आणि न्याय्य हक्काविषयी जाहिरपणे ख्रिस्तसभेची भूमिका मांडली. त्यावेळी पोलंडचा राजा बोलेस्लॉस दुसरा आपल्या स्वैराचारी जीवनाद्वारे आणि आपल्या नोकरचाकरांना तुच्छतेने वागवून एक वाईट उदाहरण घालून देत होता. त्याचे परिवर्तन व्हावे म्हणून बिशप स्टॅनिस्लॉस ह्यांनी उपवास, प्रार्थना आणि अश्रुपूर्ण नयनांनी व गुडघे टेकून देवाकडे. आणि राजाकडे विनंती केली. परंतु राजाच्या दगडी हृदयाला अजिबात पाझर फुटला नाही. त्यामुळे बिशपांनी त्याला धर्मबहिष्कृत केले व कॅथिड्रलमधील सार्वजनिक उपासनाविधी राजालाही निर्भिडपणे बंद करून टाकल्या व शेवटी आपण स्वतः क्रॅकोव्हच्या एका छोट्याशा उपनगरातील लहानशा प्रार्थनागृहात जाऊन राहिले.
बिशपांचे हे धैर्य पाहून राजा खवळला. त्याने आपले हस्तक पाठवून बिशपांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष हे दूत बिशपांच्या समोर येऊन ठेपले तेव्हा या साधुपुरूषाला हात घालण्याचा त्यांना धीर होईना. शेवटी एके दिवशी बिशप महोदय मिस्साबली अर्पण करत असताना चवताळलेला राजा त्या प्रार्थना मंदिरात घुसला आणि आपल्या हाती असलेल्या धारदार तरवारीने त्याने त्यांच्यावर सपासप वार केले व शेवटी त्यांचा शिरच्छेद केला. परिणामत: पोप ग्रेगरी सातवें ह्यांनी संपूर्ण पोलंड देशाला धारेवर धरले व त्यांना कुठलीही आध्यात्मिक सेवा मिळण्यापासून परावृत्त केले.
ह्याचा परिणाम जनमाणसावर व्हायचा तोच झाला. लोकांनी बंड केले व राजा बोलेस्लॉस दुसरा ह्याला सन १०८१ साली गादीवरून पदच्यूत करून हद्दपार केले. दोनच वर्षांनी तो हंगेरी येथे मरण पावला.
पुढे पोप इनोसेंट चौथे ह्यांनी १२५३ साली बिशप स्टॅनिस्लॉस ह्यांना संतपद देऊन त्यांचा गौरव केला.
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये ४:१३-२१
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हांला शक्य नाही."
पेत्रचे व योहानचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून याजक, वडीलजन व शास्त्री आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. तरी बरा झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना काही विरुद्ध बोलता येईना. मग त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली आणि ते आपसांत विचार करून म्हणाले, “ह्या माणसांना आपण काय करावे? कारण त्यांच्याकडून खरोखरच अलौकिक चमत्कार घडला आहे, हे सर्व येरुशलेमकरांना कळून चुकले आहे, तेव्हा आपणाला नाकारता येत नाही. तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की, ह्यापुढे तुम्ही ह्या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये." मग त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका. परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की, देवाच्याऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा, कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हांला शक्य नाही. तेव्हा त्यांनी त्यांना पुन्हा ताकीद देऊन सोडून दिले. त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सुचेना, कारण घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक देवाचा गौरव करीत होते.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 4:13-21
In those days: When the rulers and elders and scribes saw the boldness of Peter and John, and perceived that they were uneducated, common men, they were astonished. And they recognized that they had been with Jesus. But seeing the man who was healed standing beside them, they had nothing to say in opposition. But when they had commanded them to leave the Council, they conferred with one another, saying, "What shall we do with these men? For that a notable sign has been performed through them is evident to all the inhabitants of Jerusalem, and we cannot deny it. But in order that it may spread no further among the people, let us warn them to speak no more to anyone in this name." So they called them and charged them not to speak or teach at all in the name of Jesus. But Peter and John answered them, "Whether it is right in the sight of God to listen to you rather than to God, you must judge, for we cannot but speak of what we have seen and heard." And when they had further threatened them, they let them go, finding no way to punish them,because of the people, for all were praising God for what had happened.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र स्तोत्र ११८:१,१४-२१
प्रतिसाद : प्रभो, तू माझे ऐकलेस.
१) प्रभूला धन्यवाद द्या कारण तो चांगला आहे.
त्याचे वात्सल्य अनंत आहे.
प्रभू माझा सामर्थ्यदाता आणि गीत आहे,
तो माझा उद्धारकर्ता झाला आहे.
नीतिमानांच्या तंबूतून आनंदाचा व
विजयाचा जयघोष होत आहे.
२) प्रभूचा उजवा हात उंचावला आहे.
प्रभूने उजव्या हाताने महान पराक्रम केला आहे.
मी मरणार नाही, मी जगेन आणि
परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन.
प्रभूने मला जबर शिक्षा केली आहे,
तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही.
३) माझ्याकरिता नीतिमंदिराची दारे उघडा.
मग आत जाऊन मी प्रभूला धन्यवाद देईन.
प्रभूकडे जायचे हे दार आहे.
यातून सज्जन प्रवेश करील.
प्रभू, तू माझे ऐकलेस, माझा उद्धारकर्ता झालास
म्हणून मी तुझे धन्यवाद गाईन.
Psalm 118:1 and 14-15ab, 15c-18, 19-21
I will thank you, Lord, for you have answered me. (Or: Alleluia)
Give praise to the Lord, for he is good;
his mercy endures forever.
and recount the deeds of the Lord.
The Lord is my strength and my song:
he was my saviour.
There are shouts of joy and
salvation in the tents of the just. R
"The Lord's right hand has done mighty deeds;
his right hand is exalted.
The Lord's right hand has done mighty deeds."
I shall not die, I shall live
The Lord punished me, punished me severely,
but did not hand me over to death. R
Open to me the gates of justice:
I will enter and thank the Lord.
This is the Lord's own gate, where the just enter.
I will thank you,
for you have answered, and you are my saviour. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूचा हा दिवस आहे ह्या दिवशी आपण उल्हास व आंनद करुया.
आलेलुया !
Acclamation:
This is the day the Lord has made, let us rejoice in it and be glad.
शुभवर्तमान मार्क १६:९-१५
वाचक :मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"सर्व जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करा."
आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी येशूचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मग्दालिया मरिया हिला दर्शन दिले, हिच्याचमधून त्याने सात भुते काढली होती. तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करीत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही. ह्यानंतर त्यांच्यापैकी दोघेजण अरण्यात चालले असता त्यांना तो दुसऱ्या रूपाने प्रकट झाला. त्यांनी माघारी जाऊन इतरांना सांगितले तरी त्यांनी त्याच्यावरही विश्वास ठेवला नाही.
नंतर अकरा जण जेवायला बसले असता त्यांनाही तो प्रकट झाला आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंतकरणाचा कठीणपणा ह्याविषयी त्यांना दोष लावला. मग त्याने त्यांना सांगितले की, "सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा."
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Mark 16:9-15
When Jesus rose early on the first day of the week, he appeared first to Mary Magdalene, from whom he had cast out seven demons. She went and told those who had been with him, as they mourned and wept. But when they heard that he was alive and had been seen by her, they would not believe it. After these things he appeared in another form to two of them, as they were walking into the country. And they went back and told the rest, but they did not believe them. Afterwards he appeared to the eleven themselves as they were reclining at table, and he rebuked them for their unbelief and hardness of heart, because they had not believed those who saw him after he had risen. And he said to them, "Go into all the world and proclaim the gospel to the whole creation.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आज आपल्यासाठी विश्वासाचा अभाव हा एक धोक्याचा इशारा आहे. साक्षी असूनही मेरी मॅग्दालीन आणि अम्माऊसच्या शिष्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला. पण जेव्हा येशूने त्यांच्यात पवित्र आत्मा फुंकला तेव्हा ते भित्र्यांपासून धाडसी साक्षीदारांमध्ये रूपांतरित झाले. ख्रिस्ताचा अनुभव इतरांसोबत शेअर करण्यापासून आपल्याला काय रोखते? भीती आहे, अपयश आहे की ऊबदार विश्वास आहेआपण उठलेल्या प्रभूला आपल्यावर उच्छ्वास सोडण्यास आमंत्रित करूया, संशयाची राख काढून टाकूया जेणेकरून आपल्यामध्ये आत्म्याची आग पुन्हा प्रज्वलित होईल. आपण देवाला आपले सामान्य जीवन घेऊन त्यांना असाधारण बनवू देऊ या का? आपण आपले वरवरचे प्रयत्न सोडून देऊ का आणि त्याचे महान साक्षीदार बनू का ?
प्रार्थना :हे प्रभू येशू, देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

0 टिप्पण्या